Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला भुईमुग *पाणी व्यवस्थापन* भुईमुगाची उगवण झ | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
भुईमुग
*पाणी व्यवस्थापन*
भुईमुगाची उगवण झाल्यानंतर २० ते २४ दिवसांनी पिकास फुले लागतात. फुलोरा अवस्था ही ४५ ते ६० दिवसपर्यंत सुरू असते. त्याच वेळी पिकास आऱ्या सुटणे, शेंगा लागणे इत्यादी अवस्था एकाच वेळी दिसून येतात. या सर्व अवस्थांमध्ये पाण्याची गरज असते. उत्पादनात घट होऊ नये म्हणून पीकवाढीच्या काळात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. आधुनिक सिंचन पद्धतीने पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते. उत्पादनात २५ ते ३०टक्के वाढ होते. तसेच पिकाची गुणवत्ता व दर्जा वाढतो. सिंचनाची कार्यक्षमता वाढते. रोग, कीड व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
वाढीच्या विविध अवस्था, कालावधी व वैशिष्ट्ये
वाढीची अवस्था ---- कालावधी (दिवस) ---- वैशिष्ट्ये
आऱ्या सुटणे ------------ ३१ ते ५१ ---- फुलाचे फलन होऊन आऱ्या लागणे.
शेंगा लागण्याची अवस्था ---- ५० ते ७५ ---- आऱ्यांच्या टोकावर शेंगांची वाढ सुरू होणे.
शेंगेत दाणे भरणे ---------- ७५ ते ९० ---- पूर्ण वाढलेल्या शेंगेत दाणे भरणे.
पक्वता ------------------- ८० ते १०५ ---- दाण्यांचा रंग फिकट गुलाबी होणे.
सुर्यफुल
पाणी व्यवस्थापन
सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पिक असून ३० ते ३५ सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. सूर्यफूल पिकाला कळी धरणे (३० ते ४० दिवस), फुल उमलणे (५५ ते ६५ दिवस) आणि दाणे भरणे (६५ ते ७५ दिवस) या पीक वाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार काळ्या व भारी जमिनीमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतराने, तर मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जर पाणी उपलब्ध नसेल व केवळ एका पाळीकरीता पाणी उपलब्ध असेल, तर पीक फुलोरा या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, फुलकळीची अवस्था व पीक फुलोरा या संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. चार पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, रोपावस्था, फुलकळी अवस्था, पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en