Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 64

2021-04-27 08:24:02 मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर निर्बंध

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 27-Apr-21
पुणे : सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा प्रांत असलेल्या इंदूरमधून परराज्यात बियाणे विक्रीस मध्य प्रदेश सरकारने मनाई केली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बियाणे टंचाईचे सावट आणखी गडद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्य प्रदेशातील बियाणे उद्योगावर किसान कल्याण तथा कृषी विकास संचालनालयाचे नियंत्रण आहे. इंदोर जिल्हा किसान कल्याण विभागाच्या उपसंचालकांनी २० एप्रिल रोजी जारी केलेल्या एका आदेशानुसार (२०२१-२५३४) बियाण्याची विक्री आता संबंधित कंपन्यांना मनमानी पद्धतीने करता येणार नाही.
प्रमाणित, सत्यप्रत किंवा संशोधित केलेले कोणतेही बियाणे जिल्हा किंवा राज्याच्या बाहेर आमच्या मान्यतेशिवाय विकता येणार नाही, असे मध्यप्रदेश कृषी विभागा��्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘‘खरीप हंगामासाठी बियाण्याच्या मागणीच्या तुलनेत बिजोत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे आम्ही विक्रीवर निर्बंधांबाबत आदेश जारी करीत आहेत. बियाणे कंपन्यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये; अन्यथा बियाणे कायदा १९६६ प्रमाणे कंपन्यांवर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा तेथील कृषी विभागाने दिला आहे.
मध्य प्रदेशातील बियाणे उद्योग या नव्या निर्बंधांमुळे हादरला आहे. तेथील कंपन्या अब्जावधी रुपयांचे बियाणे परराज्यात विकतात. त्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील बियाणे कंपन्या तसेच विक्रेत्यांशी करार करतात. या करारापोटी कोट्यवधी रुपयांच्या आगाऊ रकमा या कंपन्यांकडून गोळा केल्या जातात. अशा स्थितीत परराज्यात बियाण्यांची डिलिव्हरी न केल्यास मध्यप्रदेशातील स्थानिक बियाणे कंपन्या कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
‘‘महाराष्ट्राच्या कृषी विभागाने मध्यप्रदेशातील बियाणे कंपन्यांचा अकारण छळ केला आहे. त्यामुळे देखील यंदा अनेक कंपन्या कमी माल पुरवणार होत्या. महाराष्ट्र सरकारने ‘इन्स्पेक्टर राज’ला आवर घालावा; अन्यथा बियाणे टंचाई जास्त तीव्र होईल व त्याची जबर किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागेल,’’ अशी भीती मध्यप्रदेशातील बियाणे उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेशात यंदा सोयाबीनचे कमी बीजोत्पादन झाले आहे. त्यामुळे टंचाई राहील ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यामुळे कृषी खात्याने परराज्यात बियाणे विक्रीवर लावलेले निर्बंध चुकीचे आहेत. ते हटविण्यासाठी आम्ही राज्याच्या कृषिमंत्र्याकडे दाद मागणार आहोत. - मनिष काबरा, सचिव, सीडस् असोसिएशन ऑफ मध्यप्रदेश
निर्णयाचा महाराष्ट्राला फटका...
- विक्रीवर निर्बंध चालू ठेवल्यास महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
- इंदूर भागातून किमान ८ लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
- यंदा पुरवठ्यात २० ते ३० टक्के घट होण्याची शक्यता
- शेतकऱ्यापुढे बियाणे मिळवण्यासाठी वाट खडतर
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
108 views05:24
ओपन / कमेंट
2021-04-26 17:05:39 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-

हिरव्या चाऱ्याची लागवड करताना केवळ मका हेच पीक विचारात न घेता जास्त प्रथिनेयुक्त चाऱ्यामुळे पशुखाद्याच्या खर्चात बचत करता येते. हिरवा मक्यामध्ये केवळ ६ ते ७ टक्के प्रथिने असतात. नवीन जास्त प्रथिनेयुक्त चाऱ्याच्या जाती जसे की, डी.एच.एन.-६, लसूण घास इत्यादींची निवड करावी. या चाऱ्यात प्रथिने १५ ते २१ टक्के इतकी जास्त असतात. जेणेकरून खाद्यावरचा खर्च कमी करता येईल. पशुआहारामध्ये जास्त खर्च हा प्रथिनावर केला जातो. एक किलो हिरव्या मक्यामध्ये कोरड्या तत्त्वावर केवळ ६० ते ७० ग्रॅम प्रथिने मिळतात. तर एक किलो लसूण घास खाऊ घातल्यास कोरड्या तत्त्वावर २०० ग्रॅम प्रथिने जनावरांना मिळतात. इतकी प्रथिने पशुखाद्यामधून कमी करता येतात, उदा. ५ किलो ओल्या लसूण गवतामागे १ किलो पशुखाद्य कमी करता येऊ शकते. गाई, म्हशींना त्यांच्या वजनाप्रमाणे व दूध उत्पादनाप्रमाणे नेमके व मोजून पशुखाद्य व चारा दिल्यास होणारा अतिरिक्त खर्च टाळता येईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
186 views14:05
ओपन / कमेंट
2021-04-26 09:12:43 सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती भाजीपाला गुणवत्ता केंद्र
*हळद लागवड तंत्रज्ञान* परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक: श्री. संतोष करंजे
विषय विशेषज्ञ (कृषीविद्या),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - २७/०४/२०२१
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्या पर्यंत पोहचवावी ही विनंती
#krushikapp_Facebook_Live
385 views06:12
ओपन / कमेंट
2021-04-26 09:12:40
220 views06:12
ओपन / कमेंट
2021-04-26 08:46:48 सिंचन ठेकेदारांवर अंकुश; निविदा भरण्यापूर्वी प्रकल्पस्थळाची पाहणी बंधनकारक

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 26-Apr-21
मुंबई : राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढवण्यासाठी ठेके दार डावपेच आखतात. त्यांना लगाम घालण्यासाठी प्रकल्पस्थळांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यानुसार यापुढे निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी करतानाच निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना प्रकल्पस्थळाच्या भेटीचे ‘जिओ टॅगिंग’ बंधनकारक करण्यात आले आहे.
सिंचन प्रकल्पांची कामे अनेक कारणांनी रखडतात. त्यामध्ये भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांना विरोध करण्यापासून प्रकल्प उभारणीसाठी लागणारे गौण खनिज आणि अन्य साहित्याची अनुपलब्धता या कारणांमुळेही प्रकल्प रखडतात. आम्ही धरणस्थळाची पाहणी केली नव्हती, त्यामुळे बांधकामासाठी लागणारे गौण खनिज आणि अन्य आवश्यक साहित्य जवळ उपलब्ध होत नसल्याने काम परवडत नसल्याची सबब पुढे करीत अनेक ठेकेदार प्रकल्पाची किंमत वाढवून मागतात. त्यातूनही प्रकल्पांची कामे रखडतात. त्यामुळे यापुढे कोणताही सिंचन प्रकल्प ठरलेल���या कालावधीतच पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रियेमधील पळवाट दूर करण्याचा निर्णय जलसंपादन विभागाने घेतला आहे. त्यासाठी सध्याच्या निविदा प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करताना ठेकेदारांच्या पळवाटाही बंद करण्याचा प्रयत्न के ल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सध्याच्या काळात ई-निविदेच्या माध्यमातून प्रकल्पाची माहिती सर्वदूर पोहोचविता येत असल्याने यापुढे वर्तमानपत्रांतील जाहिरातीमध्ये निविदेसाठी देण्यात येणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० कोटी रुपयांच्या आतील कामांसाठी पूर्वी दीड महिन्यांचा कालावधी दिला जात असे. तो कमी करून आता तीन टप्प्यांसाठी अनुक्रमे १५ दिवस, पहिल्या मुदतवाढीसाठी दहा दिवस आणि दुसऱ्यांदा मुतदवाढीसाठी सात दिवस करण्यात आला आहे. तर ५० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांच्या निविदांचा कालावधी २१ दिवस, दुसऱ्यांदा मुदतवाढीसाठी १५ दिवस, तर तिसऱ्या वेळी केवळ दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
कामातील दिरंगाई टाळण्यासाठी… : सिंचन प्रकल्पाची निविदा भरण्यापूर्वी संबंधित ठेके दारांना धरणस्थळ, गौण खनिज क्षेत्र व इतर महत्त्वाच्या कार्यक्षेत्राची स्थळ पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. ठेकेदारांनी अधिकाऱ्यांसह प्रकल्पस्थळांना भेट देऊन त्याचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असेल. त्यामुळे गौण खनिज वा अन्य कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडल्यास कोणतीही सबब ठेकेदारांना सांगता येऊ नये, यासाठी ही नवीन तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
227 views05:46
ओपन / कमेंट
2021-04-25 08:41:35 राज्यातील कृषी पदव्यांना ‘बीएस्सी अ‍ॅग्रि’ समकक्षतेचा दर्जा

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 25-Apr-21
पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम बीएस्सी अ‍ॅग्रि (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाला समकक्ष ठरवण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या नावांमध्ये बदल झाल्याने कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षा देण्यात अडचणी येऊ लागल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला.
सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित के ले आहे. त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, या नामबदलामुळे कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येतात. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी परिषदेच्या १०४ व्या बैठकीत विविध कृषिपदवी अभ्यासक्रमांना बीएस्सी अ‍ॅग्रि अभ्यासक्रमाच्या पदवीच्या समकक्षतेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीएस्सी अ‍ॅग्रि समकक्षतेचा दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांमध्ये बीएस्सी उद्यानविद्या, बीएस्सी वनविद्या, बीएस्सी सामाजिक विज्ञान, बीएफएस्सी (मत्स्य विज्ञान), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीटेक (अन्न तंत्रज्ञान), बीटेक (जैव तंत्रज्ञान), बीएस्सी (एबीएम)/ बीबीएम (कृषी)/ बीबीए (कृषी), बीएस्सी कृषिव्यवसाय व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी शाखेत विविध अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि परीक्षांना अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे राज्यातील विविध कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी *आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.**
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
207 views05:41
ओपन / कमेंट
2021-04-24 17:13:08 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) ७० ग्रॅम अधिक मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट ५० ग्रॅम प्रति १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उष्ण व कोरड्या हवामानात उन्हाळी भुईमूग पिकात तुडतुडे व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी, थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम किंवा डायमेथोएट १.४ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पिकास पाणी देताना तुषार सिंचनाचा वापर करावा. शक्यतो सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
259 views14:13
ओपन / कमेंट
2021-04-24 08:35:45 धिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल.
-एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
41 views05:35
ओपन / कमेंट
2021-04-24 08:35:45 शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?

सौजन्य : सकाळ
दिनांक : 24-Apr-21
सोलापूर : राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार "शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना आणली आहे. नुकतीच ही योजना राबविण्यास मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये 1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, 2. शेळी पालनासाठी शेड बांधणे, 3. कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे, 4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी अनुदान दिले जाणार आहे.
असे मिळणार अनुदान
*गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक ग���रांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
*शेळीपालन शेड बांधकाम : 10 शेळ्यांकरिता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. जर अर्जदाराकडे 10 शेळ्या नसतील तर किमान दोन शेळ्या असाव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
*कुक्कुटपालन शेड बांधकाम : 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.
*भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग : शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
असा करा अर्ज
-या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. अर्जाच्या नमुन्यानुसार...
-सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.
-त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.
-त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका.
-आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
-येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
-इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
-त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.
-तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.
-लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास "हो' म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.
-रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
-अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
-शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
-यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
-यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगितले जाईल.
-त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अ
41 views05:35
ओपन / कमेंट
2021-04-23 17:54:28 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
पिनवर्म (टुटा अबसोलुटा) उन्हाळी हंगामात या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे ४०-१०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकाच्या पाने, फळे आणि खोडावर आढळून येतो. किडीची अळी प्रथम पानांच्या दोन्ही पापुद्रांमधील हरितद्रव्य खाते. पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरट पापुद्रे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात व गळून पडतात. नंतर अळी कोवळे शेंडे, खोड व फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते.
एकात्मिक व्यवस्थापन
पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोचप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत.
पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.
शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत.
काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
शेतात परोपजीवी मित्र किटकांचे (ट्रायकोग्रामा अॅची, नेसिडोकोरस, नेबीस, मॅक्रोलोफस, नेक्रीमस) संवर्धन करावे.
बॅसिलस/मेटारायझीअम/बिव्हेरिया या जैविक कीडनाशकांची २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
किडीची कोषावस्था जमिनीवर आणि मल्चिंग पेपरवर आढळून येते. यासाठी जमिनीवर, मल्चिंग पेपरवर मेटारायझीअमची फवारणी करावी.
कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण जास्त आढळल्यास, झाडाच्या बुंध्याजवळ रिंग/स्पॉट पद्धतीने फिप्रोनिल १ मि.लि. किंवा क्लोडरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे आळवणी करावी.
आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशक क्लो.रअँट्रॅनिलीप्रोल ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब ०.७५ मि.लि. किंवा स्पिनोसॅड ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
148 views14:54
ओपन / कमेंट