Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला टोमॅटो रोग नियंत्रण लवकर येणारा करपा (अर्ली | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
रोग नियंत्रण लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘अल्टरनेरीया सोलॅनी’ उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा इन्फेस्टन्स’ फळसड (बक आय रॉट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासीटीका’
*एकात्मिक व्यवस्थापन* - पिकाची फेरपालट करावी. - बियाणे प्रमाणित व निरोगी असावे. - थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. - रोपवाटिकेत मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. - लागवडीवेळी एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे. - पुनर्लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून नंतरच लावावीत. - झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावीत अथवा जाळून नष्ट करावीत. - रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. उशीरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true