Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-09-01 14:49:50 *आजचा कृषी सल्ला*
*कांदा-लसूण*
खरीप कांद्याचे उभे पीक
नत्र खताचा पहिला हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-II ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्यावे. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
पीक संरक्षण
काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.
फुलकीडे नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान १ मि.लि.
फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
*टोमॅटो*
विषाणूजन्य रोगांचे लागवडीनंतरचे व्यवस्थापन
लागवडीवेळी वाफ्यावर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पेपरचा वापर करावा.
विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तणविरहित व स्वच्छ ठेवावेत.
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.
पांढरी माशी, फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिएकरी ४० ते ५० पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत.
लागवडीनंतर दहा दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ सीजी) १३ किलो प्रतिएकरी झाडाभोवती गोलाकार पद्धतीने घालून झाकावे व पाणी द्यावे.
पांढरी माशी, मावा, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. अथवा निंबोळी अर्क ५% किंवा अॅझाडीरॅक्टिन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. किंवा व्हर्टीसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम किंवा मेटॅरायझीयम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
फळधारणेनंतर जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, गाजर, काकडी, खरबूज, कलिंगड, भुईमूग, बटाटा, उडीद, सोयाबीन, मूग, पपई, कापूस, भोपळा, केळी, बीट, पालक ही टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची यजमान पिके आहेत. या पिकांत विषाणूजन्य रोगांची लागण झाली असल्यास, अशी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे. पीक तसेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊन प्रादुर्भाव वाढतो.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
27 views11:49
ओपन / कमेंट
2022-09-01 09:59:52 *पीकविमा योजनेंतर्गत ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ आजपासून*

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 01-Sep-22
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत देशभरात आजपासून (१ सप्टेंबर) ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हा उपक्रम ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’, या नावाने राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा ‘पॉलिसी’ घेतली आहे, त्या शेतकऱ्यांना विम्याची पावती घरपोहोच देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, खासदार, आमदार किंवा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना माझी पॉलिसी माझ्या हातात या उपक्रमांतर्गत विम्याची पावती देऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात यावा. विम्याची पावती देण्याचे नियोजन दिवसनिहाय करावे. त्यात लोकप्रतिनिधी, विमा कंपन्या, बँका, विकास सोसायटय़ा, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या सहभागाने पीकविमा शाळांचे आयोजन करण्यात यावे. या उपक्रमाची जाहिरात राज्य सरकारने सर्व माध्यमांद्वारे करावी. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आपण कोणत्या पिकाचा, किती क्षेत्राचा विमा काढला आहे, त्यात आपला हप्ता किती, राज्य-केंद्राचा हप्ता किती याची माहिती उपलब्ध करून दिली जावी.
यंदाच्या विमा योजनेवर दृष्टिक्षेप..
खरीप २०२२ हंगामात राज्यात ९६ लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले. खरीप २०२१ मध्ये या अर्जाची संख्या जवळपास ८४ लाख होती. गतवर्षीपेक्षा चालू हंगामात जवळपास १२ लाख जास्त अर्ज प्राप्त झाले. सन २०१६ पासून शेतकऱ्यांना २३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची नुकसानभरपाई विमा योजनेतून देण्यात आली.
‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ हा उपक्रम राज्यात आजपासून गावोगावी राबविण्यात येत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार अमरावती येथे या उपक्रमात सहभागी होणार आहेत. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते विमा पॉलिसींचे वितरण होईल. विमा शाळांचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी, शंकांचे निरसन करण्यात येईल. – विनयकुमार आवटे, मुख्य सांखिक, कृषी विभाग
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
151 views06:59
ओपन / कमेंट
2022-08-30 15:45:49 *आजचा कृषी सल्ला*
*आंबा*
आंबा झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यांवर दिसून येण्याची शक्‍यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे.
प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी १५ मि.मी. पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भाग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने अळीला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झालेल्या ठिकाणी त्वरित बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाहीत, याची नेहमी काळजी घ्यावी. नियमित बागेची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. त्यामुळे तेथून किडीचा संभाव्य प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
*संत्रा-मोसंबी-लिंबू*
कीड नियंत्रण
फळातील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून, त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. असे प्रकाश सापळे बनवून बागेत ठेवावेत. गळालेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावे. याशिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बगीचामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.
फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी ०.५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक २ मि.लि. मॅलॅथिऑन किंवा २ मि.लि. क्विनालफॉस प्रति लिटर पाण्यात द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा एकरी १० बाटल्या झाडावर अडकवून ठेवाव्यात. दर ७ दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.
कोळी - या कीडीचा प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा प्रोपरगा��ट (२० ईसी) १ मि.लि. किंवा इथिऑन (२० ईसी) २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
पाने खाणारी अळी – नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
44 views12:45
ओपन / कमेंट
2022-08-30 13:00:01

112 views10:00
ओपन / कमेंट
2022-08-30 07:51:55 ‘महा-ऊसनोंदणी’ अ‍ॅप शेतकर्‍यांना सुलभ; अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध

सौजन्य : पुढारी
दिनांक : 30-Aug-22
पुणे : राज्यात चालू वर्षी 1343 लाख मेट्रिक टन इतके विक्रमी ऊसगाळप अपेक्षित आहे. ऊसनोंदणीच्या कामी साखर आयुक्तालयाने ‘महा-ऊसनोंदणी’ अ‍ॅप विकसित केलेले आहे. ते शेतकर्‍यांना वापरासाठी अत्यंत सुलभ असून, सोमवारपासून गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी ते डाऊनलोड करून त्यावरून आपल्या चालू हंगामातील ऊसक्षेत्राची माहिती भरावी लागेल.
अ‍ॅपमध्ये ऊसलागवडीचा जिल्हा, तालुका, गाव व गट नंबरनिहाय माहिती भरल्यावर इतर माहितीसह ऊसक्षेत्राची माहिती भरावी. त्यानंतर कोणत्या कारखान्याला या ऊसनोंदणीसाठी कळवायचे, यासाठी कारखान्यांचे तीन पर्याय भरता येतील. आयुक्तालय ही माहिती संबंधित जवळच्या कारखान्याकडे पाठवून देईल. त्यानंतर शेतकर्‍याला साखर कारखान्यामधील आपली ऊसनोंदणीची माहिती पाहता येईल.
या अ‍ॅपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खासगी अशा एकूण 200 कारखान्यांकडे ऊसनोंदणीची माहिती पाठवू शकणार असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत अ‍ॅपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी विकास जगताप म्हणाले, ‘ऊसनोंदीचा अ‍ॅप मराठीत असून, वापरण्यास सुलभ आहे. शिवाय तांत्रिकदृष्ट्या तो सोपा व त्यामध्ये माहिती भरण्यास सोपा असल्याने आम्ही ऊसनोंदणी करू शकलो.’
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
186 views04:51
ओपन / कमेंट
2022-08-29 15:58:50
288 views12:58
ओपन / कमेंट
2022-08-29 15:58:43 *कृषिक अँप अपडेट*

* कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी *

!!!!! अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत *“कृषिक अॅप”*!!!!
त्वरित खाली देलेल्या लिंकवरून अॅप इनस्टॉल करून आधुनिक शेतीविषयक मोफत सेवेचा लाभ घ्या....
आपण कृषिक अॅपमध्ये काय नवीन पाहू शकता ?

*महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील तालुकानिहाय खत उपलब्धतेची माहिती*

*जमीन आरोग्यपत्रिका व कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसार पिकनिहाय खतमात्रा गणकयंत्र*

*विविध खतमात्रा संयोजनाचे पर्याय व अपेक्षित खर्च*

*जिल्हा निहाय व्हॉटसअप ग्रुप ची सुविधा*

अजून बरेच काही .....

*तरी आजच पुढे दिलेल्या लिंक वरून /गुगल प्ले स्टोअरवरून कृषिक अॅप अपडेट/ डाऊनलोड करून मोफत सेवेचा लाभ घ्या *
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
286 views12:58
ओपन / कमेंट
2022-08-29 08:07:22 *पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता*

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 29-Aug-22
पुणे : राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच उघडीप दिलेला पाऊस पुनरागमन करण्याची शक्यता आहे. आज (ता. २९) दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. बिहार आणि परिसरावर, उत्तर प्रदेश, तसेच केरळ परिसरावर वेगवेगळ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. विदर्भापासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अंदमान समुद्रापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
पावसाची उघडीप, अंशतः ढगाळ हवामान, स्वच्छ सूर्य प्रकाश यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील सातारा. सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह विदर्भातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सातारा, सोलापूर, सांगली, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
319 views05:07
ओपन / कमेंट
2022-08-26 15:02:03 *आजचा कृषी सल्ला*
*सोयाबीन*
रोग नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, पर्ण करपा आणि दाण्यांचा जांभळा रंग –
पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा पिकॉक्सीस्ट्रोबीन (२२.५२ एससी) ०.८ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१० %) + सल्फर (२५ % डब्ल्यूजी) २.५ ग्रॅम किंवा फ़्ल्युक्झॅपायरॉक्झॅड (१६७ g/L) + पायरॅक्लोस्ट्रोबीन (३३३ g/L एससी) ०.६ मि.लि. किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिन (१३३ g/L) + इपोक्झीकोनॅझोल (५० g/L एसई) १.५ मि.लि.
शेंगांवरील करपा –
टेब्युकोनॅझोल (२५.९ ईसी) १.२५ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१० %) + सल्फर (२५ % डब्ल्यूजी) २.५ ग्रॅम
*तांबेरा* –
हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मि.लि. किंवा क्रेसोक्झिम मिथाईल (४४.३ एससी) १ मि.लि. किंवा पिकॉक्सीस्ट्रोबीन (२२.५२ एससी) ०.८ मि.लि.
जिवाणूजन्य करपा –
कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम
*भात*
खत व्यवस्थापन
भात लागवडीसाठी एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश अशी शिफारस आहे. ही खत मात्रा हळव्या जातींमध्ये लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागवडीवेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
संकरित जातींकरिता एकरी ४८ किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश अशी शिफारस आहे. ही खत मात्रा लागवडीवेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
453 views12:02
ओपन / कमेंट
2022-08-26 07:53:26 *जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी मिळणार अनुदान*

सौजन्य : पुढारी
दिनांक : 26-Aug-22
पुणे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत परदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये क्षेत्र विस्तारासाठी फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन या घटकांचा समावेश आहे. विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी व डाळिंब या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकर्‍यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे. फुले लागवड या घटकामध्ये कट फ्लॉवर्स या घटकात अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा एक लाख असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा राहील.
कंदवर्गीय फुले : अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी खर्च मर्यादा दीड लाख प्रतिहेक्टरी आहे, तर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये प्रतिहेक्टरी राहील. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 37 हजार 500 प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा आहे.
सुटी फुले : अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इतर शेतकर्‍यांसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपये अनुदान प्रतिहेक्टरी आहे.
मसाला पीक लागवड : बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 30 हजार रुपये आहे, तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 12 हजार रुपये अनुदान राहील. बहुवर्षीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम रुपये 20 हजार अनुदान राहील.
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन : जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठीची खर्च मर्यादा प्रतिहेक्टरी 40 हजार रुपये असून खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान आहे.
विदेश फळपीक लागवड : ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी यांच्यासाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा 4 लाख रुपये आहे, तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रुपये प्रतिहेक्टरी अनुदान आहे . स्ट्रॉबेरी फळासाठीची खर्च मर्यादा 2 लाख 80 हजार रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार रुपये अनुदान आहे. पॅशन फ्रुट, ब्लुबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी प्रतिहेक्टरी खर्च मर्यादा एक लाख रुपये असून, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान आहे.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
414 views04:53
ओपन / कमेंट