Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला गहू अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय नत्र जू | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
गहू
अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय
नत्र
जूनी पाने फिक्कट पिवळी दिसण्यास सुरुवात होते. यामुळे पिकवाढीचा वेग मंदावतो. पाने लहान राहतात. लक्ष न दिल्यास पाने टोकाकडून पिवळी पडत जाऊन गळून पडतात, फुटवे कमी राहतात, पीक खुजे राहते, ओंब्या लहान राहतात. पिक वेळेअगोदर पक्व होते.
उपाय
पीकवाढीच्या अवस्थेनुसार १०-२० ग्रॅम युरिया किंवा १९-१९-१९ हे विद्राव्य खत प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्फुरद
पानांवर, शिरावर व खोडावर जांभळे चट्टे दिसतात. जुन्या पानांवर प्रथम लक्षणे आढळतात. पिकवाढीचा वेग मंदावतो, ओंब्या लहान राहतात.
उपाय
डि.ए.पी. किंवा १२-६१-० हे विद्राव्य खत २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लोह
नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्याच राहतात. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पान पिवळे दिसते. जुनी पानेदेखील पिवळी पडू लागतात.
उपाय
फेरस सल्फेट ५ ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जस्त
कमतरता नवीन पानावर दिसून येते. शिरांमधील भाग पिवळा दिसून येतो. जर कमतरता जास्त प्रमाणात असेल, तर पाने पांढरट दिसतात आणि कालांतराने वाळतात. झाडाची उंची आणि पानांचा आकार कमी होतो.
उपाय
झिंक सल्फेट ५ ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en