Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 16

2022-04-11 15:37:01 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
पाणी व्यवस्थापन
भुईमूग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे प्रमाण वाढते. फुल कळीतून सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये सुलभ व जलद घुसतात. शेंगांचे पोषण चांगले होऊन दर्जेदार उत्पन्न मिळते. उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची अवस्था, आऱ्या सुटण्याची अवस्था, शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
भुईमुगाची लागवड रुंद वाफा सरी (इक्रीसॅट) पद्धतीने केली असता, पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटानेदेखील पाणी देता येते. वेगळी रानबांधणी करावी लागत नाही. तुषार सिंचन पद्धत व प्लॅस्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते. प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
बाजरी
पाणी व्यवस्थापन
पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
539 views12:37
ओपन / कमेंट
2022-04-11 08:18:24 राज्यात उन्हाच्या झळा कायम; पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 11-Apr-22
पुणे : उत्तरेकडील राज्यांत अद्यापही उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याने आणखी दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानवाढ थांबण्याची चिन्हे नाहीत. उन्हाचा चटका कायम असताना पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारीही काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर-पश्चिम भारतामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेची स्थिती आहे. उत्तरेकडे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशपासून पंजाब, दिल्ली, हरियाणात उष्णतेची लाट आहे. राजस्थानमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने अतितीव्र स्वरूप घेतले आहे. या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही प्रामुख्याने विदर्भात सध्याही उष्णतेची लाट कायम आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र कमाल तापमान अद्यापही ४१ अंशांपुढे आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातही तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
555 views05:18
ओपन / कमेंट
2022-02-28 07:51:41 *कृषीपंप थकबाकी भरण्यास एक महिन्याची मुदत*

सौजन्य : सकाळ
दिनांक : 28-Feb-22

पुणे, ता. २७ : कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषिपंपाच्या थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिन्यांची मुदत राहिली आहे. त्यामुळे या मुदतीत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येणार आहे.
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण १५ हजार ९७ कोटी रुपये माफ केले आहेत. तर आतापर्यंत वीजबिलांच्या दुरुस्तीमधून ३०० कोटी २४ लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलापोटी ३० हजार ७०५ कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी ५० टक्के थकबाकीचा (ता. ३१) मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १५ हजार ३५२ कोटी ५० लाख रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे महावितरणने कळविले आहे.
आतापर्यंत २१ लाख ७९ हजार ८१६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना आतापर्यंत व्याज व दंड भरलेल्या रकमेएवढीच एकूण सहा हजार ७६९ कोटी ५० लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित ५० टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून राज्यातील तीन लाख ९७ हजार १९९ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. त्यांना उर्वरित ५० टक्के थकबाकीची ५७१ कोटी ८८ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. तर या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये सात लाख २७ हजार ६३७ शेतकरी सहभागी झाले असून त्यातील दोन लाख नऊ हजार ६३८ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
252 views04:51
ओपन / कमेंट
2022-02-25 07:57:04 सोयाबीन दराची मुसंडी रशिया, युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 25-Feb-22

पुणेः रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु होताच जागतिक सोयाबीन बाजारात मोठी तेजी आली. सोयाबीन दराने दशकातील विक्रम गाठला. यासोबतच देशातील बाजारांतही सोयाबीन दराने उसळी घेतली. देशात सोयाबीनला ६ हजार ते ७ हजार ७५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. युध्दाच्या परिस्थितीमुळे बाजारात आणखी चढ-उतार होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
रशिया, युक्रेनसह काळा समुद्रीय देशांत जागातीक एकूण सूर्यफूल उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के उत्पादन होते. तर याच देशांतून जागाच्या ७६ टक्के निर्यात होते. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सूर्यफूल तेल उपलब्धतेत अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयातेल आणि पामतेलाच्या दरात मोठी तेजी आली. एकूणच तेलबाजाराला दराची फोडणी मिळाली. पामतेलही विक्रमी पातळीवर पोचले आहे. बुर्सा मलेशियावर कच्च्या पामतेलाचे मार्चचे वायदे विक्रमी ७ हजार ४४ रिंगीट प्रतिटनांवर पोचले आहेत. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. तर चीनच्या बाजारात सोयापेंडच्या दरात जबरदस्त तेजी आली. त्यामुळे चीनी सरकाराने बाजारावरील युध्दाचे सावट दूर करण्यासाठी साठ्यातील सोयाबीन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.
आधीच ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला दुष्काळ आणि पासाचा फटका बसत आहे. त्यामुळे दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. आता युध्दाच्या परिस्थितीमुळे दरात मोठी तेजी आली. सीबाॅटवर सोयाबीन दराने विक्रमी १७५० सेंट प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. सोयाबीन दरात आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारही तेजीत : देशातील सोयाबीन दरही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशभरात सोयाबीन दर ६ हजार ते ७ हजार ७५० रुपयांवर पोचले होते. तर प्लांट्सचे दरही ७ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान राहिले. सोयाबीन दरात तेजी आल्यानंतर आवकही वाढली आहे. लातूर बाजार समितीत गुरुवारी १२ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर कमाल दर साडेसात हजारांवर पोचला होता. तर सर्वसाधारण दर ७ हजार ३५० रुपयांवर होता. मध्य प्रदेशातही सोयाबीन दराने साडेसात हजारांचा टप्पा पार केला. इंदोर बाजारात ६ हजार ५०० ते ७ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर देवास येथे सर्वसाधारण दर ७ हजार ४०० रुयांवर होता. उज्जैन येथेही सर्वसाधारण दर ७ हजार ४०० रुपयांवर होता.
युक्रेन आणि रशियातील युध्दामुळे सूर्यफूल तेलाचे उत्पादन आणि पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयातेल आणि पामतेलाला अचानक मागणी वाढून दर वाढले. परिणामी देशातील सोयाबीन बाजाराने उसळी घेतली. युध्दाची परिस्थिती केव्हा निवळेल यावर बाजाराचे भविष्य अवलंबून आहे. - अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायजरी
सोयातेलाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच ब्राझीलसह इतर देशांत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन दरात मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. दर सुधारल्याने सोयाबीनची आवकही वाढली आहे. - अशोक अगरवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
603 views04:57
ओपन / कमेंट
2022-02-17 07:19:15 प्रधानमंत्री सूूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर – कृषी मंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 17-Feb-22
मुंबई, दि. 16 : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ हजार २३० इतकी आहेत. बँकेने मंजूर केलेली प्रकरणे २३५ इतकी आहेत. आतापर्यंत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मिळालेले रु.६५ कोटी इतके अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. तरी सुध्दा ‘एक जिल्हा, एक उत्पादन‘ अंतर्गत निवडलेली उत्पादने तसेच जी.आय. मानांकन मिळालेल्या पिके व उत्पादनांची मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे, असेही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
178 views04:19
ओपन / कमेंट
2022-02-05 08:11:52 तापमानातील चढ-उतार सुरूच

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 05-Feb-22

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात कमाल तापमान तिशी पार गेले आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर व वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी धुके पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज (ता. ५) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. आज (ता. ५) आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पूर्वोत्तर राज्यामध्ये गारपिटीसह, पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात शुक्रवारी ८.६ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान देखील ३२ अंशांच्या पुढे गेले असून, सांगली, नांदेड, परभणी, अकोला, वर्धा व यवतमाळ येथे पारा ३३ अंशांच्या वर आहे. दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात १५ ते २२ अंशांची तफावत दिसून येत आहे.
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (१३.१), धुळे ३२ (९), जळगाव ३०.८ (१४.८), कोल्हापूर ३१.४ (१५.६), महाबळेश्‍वर २६.६ (११.८), नाशिक २८.३ (१२.३), निफाड २९.५ (८.६), सांगली ३४.३ (१३.४), सातारा ३१.६ (१३.१), सोलापूर ३५ (१४), सांताक्रूझ ३१.१ (१८), अलिबाग ३०.७ (१९.१), डहाणू २८.२ (१७.६), रत्नागिरी ३० (१८.४), औरंगाबाद ३०.६ (११.७), नांदेड ३३.२ (१३.८), उस्मानाबाद ३१.२ (१३.६), परभणी ३३.२ (१४.४), अकोला ३३ (१५.७), अमरावती ३१.८ (१३.१), बुलडाणा ३१.५ (१३.६), ब्रह्मपुरी ३१.३ (१७.२), चंद्रपूर ३१ (१५.४), गडचिरोली ३० (१४.८), गोंदिया २९.६ (१३.५), नागपूर ३१.६ (१३.२), वर्धा ३३.२ (१३.२), वाशीम ३५ (१३.५), यवतमाळ ३३ (१५.५)
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
420 views05:11
ओपन / कमेंट
2022-02-04 15:31:14 आजचा कृषी सल्ला
गहू
अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय
नत्र
जूनी पाने फिक्कट पिवळी दिसण्यास सुरुवात होते. यामुळे पिकवाढीचा वेग मंदावतो. पाने लहान राहतात. लक्ष न दिल्यास पाने टोकाकडून पिवळी पडत जाऊन गळून पडतात, फुटवे कमी राहतात, पीक खुजे राहते, ओंब्या लहान राहतात. पिक वेळेअगोदर पक्व होते.
उपाय
पीकवाढीच्या अवस्थेनुसार १०-२० ग्रॅम युरिया किंवा १९-१९-१९ हे विद्राव्य खत प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्फुरद
पानांवर, शिरावर व खोडावर जांभळे चट्टे दिसतात. जुन्या पानांवर प्रथम लक्षणे आढळतात. पिकवाढीचा वेग मंदावतो, ओंब्या लहान राहतात.
उपाय
डि.ए.पी. किंवा १२-६१-० हे विद्राव्य खत २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लोह
नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्याच राहतात. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पान पिवळे दिसते. जुनी पानेदेखील पिवळी पडू लागतात.
उपाय
फेरस सल्फेट ५ ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जस्त
कमतरता नवीन पानावर दिसून येते. शिरांमधील भाग पिवळा दिसून येतो. जर कमतरता जास्त प्रमाणात असेल, तर पाने पांढरट दिसतात आणि कालांतराने वाळतात. झाडाची उंची आणि पानांचा आकार कमी होतो.
उपाय
झिंक सल्फेट ५ ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
194 views12:31
ओपन / कमेंट
2022-02-03 15:00:06 आजचा कृषी सल्ला
हरभरा
घाटे अळी*
ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते.
एकात्मिक व्यवस्थापन
जमिनीची निवड करताना खरीप हंगामात सहजीवी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत.
जमिनीची खोल नांगरट करावी.
एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो.
पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.
तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
396 views12:00
ओपन / कमेंट
2022-02-03 08:02:13


ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित
"कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह" २०२२ दि ९ ते १३ फेब्रुवारी २०२२
ठिकाण : कृषि विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५
नाव नोंदणी करणे आवश्यक
प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी नोंदणी करावी.
मोठ्या गटांच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: ९०११०७६७०९/ ८३८००९३४०८
प्रती व्यक्ती प्रवेश शुल्क रु. ५० (कृषिक अॅपद्वारे २०% सवलतीत रु. ४०) कृषि तंत्रज्ञान सप्ताह स्थळी SMS दाखवून सवलतीचा लाभ घ्यावा.
सशुल्क प्रवेश, परंतु नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
408 views05:02
ओपन / कमेंट
2022-02-02 15:25:55 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
रोपवाटिकेची ट्रे पद्धत ट्रे पद्धतीने रोपे तयार करावयाची असल्यास ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमणे बी पेरावे. या पद्धतीत बियाणे वाया जात नाहीत. तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोईस्कर आहे.
वेल वर्गीय पिके
कलिंगड, खरबूज पिकामध्ये रोप वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ‘क्रॉप कव्हर’ (नॉन वूव्हन फॅब्रीक) तंत्राचा वापर २१ ते २५ दिवस करावा. याच्या वापरामुळे पिकाची वाढ आणि विकासासाठी आवश्यक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते. पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादनाचा दर्जा सुधारतो. तुलनेत पीक लवकर तयार होते. क्रॉप कव्हर हे पिकाचे धुके, थंडी, ऊन, गारा, अवकाळी पाऊस यांपासून संरक्षण करते. वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोगजंतू, किडींना अटकाव होतो. यामुळे पीक संरक्षण खर्चात व कष्टात बचत होते. पिकाच्या एकूण कालावधीमध्ये पीक संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या फवारण्यांची संख्या कमी लागते.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
449 views12:25
ओपन / कमेंट