Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-05-31 07:19:59 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
“ गुणवत्तापूर्ण खरीप कांदा उत्पादन” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक: डॉ. विवेक भोईटे
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
मंगळवार दि. ३१ मे
वेळ - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
271 views04:19
ओपन / कमेंट
2022-05-30 15:49:47 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड यशस्वीरीत्या केली जाते. खरीप हंगामात टोमॅटो लागवडीसाठी मे-जून महिन्यात रोपवाटिकेमध्ये बी पेरून जून-जुलै महिन्यात रोपांची पुनर्लागवड करावी. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य रोपांची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्याप्रकारे आवश्‍यक असते. एक एकर क्षेत्रासाठी १.२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. ३ मी x १ मी x १५ सेंमी आकाराचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ चांगले एकसारखे मिसळावे. बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात. त्यानंतर हाताने १० सेंमी अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सेंमी अंतरावर एक-एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे ५-८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, या���ुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५-३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादीवाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेंडाझीम २-३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
*कांदा-लसूण*
खरीप कांदा रोपवाटिका
एक एकर कांदा लागवडीसाठी २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी २-३ किलो बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे. रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंच, १-१.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात. वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत. रुंदीशी समांतर ५-७.५ सें.मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे. अति उष्णतेमुळे बियांची उगवण व रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी वाफ्यावर दुपारच्या वेळी सावली राहील अशी सोय करावी. तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
176 views12:49
ओपन / कमेंट
2022-05-30 12:48:27
217 views09:48
ओपन / कमेंट
2022-05-30 12:48:17 *टोमॅटो*
*करपा, आकसा, व्हायरस, पिवळेपणा* नियंत्रणासाठी....
आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह* *(एल)* आयुर्वेदिक स्प्रे पावडर.

*फायदे -*
पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवा.
अधिक फुटी, फुले व फळ धारणा.
फुल - फळ गळ नियंत्रण.

*(सर्व पिकांसाठी उपयुक्त)*
+91 9075099544
+91 9145499544

https://wa.me/919075099544 (What's app)
https://wa.me/919145499544 (What's app)
207 views09:48
ओपन / कमेंट
2022-05-30 09:09:23 मॉन्सून केरळात दाखल

सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 30-May-22
पुणे : संपूर्ण देशासाठी वरदान ठरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) यंदा तीन दिवस आधीच देवभूमी केरळमध्ये आगमन झाले आहे. रविवारी (ता. २९) केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवस आधीच मॉन��सून दाखल झाला असून, गतवर्षी मॉन्सूनचे आगमन दोन दिवस उशिराने (३ जून) झाले होते.
समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिमेकडून वाहणारे वारे, अग्नेय अरबी समुद्रात वाढलेले पश्‍चिमी वाऱ्यांचे प्रवाह, अरबी समुद्र आणि केरळमधील ढगांचे अच्छादन, समुद्र आणि भूभागावरून परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, गेल्या २४ तासांमध्ये १४ पैकी १० केंद्रांवर २.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने केरळात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी (ता. २९) दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा दक्षिण भाग, मन्नारचे आखात आणि नैऋत्य बंगालच्या उपसागाच्या आणखी काही भागात मॉन्सूनचे प्रगती केली आहे. कर्नुल, पलक्कडपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण केरळ व्यापून, मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या काही भागांसह, तमिळनाडूनचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. लवकरच हवामान विभागाकडून मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येईल.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
287 views06:09
ओपन / कमेंट
2022-05-27 15:28:18 आजचा कृषी सल्ला
आले
आले जाती
हवामानाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. त्या त्या भागानुसार जातींना नावे दिली आहेत. जसे सातारा परिसरातील माहीम, औरंगाबाद परिसरातील औरंगाबादी, कालिकत, कोचीन, मारन इत्यादी जातींचा समावेश होतो; तर काही जाती बाहेरच्या देशांतून आयात केलेल्या आहेत. त्यामध्ये रिओ डी जानेरो, चायना, जमैका या जातींचा समावेश होतो.
माहीम : महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी २१० दिवस, मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे, सुंठेचे प्रमाण १८.७ टक्के, उत्पादन प्रतिहेक्‍टरी २० टन.
राष्ट्रीय स्तरावर भारतीय मसाल्याचे पीक संशोधन केंद्र, कालिकत यांनी प्रसारीत केलेल्या काही जाती
वरदा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २२.३ टन, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, फुटव्यांची संख्या ९ ते १०, सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के.
महिमा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २३.२ टन, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, फुटव्यांची संख्या १२ ते १३, सुंठेचे प्रमाण १९ टक्के, सूत्रकृमीस प्रतिकारक जात.
रिजाथा - कालावधी २०० दिवस, हेक्टरी उत्पादन २२.४ टन, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के, फुटव्यांची संख्या ८ ते ९, सुंठेचे प्रमाण २३ टक्के, प्रामुख्याने सुंठ बनविण्यासाठी प्रसारीत जात.
हळद
हळद जाती
फुले स्वरूपा: कालावधी २५५ दिवस, ५०-५५ ग्रॅमपर्यंत वजनाचे मध्यम गड्डे, सरळ व लांब वाढणारी ३५-४० ग्रॅम वजनाची प्रत्येक कंदात ७-८ हळकुंडे, बियाणे उत्पादन प्रमाण १.५, गाभ्याचा रंग पिवळसर, कुरकुमीनचे प्रमाण जास्त (५.१९ टक्के), उतारा २२ टक्के, ओल्या हळदीचे उत्पादन ३५��.३० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विंटल/ हेक्टर, पानावरील करपा व कंदमाशीस प्रतिकारक.
सेलम: कालावधी २७० दिवस, जाड व ठसठशीत हळकुंडे उपहळकुंडे, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन ३५०-४०० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७०-८० क्विंटल/ हेक्टर, करपा रोगास बळी पडते.
राजापुरी: हळकुंडे व उपहळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा, उतारा १८-२० टक्के, ओल्या हळदीचे उत्पादन २४०-२५० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ४५-५० क्विंटल/ हेक्टर, करपा रोगास बळी पडते.
आयआयएसआर प्रगती: सरासरी झाडाची उंची १०४ से.मी, सरासरी फुटव्यांची संख्या ३.५ प्रती झाड, गाभ्याचा रंग नारंगी, सरासरी पानाची संख्या १५.८७ प्रति फुटवा, सरासरी पानाची लांबी व रुंदी ४९ x १३.३ से.मी, सरासरी गड्ड्यांची संख्या तीन, सरासरी उत्पादन ५७७.९३ ग्रॅम प्रति झाड, पक्वता कालावधी १८० दिवस, ओल्या हळदीचे सरासरी उत्पादन ३८ टन प्रति हेक्टर, कमाल उत्पादन ५२ टन प्रति हेक्टर, कुरकुमीनचे प्रमाण ५.०२%, ओलिओरेझीनचे प्रमाण १५.२९%, सुगंधी तेलाचे प्रमाण ६.३%, उतारा १६ ते २०%, सूत्रकृमिंना प्रतिकारक्षम
वायगाव: उतारा २०-२१ टक्के, हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध, गाभा गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन २६५-२७० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ५२-५५ क्विंटल/ हेक्टर
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
96 views12:28
ओपन / कमेंट
2022-05-26 15:18:14 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमुगाचा पाला उत्तम चारा म्हणून गणला जातो. भुईमुगाच्या पाल्याची पाचकता जवळजवळ ५३ टक्के इतकी आहे. तर त्यातील क्रूड प्रथिने ८८ टक्के इतकी असतात. १ किलो पूर्ण वाळलेल्या चाऱ्यापासून २३२७ कॅलरी उष्मा मिळते. शेंगा तोडून झालेला पाल्याचे छोटे-छोटे भेले वळले जातात. असा वाळलेला पाला उन्हात वाळवून त्याची चाऱ्यासाठी साठवण केली जाते. भुईमुगाचा पाला पावसात ओला झाल्यास त्यावर बुरशी वाढते. तो जनावरांना खाण्यासाठी अयोग्य होतो. म्हणून काढणीनंतर वाळलेला पाला त्वरित कोरड्या जागी शेडमध्ये हलवावा.
सुर्यफुल
बुंधा, पाने, फुलांच्या भुशाचा उपयोग -
सूर्यफूल झाडापासून मूरघास तयार करता येते. हा मूरघास जनावरे अत्यंत चवीने खातात.
वाळलेली बोंडे व झाडे जनावरे चवीने खातात.
झाडाचा बुंधा, पाने, फुलांच्या भुश्‍श्‍यापासून कंपोस्ट खत तयार करून पिकांना दिले तर नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीचा पोत सुधारतो.
झाडाचा बुंधा, पानांच्या लगद्यापासून कागद तयार करतात.
बुंध्यातील गराचा उपयोग पार्सलचे खोके, शोभेचे छप्पर, बाटलीची बुचे इत्यादी उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
फुलांचा भुसा पशू व पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात.
खोड व भुशापासून मिळणाऱ्या पेक्‍टिनमध्ये मिथॉक्‍सीलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला फळांपासून मिळणाऱ्या पेक्‍टिनपेक्षा जास्त मागणी असते.
इतर उपयोग -
औषधी वनस्पती म्हणून उपयोग
गराचा उपयोग बेंड, पुळीवर लेप देण्यासाठी करतात.
अंग मॉलिशसाठी सूर्यफूल तेलाचा वापर होतो.
सूर्यफुलामधील रसामुळे उंदरांना विषबाधा होते. त्यामुळे उंदीर नियंत्रणाकरिता याचा वापर होतो.
मधमाशी पालनासाठी उपयुक्त
तेलाचा उपयोग रंग, वॉर्निश, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीमध्ये होतो.
डिझेलबरोबर योग्य प्रमाणात सूर्यफुलातील अल्कोहोल व फरफ्युरलचे मिश्रण करून इंधन म्हणून उपयुक्तता तपासली जात आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
281 views12:18
ओपन / कमेंट
2022-05-26 08:02:00 राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; विदर्भात तापमान चाळीशी पार

सौजन्य : सकाळ
दिनांक : 26-May-22
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मिश्र वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान राज्यात मागच्या सात दिवसांपासून काही जिल्ह्यात पावसाच्या सरी पडत आहेत.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच वर्धा आणि चंद्रपूरमध्ये या जिल्हांपेक्षा कमी पण समाधानकारक पाऊस पडला आहे. तसेच यवतमाळ आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाच्या थोड्या प्रमाणावर सरी कोसळल्या असून रत्नागिरी, सातारा, लातूर आणि नागपूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.पुणे, मुंबई, पालघर, आहमदनगर, परभणी, नांदेड, रायगड आणि गोंदिया या जिल्हातील तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यात पाऊसाच्या सरी कोसळल्या नसल���याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वर आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून अजून मान्सूनचे आगमन झाले नाही. त्याचबरोबर काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
313 views05:02
ओपन / कमेंट
2022-05-25 15:30:52 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
साठवणीतील कांदा व लसणाकरिता - कांद्याची सड आणि कोंब येणे या समस्या उद्भवू नयेत यासाठी साठवणुकीतील कांद्यांवर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. चाळीत हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी.
लसणाच्या गड्ड्या पातीसह हवेशीर चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवाव्यात.

टोमॅटो
लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट), पानांवरील ठिपके (सेप्टोरिया लीफ स्पॉट) या रोगांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तर उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट), फळसड (बक आय रॉट) रोगाच्या नियंत्रणासाठी, वरील बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. झाडे योग्य प्रकारे बांधावीत. पाने आणि फळे मातीच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाचे अवशेष, रोगग्रस्त फळे गोळा करून जाळून टाकावीत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
164 views12:30
ओपन / कमेंट
2022-05-25 08:08:26 उष्णतेची लाट ओसरली

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 25-May-22
पुणे : यंदा मार्च महिन्यापासून उन्हाच्या (Heat) तडाख्याने हैराण झाल्यानंतर मे महिन्यातही राज्यात उष्ण लाट (Heat Wave) कायम होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्ण लाट ओसरली असून, अद्यापही अनेक भागांत उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांच्या खाली घसरला आहे. कोकणात कमाल तापमान ३२ ते ३६ अंश, मध्य महाराष्ट्रात २७ ते ३८ अंश, मराठवाड्यात ३७ ते ३९ अंश आणि विदर्भात ३९ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे.
राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, अनेक भागांत वाऱ्याचा वेग वाढला आहे. आज (ता. २५) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.७, धुळे ४१, जळगाव ४१, कोल्हापूर ३३.१, महाबळेश्‍वर २७.१, नाशिक ३४.७, सांगली ३४.४, सातारा ३३.३, सोलापूर ३८.०, सांताक्रूझ ३४.६, डहाणू ३५.५, रत्नागिरी ३२.८, औरंगाबाद ३७.३, परभणी ३८.६, अकोला ४१, अमरावती ४०.४, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४२.२, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.५, वर्धा ४१.२, यवतमाळ ४०.५.
मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान
नैॡत्य मो��मी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू होणार आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. अरबी समुद्रात मालदीव आणि कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखा काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
261 views05:08
ओपन / कमेंट