Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 54

2021-06-03 17:00:17 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
खरीप हंगामासाठी शिफारशीत प्रमुख जाती व त्यांची वैशिष्ट्ये
भीमा डार्क रेड लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणी सरासरी उत्पादन हेक्टरी २२ ते २४ टन साठवणुकीत दोन महिन्यांपर्यंत टिकतो.
भीमा सुपर लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणी सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात.
भीमा रेड लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांत काढणी सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २२ टन
भीमा राज लागवडीनंतर १०५ ते ११० दिवसांत काढणी सरासरी उत्पादन हेक्टरी २४ ते २६ टन
एन ५३ कांदे गोलाकार, परंतु थोडे चपटे कांद्याचा रंग जांभळट लाल आणि चवीला तिखट लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणी सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन
बसवंत ७८० कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते रंग आकर्षक लाल असून डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण कमी लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणी उत्पादन हेक्टरी २५ टन
फुले समर्थ खरीप व रांगडा हंगामात लागवडीसाठी शिफारस कांद्याचा रंग गडद लाल, आकाराने गोलाकार आणि पातळ मान लागवडीनंतर ९० दिवसांनी काढणी उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
345 views14:00
ओपन / कमेंट
2021-06-03 14:39:33

334 views11:39
ओपन / कमेंट
2021-06-03 09:29:06 खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
DAP 18-46-00 : (1200)
NPK 10-26-26 : (1375)
NPK 12-32-16 : (1310)
NPK 19-19-19 : (1575)
NPS 20-20-0-13 : (1090)
NP 28-28-0 : (1475)
NPK 14-35-14 : (1365)
►कोरोमंडल ही खत उत्पादक कंपनी ग्रोमोर या ब्रॅंड नावानं खताची विक्री करते. कंपनीने 20 मे 2021 पासून नवीन दर लागू केले आहेत. जुना स्टॉक किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची एमआरपी असेल तोसुद्धा या नवीन दरानेच विकावा, असेही सांगितले आहे.
कोरोमंडलच्या खतांचे दर
खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
DAP 18-46-00 : (1200)
NPS 20-20-0-13 : (1050)
NPS 16-20-0-13 : (1000)
NPK 14-35-14 : (1400)
NPK 10-26-26 : (1300)
NP 28-28-0-0 : (1450)
NPS 24-24-0-8 : (1500)
NPKS 15-15-15-09 : (1150)
►स्मार्टकेम टेक्‍नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी "महाधन' या ब्रॅंडखाली खंतांची विक्री करते. 20 मेपासून खतांची नवीन दराने विक्री होणार आहे.
महाधनच्या खतांचे नवे दर
खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
24-24-00 : (1450)
10-26-26 : (1390)
12-32-16 : (1370)
20-20-0-13 : (1150)
14-28-00 : (1280)
►"गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड' ही कंपनी "सरदार' या ब्रॅंडच्या नावाने खतांची विक्री करते. या कंपनीने सुद्धा त्यांच्या खतांचे नवीन दर जाहीर केले आहेत.
सरदारच्या खतांचे नवे दर
खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
सरदार अमोनियम सल्फेट : 735
सरदार DAP : 1200
सरदार NPK 10-26-26 : 1175
सरदार NPK 12-32-16 : 1185
सरदार APS : 975
►इंडियन पोटॅश लिमिटेड ही कंपनी बाजारात "आयपीएल' या ब्रॅंडच्या नावाने खतांची विक्री करते. या कंपनीने त्यांचे सुधारित दर जाहीर केले आहेत.
आयपीएलचे नवे दर
खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
MOP : 1000
DAP : 1200
16-16-16 : 1125
20-20-0-13 : 1050
●विक्रेत्याने ज्यादा दर घेतल्यास येथे करा तक्रार : जर तुम्हाला तुमच्या भागात एखादा विक्रेता पूर्वीच्या ज्यादा दरानेच खत विकत असेल तर तुम्ही फोनद्वारे यासंबंधीची तक्रार करू शकता. त्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. याविषयी माहिती देताना कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी असलेल्या निर्बंध काळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याच्या निवारणासाठी नियंत्रण दिलेल्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालय स्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषी विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
362 views06:29
ओपन / कमेंट
2021-06-03 09:29:06 खतांचे वाढीव दर रद्द केल्यानंतर कोणते खत किती रुपयांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर

सौजन्य : सकाळ
दिनांक : 03-Jun-21

सोलापूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शेतकरी पिचला जात आहे. त्याच्या शेती उत्पादनाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच पावसाळ्यात नवीन पीक लागवड करताना लागणाऱ्या खते व बी-बियाणे विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. यात शेतकरी मात्र भरडला जात होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीएपी खतांवरील अनुदानात वाढ केल्याचे जाहीर केले होते, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मग फक्त डीएपीचेच दर कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते. पण आता सरकारने डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच पी अँड के (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहेत. जाणून घ्या सरकारने खतांसाठी जाहीर केलेले अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवीन दर याविषयी.
●खतांवरील अनुदानात वाढ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचे अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवले. यामुळे सगळ्याच कंपन्यांची डीएपी खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (पी अँड के) (P & K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे. केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. म्हणजेच खतांमधील पोषक द्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.
2020-21 मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्‍चित करण्यात आले होते. आता 2021-22 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फॉस्फेटसाठीचे अनुदान 14.888 रुपयांहून 45.32 रुपये करण्यात आले आहे.
●खतांचे नवीन दर : भारतात सर्वाधिक वापर युरिया या खताचा केला जातो. यंदा युरियाचे दर "जैसे थे' ठेवण्यात आले होते. यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची युरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळणार आहे.
►इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) ने नवीन खतांचे दर जाहीर केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2021 पासून या नवीन दराने खतांची विक्री केली जाणार आहे.
याशिवाय कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात असंही म्हटलंय, की बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एमआरपीच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील. म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे, ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.
इफ्को कंपनीच्या नवीन खतांचे दर
खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)
DAP 18-46-00 - (1200)
NPK 10-26-26 - (1175)
NPK 12-32-16 - (1185)
NPS 20-20-0-13 - (975)
►ADVENTZ ग्रुपअंतर्गत येणाऱ्या झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान या ब्रॅंड नावाने खत विक्री), मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (जय किसान मंगला या ब्रॅंड नावाने खत विक्री) आणि प्रदीप फॉस्फेट्‌स लिमिटेड (जय किसान नवरत्न या ब्रॅंड नावाने खत विक्री) या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे नवीन दर जारी केले आहेत. हे नवीन दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्यांनी जारी केलेल्या पत्रकात असेसुद्धा स्पष्ट केले आहे की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एमआरपीच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील.
जय किसानच्या खतांचे दर
325 views06:29
ओपन / कमेंट
2021-06-03 08:03:29 कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 03-Jun-21
मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना कोरोना संसर्गाला गावच्या वेशीवरच रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जातील. यासाठी बक्षीसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.
गावांचे विविध २२ निकषांवर होणार गुणांकन : स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे, पथकांची निर्मिती करणे, कोरोनाबाधित गावांचे सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, गावपातळीवर अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करणे, टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करणे, लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवणे, यासाठी अल्पदरात वाहनव्यवस्था करणे, विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करणे, गावातील खाजगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सक्रिय सहभाग घेणे, शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्याकडील उत्पादित दूध व भाजीपाला हे अनुक्रमे दूध डेअरी व मार्केटला स्वयंसेवकांमार्फत पोहोच करणे, सहकारी संस्था, बचतगट यांचा सहभाग घेणे, कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे, कोरोनाविरहीत कुटुंबांची नोंद ठेवणे व काळजी घेणे, लसीकरणासाठी मदत करणे, उपलब्ध लसीचे शासकीय नियमानुसार योग्य वाटप करणे, लहान बालकांचे, गरोदर महिलांचे सर्वेक्षण करणे, जनजागृतीसाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणे, विविध तंत्रज्ञानाचा वापर करणे, नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य ती खबरदारी घेणे, मृत्यूदर कमी असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे, कोरोनामुळे आई-वडीलांचे निधन झालेल्या अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणे अशा विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. ५० गुणांचे हे गुणांकन असेल. १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
339 views05:03
ओपन / कमेंट
2021-06-02 17:57:43 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-

पशुधनामध्ये कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत लसीकरणाचा खर्च नगण्य आहे. लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा तुलनेने अतिशय कमी असल्याने, त्यापासून होणारा फायदा लक्षात घेता जनावरांना होणाऱ्या रोगांची लस त्या-त्या ऋतूच्या आधी तज्ञ पशुवैद्यकामार्फत करून घेणे फायदेशीर ठरते. गाई-म्हशींमधील लसीकरणाचे वेळापत्रक - लाळखुरकुत : फेब्रुवारी-मार्च, ऑगस्ट-सप्टेंबर; वर्षातून २ वेळा घटसर्प : मे-जून (मॉन्सूनपूर्व) फऱ्या : एप्रिल (मॉन्सूनपूर्व) आंत्रविषार : एप्रिल-मे (मॉन्सूनपूर्व) बुस्टर मात्रा १५ दिवसांनी, फक्त रोगप्रवण क्षेत्रात अँथ्रॅक्स : एप्रिल (शक्यतो मॉन्सूनपूर्व), फक्त रोगप्रवण क्षेत्रात सांसर्गिक गर्भपात : वयाच्या चौथ्या महिन्यात फक्त कालवडीमध्ये
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
123 views14:57
ओपन / कमेंट
2021-06-02 14:13:04 *फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://m.facebook.com/Krushikapp/videos/2971973313043113/
202 views11:13
ओपन / कमेंट
2021-06-02 11:11:58 फेसबुक लाईव्ह परिसंवाद
कापूस पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन
243 views08:11
ओपन / कमेंट
2021-06-02 11:11:23 https://m.facebook.com/story.php?story_fbid=228112265456176&id=1832292603705174
243 views08:11
ओपन / कमेंट
2021-06-02 08:09:30 देशात यंदा १०१ टक्के पाऊस : IMDचा अंदाज

सौजन्य : सकाळ
दिनांक : 02-Jun-21
पुणे : उत्तर-पश्चिम (वायव्य) भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प येथे नैऋत्य मोसम�� वाऱ्यांची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार,२०२१ मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते सप्टेंबर) सरासरीच्या १०१ % पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील स्थिती जैसे थे (तटस्थ) राहणार असून इंडियन ओशन डायपोल (आयओडी) निगेटिव्ह राहणार असल्याच अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मॉन्सून बाबत बोलताना, ''हवामान खात्यांचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा म्हणाले की, वायव्य भारतामध्ये सामान्य पावसाची अपेक्षा आम्ही करत आहोत तर जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाख प्रदेशात सामान्यपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.''
आयएमडी 2021 पावसाचा अंदाज
सरासरी इतका पावसाळा
(96 ते 104% दीर्घ कालावधी सरासरी, LPA)
प्रमाणितपणे 101% (मॉडेल त्रुटी +/- 4%)
मध्य भारत-सामान्यपेक्षा वर >106%
ईशान्य भारत-सामान्यपेक्षा कमी<95%
उत्तर-पश्चिम,दक्षिण भारत-सरासरी इतका
मान्सून कोअर झोन-सामान्यपेक्षा वर >106% नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह दोन दिवसांपासून सक्रिय नसल्याने मॉन्सून ‘जैसे थे’ आहे. आज (ता.१) हे वारे काही प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत वाऱ्याचा प्रवाह आणखी वाढल्यास मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता.४) केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. मॉन्सूनच्या वाऱ्यांना पुढे सरकण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हीचक्रिय स्थिती निवळल्याने पुन्हा मॉन्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे लवकरच केरळात दाखल होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला असून केरळ व श्रीलंका मालदीवच्या भागात पुन्हा जोरदार पाऊस पडेल. सध्या तमिळनाडू व परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर असून त्याचीही तीव्रता कमी होऊ लागली आहे.तसेच उत्तर प्रदेशचा पूर्व भाग ते विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात येणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
288 views05:09
ओपन / कमेंट