Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 63

2021-05-01 18:03:36 आजचा कृषी सल्ला
*"खोडवा ऊस**
पीक संरक्षण
खोडवा पिकामध्ये काणी व गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी अशी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत.
मार्च-एप्रिलमध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. खोडवा ऊसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी दोन ट्रायकोकार्डची दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने तीनवेळा प्रसारणे करावीत. क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३७५ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. अन्यथा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) १० किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीत वाफसा असताना समप्रमाणात मिसळून द्यावे.
हुमणीच्या नियंत्रणासाठी वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. हुमणीग्रस्त क्षेत्रात फिप्रोनिल (०.३ जीआर) ८ किलो प्रति एकर शेणखतात मिसळून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे.
कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर पंधरा दिवसांनी आवश्यकतेनुसार ऊस तोडणीअगोदर एक महिन्यापर्यंत वापरावीत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
130 views15:03
ओपन / कमेंट
2021-04-30 17:45:54 आजचा कृषी सल्ला
वेल वर्गीय पिके

भाजीपाला पिकास पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचाच (उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन) वापर करावा. पिकांना पाणी देत असताना शक्यतो सकाळी, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात. फुले येण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
117 views14:45
ओपन / कमेंट
2021-04-30 09:08:03 ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत १५ मे पर्यंत निर्बंध आदेश जारी

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 30-Apr-21
मुंबई, दि २९ : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध आता १५ मे पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य���त कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार सातत्याने वाढत असल्याने कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या आपत्कालीन उपाययोजना पुढे सुरु ठेवणे अपरिहार्य आहे. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्कालीन योजनांचे कार्यान्वयन आहे तसेच पुढे सुरु ठेवणे शासनास आवश्यक वाटत असल्याने फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध व उपाययोजना यांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्यात आले आहेत.
साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील संबंधित सर्व सहाय्यभूत तरतुदींन्वये दिनांक १३ एप्रिल २०२१ व दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन (साखळी तोडा) आदेशातील सर्व निर्बंध त्यामध्ये केलेल्या सुधारणा, दुरुस्त्या व स्पष्टीकरणाच्यासह संपूर्ण राज्यामध्ये दिनांक १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी ०७ : ०० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
99 views06:08
ओपन / कमेंट
2021-04-29 17:11:56 *आजचा कृषी सल्ला*
*कांदा-लसूण*
खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० ते ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झा���ावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
3 views14:11
ओपन / कमेंट
2021-04-29 08:03:29 पावसाची तीव्रता वाढणार
सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 29-Apr-21
पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढील काही दिवस पूर्वमोसमी पावसासह उन्हाचा चटका चांगलाच वाढणार आहे. मंगळवारपर्यंत (ता.४) राज्याच्या काही भागांत वादळी वारे, गारपिटीसह पूर्वमोसमीच्या तुरळक सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
सध्या राज्यातील भूपृष्टावरून उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे सकाळपासून उन्हाचा कमालीचा चटका वाढत आहे. नऊ वाजल्यापासून पारा वाढत जाऊन दुपारी पारा सरासरी ओलांडत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. महाबळेश्‍वर येथे १९.९ अंश सेल्सिअसची किमान तापमान नोंदविले गेले.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
गुरुवार : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
शुक्रवार : पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, यवतमाळ
शनिवार : संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ
रविवार : संपूर्ण महाराष्ट्र
बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रूझ) ३४.६, अलिबाग ३६.१, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३५.५, पुणे ३८.४, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३१.३, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.८, सांगली ३६.२, सातारा ३७.६, सोलापूर ३८.२, औरंगाबाद ४०, परभणी ४०.७, अकोला ४२.७, अमरावती ४२, बुलडाणा ४१.४, ब्रह्मपुरी ४३.७, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ४१.४, नागपूर ४१.७, वर्धा ४२
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
187 views05:03
ओपन / कमेंट
2021-04-28 18:15:22 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियम कमतरतेमुळे शेंड्याची वाढ खुंटून शेंडा ठिसूळ व अशक्त होतो. फळांचे देठ कमकुवत होऊन फळगळ वाढते. फळांच्या खालच्या बाजूस काळसर भाग (ब्लॉसम एंड रॉट) तयार होऊन थोड्या दिवसांनी ही फळे कुजून गळून पडतात. फळ नासणे, फळ बारीक होऊन सुकल्यासारखे होणे, फळे तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे अशा समस्या दिसून येतात. कॅल्शियम कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. माती परीक्षणानुसार कॅल्शियम या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून कॅल्शियमयुक्त खते वापरावीत. जमिनीमधून कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, सिंगल सुपर फॉस्फेट, तसेच जिप्समद्वारेसुद्धा कॅल्शियमचा पुरवठा केला जाऊ शकतो. टोमॅटो पुनर्लागवडीनंतर रोपावस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत चिलेटेड कॅल्शियम १ ग्रॅम किंवा कॅल्शियम नायट्रेट ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
85 views15:15
ओपन / कमेंट
2021-04-28 09:41:46

103 views06:41
ओपन / कमेंट
2021-04-28 08:42:47 करोना काळात दुधाला फटका
सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 28-Apr-21

पुणे : करोना काळात राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठय़ा प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के घट झाली आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी लागू के ली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र हॉटेलांवर क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश असे काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली. त्यात हॉटेल बंद ठेवून के वळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. या सगळ्याचा फटका दैनंदिन दूध विक्रीवर झाला आहे. दुधाच्या संकलनाचे प्रमाण कायम आहे, दुधाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने दुधाच्या वितरणावर काही परिणाम झालेला नाही. मात्र, विक्री घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे म्हणाले, की राज्यात दुधाच्या विक्रीत घट फटका आहे. गोकुळचे रोजचे दुधाचे संकलन १२ लाख लीटर आहे. त्यापैकी सुमारेफटका** लाख लीटर दूध शिल्लक राहते. हॉटेल, चहाची दुकाने,आइसक्रीम उत्पादक हे दूध खरेदी करणारे प्रमुख उद्योग करोनामुळे अनियमित पद्धतीने सुरू आहेत.
किरकोळ विक्रीची दुकाने के वळ ७ ते ११ या वेळेतच सुरू असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांकडून येणारी मागणी बंद झाली. शिवाय हॉटेल, कं पन्यांची उपाहारगृहे, रस्त्यावरील चहाची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे एकू ण २० ते ३० टक्के विक्री कमी झाली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर दूध विक्री विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर-फे ब्रुवारी या दरम्यान दुधाची मागणी पूर्ववत झाली. मात्र आता मार्चपासून पुन्हा दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुधाची विक्री जवळपास ३० टक्के कमी झाली आहे. – श्रीपाद चितळे, भागीदार, चितळे डेअरी
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
136 views05:42
ओपन / कमेंट
2021-04-27 17:11:03 आजचा कृषी सल्ला
शेळी पालन :-

उन्हाळ्यात शेळ्या कमी खाद्य खातात, म्हणून त्यांच्या खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. शेळ्यांच्या खाद्यातील शुष्कांशावर जास्त भर द्यावा. खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. खाद्यात प्रथिनांचे प्रमाण १६-१८ टक्के ठेवावे. हिरव्या चाऱ्याचे उदा. लुसर्न प्रमाण वाढवावे. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, यीस्ट (किण्व) द्यावे. जीवनसत्त्व ‘सी’ व ‘अ’ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मरतुकीस आळा बसतो. खाद्याची पाचकता व इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात व्हिनेगार, लिनसीड मिल व गव्हाचा चोथा, युरिया मोलासेस, मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तसेच तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
208 views14:11
ओपन / कमेंट
2021-04-27 14:03:26 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा !!!

https://www.facebook.com/Krushikapp/videos/303750837980867/
221 views11:03
ओपन / कमेंट