Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-08-25 08:30:00 *वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार – वनमंत्री*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 25-Aug-22
मुंबई, दि. 24 : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणाऱ्या १५ लाख रूपये अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करत ही रक्‍कम २० लाख रुपये इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला.
राज्याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांचे वनविभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत असून डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन सन 2019-20 या वर्षी 47, 2020-21 ला 80 आणि 2021-22 ला 86 इतकी मनुष्यहानी झाली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणाऱ्या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍यात आली असून यापुढे १५ लक्ष ऐवजी २० लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. २० लाखापैकी १० लाख रुपये देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तत्‍काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्‍कम रूपये १० लाख त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणाऱ्या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास रू. ५ लाख तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास रू. १ लाख २५ हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खाजगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा २० हजार रू. प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या ६० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून ती ७० हजार रू. इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या १० हजार रू. इतक्‍या रकमेत वाढ करून १५ हजार रू. इतकी वाढ करण्‍यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी १२ हजार इतकी रक्‍कम वाढवून १५ हजार रू. करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी ४ हजार रू. ची रक्‍कम ५००० रू. इतकी करण्‍यात आली आहे.
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी व त्‍यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
431 views05:30
ओपन / कमेंट
2022-08-24 15:01:24

410 views12:01
ओपन / कमेंट
2022-08-24 07:32:13 सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवघ्या महिना सव्वा महिन्यात सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. कुणीही अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही. मदत वाटपाबाबत एकही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे नुकसानीबाबतचे निकष बदलण्याबाबत पंतप्रधान अनुकुल आहेत. त्यांचा शेती आणि शेतकरी हाच प्राधान्याचा विषय असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
424 views04:32
ओपन / कमेंट
2022-08-24 07:32:13 पीक विविधीकरणा (Crop Diversification) अंतर्गत “तेलबिया, डाळवर्गीय पिके व फलोत्पादन” यावर विशेष भर देण्यात येऊन मूल्य साखळी विकसित करण्यात येईल. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी इको सिस्टिम तयार केली जाईल. कृषी क्षेत्रामध्ये सुगंधीत व औषधी वनस्पती लागवड व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व केंद्रासमवेत सहकार्य साधण्याचे कार्य प्रभावी पध्दतीने हाती घेतले जाईल. असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा : मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, केंद्राच्या योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पध्दतीने कार्य केले जाईल. “अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट सक्षम करुन जलद गतीने दिशा देण्याचे काम केले जाईल. जैविक शेती व नैसर्गिक शेतीसंदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील जेणेकरुन आपली शेती विषमुक्त होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल. असेही श्री.शिंदे म्हणाले.
आपत्ती परिस्थितीत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम : मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळे, अवेळी पाऊस, बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र दरवर्षी तोंड देत आहे.पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मुंबई व कोकणात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. कार्यभार घेतल्यानंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे पाहण्याचे, त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करण्याचे निर्देश दिले. सातत्याने दररोज सकाळी विशेषत: कोकणातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे होते आहे. वेगवेगळ्या नद्यांना पूर आले. काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरून वाहत होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ तुकड्या त्यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच बेस स्टेशनवर ‘एनडीआरएफ’च्या ९ आणि ‘एसडीआरएफ’च्या ४ अशा एकूण १३ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या कामावरही लक्ष ठेवले. ठाणे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कामांबाबत माहिती घेतली व सूचना केल्या. आपण आणि उपमुख्यमंत्री दोघांनी पूरग्रस्त गडचिरोलीला भेट दिली, पूरग्रस्तांना धीर दिला. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद होते. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई म��र्गाने जाणे व पाहणी करणे शक्य झाले नाही म्हणून रस्ते मार्गाने जावून पाहणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे 18 लाख 21 हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामध्ये जिरायतीखालील 17 लाख 59 हजार 633, बागायतीखालील 25 हजार 476 ,फळपीक 36 हजार 294 हेक्टर क्षेत्र आहे.आतापर्यंत पूर बाधित 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यांत आले आहे. मृत जनावरांच्या नुकसानीपोटी रु. 1 कोटी 52 लक्ष इतका निधी देत आहोत. घरे, झोपड्या व गोठ्यांच्या नुकसानीपोटी रु. 4 कोटी 70 लक्ष इतका निधी देत आहोत.शेत जमिन खरडून झालेल्या नुकसानीपोटी रु. 5 कोटी 78 लक्ष इतका निधी देण्यात येत आहे. ठिबक संच, तुषार संचांचे नुकसान राज्यात 212 ठिबक संच आणि 469 तुषार संचांचे नुकसान झाले आहे.केंद्राच्या सूचनेनुसार एखाद्या लाभार्थीस 7 वर्षांनंतरच सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेता येतो कारण 7 वर्षे हे त्या संचाचे आयुष्य निर्धारित केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
शेती पिकांच्या नुकसानीकरिता वाढीव दराने मदत : मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जुलै – 2022 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) सुधारित दराप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून पूर्वी दोन हेक्टर मर्यादेत मदत केली जायची आता ती तीन हेक्टर इतकी वाढवली आहे. आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
422 views04:32
ओपन / कमेंट
2022-08-24 07:32:13 *सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 24-Aug-22
मुंबई, दि. 23 : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेत सर्वश्री विरोधी पक्ष नेते अजित पवार, अशोक चव्हाण, समीर कुणावार, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ, नाना पटोले, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, सुरेश वरपूडकर, कैलास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, प्राजक्त तनपुरे, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, राजेश टोपे, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर, हरीश पिंपळे, अनिल पाटील यासह मान्यवर सदस्यांनी आपली मत मांडून विविध मागण्या मांडल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर : नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील मदत : मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला सूचना देण्यात येतात. तसेच कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण : मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल.
मूल्य साखळी विकसित करणार : डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची ट्रेसेबिलिटी, ब्लॉक चेन ��ॉडेल, आर्टिफिशियल इन्टलिजन्स, को-ऑपरेटीव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांचे (FPO) संगणकीकरण इत्यादी कार्ये हाती घेतली जातील. यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल. आधुनिक शेतीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅनो युरीया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल कल्टिव्हेशन ह्या टेक्नॉलॉजीच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल.
383 views04:32
ओपन / कमेंट
2022-08-22 14:51:16 *आजचा कृषी सल्ला*
*आडसाली ऊस*
ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये विभागून ठिबक सिंचनातून द्यावीत.
आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर)
१ ते ४ आठवडे - युरिया १०.५ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो
५ ते ९ आठवडे - युरिया १९.५ किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो
१० ते २० आठवडे - युरिया १२.५ किलो, १२:६१:०० ४.५ किलो, एम.ओ.पी. ३ किलो
२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ६ किलो
*सुरु ऊस*
कीड नियंत्रण
पायरीला
पाठीमागे चिमट्यासारख्या दोन शेपट्या असणारी पिल्ले तसेच तपकिरी रंगाच्या प्रौढावस्था पानावर दिसतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. अधिक प्रादुर्भावात पानावर काळी बुरशी वाढते. उसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट येते.
नियंत्रण
इपिरीनिया मेल्यॅनोल्युका या मित्र किटकाचे एकरी २,००० कोष अथवा २ लाख अंडी सोडावीत.
ऑगस्ट महिन्यानंतर उसाची खालची पाने काढावीत.
पाकोळीची अंडी गोळा करून त्यांचा नाश करावा.
तीन ते पाच पिल्ले किंवा प्रौढ अथवा एक अंडीपुंज प्रति पान दिसून आल्यास, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
पांढरी माशी
निचरा नसलेल्या जमिनी, दलदलीच्या क्षेत्रात प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पिल्ले व प्रौढ पानांच्या मागील बाजूने रसशोषण करतात. पाने पिवळसर गुलाबी दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाळतात. पिल्ले पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. त्यामुळे काळी बुरशी वाढते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. वाढ खुंटते, साखर उतारा कमी होतो.
नियंत्रण
पाणी साचत असल्यास चर काढून निचरा करावा. पिकाला ताण पडल्यास पाणी द्यावे.
रासायनिक खतांची मात्रा शिफारशीनुसार व योग्यवेळी विभागून द्यावी.
प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
व्हर्टिसिलीअम लेकॅनी १ किलो आणि १ लिटर दूध प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास, डायमेथोएट (३० ईसी) २.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
460 views11:51
ओपन / कमेंट
2022-08-22 08:13:09 कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 22-Aug-22
पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पश्‍चिमेकडे सरकत असून, त्याच्या प्रभावामुळे आज (ता. २२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक बरेली, कानपूर, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, मध्य प्रदेश, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. त्यामुळे मध्य भारतात ढगांची दाटी असून, पाऊस सुरू आहे.
घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असून, पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. आज (ता. २२) कोकणासह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरली : वायव्य झारखंड आणि आग्नेय मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीचे आज (ता. २२) ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा
रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : लांजा ४०, माथेरान, खालापूर, कर्जत, रामेश्‍वर प्रत्येकी ३०
मध्य महाराष्ट्र : लोणावळा, राधानगरी, महाबळेश्‍वर प्रत्येकी ४०
विदर्भ : अर्जुनी मोरगाव ६०, भंडारा, मोहाडी प्रत्येकी ५०, कुरखेडा, सावळी प्रत्येकी ४०, लाखणी, अरमोरी, मोदा प्रत्येकी ३०
घाटमाथा : कोयना ९०, अंबोणे ८०, दावडी, डुंगुरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ७०, शिरगाव ६०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
459 views05:13
ओपन / कमेंट
2022-08-20 15:36:20 आजचा कृषी सल्ला
आले
आल्यामध्ये भरणी करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. लागवडीपासून २.५ ते ३ महिन्यांनी भरणी करावी. या कालावधीत आले प्रामुख्याने शाकिय वाढीच्या अवस्थेमध्ये असते, ही अवस्था आल्याच्या उत्पादनात महत्त्वाची आहे. या अवस्थेमध्ये प्रामुख्याने आल्याच्या पानांची संख्या, फुटव्यांची संख्या आणि उंची निश्चित होते. भरणी केल्याने उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. भरणी केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि गड्ड्यांचे चांगले पोषण होते. उघडे पडलेले गड्डे पूर्ण झाकले जातात. आल्याचे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे राहिल्यास ते हिरवे पडतात, त्यांची वाढ पूर्ण थांबते, त्यामुळे उत्पादनात घट येते. कंदमाशीचे नियंत्रण करता येते. भरणीवेळी दिलेली खतमात्रा मातीआड होण्यास मदत होते. त्यामुळे खते वाया न जाता त्यांची कार्यक्षमता वाढते. पावसामुळे उथळ झालेल्या सऱ्या खोल होण्यास मदत होते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येते.
लागवड पद्धतीनुसार भरणी करण्याची पद्धत अवलंबून आहे. सरी-वरंब्यावर लागवड केलेल्या आल्यामध्ये सरीमधील ५-७ सें.मी. माती शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावावी. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल याची काळजी घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केली असल्यास दोन गादीवाफ्यामधील सरीतील माती उकरून गादीवाफ्यावर २-३ इंचाचा थर येईल याप्रमाणे माती लावावी किंवा पॉवर टीलरच्या सहाय्यानेदेखील भरणी करता येते, त्यामुळे मजुरांची बचत होते. भरणी केल्यानंतर पाऊस नसल्यास पिकास हलके पाणी द्यावे. गादीवाफ्यावर भरणी करताना ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि तोट्या मातीमध्ये जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
*हळद*
लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. या कालावधीमध्ये हळदीस फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्डयामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्डयांना लावावी. माती लावताना संपूर्ण कंद झाकावा. भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकास हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते. उघड्या राहिलेल्या हळकुंडावर कंदमाशी अंडी घालते. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रसार होतो. गादीवाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
524 views12:36
ओपन / कमेंट
2022-08-20 08:19:59 *केंद्राने विद्राव्य खतांची बाजारपेठ ठेवली दाबून*

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 20-Aug-22
पुणे : रासायनिक खतांचा काटेकोर वापर करा, असा उपदेशाचा डोस केंद्र सरकारकडून वारंवार पाजला जात असताना कमी मात्रेत जादा उत्पादन देणाऱ्या विद्राव्य खतांवरील भरमसाट आयातकर कमी करण्यास सरकार का तयार नाही, असा सवाल खत उद्योगाने उपस्थित केला आहे.
केंद्राकडून सध्या फक्त रासायनिक खतांनाच अनुदान दिले जाते. मात्र पारंपरिक खतांच्या तुलनेत ५० टक्के कमी मात्रेत शेतीमालाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढविणाऱ्या विद्राव्य खताला अनुदान नाकारले जात आहे. पारंपरिक रासायनिक खतांचा देशभर असंतुलित वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरण आणि शेतजमिनीची मोठी हानी होत आहे. पंजाब, हरियानासारख्या राज्यांमध्ये रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मानवी आरोग्याच्याही समस्या उद्‍भवल्या आहेत. त्यावर उपाय विद्राव्य खतांचा वापर वाढविणे हाच आहे. परंतु केंद्र व राज्याराज्यांमधील कृषी विभागाने विद्राव्य खताच्या उपयुक्ततेकडे साफ दुर्लक्ष केले आहे, अशी खंत उद्योगातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
‘रिचफिल्ड फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वप्नील बच्छाव म्हणाले, ‘‘भारतीय कृषी धोरणात विद्राव्य खताच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून आहे. कारण दाणेदार खतांमधून जमिनीत ४० ते ६० टक्क्यांपर्यंत खते वाया जात आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आणि सरकारी अनुदानदेखील मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विद्राव्य खतांकडे दुर्लक्ष होते आहे. शेतकऱ्यांची इच्छा असूनही विद्राव्य खतांचा वापर करता येत नाही. जागतिक बाजारात कच्चा माल महागल्याने विद्राव्य खतांच्या वाढलेल्या किमती, केंद्र सरकारने केलेले धोरणात्मक दुर्लक्ष आणि या खतांना अनुदानाच्या कक्षेपासून दूर ठेवणे अशा मुख्य समस्या त्यामागे आहेत. त्यामुळेच देशात पारंपरिक रासायनिक खतांच्या तुलनेत विद्राव्य खतांचा वापर एक टक्कादेखील होत नाही.’’
आयातकर सरसकट काढणे हाच पर्याय : सूत्रांच्या म्हणण्यानुसार, विद्राव्य खतांची आयात किचकट करण्यासाठी ५ ते २२ टक्क्यांपर्यंत कर लादलेले आह��त. त्यामुळे शेतकऱ्यांना महाग खते घ्यावी लागतात. आयातकर सरसकट काढून टाकणे हाच एक चांगला पर्याय या समस्येवर आहे. पारंपरिक खतांवरील अनुदाने कमी करून विद्राव्य खतांच्या पीकनिहाय श्रेणींवर (ग्रेड्‍स) अनुदान देणे अत्यावश्यक आहे. राजस्थान सरकारने सर्वप्रथम पीकनिहाय ‘फर्टिगेशन किट्स अनुदानावर शेतकऱ्यांना दिले आहेत. तेच धोरण देशभर लागू करणे शक्य आहे.
विद्राव्य खतवापरात सहा पट वाढ : जागतिक खते संघटनेच्या (आयएफए) मतानुसार, विद्राव्य खतांचा वापर जगभर वाढतो आहे. सूक्ष्म सिंचन व हरितगृहांचा वापर जगभर वाढत आहे. त्यामुळे २०१८ मध्ये विद्राव्य खताचा एकूण जागतिक खप ३.६ दशलक्ष टनापर्यंत झाला. भारतात विद्राव्य खतांचा वापर २०१० मध्ये ५० हजार टन होता. आता त्यात सहा पट वाढ होऊन तीन लाख टनापर्यंत वापर वाढला आहे. तरीही हे प्रमाण पारंपरिक रासायनिक खतांच्या तुलनेत ०.५ टक्का इतके नगण्य आहे. केंद्राने थोडा आधार दिला तरी पाच वर्षांत हा वापर ३० लाख टनांच्या पुढे जाणे शक्य आहे.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
460 views05:19
ओपन / कमेंट
2022-08-19 07:42:48 पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 19-Aug-22
पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १९) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, श्रावण सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. या आसाचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकणार आहे. पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीत कायम राहील. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. १९) पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहेत. बांगलादेश आणि म्यानमार किनाऱ्यालगतच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज (ता. १९) उत्तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे. ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगड कडे येण्याचे संकेत आहेत. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
गुरूवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : दापोली, अंबरनाथ, माथेरान प्रत्येकी ५०, जव्हार, वाकवली प्रत्येकी ४०, तळा, मंडणगड, उल्हासनगर, खेड, पालघर, कल्याण, वेंगुर्ला, पोलादपूर, शहापूर, तलासरी, म्हसळा, हर्णे, कणकवली प्रत्येकी ३०
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, इगतपुरी प्रत्येकी ७०, लोणावळा, वेल्हे प्रत्येकी ४०, पेठ, सुरगाणा, जावळीमेढा, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३०
घाटमाथा : दावडी, ताम्हिणी ८०, शिरगाव, अंबोणे, डुंगुरवाडी प्रत्येकी ७०, कोयना नवजा प्रत्येकी ६०, भिरा ५०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
526 views04:42
ओपन / कमेंट