Get Mystery Box with random crypto!

तापमानातील चढ-उतार सुरूच सौजन्य : अॅग्रोवन दिनांक : 05-Feb- | कृषिक अँप Krushik app

तापमानातील चढ-उतार सुरूच

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 05-Feb-22

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात कमाल तापमान तिशी पार गेले आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर व वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी धुके पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज (ता. ५) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. आज (ता. ५) आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पूर्वोत्तर राज्यामध्ये गारपिटीसह, पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात शुक्रवारी ८.६ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान देखील ३२ अंशांच्या पुढे गेले असून, सांगली, नांदेड, परभणी, अकोला, वर्धा व यवतमाळ येथे पारा ३३ अंशांच्या वर आहे. दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात १५ ते २२ अंशांची तफावत दिसून येत आहे.
शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (१३.१), धुळे ३२ (९), जळगाव ३०.८ (१४.८), कोल्हापूर ३१.४ (१५.६), महाबळेश्‍वर २६.६ (११.८), नाशिक २८.३ (१२.३), निफाड २९.५ (८.६), सांगली ३४.३ (१३.४), सातारा ३१.६ (१३.१), सोलापूर ३५ (१४), सांताक्रूझ ३१.१ (१८), अलिबाग ३०.७ (१९.१), डहाणू २८.२ (१७.६), रत्नागिरी ३० (१८.४), औरंगाबाद ३०.६ (११.७), नांदेड ३३.२ (१३.८), उस्मानाबाद ३१.२ (१३.६), परभणी ३३.२ (१४.४), अकोला ३३ (१५.७), अमरावती ३१.८ (१३.१), बुलडाणा ३१.५ (१३.६), ब्रह्मपुरी ३१.३ (१७.२), चंद्रपूर ३१ (१५.४), गडचिरोली ३० (१४.८), गोंदिया २९.६ (१३.५), नागपूर ३१.६ (१३.२), वर्धा ३३.२ (१३.२), वाशीम ३५ (१३.५), यवतमाळ ३३ (१५.५)
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en