Get Mystery Box with random crypto!

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत सौजन्य : अॅग्रोवन दि | कृषिक अँप Krushik app

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 07-May-22
पुणे : बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. ६) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उद्या (ता. ८) सायंकाळपर्यंत उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, आज (ता. ७) सायंकाळपर्यंत या भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे. उद्या (ता. ८) त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, मंगळवारपर्यंत (ता. १०) ही वादळी प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.
या प्रणालीमुळे अंदमान निकोबार बेटसमूह आणि लगतच्या समुद्रात ६५ ते ८५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. पूर्व किनारपट्टीकडे येताना वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अंदमान बेटसमूह आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासह, मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en