Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 52

2021-06-09 15:45:57
135 views12:45
ओपन / कमेंट
2021-06-09 08:49:17 कोरोना संकटातही कृषी निर्यातीची भरारी

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 09-Jun-21
पुणे : कोरोना आणि लॉकडाउनमुळे बहुतेक उद्योगांना पराभूत केले असले, तरी कृषी क्षेत्राचा झेंडा मात्र संकटातही डौलाने फडफडत राहिला. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राज्याची कृषी निर्यात १३ हजार ८७७ कोटी रुपयांपर्यंत गेली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नाना संकटाशी सामना करीत देशातून एक कोटी ८० लाख टन कृषी मालाची निर्यात झाली. त्याचे मूल्य ५८ हजार कोटी रुपयांच्या पुढे होते. यात महाराष्ट्राचा वाटा २३ टक्क्यांपेक्षा जास्त होता. राज्यातून याच कालावधीत ३३ लाख टनांपेक्षा जास्त शेतीमाल विदेशात पाठवला गेला. त्यामुळे १३ ते १४ हजार कोटी रुपयांची उलाढाल कृषी क्षेत्रात झाली.
कोविड १९ साथीने गेल्या वर्षीपासून धुमाकूळ घातलेला आहे. साथ नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाउनला गेल्या वर्षी २४ मार्चपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग तीन वेळा लॉकडाउन वाढविण्यात आले. त्यामुळे निर्यातीची साखळी विस्कळित झाली होती. दुसरीकडे मॉल्स, बाजारपेठा, बाजार समित्या सातत्याने बंद राहिल्याने ६० ते ८० टक्के शेतीमाल देशांतर्गत बाजारात खपला नाही. अशा स्थितीत कृषी निर्यातीने मात्र आधार दिल्याचे दिसून येते.
‘‘लॉकडाउन काळात देशातील कृषी निर्यात प्रणालीतील संस्था, व्यापारी संघटना, निर्यातदार, बंदरे आणि रेल्वे प्रशासनाशी केंद्रीय कृषी मंत्रालय समन्वय ठेवत होते. याच कालावधीत राज्य शासनाच्या कृषी यंत्रणांनी निर्यात घटकांशी चांगला संपर्क ठेवला. त्यामुळे निर्यातीत मोठे अडथळे आले नाहीत,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्याचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे म्हणाले, की निर्यातीशी संबंधित साखळीतील सर्व घटकांच्या समस्या सोडविण्याकडे सरकारी यंत्रणांनी भर दिला. त्यामुळे कृषी निर्यात वाढत राहिली.
कृषी अवजारे, सेंद्रिय शेतीमाल, फुले, बियाणे, बासमती व बिगर बासमती तांदूळ, फळे आणि भाजीपाला निर्यातीमधील बहुतेक समस्या दूरदृश्‍यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरसिंग) सोडविल्या जात होत्या. निर्यातीशी संबंधित सर्व कार्यालयांनी ऑनलाइन प्रणालीचा वापर वाढवला व सरकारी कामकाजाच्या एरवीच्या वेळा न बघताही काही कार्यालयांनी काम केल्यामुळे निर्यातीमधील समस्या तत्काळ सोडविल्या जात होत्या. निर्यातदारांना सर्वांत जास्त समस्या या कच्च्या मालाच्या येत होत्या. मात्र निर्यातदारांनीही जिद्दीने लढा दिल्यामुळे निर्यात घटली नाही, असे निर्यातदार कंपन्यांचे म्हणणे आहे.
‘‘लॉकडाउन कालावधीत निर्यातीमधील समस्या कमी नव्हत्या. गोदींमधील नाहरकत दाखले वेळेत मिळत नव्हते. कंटेनर अडकून पडायचे तर दुसरीकडे कंटेनरची टंचाई होत होती. कच्चा माल वेळेवर मिळत नव्हता. वाहतुकीच्या साधनांचा खोळंबा आणि मजुरांची मोठी टंचाई अशा सर्व स्थितीत आम्ही निर्यात चालू ठेवली. त्यामुळे देशातून ३० हजार कोटींच्या आसपास तांदळाची निर्यात होऊ शकली,’’ अशी माहिती तांदूळ निर्यात साखळीतील सल्लागार कंपनीच्या एका प्रतिनिधीने दिली.
माझ्या मते केंद्रीय कृषी मंत्रालयातील सचिव संजय अग्रवाल यांनी सलग दोन वर्षांपासून लॉकडाउन काळात कृषी संबंधित यंत्रणा यशस्वीपणे सांभाळल्या. त्यामुळे देशाची कृषी निर्यात अखंडपणे सुरू राहिली. दोन वर्षांपासून शेतकरी कष्टाला, गुणवत्तेला आणि उत्पादनाला कुठेही कमी पडला नाही. त्याला फटका केवळ देशांतर्गत बाजारपेठांचा बसला. मुख्य फळांच्या ऐन काढणीत लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद होत्या. त्याचा फायदा व्यापारी वर्गाने उचलला. आता वेळीच पतपुरवठा आणि सुरळीत बाजार व्यवस्था दिली तरच शेतकरी लवकर सावरतील. - सोपान कांचन, अध्यक्ष, अखिल भारतीय फलोत्पादन महासंघ
अशी होती वर्षभरातील राज्याची निर्यात
शेतीमाल : निर्यात मूल्य (कोटींत)
फळे : ४०८५
भाजीपाला : २६९०
कृषी उत्पादने : ५८२८
कृषी संबंधित उत्पादने : १२७४
(ही आकडेवारी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील आहे.)
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
248 views05:49
ओपन / कमेंट
2021-06-08 16:55:41 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण

खरीप कांदा रोपवाटिका साधारणपणे मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड करावी. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. एक एकर क्षेत्रावर लागवडीकरिता रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५ ते ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
331 views13:55
ओपन / कमेंट
2021-06-08 13:59:26
*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=277623650816522&id=1832292603705174
327 views10:59
ओपन / कमेंट
2021-06-08 08:28:15 फळबागा समूह विकासासाठी २०० कोटी उपलब्ध होणार

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 08-Jun-21
पुणे : केंद्र शासनाने फलोत्पादन समूह क्षेत्रविकास कार्यक्रम (सीडीपी) देशभर लागू केला आहे. यात पहिल्या टप्प्यात नाशिक व सोलापूर जिल्ह्याचा समावेश असून, तेथील फळबागांच्या विकासासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
एकाच वेळी अनेक फळपिकांवर भर देण्यापेक्षा नैसर्गिक वातावरणामुळे आधीपासून स्थिर झालेल्या पिकांचा क्षेत्रविकास करण्याचा हेतू ‘सीडीपी’चा आहे. नाशिकमधील द्राक्ष व सोलापूर भागातील डाळिंब पिकांचा यामुळे आणखी वेगाने विकास होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या समूहातील फळपिकांचे निर्यातक्षम उत्पादन वाढविणे, मूल्य वृद्धी व विक्री व्यवस्थापनाची साखळी मजबूत करण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० कोटी रुपये खर्च केले जातील.
रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच या उपक्रमाचा आढावा घेतला. राज्याचे फलोत्पादन सचिव एकनाथ डवले व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यावेळी उपस्थित होते. विविध राज्यांमधील दहा लाख शेतकऱ्यांना लाभ देणारे ५३ समूह तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यात पहिल्या टप्प्यात देशात १२ समूहांचे काम पथदर्शक स्वरूपात सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.
‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू ‘सीडीपी’चा आहेच; पण याशिवाय निवडलेल्या समुहातील फळपिकाची निर्यात किमान २० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील ५३ समूहांमधील फळपिकांमध्ये एकूण गुंतवणूक दहा हजार कोटींच्या पुढे नेण्याची तयारी केंद्राची आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘सीडीपी’ उपक्रमात शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) सामावून घेतले जाणार आहे. केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनीही ‘सीडीपी’चा आढावा दिल्लीत घेतला. ‘‘या समूहांमध्ये राज्याच्या यंत्रणांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. या उपक्रमातून केवळ आर्थिक उलाढाल वाढवायची नसून फळांचे ब्रॅंडदेखील करायचे आहेत,’’ असे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
३८ हजार हेक्टरवर फळबागा : दरम्यान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतकऱ्यांना यंदा ७० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. नव्या वर्षासाठी २३४.१४ कोटींचा कृती आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात ३८ हजार २०७ क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. त्याबद्दल फलोत्पादन मंत्र्यांनी कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे. ठिबकसाठी यंदा ५१६.३२ कोटी अनुदान शेतकऱ्यांना दिले गेले आहे. यामुळे आतापर्यंत २५.२५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आले आहे.
पावणेचार कोटी रोपे उपलब्ध : राज्यात १४३ शासकीय रोपवाटिका आहेत. याशिवाय ५८ कृषी विद्यापीठाच्या ५८ व १०४२ खासगी रोपवाटिका असून, विविध फळपिकांची ३८० लाख कलमे, रोपे उपलब्ध आहेत. याशिवाय पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेतून ५०० रोपवाटिका तयार होणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
372 views05:28
ओपन / कमेंट
2021-06-07 17:24:54 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
सुधारित वाण
वाण पिकाचा कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं./हे.)
डीएस २२८ (फुले कल्याणी) ९५-१०० २३-२४
केडीएस ३४४ (फुले अग्रणी) ९५-९६ २५-२६
केडीएस ७२६ (फुले संगम) १००-१०५ २५-३०
एएमएस १००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) ९७ २२-२५
एएमएस १००-३९ ९५-९७ २८-३०
एमएसीएस ११८८ १०० ३०-३५
एमएयूएस ७१ (समृद्धी) ९५-१०० ३०-३२
एमएयूएस १५८ ९३-९८ २६-३१
एमएयूएस १६२ १००-१०५ २८-३०
एमएयूएस ६१२ ९३-९८ ३०-३५
जेएस ३३५ (जवाहर) ९५-९८ २५-२८
जेएस ९३-०५ ९०-९५ २०-२५
जेएस ९५-६० ८२-८८ १८-२०
जेएस ९७-५२ ९८-१०२ २५-३०
जेएस २०-३४ ८६-८८ २०-२२
जेएस २०-२९ ९३-९६ २५-३०
जीएस २०-६९ ९३-९५ २५-३०
जेएस २०-११६ ९७-१०१ २५-३०
भात
सुधारित जाती
या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत. पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असल्यामुळे कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होते. त्यामुळे पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन, ते कमी कालावधीत निसवतात. यामुळे भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) अधिक मिळते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी
हळवा गट - फुले राधा
निमगरवा सुवासिक गट - इंद्रायणी, फुले समृध्दी, भोगावती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
हळवा गट - कर्जत १८४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी २४, कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी ५
निमगरवा गट – कर्जत ५, कर्जत ६, बी.ए.आर.सी.के.के.व्ही. १३, पालघर १
गरवा गट - रत्नागिरी २, रत्नागिरी ३, कर्जत २, कर्जत ८
संकरित गट – सह्याद्री १, सह्याद्री २, सह्याद्री ३, सह्याद्री ४, सह्याद्री ५
खार जमिनीसाठी - पनवेल १, पनवेल २, पनवेल ३
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
हळवा गट - साकोली ६, सिंदेवाही १
निमगरवा गट- साकोली ७, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही गणेश
गरवा गट - सिंदेवाही ४, सिंदेवाही ५, पीकेव्ही मकरंद
डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
प्रभावती, पराग, अंबिका, तेरणा
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
407 viewsedited  14:24
ओपन / कमेंट
2021-06-07 11:51:09
742 views08:51
ओपन / कमेंट
2021-06-07 11:51:05 जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार खतांचा संतुलित वापर करावा : कृषिमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 07-Jun-21
मालेगाव : रासायनिक खताचा वापर करत असताना शेतकरी बांधवांनी खत विक्रेत्याकडून योग्य दारातच खत विकत घ्यावे, त्याचबरोबर खताचा वापर करताना कृषी विभागामार्फत आपणास देण्यात आलेल्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार तसेच कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या कृषिक अॅपचा वापर करून खताची मात्रा काढून त्याप्रमाणे खताचा योग्य वापर करावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
शासकीय विश्रामगृहाच्या आवारात खते व बियाणे विक्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनेतंर्गत राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर क��्पनी, नाशिक यांच्यावतीने आज कुकाने येथील जय मल्हार शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष भिकन लोंढे व शेतकरी यांनी एकत्रितपणे युरियाची मागणी नोंदविली होती त्यानुसार त्यांना 200 युरिया खताच्या बॅग व 10 लिटर बायोला जैविक द्रावणाचे वाटप कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, एम.ए.आय.डी.सी.चे क्षेत्रीय प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील, बजरंग कापसे, आर.सी.एफ.चे जिल्हा प्रभारी विशाल सोनवलकर, संजय दुसाने, आदित्य कृषी एजन्सीचे संचालक दीपक मालपुरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी खरिप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खत शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले असले तरी शेतकरी बांधवांनी जमिनीची सुपीकता व गुणवत्ता राखण्यासाठी खतांचा नियोजनबद्ध व आवशक्यते नुसारच वापर करावा. राज्यात शेतकरी बांधवांचा रासायनिक खताचा वापर वाढत असून त्यातही युरिया सारख्या खताचा वापर वाढत आहे. मात्र रासायनिक खताची बचत करण्यासाठी विविध कंपन्यांमार्फत जैविक खते निर्मिती केली असून या खतांमध्ये जिवाणू रायझोबियम ऍझोटोबॅक्‍टर जमिनीमध्ये रासायनिक खताचे स्थिरीकरण वाढविण्याकरिता उपलब्ध करून देण्याचे काम करत असले तरी, शेतक-यांनी आपल्या जमिनीची पोत टिकविण्यासाठी खताची मात्रा योग्य व नियोजनबध्द वापरण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.
तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने आजपर्यंत एकूण 198 बचत गटांमार्फत 1524 शेतकरी बांधवांना 348 मेट्रिक टन खतांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे म्हणाले, शेतकरी बांधवांनी जैविक खताचा वापर हा पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्याकामी करावा. तसेच लागवडीच्या वेळी पाण्यातून जैविक खताचा वापर करावा. काही ठिकाणी फवारणी मध्ये तसेच ठिबक सिंचनाद्वारे जैविक खताचा वापर करावा. युरिया सारखे लवकर पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर दोन तीन डोस मध्ये विभागून ठराविक दिवस अंतराने वापरण्याची माहिती देवरे यांनी यावेळी दिली.
तर शेतकऱ्यांना काही तांत्रिक बाबींची अडचण अथवा समस्या असल्यास कृषी सहायक अथवा कृषी कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी यावेळी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
124 viewsedited  08:51
ओपन / कमेंट
2021-06-07 09:00:23 भारत का अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित ऑनलाईन वेबिनार

*विषय: गोड्या पाण्यातील मत्स्यपालन*

*दिनांक: दि ७ जून २०२१*
*वेळ: दु. ४ ते ५*

प्रमुख मार्गदर्शक :
*श्री. दाते सी. डी* फार्म मॅॅनेजर , कृषि विज्ञान केंद्र, बारामती*

झूम मिटिंग तपशील
https://zoom.us/j/98620650242?pwd=b2xTWTdJRElTa0lpZlZiS1ZvTEtldz09

Meeting ID: 986 2065 0242
Passcode: 970676

फेसबुक लाईव्ह
केव्हीके बारामती
https://www.facebook.com/baramatikvk
कृषिक अॅॅप
https://www.facebook.com/krushikapp

युट्युब तपशील:
केव्हीके बारामती
https://www.youtube.com/channel/UC_L7cuPRgcak1i9fAanv36Q
कृषिक अॅॅप https://www.youtube.com/channel/UCHhawximvSnWXoMnSKmiqtQ

अधिक माहितीसाठी संपर्क
*कृषि विज्ञान केंद्र, बारामती* मो. 9422519134
178 views06:00
ओपन / कमेंट
2021-06-07 09:00:20
162 views06:00
ओपन / कमेंट