Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 66

2021-04-17 07:58:35 देशात यंदा सर्वसाधारण पाऊस; महाराष्ट्रात...

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 17-Apr-21
पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. सरासरीच्या ९८ टक्के नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये परिस्थितीनुरूप पाच टक्के कमीअधिक स्वरूपात तफावत असेल. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता अधिक आहे.
भारतीय हवामान विभागाने नैर्ऋत्य मॉन्सूनचा जून ते सप्टेंबर या चार महिने कालावधीतील पहिला टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज शुक्रवारी (ता. १६) जाहीर केला. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मॉन्सून समाधानकारक राहणार आहे. १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर अंदाजामध्ये १०० टक्के, तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्यातील अंदाजामध्ये १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा १०९ टक्के (अधिक ९ टक्के) पाऊस पडला होता.
महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज : मॉन्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने राज्यनिहाय पडणाऱ्या संभाव्य पावसाची स्थिती दर्शविणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे.
एल-निनो सर्वसामान्य राहणार : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रात गतवर्षाच्या अखेरच्या टप्प्यात ला निना स्थिती निर्माण झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ती सर्वोच्च स्थितीवर पोहोचली होती. मात्र २०२१ च्या सुरुवातीला ला-निना स्थिती निवळण्यास सुरुवात झाली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत जाणार आहे. मात्र मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात महासागराचे तापमान (एल-निनो स्थिती) सर्वसामान्य राहण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही हीच स्थिती नकारात्मक पातळीकडे झुकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील पाच वर्षांत हवामान विभागाने मॉन्सूनच्या हंगामातील (जून ते सप्टेंबर) कालावधीसाठी हवामान विभागाने दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)
वर्ष अंदाज पडलेला पाऊस
२०१६ १०६ ९७
२०१७ ९६ ९५
२०१८ ९७ ९१
२०१९ ९६ ११०
२०२० १०० १०९
यंदाच्या मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता
पावसाचे प्रमाण शक्‍यता
९० टक्‍क्‍यांहून कमी १४ टक्के
९० ते ९६ टक्के २५ टक्के
९६ ते १०४ टक्के ४० टक्के
१०४ ते ११० टक्के १६ टक्के
११० टक्‍क्‍यांहून अधिक ५ टक्के
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
415 views04:58
ओपन / कमेंट
2021-04-16 11:07:08 *आगामी पावसाळ्याचा अंदाज आज जाहीर होणार*

सौजन्य : प्रभात
दिनांक : 16-Apr-21
पुणे - भारतीय हवामानशास्र विभागातर्फे (आयएमडी) शुक्रवारी (दि.16) आगामी पावसाळ्यात पावसाची स्थिती काय राहील, याबाबतचा अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात याबाबत माहिती दिली जाणार आहे.
आयएमडीतर्फे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पावसाळ्याबाबत संकेत दिले जातात. विभागाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे, वातावरणातील सद्य:स्थितीचा अभ्यास करत हा अंदाज वर्तविण्यात येतो. नुकतेच “स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा देशात बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती सामान्य राहील, असा अंदाज देण्यात आला होता.
त्यानंतर आता शासनाचा अधिकृत विभाग असलेल्या “आयएमडी’तर्फे नेमके काय सांगितले जाणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कण असलेली शेती, नागरिकांना पिण्यासाठी, उद्योगांसाठी पाण्याची आवश्‍यकता असते, हे पाणी पावसामुळेच मिळत असल्याने सर्वच अंगांने पावसाचे प्रमाण कसे असेल, याचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे विभागातर्फे देण्यात येणारा हा अंदाज महत्त्वपूर्ण ठरतो.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
372 views08:07
ओपन / कमेंट
2021-04-16 08:31:46 ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 16-Apr-21
मुंबई, दि. १५ : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १, ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकुण ५ हजार ८२७ कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी ४,३७० कोटी २५ लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला होता, तो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजूर असलेला संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. आता प्राप्त झालेल्या बंधीत (टाईड) निधीमधून स्वच्छतेशी संबंधीत कामे, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, पर्जन्य जल संकलन (रेन वॉटर हार्वेस्टींग) तसेच पाण्याचा पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग) यासंदर्भातील कामे करता येऊ शकतील.
८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना
या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
372 views05:31
ओपन / कमेंट
2021-04-15 16:56:21 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
कांदा काढणीच्या १०-१५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० टक्के पातींच्या माना पडल्यानंतर कराव��. डेंगळे आलेले कांदे आढळल्यास त्वरित काढून टाकावेत. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटताना तुटते; परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो. त्यामुळे खर्च वाढतो. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. प्रत्येक वाफ्यातील कांदा अशारीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
542 views13:56
ओपन / कमेंट
2021-04-15 08:28:29 विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणार
@krushikappkvk
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 15-Apr-21
पुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. विदर्भातील बहुतांशी भागात सोमवारपर्यंत (ता. १९) मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
गेल्या आठवड्यापासून हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत वातावरण काही प्रमाणात कोरडे राहणार आहे. उत्तर कर्नाटक व परिसर आणि कोमोरीन परिसर व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहील.
राज्यात आठवडाभर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढउतार झाले आहे. काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. बुधवारी (ता. १४) सकाळी चोवीस तसांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.१ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्‍वर येथे १५.४ सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येथे अवकाळी ���ावसाची शक्यता :
गुरुवार : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ
शुक्रवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
शनिवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
रविवार : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
409 views05:28
ओपन / कमेंट
2021-04-14 15:30:17 आजचा कृषी सल्ला
डाळिंब
कोळी या किडीचा प्रादुर्भाव उष्ण आणि कोरड्या हवामानात जास्त प्रमाणात होतो. कोळीच्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या दोन प्रजाती डाळिंबावर निदर्शनास येतात. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. परिणामी, पानांच्या वरील बाजूचा रंग चंदेरी पांढरा दिसू लागतो. कालांतराने पूर्ण पाने विटकरी रंगाची होऊन वाळू लागतात आणि नंतर गळून पडतात. फळांवर देखील प्रादुर्भाव होऊन त्यांचा दर्जा खालावतो. कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ताण दिलेल्या किंवा विश्रांतीच्या अवस्थ्येमध्ये बागेकडे दुर्लक्ष करू नये. या काळात झाडे एकदम सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी व झाडांना जगण्याइतपत सिंचन देत राहावे.
केळी
सिंचनाच्या पाण्यातून खत व्यवस्थापन अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति झाड १५० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम पालाश व ६० ग्रॅम स्फुरद ठिबक सिंचनातून द्यावे.
ठिबक सिंचनातून खत व्यवस्थापन (खतांची मात्रा किलोमध्ये प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा) खतमात्रा देण्याची वेळ युरिया १२:६१:०० एम.ओ.पी. १ ते १६ आठवडे ४.५ ६.५ ३ १७ ते २८ आठवडे १३.५ ०० ८.५ २९ ते ४० आठवडे ५.५ ०० ७ ४१ ते ४४ आठवडे ०० ०० ५
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
408 views12:30
ओपन / कमेंट
2021-04-14 08:09:53 राज्यासह देशभरात यंदा सर्वसाधारण पाऊस; ‘स्कायमेट वेदर’चा अंदाज

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 14-Apr-21
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात मोसमी पावसाचे प्रमाण यंदा सर्वसाधारण असून दीर्घकाळ सरासरीच्या (लाँग पीरिअड अ‍ॅव्हरेज) १०३ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होईल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ संस्थेने मंगळवारी वर्तवला.
कोकण किनारपट्टी आणि गोव्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल; मात्र मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात सर्वसाधारण पाऊस होईल, असे या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण मोसमात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट या मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाच्या कालावधीत कर्नाटकातील अंतर्गत भागांतही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या प्रारंभी जून महिन्यात आणि अखेरीस म्हणजेच सप्टेंबरमध्ये देशभरात जोरदार पावसाचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.
‘अल निनो’ स्थितीमध्ये प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि याचा परिणाम म्हणून देशातील मोसमी पाऊस कमी होतो. यंदा मात्र ‘अल निनो’ स्थिती उद्भवण्याची शक्यता नाही. या उलट, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होऊन देशातील मोसमी पावसाच्या प्रमाणात वाढ होईल; म्हणजेच ‘ला निना’ स्थिती निर्माण होईल. त्यामुळे मोसमी पावसाच्या दीर्घकाळ सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता ६० टक्के आहे. सर्वाधिक म्हणजेच २८५.३ मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात ���ोईल. सर्वसाधारण पाऊस होण्याचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे. यापूर्वी १९९६, १९९७ आणि १९९८ अशी सलग ३ वर्षे सर्वसाधारण पाऊस झाला होता.
नेमका किती? : जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाची आतापर्यंतची दीर्घकाळ सरासरी ८८०.६ मिलिमीटर आहे. सरासरीच्या १०३ टक्के पाऊस यंदाच्या मोसमात होणार आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण समजला जातो.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
417 views05:09
ओपन / कमेंट
2021-04-12 16:20:28 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमूग पेरणीवेळी व आऱ्या सुटताना प्रत्येकी ८० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. भुईमूग पिकामध्ये प्रामुख्याने लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. लोहाची कमतरता दिसून आल्यास, फेरस सल्फेटची १ किलो प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करावी. जस्ताची कमतरता दिसून आल्यास, झिंक सल्फेट १ किलो प्रति एकरी फवारणीद्वारे द्यावे. बोरॉनची कमतरता असल्यास, बोरॉन ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी करावी.
सुर्यफुल
पूरक परागीकरण हे पीक पर परागसिंचित आहे. परागकण जड असल्यामुळे वाऱ्यापासून परपरागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते. मधमाश्यां द्वारे सर्वात जास्त परागीकरण होते. परंतु जर नैसर्गिक मधमाश्यात कमी आढळल्यास कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ होते.
मधमाश्यार परागीकरण - मधमाश्यान मध गोळा करीत असताना त्यांचे पाय, अंगाला परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर टाकले जाते. त्यामुळे परागीकरणास मदत होऊन बीजधारणा प्रमाण वाढते. प्रतिहेक्टारी किमान पाच मधमाश्यांरच्या पेट्या पुरेशा ठरतात.
हस्त परागीकरण - ज्या ठिकाणी मधमाश्यां चे प्रमाण कमी असते, तसेच मधमाश्याा पाळणे शक्यट नसते, अशा ठिकाणी हस्त परागीकरण करावे. हाताला तलम व मऊ कापड गुंडाळून फुलांवरून हलकासा हात फिरवावा. यामुळे एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलावर पडून परागीकरण होते. पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ या वेळेत एका आड एक दिवशी हस्त परागीकरण करावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
470 views13:20
ओपन / कमेंट
2021-04-10 08:26:44 राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन – कृषिमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : Mahasamvad
दिनांक : 10-Apr-21
मुंबई दि 9 : कृषी क्षेत्रातील नियोजनामध्ये गाव पातळीवरील शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी, गावातील प्रगतशील शेतकरी व कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
येत्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात मोहिम स्वरूपात जमीन सुपीकता निर्देशांकाचे फलक बसविण्यात आले असून त्या आधारे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 10% बचत करावी. तालुक्यातील उत्पादकता ही त्या तालुक्यामधील सर्वोत्कृष्ट उत्पादकता असणाऱ्या शेतकऱ्याइतकी करणे व वर्ष 2020-21 मध्ये कृषी विभागाचे प्राधान्याने कार्यक्रम राबविणे बाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
बैठकीस राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले की, ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील बियाणे, खते, व औषधे उपलब्धतेबाबत आढावा घेतला असून गतवर्षी सोयाबीन बियाणांचा उद्भवलेला तुटवडा लक्षात घेता सोयाबीन पिकाच्या उत्पादनाकरिता महाबीज मार्फत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
बीजी-2 कापसाच्या वाणांच्या वाढीव किंमतीची अधिसूचना मागे घेण्याभुसे तसेच रासायनिक खतांच्या किंमत वाढ मागे घेण्याबाबत केंद्र शासनास विनंती करणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे व औषधे यांच्या वाहतुकी दरम्यान येण���ऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी आयुक्त स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करणार आहे. रासायनिक खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देण्यासाठी रासायनिक खाते उत्पादक कंपन्यांना जिल्हानिहाय जबाबदारी देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
श्री. भुसे म्हणाले की, संयुक्त खताच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता युरिया खताची मागणी वाढू शकते. राज्यस्तरावर युरिया खताचा तुटवडा भासू नये म्हणून बफर स्टॉकची निर्मिती करावी. राज्यात रासायनिक खताचा मागील वर्षीच्या शिल्लक साठ्याची विक्री ही जुन्या दराने होईल हे कृषी विभागाने सुनिश्चित करावे.
हातकणंगले येथे काटेकोर शेती तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोपॉनिक युनिट, भाजीपाला युनिटची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती घेतली. राज्यातील पुरस्कार प्राप्त व प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी विस्तार कार्यात सहभाग वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांसोबतही श्री. भुसे यांनी संवाद साधला. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून नाविन्यपूर्ण व ग्राहकांची मागणी असलेल्या पिकांखाली क्षेत्र वाढविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
560 views05:26
ओपन / कमेंट
2021-04-09 13:42:49 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=257982322719663&id=1832292603705174
434 views10:42
ओपन / कमेंट