Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला हरभरा घाटे अळी* ही हरभऱ्यावरील मुख्य किड आह | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
हरभरा
घाटे अळी*
ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते.
एकात्मिक व्यवस्थापन
जमिनीची निवड करताना खरीप हंगामात सहजीवी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.
पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत.
जमिनीची खोल नांगरट करावी.
एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो.
पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.
तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en