Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 62

2021-05-06 17:43:52 आजचा कृषी सल्ला
आले
लागवड पद्धती
सपाट वाफे पद्धत : पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सेंमी किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
सरी-वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सेंमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत : काळी जमीन, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने १५ ते २० टक्के अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादीवाफ्याची लांबी ठेवावी. गादीवाफे तयार करताना दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.२० ते १.५ मीटर ठेवावे. गादीवाफ्यावर २ ओळी लावायच्या असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सेंमी व उंची ३० सेंमी ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी, दोन कंदामधील अंतर २२.५ सेंमी ठेवावे. गादीवाफ्यावर ३ किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असल्यास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरीतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सेंमी अंतर ठेवावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
213 views14:43
ओपन / कमेंट
2021-05-06 08:05:19 आजपासून ‘पूर्वमोसमी’ची शक्यता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 06-May-21
पुणे : विदर्भ ते केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या चटक्यासह पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. आजपासून (ता. ६) पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
मे महिना सुरू झाल्याने पूर्वमोसमी पाऊस, उन्हाचा चटका, ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राज्यात राहणार आहे. दोन दिवसांपासून सकाळपासून वाढत असलेला पारा दुपारी सरासरी ओलांडत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानाची स्थिती होत आहे. काही ठिकाणी ढग जमा होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार होत असला तरी उकाड्यात मात्र वाढ होताना दिसून येते. बुधवारी (ता. ५) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर महाबळेश्वर येथे ���८.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारनंतर नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या होत्या. तर बुधवारी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होते. बार्शीमध्ये दुपारी तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
गुरुवार : सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ
शुक्रवार : संपूर्ण महाराष्ट्र
शनिवार : संपूर्ण महाराष्ट्र
रविवार ; संपूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
275 views05:05
ओपन / कमेंट
2021-05-05 17:19:44 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो

टोमॅटो पिकाची फुलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, जास्त आर्द्रता, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांमधील वाढसंप्रेरकांत होणारे बदल या कारणांमुळे होते. टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४ सीपीए या वाढ संप्रेरकाची ५० ते १०० मिलीग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
287 views14:19
ओपन / कमेंट
2021-05-05 13:33:44 काही तांत्रिक अडचणीमुळे आजचा 'आले लागवड तंत्रज्ञान' परिसंवाद रद्द केला आहे. लवकरच आपल्याला ह्या परिसंवादाची तारीख कळवण्यात येईल.
- कृषिक अॅप
21 views10:33
ओपन / कमेंट
2021-05-05 09:36:33 सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती भाजीपाला गुणवत्ता केंद्र
*आले लागवड तंत्रज्ञान* परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक: श्री. संतोष करंजे
विषय विशेषज्ञ (कृषीविद्या),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - ०५/०५/२०२१
*वार*- बुधवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्या पर्यंत पोहचवावी ही विनंती
#krushikapp_Facebook_Live
111 views06:36
ओपन / कमेंट
2021-05-05 09:36:29
108 views06:36
ओपन / कमेंट
2021-05-04 16:11:56 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
रब्बी (उन्हाळ) कांदा काढणी काढणी अगोदर २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात तीन दिवस सुकू द्यावा. त्यानंतर २ ते २.५ सें.मी. लांब नाळ (मान) ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १०-१२ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो. बऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून ���ांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
40 views13:11
ओपन / कमेंट
2021-05-03 14:10:34 नियोजन आले लागवडीचे………
@krushikappkvk
श्री. यशवंत जगदाळे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, श्री. मच्छिंद्र आगळे, कृषी महाविद्यालय, बारामती

महाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील तापमान आले उगवणीसाठी अनुकूल आहे. लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खतयुक्त तांबडी तसेच नदी काठाची गाळाची जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीत जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी आणि जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्यास चांगले पीक येते. कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर प्रति एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. शेणखताची मात्रा अधिक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यास गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडीच्या मिश्रणाचा वापर करावा. शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.जमीन तयार करतेवेळी स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बेण्यास मुळ्या फुटून पीक स्थिर होते.
अधिक वाचा कृषिक अॅॅप मध्ये

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
212 views11:10
ओपन / कमेंट
2021-05-03 07:49:51 कोरोनामुळे बाजार समित्या बंद, कांदा ऊत्पादक हवालदिल

सौजन्य : सकाळ
दिनांक : 03-May-21
लासलगाव (जि. नाशिक) : कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहे, अशातच विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शुक्रवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण मुळे हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही पण शुक्रवारी (दि. ३०) संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल छाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. पण शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अश्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत ओली झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी मंगेश गवळी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllRevies=true
240 views04:49
ओपन / कमेंट
2021-05-02 18:18:00 आजचा कृषी सल्ला
हळद
बियाणेप्रक्रिया बियाणेप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बियाणेप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ इसी) २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बियाणेप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. बियाणेप्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
68 views15:18
ओपन / कमेंट