Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 53

2021-06-07 08:55:53 मोसमी पावसाची राज्यात घोडदौड

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 07-Jun-21
पुणे : केरळमधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.
अलिबागपासून पुणे आणि उस्मानाबाद अशी पावसाची पश्चिम-दक्षिण प्रगती झाली आहे. पुढील काही दिवसांत मोसमी पाऊस राज्याच्या इतर भागांतही प्रवेश करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी रविवारी (६ जून) पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाला.
केरळमध्ये नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने म्हणजे ३ जूनला मोसमी पावसाने प्रवेश केला. त्यामुळे पाऊस ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज होता. मात्र पोषक स्थितीमुळे अवघ्या दोन दिवसांच्या विक्रमी वेळेत पाऊस ५ जूनला केरळमधून महाराष्ट्रात दाखल झाला आणि त्याच दिवशी त्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सहा जिल्हे व्यापले. दुसऱ्या दिवशी ६ जूनलाही पावसाने वेगाने प्रगती केली असून, रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग आणि पुणे जिल्ह्य़ातही प्रवेश करून तो पुणे शहरापर्यंत दाखल झाला. पावसाने रविवारी मराठवाडय़ापर्यंत मजल मारली. पाऊस उस्मानाबादला पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
बंगालच्या उपसागराच्या दिशेनेही पूर्व-उत्तर भागात मोसमी पावसाने प्रगती केली आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आदी राज्यांनंतर पाऊस थेट हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचला आहे. सद्य:स्थितीत मोसमी वारे संपूर्ण केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये सक्रिय झाले आहेत. आंध्र प्रदेशचाही बहुतांश भाग पावसाने व्यापला असून, महाराष्ट्रात ३० टक्के भागांत पाऊस सुरू झाला आहे.
पाऊस नोंद.. राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पाऊस सुरू झाला आहे. पुणे परिसरात शनिवारी रात्री आणि पहाटेही पाऊस होता. मुंबई परिसरातही काही ठिकाणी पाऊस झाला. रविवारी नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, महाबळेश्वर, परभणी, अकोला, अमरावती भागांत पावसाची नोंद झाली.
अंदाज काय? : कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. परिणामी दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
179 views05:55
ओपन / कमेंट
2021-06-05 17:03:09 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो

जमिनीची निवड
चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. हलक्यां जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते.
पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी काळीभोर जमीन टाळावी, तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्यात व उथळ जमिनीत घेऊ नये.
जमिनीचा सामू हा ६ ते ७.५च्या दरम्यान असावा.
जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी व त्यास योग्य उतार द्यावा, म्हणजे पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही.
क्षारयुक्त चोपन व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते. जमिनीत चर काढले तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षारांचाही निचरा होतो.
अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच निमॅटोड असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
221 views14:03
ओपन / कमेंट
2021-06-05 11:20:04 सोयाबीन अन्नद्रव्य व्यवस्थापन
290 views08:20
ओपन / कमेंट
2021-06-05 11:19:42 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!
https://www.facebook.com/Krushikapp/videos/166458528691531
288 views08:19
ओपन / कमेंट
2021-06-05 08:15:53 बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागू

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 05-Jun-21
पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी बियाण्यांच्या विविध जाती शोधूनही शेतकऱ्यांना मात्र त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पैदासकार बियाणे तयार करण्यासाठी नवी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
कृषी आयुक्तालयाल, विद्यापीठांमधील संशोधन संचालक, महाबीज व बीजोत्पादनाशी संबंधित यंत्रणांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
विद्यापीठांमधील बियाणेनिर्मितीच्या संधी व अडचणी विचारात घेत ही कार्यपद्धत तयार झाली आहे. कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदिवडे यांनी नुकत्याच कार्यपद्धतीत पैदासकार बियाणे वाढवण्यासाठी विद्यापीठांवर बंधने टाकली आहे. तसेच शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) व कंपन्यांना (एफपीसी) प्राधान्य देण्यात आले आहे.
विद्यापीठांनी पिकाच्या कोणत्याही नव्या वाणाचा शोध लावल्यानंतर आधी पैदासकार बियाणे विद्यापीठालाच तयार करावे लागते. पैदासकार बियाण्यांपासूनच पुढे पायाभूत बियाणे तयार करावे लागते. पायाभूत बियाणे हाती आल्याशिवाय प्रमाणित अथवा सत्यप्रत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. बीजोत्पादनाची ही साखळी सध्या अतिशय कमकुवत आहे. कारण पैदासकार बियाणे राज्यात पुरेसे तयार होत नाही. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
पैदासकार बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठांवरील जबाबदारी आणि पारदर्शकता अशा दोन्ही मुद्यांवर काम करण्याची आवश्यकता होती. नव्या कार्यपद्धतीत या मुद्द्यांना स्थान देण्यात आले आहे. विद्यापीठांनी यापुढे पायाभूत, प्रमाणित किंवा सत्यप्रत बियाण्यांकडे अधिक लक्ष न देता फक्त पैदासकार बियाण्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले आहेत. एखाद्या पिकाचे नवे वाण तयार केल्यानंतर त्याचे पैदासकार बियाणे पुरवण्याची जबाबदारी विद्यापीठांचीच राहील. त्यासाठी लागणारे केंद्रक बीजदेखील विद्यापीठाने तयार करावे. अशा केंद्र बियाण्यांची नोंदणी विद्यापीठांना आता कृषी विभागाकडे करावी लागेल. ही जबाबदारी विद्यापीठाच्या संशोधन संचालकाची राहील, असे शासनाने नमूद केले आहे.
पैदासकार बियाणे मिळण्यासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ, केंद्र शासनाच्या यंत्रणा, महाबीज तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या विद्यापीठांकडे मागणी नोंदवतात. या मागण्या एकत्रित करून पुढील वर्षीच्या खरीप हंगामात किती पैदासकार बियाणे लागेल, याचे उद्दिष्ट विद्यापीठांनी ठरवावे. पुढच्या खरिपासाठी चालू खरिपाच्या दोन महिने आधीच म्हणजेच जवळपास १४ महिने आधीच १५ एप्रिलपर्यंत पैदासकार बियाण्यांची मागणी कृषी विद्यापीठांकडे नोंदवता येणार आहे. मात्र रब्बी हंगामासाठी ही मागणी १५ जुलैपर्यंत कृषी आयुक्तालयाकडे नोंदवावी लागेल.
पैदासकार बियाणेनिर्मितीची नवी कार्यपद्धती राज्याच्या बियाणे मूल्यसाखळीला मजबूत करेल. त्यामुळे सर्व विद्यापीठे या कार्यपद्धतीचे स्वागत करीत आहेत. यामुळे विद्यापीठांवर जबाबदारी आली असून सर्व यंत्रणांवर बंधने आली आहेत. परिणामी, पैदासकार बियाणे वाढून बियाणे टंचाईची समस्या नियंत्रणात येऊ शकेल. – डॉ. शरदराव गडाख, संशोधन व विस्तार संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
बीजोत्पादन कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये
-उगवणक्षमतेत नापास होणारे पैदासकार बियाणे विचारात घेत पुढील बीजोत्पादन त्याप्रमाणात वाढवले जाईल
-पैदासकार बियाण्यांसाठी विद्यापीठांकडे २० टक्के रक्कम आगाऊ भरावी लागेल
-मुदतीत बियाणे नेले नाही तर आगाऊ भरलेली रक्कम जप्त होणार
-बियाणे पुरवठ्यात ‘महाबीज’ला प्राधान्य
-बीजोत्पादनात शेतकऱ्यांचाही सहभाग असेल
-शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत विद्यापीठे परस्पर सामंजस्य करार करणार
-पैदासकार बियाणे जादा तयार झाल्यास सत्यप्रत बियाणे म्हणून ते शेतकऱ्यांसाठी विकले जाईल
327 views05:15
ओपन / कमेंट
2021-06-04 17:20:19 आजचा कृषी सल्ला
तूर

सुधारित जाती जाती पीक कालावधी (दिवस) उत्पादन (क्विं./हेक्टर) आय.सी.पी.एल.-८७ १२० ते १३० १८ ते २० विपुला १५० ते १७० २४ ते २६ फुले राजेश्‍वरी १४० ते १५० २८ ते ३० बी.एस.एम.आर.-८५३ १६० ते १७० १८ ते २० बी.एस.एम.आर.-७३६ १७० ते १८० १६ ते १८ बी.डी.एन.-७११ १५० ते १६० १८ ते २० बी.डी.एन.-७१६ १६५ ते १७० २० ते २२
मका
सुधारीत जाती मक्याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक जातींपेक्षा ६०-८० टक्के अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. महाराष्ट्रासाठी कालावधीप्रमाणे शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र जाती : करवीर, राजर्षी, पुसा अर्ली संकरित मका-१, पुसा अर्ली संकरित मका-२, पुसा अर्ली संकरित मका-३, प्रिया (मधुमका), विंग ऑरेंज (मधुमका), माधुरी (मधुमका), एनएससीएच-१२, एनके-६२४०, पीएससी-७०१, ९००-एम गोल्ड, एचक्युपीएम-१, एचक्युपीएम-५, एचक्युपीएम-७, पी-३५२२, बायो-९५४४, पीएस-६२१७ इ.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
743 views14:20
ओपन / कमेंट
2021-06-04 13:54:29 स्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“सोयाबीन पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - ०५/०६/२०२१
*वार*- शनिवार
*वेळ* - दुपारी १.३० ते २.३०
नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन व्हाट्सद्वारे करणे आवश्यक
https://api.whatsapp.com/send?phone=917796622387
*विनित*
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
*सदरची लिंक सर्व शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती*
ICL Fertilizers-India Krushik app
#krushikapp_Facebook_Live
#krushikapp
242 views10:54
ओपन / कमेंट
2021-06-04 13:54:00
229 views10:54
ओपन / कमेंट
2021-06-04 07:59:25 पाटील : लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यात सर्वच बँकांच्या शाखांचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की, जून अखेरपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक कर्जाची उपलब्धता ही केलीच पाहिजे. व्यापारी बँकांचा वेगळा आढावा घेऊन या बँका उद्दिष्टपूर्ती करतात की नाही हे पाहिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
बैठकीस कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह राज्यस्तरीय बँकस समितीचे सदस्य, केंद्रीय अतिरिक्त सचिव वंदिता कौल, शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, नाबार्डचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बँकांना असलेल्या शंका आणि अडचणींचे यावेळी निराकरण करण्यात आले.
280 views04:59
ओपन / कमेंट
2021-06-04 07:59:25 एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 04-Jun-21
मुंबई, दि. ३ : उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझीनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगाने मंजुरी दिली जाते त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीने एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची १५१ वी बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्याच्या २०२१-२२ साठीच्या ४ लाख ६० हजार ८८१ कोटी रुपयांच्या राज्याच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट १ लाख १८ हजार ७२० कोटी रुपये असून यामध्ये पिक कर्जासाठीचे उद्दिष्ट ६० हजार ८६० कोटी रुपयांचे आहे. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी बँकांच्या वार्षिक पतआराखड्यात २ लाख ४९ हजार १३९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर प्राधान्यगटातील क्षेत्रांसाठीचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट ९३०२२ कोटी रुपयांचे आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये पिक नियोजनापासून बाजारपेठ संशोधन, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास, पिकांचे मूल्यवर्धन, या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शासनाचे विविध विभाग आणि बँकांनी एकत्रित बसून शेतकरी बांधवांना आणि शेतीक्षेत्राला अधिक सक्षम कसे करता येईल याचे एक धोरण निश्चित करावे.
कोरोनाच्य�� अडचणीच्या काळात खुल्या राहिलेल्या कृषीक्षेत्राने राज्य अर्थव्यवस्थेला तारले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गाव विकासाचा विचार करतांना पतपुरवठ्याच्या ज्या बाबी असतील त्यांना सहकार्य करण्याची भूमिका बँकांनी घ्यावी. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याचे सांगितले जात असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे.
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबविली जाते याची मर्यादा आता ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असून बँकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे व बँकांनी या अन्नदात्याच्या पाठीशी आधारस्तंभ बनून उभे राहावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
पिककर्जाची वेळेत उपलब्धता व्हावी – उपमुख्यमंत्री अजित पवार : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभरितीने आणि वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नागपूर, नंदूरबार, धुळे, नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांच्या सहकारी बँका अडचणीत आहेत त्यांना नाबार्डने पुर्नवित्तपुरवठा (रिफायनांस) करावा कारण या बँकांना वित्तपुरवठा न झाल्यास त्या जिल्ह्यातील शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून मोठ्याप्रमाणात वंचित राहतील. बँका मोठ्या शेतकऱ्यांना सहज कर्ज देतात पंरतू अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही बॅकांनी सहजतेने कर्जपुरवठा करावा, वाणिज्यिक बँकांनी किती शेतकऱ्यांना किती कर्ज दिले याची माहिती द्यावी, साखर उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याची नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने घातलेली मर्यादा सुधारितरित्या वाढवावी, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा वाढवावा – कृषीमंत्री दादाजी भुसे : वाणिज्यिक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या ठेवी मोठ्याप्रमाणात स्वीकारल्या जातात परंतू त्याच शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करतांना मात्र या बँका हात आखडता घेतात असे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की, यावर्षी आतापर्यंत १९ टक्के पिक कर्ज देण्यात आले आहे. यामध्येही सहकारी बँकांची कर्ज पुरवठ्याची टक्केवारी ३३ टक्के आहे तर वाणिज्यिक बँकांची ४ टक्के. त्यामुळे वाणिज्यिक बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा वाढवावा. नवीन शेतकऱ्यांना बँकांनी‍ पिककर्जासाठी बँकांशी जोडावे, ग्रामीण भागात बँकांच्या शाखा कमी आहेत त्या वाढवाव्यात, ग्रामीण भागात समतोल पतपुरवठा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच महिला बचतगटांना कर्ज पुरवठा करतांना, खाते उघडतांना बँका खूप त्रास देत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसंख्येच्या प्रमाणात बँक शाखांचा विस्तार व्हावा – सहकारमंत्री बाळासाहेब
284 views04:59
ओपन / कमेंट