Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0

नवीनतम संदेश 11

2022-05-16 10:01:12 *टोमॅटो*
*करपा, आकसा, व्हायरस, पिवळेपणा* नियंत्रणासाठी....
आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह* *(एल)* आयुर्वेदिक स्प्रे पावडर.

*फायदे -*
पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवा.
अधिक फुटी, फुले व फळ धारणा.
फुल - फळ गळ नियंत्रण.

*(सर्व पिकांसाठी उपयुक्त)*
+91 9075099544
+91 9145499544

https://wa.me/919075099544 (What's app)
https://wa.me/919145499544 (What's app)
285 views07:01
ओपन / कमेंट
2022-05-13 15:25:34 आजचा कृषी सल्ला
केळी
केळी हे पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. एकूण पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते २००० मि.मी. पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने मृगबाग केळीला मार्च महिन्यात १६ ते १८ लिटर, एप्रिल महिन्यात १८ ते २० लिटर आणि मे महिन्यात २० ते २२ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन द्यावे. कांदेबागेसाठी या तीन महिन्यांमध्ये प्रति झाड प्रति दिन १० ते १४ लिटर पाणी द्यावे.
संत्रा-मोसंबी-लिंबू
संत्रा व मोसंबी बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला १७ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडाला ३४ लिटर पाणी/ दिवस/ झाड, तीन वर्षे वयाच्या झाडाला ५१ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. चार वर्षे वयाच्या झाडाला ७४ लिटर पाणी, तर ८ वर्षे वयाच्या झाडाला १८८ लिटर/ दिवस/ झाड व १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना २३५ लिटर/ दिवस/ झाड पाणी द्यावे.
लिंबू बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला ११ लिटर पाणी/ दिवस/ झाड, दोन वर्षे वयाच्या झाडाला १७ लिटर, ३ वर्षे वयाच्या झाडाला २५ लिटर, ४ वर्षे वयाच्या झाडाला ३६ लिटर पाणी प्रति दिन प्रति झाड द्यावे. पाच वर्षांच्या झाडाला ४२ लिटर/ दिवस/ झाड, ८ वर्षांच्या झाडाला ७३ लिटर/ दिवस/ झाड आणि १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर/ दिवस/ झाड द्यावे.
पाणीटंचाईच्या काळात झाडाभोवती काळी पॉलीथीन (१०० मायक्रॉन जाडी) पसरून घ्यावी. आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावतो. आच्छादनासाठी शेतीतील निरूपयोगी सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ वापरता येतात. यामध्ये प्रामुख्याने डवरीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत, गव्हाचे काड, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा थर झाडाच्या सभोवती पसरावा.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
498 views12:25
ओपन / कमेंट
2022-05-13 07:38:18 मॉन्सून रविवारपर्यंत अंदमानात; नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक हवामान

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 13-May-22
पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘असानी’ चक्रीवादळ निवळत असतानाच अंदमान निकोबार बेट समुहावर नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. रविवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगत असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १५ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी २१ मे रोजी मॉन्सूनने अंदमान बेटांचा बहुतांशी भाग व्यापला होता. तर ३ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून अवघ्या दोन दिवसात (५ जून) महाराष्ट्रात दाखल झाला होता.
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल. तसेच मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.
‘असानी’ चक्रीवादळ निवळले : बंगालच्या उपसागरात आलेले ‘असानी’ चक्रीवादळ निवळत असून, आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली आज (ता. १३) निवळणार असून, आंध्रप्रदेश, रायलसीमा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यामध्ये ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
128 views04:38
ओपन / कमेंट
2022-05-12 08:31:47 *कापूस, सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी विशेष कृती योजना; तीन वर्षात एक हजार कोटी निधी देणार*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 12-May-22
मुंबई, दि. 11 : कापूस आणि सोयाबीनची उत्पादकता वाढविण्याच्या विशेष कृती योजनेस तीन वर्षात एक हजार कोटी निधी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या विशेष कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे.
राज्यातील कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर व सोयाबीन पिकाखाली ४६ लाख हेक्टर असे एकूण 88 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून या प्रमुख पिकांची उत्पादकता विविध कारणांमुळे देशाच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, या दोन्ही पिकांच्या बाबतीत असेही आढळून आले आहे की योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांची उत्पादकता खूप अधिक आहे परंतु, त्याच तालुक्यातील व त्याच कृषि-हवामान क्षेत्रात राहणाऱ्या अन्य शेतकऱ्यांची उत्पादकता मात्र त्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
या पार्श्वभूमीवर, शासनाने अर्थसंकल्पामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्य साखळी विकासासाठी राबवावयाच्या विशेष कृती योजनेसाठी येत्या तीन वर्षात रुपये १००० कोटी निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने, कापूस, सोयाबीन तसेच, भुईमुग, सुर्यफुल, करडई, मोहरी, तीळ व जवस या अन्य तेलबिया या पिकांच्या उत्पादकता वाढी बरोबरच मूल्य साखळी विकासासाठी आगामी 3 वर्षासाठी विशेष कृति योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यातील सुमारे ६० टक्के निधी हा कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यत पोहचविण्याकामी व विविध खते अनुदान स्वरुपात देण्यासाठी तसेच कृषि विद्यापिठांमार्फत बियाणे साखळी बळकटीकरणासाठी वापरला जाईल. उर्वरित ४० टक्के निधी हा मूल्य साखळी विकासासाठी, विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी (उदा. साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिनिंग ग्रेडींग युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती, बीज प्रक्रिया युनिट इ.) वापरात आणला जाईल. ज्या तालुक्यांची कापूस व सोयाबीन पिकांची उत्पादकता राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी आहे अशा तालुक्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील अधिक उत्पादकता असलेले प्रगतशील संसाधन शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान तसेच, कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत विस्तार करण्यात येईल. त्याकरिता गाव निहाय शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येतील, या गटांतील शेतकऱ्यांपर्यंत पिक प्रात्यक्षिकांद्वारे तसेच, शेती शाळा, क्षेत्रीय भेटी व प्रशिक्षणाद्वारे पिक उत्पादन तंत्रज्ञान पोहोचविण्यात येईल, त्यांची क्षमता बांधणी करण्यात येईल तसेच, पिक उत्पादन तंत्रज्ञानाची प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल.

*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
335 views05:31
ओपन / कमेंट
2022-05-09 15:23:01 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जनावरांवर येणारा ताण दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करतो. व्यवस्थापनातील बदलाने आपण या परिणामांची तीव्रता कमी करू शकतो. उन्हाळ्यातील उच्च तापमानात दाट सावली देणारा गोठा किंवा झाड, गोठ्याचे योग्य दिशेनुसार बांधकाम, उन्हाळ्यात गोठ्यात पाणी शिंपडणे किंवा स्प्रिंकलर/ फॉगर बसविणे, फॅनचा वापर, पिण्यास थंड पाणी देणे महत्त्वाचे आहे. पशू आहारशास्त्रातील नियमानुसार उन्हाळ्यात पहाटे लवकर व सायंकाळच्या थंड वातावरणात पशुखाद्य आणि चारा द्यावा. सोपा व सहज पचणारा, जास्त पोषणमूल्ये असलेला आहार द्यावा. उन्हाच्या ताणामुळे पचन क्षमतेवर ताण येतो. यामध्ये कोठीपोटातील प्रथिनांचा होणारा वापर पाहता जास्त प्रथिनयुक्त आहार या काळात जनावरांना द्यावा. उन्हाळ्यात शरीरातील इतर क्षारांचा होणारा वापर पाहता सोडियम, पोटॅशियम यांसारख्या खनिजांचे योग्य व्यवस्थापन करणे या काळात उपयुक्त ठरते.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
495 views12:23
ओपन / कमेंट
2022-05-07 15:08:47 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
*पाणी व्यवस्थापन*
भुईमुगाची उगवण झाल्यानंतर २० ते २४ दिवसांनी पिकास फुले लागतात. फुलोरा अवस्था ही ४५ ते ६० दिवसपर्यंत सुरू असते. त्याच वेळी पिकास आऱ्या सुटणे, शेंगा लागणे इत्यादी अवस्था एकाच वेळी दिसून येतात. या सर्व अवस्थांमध्ये पाण्याची गरज असते. उत्पादनात घट होऊ नये म्हणून पीकवाढीच्या काळात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. आधुनिक सिंचन पद्धतीने पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते. उत्पादनात २५ ते ३०टक्के वाढ होते. तसेच पिकाची गुणवत्ता व दर्जा वाढतो. सिंचनाची कार्यक्षमता वाढते. रोग, कीड व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
वाढीच्या विविध अवस्था, कालावधी व वैशिष्ट्ये
वाढीची अवस्था ---- कालावधी (दिवस) ---- वैशिष्ट्ये
आऱ्या सुटणे ------------ ३१ ते ५१ ---- फुलाचे फलन होऊन आऱ्या लागणे.
शेंगा लागण्याची अवस्था ---- ५० ते ७५ ---- आऱ्यांच्या टोकावर शेंगांची वाढ सुरू होणे.
शेंगेत दाणे भरणे ---------- ७५ ते ९० ---- पूर्ण वाढलेल्या शेंगेत दाणे भरणे.
पक्वता ------------------- ८० ते १०५ ---- दाण्यांचा रंग फिकट गुलाबी होणे.
सुर्यफुल
पाणी व्यवस्थापन
सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पिक असून ३० ते ३५ सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. सूर्यफूल पिकाला कळी धरणे (३० ते ४० दिवस), फुल उमलणे (५५ ते ६५ दिवस) आणि दाणे भरणे (६५ ते ७५ दिवस) या पीक वाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार काळ्या व भारी जमिनीमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतराने, तर मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जर पाणी उपलब्ध नसेल व केवळ एका पाळीकरीता पाणी उपलब्ध असेल, तर पीक फुलोरा या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, फुलकळीची अवस्था व पीक फुलोरा या संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. चार पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, रोपावस्था, फुलकळी अवस्था, पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
595 views12:08
ओपन / कमेंट
2022-05-07 07:23:26 बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 07-May-22
पुणे : बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. ६) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उद्या (ता. ८) सायंकाळपर्यंत उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, आज (ता. ७) सायंकाळपर्यंत या भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे. उद्या (ता. ८) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, मंगळवारपर्यंत (ता. १०) ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.
या प्रणालीमुळे अंदमान निकोबार बेटसमूह आणि लगतच्या समुद्रात ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. पूर्व किनारपट्टीकडे येताना वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अंदमान बेटसमूह आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासह, मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
525 views04:23
ओपन / कमेंट
2022-05-06 09:20:56 *यंदा १० दिवस आधीच मान्सून दाखल होणार!*

सौजन्य : पुढारी
दिनांक : 06-May-22
नवी दिल्ली : लाही लाही करणार्‍या उष्म्यात गारवा देणारी एक बातमी हाती आली आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज व्हेदर फोरकास्ट’नुसार यंदा भारतात मान्सून दहा दिवसांपूर्वीच दाखल होणार आहे. केरळ किनारपट्टीवर 20/21 मे रोजी मान्सून धडकेल. साधारणपणे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते.
बंगालच्या उपसागरातून हवामानसंबंधी बदलाचे संकेत मिळाले आहेत. अरबी समुद्रातही वावटळरोधी क्षेत्र तयार होत आहे. परिणामी, केरळात मान्सून लवकर दाखल होऊ शकेल. भूमध्य रेषेलगत ढगांचा समूह सक्रिय असून मान्सूनच्या आगाऊपणाचेच हे संकेत आहेत. ‘स्कायमेट’ने मात्र मान्सून आपल्या अपेक्षित वेळेच्या जवळपास दाखल होईल, असाच अंदाज वर्तविलेला आहे.
गेल्या 24 तासांत दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबचा काही भाग, बिहार, झारखंड, मणिपूरमध्ये पाऊस झाला. आंध्र प्रदेश, अंदमान निकोबारमध्येही वादळी पाऊस झाला. तेलंगणा, तटवर्ती ओडिशा, मध्य तामिळनाडूतही थोडाफार पाऊस झाला.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=e
535 views06:20
ओपन / कमेंट
2022-05-05 14:21:44 आजचा कृषी सल्ला
आले
बियाणेप्रक्रिया
बियाणेप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बियाणेप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बियाणेप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५० ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. बियाणेप्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
हळद
बियाणेप्रक्रिया
बियाणेप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बियाणेप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बियाणेप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५० ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यामध्ये १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. बियाणेप्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
540 views11:21
ओपन / कमेंट
2022-05-05 07:58:58 उन्हाचा चटका कायम राहणार

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 05-May-22
पुणे : देशाच्या विविध भागात आलेली उष्ण लाट कमी होत असतानाच राज्यातही कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील वर्धा येथे देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र हैराण झाला असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भात ४६ अंशांपार गेलेले तापमान तब्बल दोन अंशांनी झाले असून, पारा ४४ अंशांच्या जवळपास आला आहे. वर्धा, चंद्रपूर, अकोला, ब्रह्मपुरी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे तापमानाचा पारा ४४ अंशांवर आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८, धुळे ४२.०, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३०.६, मालेगाव ४४.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.८, सांगली ३८.२, सातारा ३८.६, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३४.७, डहाणू ३५.४, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.२, परभणी ४३.८, अकोला ४४.२, अमरावती ४३.६, बुलडाणा ४१.४, ब्रह्मपुरी ४४.२, चंद्रपूर ४४.४, गोंदिया ४३.५, नागपूर ४३.५, वर्धा ४४.५
उपसागरात उद्यापर्यंत कमी दाब क्षेत्र : बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती ��िर्माण झाली असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत (ता. ६) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. रविवारपर्यंत (ता. ८) या प्रणालीचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतरण होण्याची शक्यता आहे. यामुळे अंदमान बेटांवर जोरदार वाऱ्यासह, मुसळधार पावसाची शक्यता आहे. यातच विदर्भापासून तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

153 views04:58
ओपन / कमेंट