Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 65

2021-04-23 07:40:24 तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरींची शक्यता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 23-Apr-21

पुणे : मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. रविवारी (ता. २५) सोमवारी (ता. २६) सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
राज्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मागील चार ते पाच दिवस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा पुन्हा काहीसा कमी झाला आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमान कमीअधिक होत आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे सर्वांत कमी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
दोन दिवसांपासून दक्षिण तमिळनाडू या परिसरात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तर राजस्थानच्या आग्नेय भाग व परिसरात चक्रीय स्थिती सक्रिय असून, ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे.
शहरातील कमाल तापमान : मुंबई (सांताक्रूझ) ३२.६, अलिबाग ३३.६, रत्नागिरी ३३.५, पुणे ३७.१, जळगाव ३८, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्‍वर ३१.२, मालेगाव ३८.२, नाशिक ३५.८, सांगली ३८.२, सातारा ३७.४, सोलापूर ३९.७, औरंगाबाद ३७, परभणी ३९.७, नांदेड ३९.५, अकोला ३९.१, अमरावती ३८, बुलडाणा ४०.४, चंद्रपूर ४१, गोंदिया ३८, नागपूर ३९.२, वर्धा ४०.१
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
54 views04:40
ओपन / कमेंट
2021-04-22 17:05:12 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण

खरीप कांदा ऑक्टोवबर ते नोव्हेंबर या महिन्यात बाजारपेठेत आणता आला तर चांगला दर मिळतो. त्यासाठी बियाणे पेरणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात करून रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कांदा काढणीला येतो. या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर यांनी विकसित केलेल्या भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, भीमा डार्क रेड, तर पांढऱ्या जातींमध्ये भीमा शुभ्रा, भीमा श्वेीता, भीमा सफेद तसेच अन्य कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या बसवंत ७८०, फुले समर्थ किंवा ॲग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण जातींची निवड करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
111 views14:05
ओपन / कमेंट
2021-04-22 13:05:17 *प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर*
अशी घ्या पिकांची काळजी.....!
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*90750 99544*
https://api.whatsapp.com/send?phone=919075099544
*करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा* या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा
*फायदे :-*
नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
हमखास व खात्रीशीर फायदा.
सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.
*ऑफर्स*
२०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ३५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ४५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ३५० मध्ये २०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ६७० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ७७०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ६७० मध्ये ४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
१ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर- मूळ किंमत रु. १६५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. १७५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. १६५० मध्ये १ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
165 views10:05
ओपन / कमेंट
2021-04-22 13:05:02
Photo from Krushikapp
157 views10:05
ओपन / कमेंट
2021-04-22 08:16:38 मार्केटयार्डात गुळ-भुसार व्यवहाराच्या वेळेवर मर्यादा; सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत परवानगी

सौजन्य : सकाळ
दिनांक : 22-Apr-21
पुणे : मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार थाबविण्यावर बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे गुळ-भुसार बाजार सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच सुरू राहणार आहे. गर्दी टाळण्यासाठी या विभागातील व्यवहाची वेळ कमी करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांनी मर्यादित मालाची आवक मागवून सायंकाळी चारपर्यंतच लोडींग आणि अनलोडींग करायची आहे. तसेच चार वाजल्यानंतर बाजारात कोणीही थांबू नये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भुसार विभागातील व्यवहाराची वेळ कमी करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आदी विभागातील व्यवहाराची वेळ पहाटे ३ ते दुपारी १ अशी करण्यात आलेली आहे. तर भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभाग बाह्य पाकळ्या आणि अंतर्गत पाकळ्या दिवसाआड सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात बाजार प्रशासनाला यश आले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
बाजरात पासशिवाय प्रवेश नाही, किरकोळ व डमी विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील बहुतांश विभागातील गर्दी कमी झाली आहे. रिक्षाला बंदी घालण्यात आली आहे. मार्केट यार्डात येणारे सर्व रस्ते बॅरिगेटन लावून अडविण्यात आले आहेत. माल घेऊन येणाऱ्या तसेच माल घेऊन जाणाऱ्या चाहनांसाठी वेगवेगळ्या गेटने प्रवेश दिला जात आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी बाजार समितीचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी खबरदारी घेत आहेत. त्यामुळे नेहमी गर्दीने गजबजणाऱ्या मार्केटयार्डातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
''मार्केट यार्डातील किराणा दुकानांना महापालिकेने दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोविडचे सर्व नियम पाळून त्यांनी दुकाने सुरू ठेवायची आहेत. अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.'' - मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
बाजारात ८२६ वाहनांतून आवक : भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात ८२६ वाहनातून विविध प्रकारच्या भाज्या, कांदा-बटाटा आणि फळांची बुधवारी आवक झाली. या वाहनांतून १७ हजार ७८८ क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी आला होता. तर कांद्याची ४ हजार ५३० किंटलची आवक झाली. कडक निबंध असले, तरी बाजारात विक्री आवक होत आहे. योग्य नियोजनामुळे बहुतांश मालाची विक्रीही होत असल्याची माहिती फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आणि तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
209 views05:16
ओपन / कमेंट
2021-04-21 08:28:04 ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 20-Apr-21
कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे बदल खालीलप्रमाणे असतील व २० एप्रिल २०२१ संध्याकाळी आठ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील.
- सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांची दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील.
- वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते.
- स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.
- या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम 13 एप्रिल 2021 रोजी राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
81 views05:28
ओपन / कमेंट
2021-04-20 16:15:20 आजचा कृषी सल्ला
खोडवा ऊस
ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट व्यवस्थापन असे करावे
खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास, शेतातील पाचट पेटवू नये किंवा शेताबाहेर काढू नये.
खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे, म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.
पाचट कुट्टी मशिनच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
पाचट कुजविण्यासाठी पाचटावर एकरी १ पोते युरिया व १ पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर एकरी ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन टाकावे.
ऊसाच्या बुडख्यांचे व मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी व काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.
साखर कारखान्यातील मळी किंवा मळीचे कंपोस्ट एकरी २.५ टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
पलटीच्या सहाय्याने पाचट जमिनीत गाडावे (माती आड करावे) आणि आवश्यकता असल्यास शेताला पाणी द्यावे. अशा प्रकारे पाचट दोन ते तीन महिन्यांत चांगल्याप्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
129 views13:15
ओपन / कमेंट
2021-04-19 15:46:54 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
फळ पोखरणारी एक अळी ही २ ते ८ फळांचे नुकसान करू शकते. जवळपास ही कीड पिकाचे ७०-८० टक्के नुकसान करते. ते टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. पुनर्लागवडीवेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी. तसेच झेंडूही लावावा. लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा प्रेटीओसम हे मित्रकीटक एकरी ४०,००० या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने दोन ते तीनवेळा सोडावेत. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात. परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होते. फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी त्यांना रोगकारक ठरणाऱ्या विषाणूंचा वापर करता येतो. हेलीकोव्हर्पा न्यूक्लिअर पॉलिहायड्रॉसीस व्हायरस (एचएएनपीव्ही) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंब आधारित ॲझाडिरेक्टीन (३,००० पीपीएम) २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी. बीटी जिवाणूजन्य किटकनाशक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. शेतात एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. वेळोवेळी किडलेली फळे गोळा करून खोल खड्ड्यात गाडून टाकावीत. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीजवळ (१ पतंग/मीटर ओळीत किंवा २ टक्के नुकसान) असल्यास, क्विनॉलफॉस (२५ ईसी) १ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.८ मि.लि. किंवा फ्लुबेंडिअमाईड (२० डब्लूजी) ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर गेल्यास, नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) ०.७५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
186 views12:46
ओपन / कमेंट
2021-04-18 17:46:00 आजचा कृषी सल्ला
पूर्वहंगामी ऊस
ऊस हे उष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० टक्के आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते. तथापि कडक उन्हाळा, तसेच कमी पाऊसमान याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना :
को ८६०३२ व कोएम ०२६५ हे वाण अन्य जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यांना प्राधान्य द्यावे.
पाणी उपलब्धता कमी असल्यास, एक आड एक सरीतून पाणी द्यावे.
पाण्याचा ताण पडत असल्यास, उभ्या उसाची खालील पक्व तसेच वाळलेली पाने काढून सरीत आच्छादन करावे.
ताण अवस्थेत लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
ऊस पीक हे तणविरहीत ठेवावे.
शेताच्या सभोवती उंच जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
एकरी २ ते २.५ टन पाचटाचे आच्छादन करावे. प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
266 views14:46
ओपन / कमेंट
2021-04-17 17:28:33 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
पाणी व्यवस्थापन भुईमूग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे प्रमाण वाढते. फुल कळीतून सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये सुलभ व जलद घुसतात. शेंगांचे पोषण चांगले होऊन दर्जेदार उत्पन्न मिळते. उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची अवस्था, आऱ्या सुटण्याची अवस्था, शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. भुईमुगाची लागवड रुंद वाफा सरी (इक्रीसॅट) पद्धतीने केली असता, पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटानेदेखील पाणी देता येते. वेगळी रानबांधणी करावी लागत नाही. तुषार सिंचन पद्धत व प्लॅस्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते. प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
332 views14:28
ओपन / कमेंट