Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 59

2021-05-17 08:16:22 तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 17-May-21
मुंबई, दि. 16 : तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-
मुंबई शहर
वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४७)
नवीन भाऊचा धक्का: श्री. बादावार (९४२२८७२८५६)
ठाणे / पालघर
ठाणे : श्री. पाटील (९९२३०५०९८३)
डहाणू : कु. भोय (८६००६२७९०८)
सातपाटी : श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०)
वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९)
एडवण : श्री. अलगिरी (९८२३२१२७२२)
रत्नागिरी
जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९)
मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८)
साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)
गुहाघर : श्री. देसाई (९४०५०८५६१५)
दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३)
मुंबई उपनगर
माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२)
वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५)
मढ गोराई : श्री. जावळे (९८३३२६६२५१)
रायगड
उरण : श्री. दाभणे (७०२१५४२११२)
अलिबाग : श्री. अंबुलकर (८०८०९९२२०३)
मुरुड : श्री. वाळुंज (७७९८७१६७२७)
श्रीवर्धन : श्री. पाटील (९८८१४५२४३६)
सिंधुदुर्ग
देवगड : श्री.मालवणकर (९४२२२१६२२०)
वेंगुर्ला : श्री. जोशी (९४२१२३८९१३)
मालवण : श्री. भालेकर (९८२३५७९३८२)
याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
110 views05:16
ओपन / कमेंट
2021-05-16 08:13:34 रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
@krushikappkvk
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 16-May-21
पुणे : केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. कोरोना, लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोसळून पडलेली असताना काही ग्रेडमध्ये गोणीमागे ५०० ते ७०० रुपये इतकी मोठी दरवाढ केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मात्र जागतिक बाजारात कच्चा माल महागल्याने खतांच्या ‘एमआरपी’त वाढ करणे अपरिहार्य असल्याचा दावा खत उद्योगाने केला आहे.
खतांच्या किमती वाढविण्याबाबत प्रत्येक कंपनीच्या व्यवस्थापन वर्तुळात जानेवारीपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. ‘अग्रोवन’ने मात्र ‘खते दरवाढीची शक्यता’ या मथळ्याखाली १० मार्चला बातमी प्रसिद्ध करून दरवाढीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. मार्चमध्येच काही कंपन्यांनी दरवाढ केली होती. इफ्कोने देखील नजीकच्या वाढीव दरांचा अंदाज घेतला होता. तसेच, सुधारित दराबाबत माहिती देणारे एक कार्यालयीन पत्र आपल्या प्रकल्पांना पाठविले होते. या पत्रातील माहिती जाहीर झाल्यानंतर दरवाढ लागू झाली नसून तो अंतर्गत पत्रव्यवहार होता, अशी भूमिका इफ्कोने घेतली.
केंद्राचा आधार फसवा निघाला : गेल्या महिन्यात काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू असताना काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी धावपळ करीत खत उत्पादकांसोबत बैठक घेतली होती. ‘‘सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे,’’ असे मंडाविया यांनी घोषित करीत शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र हा आधार आता फसवा निघाला. निवडणुका संपताच दरवाढ करा, अशी मुभा आतून केंद्राने दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
युरियाची किंमत स्थिर : ‘‘राज्यातील बहुतेक कंपन्यांनी आपपल्या वाढीव उत्पादन खर्चाचा अंदाज घेत खतांच्या किमती वाढविल्या आहेत. मात्र एकाही कंपनीने युरियाची किंमत वाढवलेली नाही. केंद्राचे निर्बंध असलेल्या युरियाची ५० किलोची गोणी अजूनही २६६ रुपये ५० पैसे दरानेच विकली जात आहे. युरिया वगळता खताच्या इतर ग्रेडवर सरकारचे निर्बंध नाहीत. वाढीव किमतीबाबत राज्याचे कृषी खाते कोणतेही कारवाई करू शकत नाही. ही बाब पूर्णतः केंद्र सरकार व खत कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांच्या अखत्यारित येते. आम्ही केवळ एमआरपीप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे खत विकले जाते की नाही हे तपासण्यास बांधील आहोत,’’ अशी माहिती कृषी खात्याच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
आयुक्तांना साकडे : ‘‘खतांची दरवाढ होणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र बाजारात वाढीव दराने खत विक्री सुरू आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून काही कंपन्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक करीत आहे. केंद्र किंवा राज्य शासनही या मुद्द्याकडे लक्ष देत नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांमध्ये खता��च्या दराबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शेतकरी खत घ्यायला तयार नाहीत. आयुक्तांनी आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा,’’ अशी मागणी औरंगाबादच्या जय जवान जय किसान शेतकरी मंडळाने कृषी आयुक्तांकडे केली आहे.
अशी झाली दरवाढ
कंपनी आधीचे दर नवे दर
डीएपी इफको १२०० १९००
कोरोमंडल १२५० १४५०
स्मार्टकेम १२५० २१००
जीएसएफसी १२०० १९००
आरसीएफ १३४० -
कृभको १२५० १९००
इंडियन पोटॅश १२२५ १९००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२५५ १९००
एमओपी
कोरोमंडल ९५० ८५०
स्मार्टकेम ९५० -
जीएसएफसी ९५० ८७५
आरसीएफ ९७० ८५०
कृभको ८७५ -
इंडियन पोटॅश ९५० १०००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट ९४९ १०००
२०:२०:००:१३
इफको ९७५ १३५०
कोरोमंडल १००० १३००
स्मार्टकेम १०६५ १६००
जीएसएफसी ९७५ १३५०
आरसीएफ ९७५ ११५०
कृभको १००० -
इंडियन पोटॅश ९७५ १४००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १०१५ १४००
१०:२६:२६:००
इफको ११७५ १७७५
कोरोमंडल ११८५ १३७५
स्मार्टकेम १२९५ १९२५
जीएसएफसी ११७५ १७७५
आरसीएफ १२७० -
कृभको १२०० १७७५
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२२५ १७७५
१२:३२:१६
इफको ११८५ १८००
कोरोमंडल १२०० १२००
स्मार्टकेम १३०५ १९५०
जीएसएफसी ११८५ १८००
आरसीएफ १२०० १२७०
कृभको १२१० १८००
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२३५ १८००
(टीप : आकडे रुपयांमध्ये असून ५० किलोच्या गोणीचे आहेत. बाजारात काही कंपन्यांनी अद्याप वाढीव दर जाहीर केलेले नाहीत. शेतकऱ्यांनी खात्री करण्यासाठी कृषी विभाग, खत कंपनीचे विक्रेते किंवा प्रतिनिधींशी संपर्क साधावा.)
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
224 views05:13
ओपन / कमेंट
2021-05-15 17:47:22
22 views14:47
ओपन / कमेंट
2021-05-15 14:20:05 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=311758517191384&id=1832292603705174
117 views11:20
ओपन / कमेंट
2021-05-15 11:24:19 सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती

*शेतीमधील पशु धनाचे महत्व व उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी* परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून

*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp

*मार्गदर्शक: डॉ.आर.एस जाधव*
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन विभाग)
कृषि विज्ञान केंद्र,बारामती

*तारीख* - १५/०५/२०२१
*वार*- शनीवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्या पर्यंत पोहचवावी ही विनंती
#krushikapp_Facebook_Live
169 viewsedited  08:24
ओपन / कमेंट
2021-05-15 08:19:02 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये जमा

सौजन्य : सकाळ
दिनांक : 15-May-21
नवी दिल्ली - पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील आठवा हप्ता आज केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. 19 हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला असून याचा लाभ साडे नऊ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यानिमित्त मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की,''कोरोनाच्या या संकटकाळात शेतकरी कठीण आव्हानाचा सामना करत आहेत. त्यातही त्यांनी मोठं उत्पादन मिळवलं असून सरकारसुद्धा दर वर्षी एमएसपी खरेदीचे नविन विक्रम करत आहे. पहिल्यांदा धानाची खरेदी व्हायची आता गहूसुद्धा खरेदी होत आहे'' असंही मोदी म्हणाले.
आज अक्षय तृतीयेचा शुभ दिवस आहे. कृषी क्षेत्रासाठी ही नव्या सुरुवातीचा वेळ आहे. याच मुहुर्तावर जवळपास 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाठवण्यात आले आहेत. याचा लाभ पश्चिम बंगालसह देशातील जवळ जवळ 10 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.
यावेळी मोदींनी देशातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा केलं. सर्दी, खोकला किंवा ताप असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका असंही मोदी म्हणाले. 100 वर्षांनी इतकी मोठी साथ आली आहे आणि जगाची परीक्षा सुरू आहे. आपल्या समोर एक न दिसणारा शत्रू आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. काही काळ देशास���ठी कसोटीचा असून लोकांनी खूप यातना सहन केल्या तेवढाच त्रास मलाही जाणवला असं मोदी म्हणाले.
देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण केलं जात आहे. यासाठी आता तुम्हीही नोंद करा आणि लस अवश्य घ्या. लस आपल्याला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळ देईल असं मोदींनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
209 views05:19
ओपन / कमेंट
2021-05-14 16:37:05 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
रोग नियंत्रण लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘अल्टरनेरीया सोलॅनी’ उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा इन्फेस्टन्स’ फळसड (बक आय रॉट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासीटीका’
*एकात्मिक व्यवस्थापन* - पिकाची फेरपालट करावी. - बियाणे प्रमाणित व निरोगी असावे. - थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. - रोपवाटिकेत मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. - लागवडीवेळी एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे. - पुनर्लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून नंतरच लावावीत. - झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावीत अथवा जाळून नष्ट करावीत. - रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. उशीरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
264 views13:37
ओपन / कमेंट
2021-05-14 07:54:34 जिल्हास्तरावरील योजनेत बदल; शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 14-May-21
मुंबई, दि. 13 : जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याने पात्र पशुपालकांनी सुधारित योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
मंत्री श्री.केदार म्हणाले, सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सन 2011 मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणे राबविण्यात येत होत्या. तेव्हापासून आजपावेतो (मागील 10 वर्षात) या योजनेतील दरामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्यात आलेली नव्हती. शेळी/ मेंढीच्या खरेदी दरामध्ये मागील 10 वर्षात कोणतीही वाढ न झाल्यामुळे योजना व्यावहारिकदृष्ट्या
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
राबविणे शक्य होत नसल्याने, या योजनेचा अपेक्षित लाभ ग्रामीण भागामध्ये दिसून येत नव्हता. सदरील योजना ग्रामीण भागातील मजूर, भूमीहीन शेतकरी तसेच अल्पभुधारक शेतकरी यांच्यासाठी स्वयंरोजगार मिळून देण्यासंदर्भात अत्यंत लाभदायक ठरणारी असल्याने योजनेत सुधारणा आवश्यक होती.
राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनांमधील सध्याच्या शेळी मेंढी खरेदी किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थींना त्यांचे पसंतीनुसार पैदासक्षम शेळ्या व मेंढ्या खरेदी करता येतील. सन 2011 नंतर शेळी मेंढी मांसाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, पशुपालकांना चांगल्या प्रकारच्या पैदासक्षम शेळ्या उपलब्ध करून देण्यासाठी शेळ्या मेंढ्यांच्या किंमतीत वाढ करणे आवश्यक होते. राज्यात शेळीपालन व्यवसायास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष घटक, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांचाही यामध्ये समावेश असल्याने समाजातील दुर्बल घटक, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक लाभार्थींना याचा फायदा होणार असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याचेही श्री.केदार यांनी सांगितले.
यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येऊन या योजना नवीन स्वरुपात राबविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सद्यस्थितीतील योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध जातीच्या शेळी/मेंढी पूर्वी ठराविक जिल्ह्यात खरेदीची परवानगी देण्यात आली होती. ती आता संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आली आहे, असेही श्री.केदार यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाने मान्य केलेले शेळी मेंढ्यांचे सुधारित दर खालील प्रमाणे राहतील.
शेळी- उस्मानाबादी / संगमनेरी 8,000 रुपये, शेळी-बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 6,000 रुपये, बोकड- उस्मानाबादी / संगमनेरी 10,000 रुपये, बोकड- बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 8,000 रुपये, मेंढी- माडग्याळ 10,000 रुपये, मेंढी- दख्खनी व स्थानिक जाती 8,000 रुपये, नर मेंढा-माडग्याळ 12,000 रुपये, नर मेंढा-दख्खनी व स्थानिक जाती 10,000 रुपये याप्रमाणे सुधारित दर असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
2 views04:54
ओपन / कमेंट
2021-05-13 15:47:54 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
संस्थानिहाय शिफारशीत वाण, प्रसारणाचे वर्ष
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : एएमएस १००१, केडीएस ७२६ (फुले संगम ) (सन २०१९), केडीएस ३४४ (फुले अग्रणी) (२०१५).
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी : एमएयुएस ६१२ (सन २०१८), एमएयुएस १६२ (२०१४), एमएयुएस १५८ (२०१०)
जेएनकेव्हिव्हि जबलपूर : जेएस-२०-९८ (२०१८), जेएस-२०-६९ (२०१६), जेएस-२०-२९, जेएएस-२०-३४ (२०१४), जेएस ९७-५२ (२००८), जेएएस ९५-६० (२००७)
अ.भा. सोयाबीन संशोधन प्रकल्प, युएएस, धारवाड : डिएसबी २३ (२०१८), डिएसबी २१ (२०१५), डिएसबी १ (२००९), डिएस २२८ (२००७)
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर : केएस १०३, राज सोया (आरव्हिएस-२००२-४) (२०१८)
आघारकर संशोधन संस्था, पुणे : एमएसीएस १२८१ (२०१६), एमएसीएस ११८८ (२०१३)
एनआरसी, इंदौर : एनआरसी ८६ (अहिल्या-६) (२०१५)
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
183 views12:47
ओपन / कमेंट
2021-05-13 13:39:14 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7i18U59Xlg3QQz7tiHrtllDXOMeRaPekQcSk6Db4QowKQTQ/viewform?usp=sf_link
188 views10:39
ओपन / कमेंट