Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 58

2021-05-19 17:08:35
62 views14:08
ओपन / कमेंट
2021-05-19 17:02:46 *भारत अमृत महोत्सव वर्षानिमित्त*

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषि विज्ञान केंद्र, बारामती व प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वेबिनार

*विषय: जागतिक मधमाशी दिवस*

*दिनांक: 20 मे 2021*
*वेळ: सकाळी 11:00 ते 12:30*

प्रमुख वक्ते :

*डॉ. रतन जाधव* प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती.

*प्रमुख पाहुणे : श्री. राजेंद्र साबळे* प्रकल्प संचालक आत्मा, पुणे.

*प्रमुख मार्गदर्शन : डॉ. मिलिंद जोशी*, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती.

*मधमाशीपालक : श्री. हेमंत पांडुरंग निंबाळकर*

*प्रगतशील शेतकरी यशोगाथा:*

1. श्री. अतुल शिंगाडे, डाळिंब पिकामध्ये मधमाशीचा वापर.

2. श्री. सुधीर निगडे, डाळिंब पिकामध्ये मधमाशीचा वापर.

3. श्री. केशव बारवकर, कलिगड पिकामध्ये मधमाशीचा वापर.

4. श्री. विलास भगत, सूर्यफूल पिकामध्ये मधमाशीचा वापर.

*चर्चा सत्रात आपणास खालील लिंक द्वारे सहभागी होता येऊ शकते त्या पूर्वी आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये Zoom App डाउनलोड करणे गरजेचे आहे*

खालील मीटिंग ID व पासवर्ड अंतर्भूत करून चर्चासत्रात सहभागी होऊ शकता.

Join Zoom Meeting
https://zoom.us/j/99868768815?pwd=emNURmU2M2NyZzI1Si82RkxieUJrUT09

Meeting ID: 998 6876 8815
Passcode: 554956

फेसबुक लाईव्ह :

कृषी विज्ञान केंद्र, बारामती:
https://www.facebook.com/baramatikvk/

कृषिक अॅप:
https://www.facebook.com/krushikapp

अधिक माहितीसाठी संपर्क

*कृषि विज्ञान केंद्र, बारामती टोल फ्री नंबर : 18002331007*

*श्री. अल्पेश वाघ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती 9075008215*
72 views14:02
ओपन / कमेंट
2021-05-19 16:57:30 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो

टोमॅटो पिकामध्ये रब्बी व उन्हाळी हंगामात भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. भुरीच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप (४८ ईसी) ०.५ मि.लि. किंवा हेक्साळकोनॅझोल (५ इसी) १ मि.लि. किंवा अॅझोक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. शेतामध्ये नत्र खताच्या अतिवापराने भूरीची तीव्रता वाढते. यासाठी संतुलित नत्र खतमात्रेचा वापर करावा. पालाश अन्नद्रव्यामुळे पिकाची आंतरिक रोगप्रतिकारशक्ती वाढून रोगाची तीव्रता कमी होते, यासाठी पालाशयुक्त विद्राव्य खतांचा फर्टीगेशन/ फवारणीद्वारे वापर करावा. दाटीवाटीने वाढलेल्या पिकामध्ये रोगप्रसारासाठी अनुकूल सूक्ष्म हवामान बनते व रोगाची तीव्रता वाढते. म्हणून पिकाच्या ओळींमध्ये हवा खेळती राहील, अशाप्रकारे रोपांची संख्या योग्य ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
75 views13:57
ओपन / कमेंट
2021-05-19 08:44:25 मॉन्सून शुक्रवारी अंदमानात येणार

सौजन्य : सकाळ
दिनांक : 19-May-21
पुणे - गुजरातमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच नैॡत्य मोसमी वाऱ्याचा (मॉन्सून) प्रवास सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मॉन्सून शुक्रवारपर्यंत (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे. तर रविवारपर्यंत (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मॉन्सून नियमित वेळेआधी एक जूनपूर्वी ३१ मे रोजी केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर करतानाच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलूक फोरमच्या’वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये मंगळवारी दाखल झालेले चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागताच दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या भागात विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात असून, ढगांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः१८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होतो असतो. मात्र यंदा चक्रीवादळाने उशिराने मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. रविवारी (ता. २३) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली तीव्र होणार असून, मॉन्सूनचे हे प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे लवकरच मॉ��्सूनचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव मंदावणार : ‘तौक्ते’ अतितीव्र चक्रीवादळ सोमवारी (ता. १७) रात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून, जमिनीवर आले. हे वादळ गुजरातमध्ये घोंघावत असून, त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जात आहे. त्यामुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज या वादळाचा प्रभाव आणखी कमी होऊन वाऱ्याचा वेग मंदावणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
199 views05:44
ओपन / कमेंट
2021-05-18 16:43:01 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० ते ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
264 views13:43
ओपन / कमेंट
2021-05-18 11:25:19

272 views08:25
ओपन / कमेंट
2021-05-18 08:27:33 चक्रीवादळाने राज्यभरात दाणादाण

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 18-May-21
पुणे : ‘तौत्के’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. तर अपवाद वगळता सर्वत्र वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. वादळ आणि पावसाने काढणीला आलेल्या हापूस आणि केसर आंबा पिकाला कोट्यवधीचा फटका बसला. तसेच फळपिकांसह भाजीपाला आणि उन्हाळी पिकेही उद्ध्वस्त झाली. तर राज्यभरात वाऱ्याने झाडे कोसळून आणि पत्रे उडून शेकडो घरांचेही नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ठाणे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या सर्व गावांना बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सोमवारी (ता.१७) सायंकाळी हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवरून ���ूपृष्टावर आले असून ते राजस्थानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. यामुळे गुजरातमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवला आहे. दर तासाला अधिक सक्रिय होणारे हे चक्रीवादळ हळूहळू महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सोमवारी (ता. १७) सायंकाळी पोरबंदर आणि महुवा (जि. भावनगर) किनारपट्टीजवळ धडकले. त्यानंतर वादळाचा वेग कमी होण्यास सुरूवात झाली. दुपारी ते मुंबईपासून पश्चिमेकडे १५० किलोमीटर अंतरावर होते. तर दीव पासून नैऋत्याकडे २२० किलोमीटर, गुजरातमधील वेरावलपासून २६०, कराचीपासून ४९० किलोमीटर अंतरावर होते.
सोमवारी सकाळी वादळाने मुंबईच्याजवळ १५० ते २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वादळाचा वाऱ्याचा वेग ताशी १५० किलोमीटरहून अधिक होता. मात्र, सायंकाळनंतर काही प्रमाणात या वाऱ्याचा वेग कमी झाला होता. आज या वादळाचा वेग आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र, वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून पडणे, वीजेचे खांब व तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी काही घरांची पडझड झाली आहे. रत्नागिरी शहर, राजापूर तालुका, साखरीनाटे, आंबोळगड, मुंबई-गोवा महामार्ग तसेच किनाऱ्यालगतच्या गावात मोठया प्रमाणावर पोफळी, नारळाची झाडे पडली. या चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पिकांना बसला फटका : आंबा, नारळ, फणस, केळी, ऊस, उन्हाळी भुईमूग, कांदा, टोमॅटो, वांगी, कारली, दोडका आदी.
असे झाले नुकसान
वादळाने राज्यभर शेडनेट, पॉलीहाऊसचे नुकसान
कोकणात हापूसला कोट्यवधींचा फटका
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजीपाला पिकाला फटका
मराठवाड्यात केसर आंब्याचे मोठे नुकसान
विदर्भात पाऊस आणि वादळी वाऱ्याने तारांबळ
खानदेशात केळीसह पिकांना फटका
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
297 views05:27
ओपन / कमेंट
2021-05-17 17:14:07 प्रिय,
शेतकरी बंधुनो,

* ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट , संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती * व *आत्मा पुणे.* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *परिसंवाद "फेसबुक लाइव (Facebook Live)* साठी आमंत्रित करीत आहोत.

*_विषय:- खरीप हंगाम पूर्व तयारी,


*दि. 18 मे 2021 रोजी*
* सकाळी 11.00 वा. *

*_ प्रमुख मार्गदर्शक _*

*_श्री. संतोष करंजे*
*विषय विशेषज्ञ (कृषी विद्या)*
*कृषि विज्ञान केंद्र,बारामती*
कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. काही कारणास्तव कार्यक्रमात व्यत्यय आल्यास परत लिंकवर क्लिक करून पुन्हा कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp तसेच
प्रिय,
शेतकरी बंधुनो,

* ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट , संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती * व *आत्मा पुणे.* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *परिसंवाद "फेसबुक लाइव (Facebook Live)* साठी आमंत्रित करीत आहोत.

*_विषय:- खरीप हंगाम पूर्व तयारी,


*दि. 18 मे 2021 रोजी*
* सकाळी 11.00 वा. *

*_ प्रमुख मार्गदर्शक _*

*_श्री. संतोष करंजे*
*विषय विशेषज्ञ (कृषी विद्या)*
*कृषि विज्ञान केंद्र,बारामती*
कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. काही कारणास्तव कार्यक्रमात व्यत्यय आल्यास परत लिंकवर क्लिक करून पुन्हा कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
https://www.facebook.com/baramatikvk

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*०२११२-२५५४२७,*9021730474

*कृपया ऑनलाइन प्रशिक्षणविषयी माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बंधू पर्यंत पोहोचवावी ही विनंती.*
129 views14:14
ओपन / कमेंट
2021-05-17 17:14:03
118 views14:14
ओपन / कमेंट
2021-05-17 17:11:48 आजचा कृषी सल्ला
आले
आले या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्येकता असते. माती परीक्षणानुसार संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत. एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खतमात्रांची आवश्यकता असते. यापैकी संपूर्ण स्फुरद (३० किलो स्फुरद - १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाशची मात्रा (३० किलो पालाश - ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता (२४ किलो नत्र - ५२ किलो युरिया) आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र (२४ किलो नत्र - ५२ किलो युरिया) उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी एकरी ६०० ते ८०० किलो करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
130 views14:11
ओपन / कमेंट