Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 55

2021-06-01 17:19:04 आजचा कृषी सल्ला
डाळिंब

मृग बहार (बागेची विश्रांती अवस्था/ ताण अवस्थेचा शेवट/ मे महिन्याच्या शेवटी बहार धरणे)
मशागत जर नेहमीपेक्ष्या लवकर मृग बहार घ्यायचे नियोजन असेल तर बाग ताणावर असताना, मे महिन्याच्या शेवटी इथेफोन (३९ एसएल) फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शोंडयाकडून १०-१५ सें.मी.पर्यंत छाटाव्यात. काटे, वाळलेल्या फांद्या छाटाव्यात. जमिनीवर पडलेला पालापाचोळा, काड्या, गोळा करून नष्ट करावा.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
कुजलेले शेणखत २५-३० किलो किंवा शेणखत १५-२० किलो अधिक गांडूळ खत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो किंवा कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड ७.५ किलो प्रतिझाड याप्रमाणे द्यावे.
प्रत्येक झाडाला जिप्सम २.५ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ८०० ग्रॅम मुळाजवळ मातीत मिसळा.
रासायनिक खतांमध्ये २०५ ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि १५२ ग्रॅम पालाशसाठी प्रतिझाड द्यावे. खत दिल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
जैव फॉर्म्युलेशन जसे अॅझोस्पिरिलम स्पेसीज, अॅ स्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम हे चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत मिसळावे. ६० टक्के ओलावा ठेवून सावलीत १५ दिवस नियमितपणे उलथापालथ करत राहावे. त्यानंतर ते १०-२० ग्रॅम प्रतिझाड द्यावे. अर्बुस्कूलर मायकोरायझा बुरशी १०-१५ ग्रॅम प्रतिझाड द्यावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
67 views14:19
ओपन / कमेंट
2021-06-01 14:27:26 स्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“कापूस पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
लाईव्ह ऑन
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
तारीख - ०२/०६/२०२१
वार- बुधवार
*वेळ* - दुपारी १.३० ते २.३०
नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन व्हाट्सद्वारे करणे आवश्यक
https://api.whatsapp.com/send?phone=917796622387
विनित
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
*सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती**
ICL Fertilizers-India Krushik app
#krushikapp_Facebook_Live
#krushikapp
133 views11:27
ओपन / कमेंट
2021-06-01 14:26:34
132 views11:26
ओपन / कमेंट
2021-06-01 08:31:29 राज्यात पावसाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 01-Jun-21
पुणे : जून महिना सुरू झाल्याने राज्यातील बहुतांशी भागात बदल झाले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या दक्षिण भागांत पावसाच्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक वातावरण झाले होते. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला असला तरी तापमानात जवळपास चढउतार राहिले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांत विदर्भासह राज्यातील काही भागांत उन्हाचा कडाक्याचे ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता.
तर शनिवार (ता.२९) हा हॉट दिवस ठरला असून चंद्रपुरात सर्वाधिक ४६.२ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्यानंतर पारा काहीसा कमी झाला आहे.
राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
मंगळवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
बुधवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
गुरुवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
शुक्रवार ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ
सोमवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रुझ) ३३.९, अलिबाग ३४.५, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३४.१, पुणे ३४.१, जळगाव ३४.०, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्वर २५.४, नाशिक ३४.४, सांगली ३५.३, सातारा ३४.६, सोलापूर ३८.२, उस्मानाबाद ३४.६, औरंगाबाद ३५.०, परभणी ३५.९, अकोला ४१.०, अमरावती ४०.८, बुलडाणा ३५.०, ब्रम्हपुरी ४३.८, चंद्रपूर ४१.६, गोंदिया ४२.२, नागपूर ४२.३ वर्धा ४१.५
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
46 views05:31
ओपन / कमेंट
2021-05-31 16:54:17 आजचा कृषी सल्ला
कापूस
पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड करावी. जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत असावा. उथळ/ कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीनही कपाशीला हानिकारक ठरते. कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोन-तीन वर्षांनी एकवेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करून घेतल्याने मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. शेवटची वखरणीपूर्वी कोरडवाहू कपाशीसाठी २ टन (४-५ गाड्या) व बागायती लागवडीसाठी ४ टन (८-१० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतात मिसळून द्यावे. परिणामी मॅग्नेशिअम, झिंक इ. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.
मका
मका पिकासाठी रेतीयुक्त, मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणक्षमता असणारी जमीन निवडावी. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पिक फार चांगले येते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) करावी. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीबरोबर एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
239 views13:54
ओपन / कमेंट
2021-05-31 10:42:42 ्यक्तींसाठी लागू राहतील.
Ø मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
Ø स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
Ø दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
Ø कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
Ø स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.
288 views07:42
ओपन / कमेंट
2021-05-31 10:42:42 ‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 30-May-21
मुंबई, दि. ३० : ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.
२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.
पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील : २०११ च्या जनगणनेनुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.
पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी : वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी : वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.
अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
दुकानांना पुरवठा केल्या जाणार��� वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश माहिती व संदर्भासाठी
Ø कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
Ø यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व
293 views07:42
ओपन / कमेंट
2021-05-29 17:32:02 आजचा कृषी सल्ला
तूर
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ सामू असावा. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खोलवर नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
सोयाबीन
पिकाच्या वाढीसाठी मध्यम काळी पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ पर्यंत सामू असणारी जमीन अतिशय उत्तम असते. जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरट दोन-तीन वर्षांतून एकदा करावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीला चांगले कुजलेले २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून नंतर जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी एक वखराच्या सहाय्याने पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
186 views14:32
ओपन / कमेंट
2021-05-29 15:50:56 *प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर*
अशी घ्या पिकांची काळजी.....!
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*90750 99544*
https://api.whatsapp.com/send?phone=919075099544
*करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा* या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा
*फायदे :-*
नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
हमखास व खात्रीशीर फायदा.
सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.
*ऑफर्स*
२०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ३५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ४५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ३५० मध्ये २०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ६७० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ७७०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ६७० मध्ये ४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
१ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर- मूळ किंमत रु. १६५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. १७५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. १६५० मध्ये १ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
अगोदर ऑलाईन पेमेंट करणे आवश्यक......
226 views12:50
ओपन / कमेंट
2021-05-29 15:50:51
211 views12:50
ओपन / कमेंट