Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 60

2021-05-13 13:38:51
Photo from कृषिक अँप
560 views10:38
ओपन / कमेंट
2021-05-13 13:38:33
Photo from कृषिक अँप
185 views10:38
ओपन / कमेंट
2021-05-13 08:15:48 राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 13-May-21
मुंबई, दि. १२ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे.
कंपन्यांनी खत पुरवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रीक टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रीक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरीया ५ लाख ३० हजार मेट्रीक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रीक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रीक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
105 views05:15
ओपन / कमेंट
2021-05-12 17:31:24
214 views14:31
ओपन / कमेंट
2021-05-12 16:13:01 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण

दोन पाखी साठवणगृह या साठवणगृहाची रचना पूर्व-पश्चिम करावी. साठवणगृहाची लांबी ३० ते ५० फूट असावी. लांबी जास्त ठेवल्यास कांदा सडण्याचे प्रमाण वाढते. साठवणगृह दोन पाखी असावे. एका पाखीची रुंदी ४ फूट तर साठवणगृहाची रुंदी १२ फूट असावी. दोन पाख्यांच्यामध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा ठेवावी. जमिनीपासून तळाची उंची २ फूट ठेवावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवाव्यात. दोन पट्ट्यांमध्ये लहान कांदे पडणार नाहीत इतकी १-१.५ इंच मोकळी जागा ठेवावी. साठवणगृहाचे छप्पर ॲसबेसटॉसचे असावे. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या ३ फूट पुढे आलेले असावेत. छताचा कोन २२ अंश इतका असावा. साठवणगृहाची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट तर बाजूची उंची ६ फूट असावी. कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कप्प्याला झडपा असाव्यात. पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर किमान दोन फूटाची मोकळी जागा ठेवावी. साठवणगृहाच्या मागील बाजूवरील त्रिकोणी भागातून व दरवाजामधून पाऊस आत जावू नये, यासाठी पत्र्याचा भाग पुढील बाजूने वाढवावा किंवा त्याजागी हिरव्या शेडनेटची जाळी बसवावी. कमी होते. तपशील दोन पाखी साठवणगृह साठवणक्षमता २५ टन ५० टन चाळ उभारणीची दिशा पूर्व-पश्चिम पूर्व-पश्चिम लांबीXरुंदीXबाजूची उंचीXमधील उंची (फूट) ४०x१२x६x१० ८०x१२x६x१० मधील मोकळ्या जागेची रुंदी (फूट) ४ ४ तळाची जमिनीपासूनची उंची (फूट) २ २ साठवण क्षमता (घन मीटर) ४२ ८४ चाळीचे अपेक्षित आयुष्य २० २०
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
241 views13:13
ओपन / कमेंट
2021-05-12 08:58:29 स्थानिक स्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 12-May-21
मुंबई, दि. ११ : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत
त्यातून बोध घेवुन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये
जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
आज मंत्रालयात कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हानिहाय पीकपध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या-त्या पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषि आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. गतवर्षीच्या अनुभवातुन बोध घेवुन पेरणीपुर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके जास्तीत जास्त प्रमाणावर आयोजित करावीत. अशा प्रात्यक्षिकां दरम्यान कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषि सेवा केंद्राचे प्रतिनिधी शेतकरी वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्यास उपलब्ध झाल्यास मोठा सकारात्मक बदल निश्चितच होवुन येणाऱ्‍या वर्षात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होवु शकेल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.
सोयाबीन पिकासाठी १० ते २० टक्के अति���ीक्त बियाणे पुरवठा करावा : सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखड्याप्रमाणे करीत असताना राज्याकरिता विशेष बाब म्हणून सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबिज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्यात आलेली नाही. याबाबत खाजगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेवुन त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.
कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या तक्रारींबाबत संशोधनासाठी पुढाकार घ्यावा : राज्यातील कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उद्भवणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवड यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली यावर देखील सविस्तर संशोधन होऊन राज्यातील शेतकऱ्यांना शिफारसी द्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाबीजने शासकीय प्रक्षेत्रे व कृषि विद्यापीठाकडील प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांसाठी उत्पादीत करावे अशी सूचनाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. यावर्षी पावसाळा वेळेवर आणि नियमित असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करावे. बियाण्यांच्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, असे श्री. भुसे यांनी सांगितले.
यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज : यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे याकामी बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच अन्य राज्यांतून बेकायदा बियाण्यांची विक्री राज्यात होऊ नये यासाठी कृषि विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.
264 views05:58
ओपन / कमेंट
2021-05-11 15:59:23 आजचा कृषी सल्ला
डाळिंब
अंबिया बहर
रोग व्यवस्थापन बहार व्यवस्थापन वेळेस सॅलिसिलिक ॲसीड ०.३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ४ फवारण्या एक महिन्याच्या अंतराने फुलधारणेच्या आधीपासून घ्याव्यात. बोर्डो मिश्रण ०.५ टक्के किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा २ ब्रोमो २ नायट्रो प्रोपेन १-३ डायोल (९५%) ०.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि प्रति लिटर पाण्यातून १० ते १४ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
तेलकट डाग स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट (९० टक्के) अधिक टेट्रा सायक्लिन हायड्रोक्लोराईड (१० टक्के) (स्ट्रेप्टोमायसीन) ०.२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे महिन्यातून एकदा फवारणी करावी.
बुरशीजन्य स्कॅब, ठिपके आणि कुजव्या (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्डीप्रोपॅमिड (२३.४ एससी) १ मि.लि. मेटीराम (५५%) + पायरॅक्लोस्ट्रॉबिन (५% डब्ल्यूजी) ३ ग्रॅम प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. अधिक ॲझोक्सिस्ट्रोबीन (२३ एससी) १ मि.लि. अॅरझॉक्सीस्ट्रोबीन (२०%) + डायफेनोकोनॅझोल (१२.५% एससी) २ मि.लि. क्लोरोथॅलोनिल (५०%) + मेटॅलॅक्झील-एम (३.७५% एससी) २ मि.लि. बोर्डो मिश्रण ०.५ टक्के ट्रायसायक्लॅझोल (१८%) + मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम झायनेब (६८%) + हेक्साकोनॅझोल (४% डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम क्लोरोथॅलोनिल (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. कॉपर ऑक्सिक्लोराईड (४५%) + कासुगामायसिन (५% डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम वरील बुरशीनाशकांची १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
487 views12:59
ओपन / कमेंट
2021-05-11 12:26:16 जळगाव बाजारभाव
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
84 views09:26
ओपन / कमेंट
2021-05-11 12:24:50
90 views09:24
ओपन / कमेंट
2021-05-11 08:37:34 ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा : कृषी आयुक्त
@Krushikappkvk
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 11-May-21
पुणे : कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व कृषी सहायकांसोबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पत्राद्वारे संवाद साधला आहे. राज्यभरात यंदा तयार होणारे ग्राम कृषी विस्तार आराखडे शेतकरीभिमुख होण्यासाठी तातडीने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
कृषी सहायकांसाठी या पत्रात ‘प्रिय मित्रांनो’ असे शब्द पहिल्याच ओळीत आयुक्तांनी लिहिले आहेत. ‘‘आपण अतिशय निष्ठा व तळमळीने काम करीत आहात. तुम्ही शेतकरी व खात्यांमधील खरा दुवा आणि कणा आहात. राज्यात आतापर्यंत राबविलेल्या सर्व कीड-रोग मोहिमा यशस्वी होण्यास कृषी सहायकांची भूमिका मोलाची होती. तसेच विक्रमी अन्नधान्य ही सहायकांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती आहे,’’ असे कौतुकही आयुक्तांनी केले आहे.
‘‘गेल्या वर्षीपासून सुरू असलेली कोरोनाची साथ आणि निर्बंध या समस्यांमधून वाट काढत कृषी विभाग शेतकऱ्यांना ��ेवा देतो आहे. त्यात ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शेती हा अविरत चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे निविष्ठा व योजनांचा लाभ योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जबाबदारीने आपला विभाग कार्यरत असतो. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनपासून आपण शेतीमाल व निविष्ठांची विक्री व वाहतूक,त्या अनुषंगाने परिवहन व गृह विभागाचे परवाने उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना वेळेत खते देण्याचे काम केले आहे,’’ असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
‘‘शेतकऱ्यांसाठी घरच्या बियाण्यांचा वापर, उगवणक्षमता तपासणी मोहीम, बांधावर खत व बियाणेवाटप यासाठी आपण निविष्ठा विक्रेते व शेतकऱ्यांशी समन्वय साधला. याशिवाय टोळधाड नियंत्रण, फरदड निर्मूलन, बोंड अळी निर्मूलन, लष्करी अळी नियंत्रण या मोहिमा देखील यशस्वी केल्या. कृषी सहायकांच्या परिश्रमामुळेच २०२०-२१ च्या हंगामात कडधान्यात ८९९१० टन हरभरा आणि तेलबिया पिकांमध्ये ६२०११०० टन असे उच्चांकी उत्पादन आपल्या राज्याने घेतले. ही कृषी विभागासाठी सन्मानाची बाब आहे,” असे आयुक्तांनी नमुद केले आहे.
आयुक्तांनी केल्या अशा सूचना
-ग्राम कृषी विस्तार आराखडा लोकाभिमुख करा
-गावातील पीक उत्पादन, उत्पादकतेचे नियोजन करा
-गावात जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावा
-शेतकऱ्यांमध्ये खताचा संतुलित वापराबाबत जागृती
-पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक पद्धतीत बदल
-विकेल ते पिकेल या उद्देशानुसार लागवड करा
-गावांमध्ये सरळ वाण बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबवा
-फळबाग लागवड व शेततळ्यांसाठी शेतकरी निवड करा
-खते, बियाणे, कीडनाशके वेळेत पुरवठ्यासाठी नियोजन करा
-पीकविमा, फळपीक विम्यासाठी कृती आराखडा तयार करा
-कृषी योजनांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा प्रसार प्रचार करा
-शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी समूह माध्यमांचा वापर करा
सोयाबीन पेऱ्यासाठी घरच्या बियाण्यांचा वापर, बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी, रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर, कपाशीत बोंड अळी नियंत्रण आणि रासायनिक खत वापर दहा टक्क्यांनी कमी करणे ही यंदाच्या खरीप मोहिमेतील प्रथम प्राधान्याची कामे असतील. - धीरज कुमार, कृषी आयुक्त
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
159 views05:37
ओपन / कमेंट