Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला तूर मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणार | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
तूर
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ सामू असावा. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खोलवर नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
सोयाबीन
पिकाच्या वाढीसाठी मध्यम काळी पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ पर्यंत सामू असणारी जमीन अतिशय उत्तम असते. जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरट दोन-तीन वर्षांतून एकदा करावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीला चांगले कुजलेले २ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून नंतर जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी एक वखराच्या सहाय्याने पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true