Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 56

2021-05-29 07:55:13 सुपर फॉस्फेटचे दर कमी का केले नाहीत?

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 29-May-21
पुणे : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना स्वस्तात खत मिळण्यासाठी कंपन्यांना अनुदान वाढवून दिलेले असताना राज्यात सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमती कमी करण्यात आलेल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने खत कंपन्यांना तत्काळ खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्राकडून खताला वाढीव अनुदान मिळाल्यानंतर कंपन्यांनी विविध ग्रेडच्या किमती कमी केल्या; मात्र शेतकऱ्यांना अद्यापही जादा दराने सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) घ्यावा लागत आहे. जादा किमतीपोटी शेतकऱ्यांकडून रोज लक्षावधी रुपये जादा गोळा होत आहेत. महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स असोसिएशनचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपिन कासलीवाल, कोशाध्यक्ष प्रकाशजी नवलाखा यांनी ही बाब आयुक्तालयाच्या लक्षात आणून दिली.
‘माफदा’च्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे कृषी संचालक दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी बारकाईने समजावून घेतल्यानंतर तातडीने पावले उचलत कंपन्यांना जाब विचारला आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘एसएस’पी खताच्या विक्रीसाठी कंपन्यांनी केंद्राच्या सध्याच्या धोरणाचा विचार करावा. तसेच किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तशी कार्यवाही केल्याचा अहवाल सादर करा, अशा सूचना संचालकांनी कंपन्यांना दिल्या आहेत. केंद्राने ‘एसएसपी’च्या ५० किलोच्या गोणीमागे २४४ रुपये इतकी मोठी वाढ केली आहे. मात्र खताच्या विक्री दरात कंपन्यांनी घट केलेली नाही,’’ असाही निष्कर्ष आयुक्तालयाने काढला आहे.
आयुक्तालयाच्या या भूमिकेला आता कंपन्या कसा प्रतिसाद देतात याकडे राज्यातील खत विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे.
मतीची सक्ती राज्य करू शकत नाही : खत उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘वाढता उत्पादन खर्च विचारात घेत आम्हाला किमती निश्‍चित कराव्या लागतात. किमती निश्‍चित करण्याचे अधिकार कंपन्यांना आहेत. त्यासाठी केंद्राच्या धोरणातील बाबी मार्गदर्शक म्हणून स्वीकारल्या जातात. मात्र किमती कमी करण्याची सक्ती अथवा सूचना देण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. ‘एमआरपी’प्रमाणे खते विकली जातात की नाही इतकाच मुद्दा राज्याच्या अखत्यारित येतो.’’
केंद्राने स्फुरदाचे अनुदान वाढवून दिल्यानंतरही ‘एसएसपी’च्या किमती न घटविणे ही कंपन्यांची चूक आहे. लॉकडाउनमुळे आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कृषी आयुक्तालयाने देखील या मुद्याची दखल घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला वाटते. - विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, ‘माफदा’
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
306 views04:55
ओपन / कमेंट
2021-05-28 16:51:16 आजचा कृषी सल्ला
हळद
हळद पिकामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. लव्हाळा किंवा हराळी यांसारख्या बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९ ते १० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ एसएल) या बिननिवडक तणनाशकाची ४ ते ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. परंतु सजीव आच्छादन करावयाचे असल्यास तणनाशकांचा वापर टाळावा. हळदीची उगवण सुरू झाल्यानंतर तणनाशकांचा वापर करू नये.
आले
आल्यामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. लव्हाळा किंवा हराळी यांसारख्या बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९ ते १० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ एसएल) या बिननिवडक तणनाशकाची ४ ते ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. परंतु सजीव आच्छादन करावयाचे असल्यास तणनाशकांचा वापर टाळावा. साधारण पंधरा दिवसांपासून आल्याची उगवण व्हायला सुरवात होते, त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
361 views13:51
ओपन / कमेंट
2021-05-28 13:35:56 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1748589421993817&id=1832292603705174
358 views10:35
ओपन / कमेंट
2021-05-28 09:13:09
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषि विज्ञान केंद्र, बारामती व
प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुक लाईव्ह
*विषय: “स्वच्छ दुध निर्मिती गरज आणि महत्व”
*दिनांक: २८ मे २०२१ शुक्रवार
*वेळ: दु. ४ ते ५.*
प्रमुख मार्गदर्शक :
*डॉ. रतन जाधव* प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती.
*चर्चासत्रात सहभागी होणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
https://www.facebook.com/krushikapp
अधिक माहितीसाठी संपर्क
*कृषि विज्ञान केंद्र, बारामती* मो. 9420723218
Ratan Jadhav
384 views06:13
ओपन / कमेंट
2021-05-27 08:42:58 खत वापरासाठी मोबाईल अॅप करणार मार्गदर्शन

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 27-May-21
पुणे : माती परीक्षण केल्यानंतर आरोग्य पत्रिकेवर दाखवलेल्या १२ घटकांच्या माहितीनुसार खतांची मात्रा नेमकी कशी द्यावी, याविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी मोबाईल अॅपची मदत घेता येईल, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
कृषिक गणकयंत्राच्या माध्यमातून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा प्राप्त होण्यासाठी या अॅपचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्या केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शिफारस असलेल्या पिकांसाठी ठिबकद्वारे देता येणाऱ्या खत मात्रांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर विद्यापीठांच्या ठिबक खतमात्रांची माहिती दिली जाणार आहे.
कृषी विभाग व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. गुगल प्ले-स्टोअरवर ‘कृषिक’ अॅप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांच्या पीकनिहाय खत शिफारशी दिसतात. जमीन आरोग्य पत्रिकेवर आधारित विविध पिकांच्या खतमात्रा, बाजारातील किमतीनुसार प्रति एकर खतमात्रांच्या खर्चाचा हिशेब करता येतो.
नत्र, स्फुरद, पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय आणि गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतमात्रांची माहिती या अॅपमधून मिळते, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
468 views05:42
ओपन / कमेंट
2021-05-26 17:04:52 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो

महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड यशस्वीरीत्या केली जाते. खरीप हंगामात टोमॅटो लागवडीसाठी मे-जून महिन्यात रोपवाटिकेमध्ये बी पेरून जून-जुलै महिन्यात रोपांची पुनर्लागवड करावी. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य रोपांची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्याप्रकारे आवश्य क असते. एक एकर क्षेत्रासाठी १.२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. ३ मी x १ मी x १५ सें.मी. आकाराचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ चांगले एकसारखे मिसळावे. बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्टार २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात. त्यानंतर हाताने १० सेंमी अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर एक-एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे ५-८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५-३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादीवाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेंडाझीम २-३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
129 views14:04
ओपन / कमेंट
2021-05-26 08:03:25

155 views05:03
ओपन / कमेंट
2021-05-25 13:35:36 फेसबुक लाईव्ह परिसंवादात सहभागी व्हा!!!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=937057387217134&id=1832292603705174
195 views10:35
ओपन / कमेंट
2021-05-25 08:30:53 कमी केलेल्या दरात खतांची उपलब्धता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 25-May-21

पुणे : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या अनुदानात वाढ केल्यानंतर खत निर्मिती कंपन्यांनी कमी केलेल्या दरानुसार खते उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. दुसऱ्या बाजूला अनुदान धोरणात दोन नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे.
खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) धोरणात ८:२१:२१ आणि ०९:२४:२४ अशा दोन नव्या श्रेणींना आणले आहे. त्यांना गोणीमागे अनुक्रमे ६५७ रुपये आणि ७५० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या नव्या ग्रेड्स कमी किमतीत शेतकऱ्यांना द्याव्या लागतील. विशेष म्हणजे नव्या धोरणात नत्र, पालाश आणि गंधक अशा चारही मुख्य अन्नद्रव्यांच्या अनुदानात अजिबात कपात करण्यात आलेली नाही.
स्फुरदसाठी गेल्या हंगामात दिले जाणारे प्रतिकिलो १४.८८८ रुपये अनुदान रक्कम २०४ टक्क्यांनी वाढवले आहे. स्फुरदसाठी प्रतिकिलो ४५.३२३ रुपये अनुदान मंजूर करीत केंद्राने चांगले पाऊल टाकले आहे. त्यामुळे कंपन्यांना ग्रेडनिहाय ६७ ते २०४ टक्क्यांपर्यंत जादा अनुदान मिळणार आहे.
कंपन्यांनी आता सुधारित दरपत्रकानुसार खतांची उपलब्धता करून देण्यास सुरूवात केली आहे. इफको पाठोपाठ कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीने देखील राज्यात खतांचे दर कमी केले आहेत. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी सुधारित दरपत्रक लागू न केल्यास कारवाईचा इशारा देणारे पत्र खत कंपन्यांना पाठविल्यामुळे विक्रेत्यांनी देखील धसका घेतला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
किमती कमी होण्यास मदत : कंपन्यांना जादा अनुदान मिळणार असल्याने राज्यात शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या जवळपास विविध प्रकारच्या २० ग्रेड्सच्या खतांच्या किमती घटण्यास मदत झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना खतांची विक्री करताना सुधारित दरानुसार कंपन्यांना विविध ग्रेडप्रमाणे ५० किलोच्या गोणीमागे २४४ रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत कमी रक्कम घ्यावी लागणार आहे.
५० किलोच्या गोणीचे अनुदान असे (रुपयांत)
ग्रेड पूर्वीचे अनुदान नवे अनुदान वाढ
१८:४६:०:० ५१२ १२१२ ७००
०:०:६०:० ३०४ ३०४ ०
०:१��:०:११ १३२ ३७६ २४४
२०:२०:०:१३ ३५२ ६५७ ३०४
१०:२६:२६:० ४१९ ८१५ ३९६
२०:२०:०:० ३३७ ६४१ ३०४
१५:१५:१५ ३२८ ५५७ २२८
२४:२४:०:० ४०४ ७६९ ३६५
२०:५:०:२३ २२० २२० ०
२८:२८:०:० ४७२ ८९८ ४२६
१७:१७:१७ ३७२ ६३१ २५९
१९:१९:१९ ४१६ ७०५ २८९
१६:१६:१६:० ३५० ५९४ २४३
१६:२०:०:१३ ३१५ ६१९ ३०४
१४:३५:१४ ४६३ ९९६ ५३३
२४:२४:०:८ ४०४ ७६९ ३६५
११:५२:०:० ४९० १२२८ ७९१
०:४६:०:० ३४२ १०४२ ७००
१२:३२:१६ ४३२ ९१९ ४८७
१४:२८:१४ ४११ ८३७ ४२६
१५:१५:१५:०९ ३३९ ५६७ २२८
१४:२८:०:० ३४० ७६६ ४२६
८:२१:२१ ० ६५७ ०
९:२४:२४ ० ७५० ०
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
260 views05:30
ओपन / कमेंट
2021-05-24 16:50:36 आजचा कृषी सल्ला
डाळिंब
सूत्रकृमी व्यवस्थापन विश्रांती काळात सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.
प्रत्येक ड्रीपर खाली ५ ते १० सें.मी. खोल खड्डा करून त्यामध्ये फ्लूएनसलफोन (२ जीआर) १० ग्रॅम टाकून मातीने झाकून टाकावे. फ्लूएनसलफोनची मात्रा जास्तीत जास्त ४० ग्रॅम प्रति झाड इतकी वापरावी. त्यानंतर हलके पाणी द्यावे किंवा
फ्लूओपायरम (३४.४८ एससी) २ मि.लि. प्रति झाड प्रमाणे ड्रेंचिंग करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्यावे. प्रत्येक झाडासाठी २ लिटर पाण्यामध्ये २ मि.लि. फ्लूओपायरम हे द्रावण ५०० मि.लि. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला ४ ड्रिपर असतील) किंवा १००० मि.लि. प्रति ड्रिपर (जर एका झाडाला २ ड्रिपर असतील) मिसळून ड्रेंचिंग करावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
92 views13:50
ओपन / कमेंट