Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 14

2022-04-26 09:10:04 https://krushikapp.blogspot.com/2022/04/blog-post_33.html
255 views06:10
ओपन / कमेंट
2022-04-25 07:49:54 पावसासह तापमानवाढ कायम

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 25-Apr-22
पुणे : बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प आणि पश्चिम-दक्षिण भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी असतानाच दुसरीकडे तापमानातील वाढ कायम आहे. पुढील दोन दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. पावसाळी स्थितीमुळे या भागातील तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, कोल्हापूर आदी भागांत रविवारी पावसाची नोंद झाली. या भागातील तापमान सरासरीच्या खाली आले असले, तरी रात्री उकाडा जाणवत आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात मोठी वाढ होत आहे. शनिवारी जळगाव येथे देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पावसाळी वातावरणामुळे सध्या तापमानात काही प्रमाणात घट असली, तरी विदर्भात ते ४० ते ४२ आणि मराठवाडय़ात ४० अंशांच्या आसपास आहे. मुंबईसह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर-दक्षिण भारतामध्ये तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे. गुजरातमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मध्य प्रदेशमध्येही २ ते ३ दिवसांत तापमान ३ अंशांनी वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही कमाल तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात काही भागात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी २६ एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
142 views04:49
ओपन / कमेंट
2022-04-21 15:06:46 आजचा कृषी सल्ला
आले
लागवडीची वेळ
आल्याच्या उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असून, आल्याची लागवड एप्रिल महिन्याच्या अखेरपासून ते जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. त्यानंतर अधिक उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. राज्यामध्ये सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेच्या दरम्यान आले लागवडीला सुरवात होते.
हळद
लागवडीची वेळ
बदलत्या हवामानाचा हळद पिकाच्या वाढीवर फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही. हळद हे नऊ महिन्यांचे पीक आहे. याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार एप्रिल महिन्याची अखेर ते जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. लागवडीला अधिक उशीर झाल्यास उत्पादनात घट येते. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड सुरू होते.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
216 views12:06
ओपन / कमेंट
2022-04-21 13:59:46

228 views10:59
ओपन / कमेंट
2022-04-20 07:56:47 *उद्यापासून तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज*

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 20-Apr-22

पुणे : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असली, तरी गुरुवारपासून (२१ एप्रिल) तीन दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. या हंगामातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंशापर्यंत वाढ झाली आहे.
बंगालचा उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि पुढे दक्षिण पश्चिम गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचबरोबरच अरबी समुद्राच्या भागात देखील चक्रीय स्थिती वाढली आहे. या दोन्हीच्या परिणामामुळे २१ आणि २२ एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण जोरदार वाढले आहे. या भागात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे.
काही भागात तर सरासरी तापमानात दोन ते चार अंशांपर्यंत वाढ झाली आहे. या भागाकडून राज्याकडे उष्णवारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भातील सर्वच चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या शहरांचे तापमान ४४.८ अंशांवर पोहोचले आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा चार अंशांपर्यंत तापमानात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरांमधील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये : पुणे ३७.७, नगर ४२.९, जळगाव ४३.५, महाबळेश्वर ३०.६, नाशिक ३८.१, सोलापूर ४१.४, रत्नागिरी ३३.९, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.३, अमरावती ४३.४, नागपूर ४३.६

*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
419 views04:56
ओपन / कमेंट
2022-04-19 07:59:42 आराखडे कागदोपत्री नकोत

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 19-Apr-22
या वर्षीच्या खरीप हंगामासाठी गावपातळीवर कृषी आराखडे तयार करा, अशी सूचना कृषी आयुक्तालयाने दिली आहे. गावपातळीवर शेतकरीकेंद्रित कृषी आराखडे तयार करून त्यास ग्रामविकास समितीकडूनच मान्यता घ्यावी, ही भूमिका आणि निर्णय चांगला आहे. मुळात शेतीचे नियोजन हे सुरुवातीपासून असेच होणे गरजेचे होते. परंतु दुर्दैवाने त्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कृषी विभागाला ७० वर्षांहून अधिक काळ लागला. खरीप नियोजनाला आत्तापर्यंत सूक्ष्म, सर्वसमावेशक अशी नावे दिली असली तरी ते मोघम असायचे. या वर्षीच्या गावकेंद्रित आराखड्यात मात्र मृद्‌-जलसंधारणाबाबत जनजागृतीपासून ते विकेल ते पिकेल आणि शेतीमाल प्रक्रिया अशा एकूण २५ महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. यातील पाच ते सहा घटक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने फारच महत्त्वाचे असून, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
कृषी निविष्ठांमध्ये बियाणे आणि रासायनिक खते हे उत्तम गुणवत्तेचे मुबलक प्रमाणात आणि वेळेवर शेतकऱ्यांना उपलब्ध होणे अपेक्षित असते. परंतु नेमके तेच होताना दिसत नाही. ऐन पेरणीच्या गडबडीत बियाणे टंचाई, त्यांचा निकृष्ट दर्जा यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची चांगलीच फजिती होते. बियाण्यांच्या बाबतीत कृषी विद्यापीठे, महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, खासगी कंपन्या यांच्याकडून होणारा बियाणे पुरवठा तसेच परराज्यांतून येणारे बियाणे याचा कृषी विभागाने अचूक अंदाज घेऊन त्यावर अभ्यास केला पाहिजेत. असे झाले तरच बियाणे पुरवठा सुरळीत होऊ शकतो. बनावट, निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त बियाण्यांचा बाजार बंदच झाला पाहिजेत. या वर्षी रासायनिक खतांच्या बाजारात तर आतापासूनच संभ्रमाचे वातावरण आहे. खतांची सुद्धा ऐन पेरणीच्या काळात टंचाई जाणवते, अनेक विक्रेते खतांची लिंकिंग करतात, अधिक दराने खत विक्रीसुद्धा होते. त्यातच खते भरून ठेवा, असे आवाहन कृषी विभागच करीत आहे. पेरणीला अजून किमान दोन महिने अवधी असताना बहुतांश शेतकरी आतापासून खते भरून ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत खतांचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना पाहिजे तेव्हा आणि पाहिजेत ती खते उपलब्ध झाली पाहिजेत.
मागील काही वर्षांपासून शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यातच खरीप हंगामात अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित राहतात. दरवर्षी पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट निम्म्यापर्यंतच गाठले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यांच्याकडून मनमानी व्याजाने कर्ज काढावे लागते. यावर्षी तरी पीककर्ज पुरवठ्यात सुधारणा होतील, ही काळजी केंद्र-राज्य सरकारसह रिझर्व्ह बॅंकेने घ्यायला हवी. गावकेंद्रित आराखडे तयार करताना शासनाच्या शेतीसाठीच्या विविध योजना, अभियान आदींना प्राधान्य देण्यात येणार असल्याची बाबही चांगलीच आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्तींत पीकविमा योजना पिकांना जीवदान ठरणारी आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. या वर्षी तरी पीकविमा योजनेतील गोंधळ दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. विकेल ते पिकेल, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. मात्र या धोरणांतर्गत नेमके काय, करायचे याबाबत गावपातळीवर अजूनही संभ्रम आहे. आत्तापर्यंत शेतकरी विकेल तेच पिकवीत आला आहे. परंतु काही ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी आहे, की शेतकऱ्यांची इच्छा असूनही जे विकले जाईल ते त्यांना पिकविता येत नाही. त्या ठिकाणी नेमके काय करायचे, हा खरा तर मूळ नियोजनाचा प्रश्‍न आहे. खरीप हंगामात अशा काही बाबींचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर केवळ कागदोपत्री आराखड्यांना काहीही अर्थ उरणार नाही.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
469 views04:59
ओपन / कमेंट
2022-04-18 15:45:33 *आजचा पशू सल्ला*
*पशु संवर्धन :-*
प्रखर ऊन, अधिक तापमानामुळे जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. म्हशी, संकरित गाईंमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते. जास्त वयस्क व कमी वयाची जनावरे उष्माघातास जास्त बळी पडतात. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा उष्माघात प्राणघातक होऊ शकतो. उष्माघातासाठी तापमान वाढ, वातावरणातील भरपूर आर्द्रता, कोंदट गोठा, जनावरे उन्हात चरण्यास सोडणे, लांबवर वाहतूक, पिण्याच्या पाण्याची कमरता, दिवसा सावलीची सोय नसणे इत्यादी कारणे असतात. उष्माघातामध्ये शरीराचे तापमान १०३-१०७ डिग्री फॅरनहाईटपर्यंत वाढते. श्वसनाचा वेग, हृदयाचे ठोके वाढतात. जनावर जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करते. जनावर लाळ गाळते. नाकातून स्राव येतो. जनावराला भरपूर तहान लागते. जनावर अस्वस्थ होते. जनावरांना शरीराचा तोल सांभाळता येत नाही. जनावर चालताना अडखळते व कोसळते. जनावराला झटके येतात. जनावर बेशुद्ध पडून दगावते.
उष्माघात टाळण्यासाठी जनावरांचा गोठा हवेशीर असावा. जनावरांना हवेशीर ठिकाणी बांधावे किंवा गोठ्यामध्ये पंख्याची व्यवस्था करावी, जेणेकरून हवा खेळती राहील. उन्हाच्या वेळेत जनावरे चरावयास सोडू नयेत. उन्हाच्या वेळी जनावरांची लांब वाहतूक टाळावी. जनावरांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी. जनावरांना दिवसा सावलीची सोय करावी.
उष्माघातग्रस्त जनावराचे अंग थंड पाण्याने ओले करावे, जेणेकरून शरीराचे तापमान कमी होईल. पिण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे, चघळण्यास बर्फ द्यावा. जनावराच्या डोक्यावर बर्फाने शेकावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने थंड ग्लुकोज सलाईन, तापनाशक औषधे द्यावीत. आजारी जनावरास सावलीत बांधावे, उन्हात अजिबात नेऊ नये.
*शेळी पालन :-*
उष्माघात हा शेळ्या, करडांना प्राणघातक ठरू शकतो. म्हणून उष्माघात लवकरात लवकर ओळखून त्यांच्यावर उपचार करणे हितकारक ठरते. शेळ्यांवर जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास, शेळ्या जास्त प्रमाणात श्वासोच्छवास करतात. जास्त लाळ गाळतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा जाणवतो. खाद्य कमी खाणे, अशी लक्षणे असतील तर उष्माघाताची शक्यता असते.
शेळ्यांना थंड व हवेशीर ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे व गरज भासल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे. पाण्याचा फवारा व शक्य असल्यास पंखे लावून गोठ्यातील वातावरण थंड करावे. शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी. तज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत. खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे द्यावीत. लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
462 views12:45
ओपन / कमेंट
2022-04-18 10:25:04
450 views07:25
ओपन / कमेंट
2022-04-18 10:24:57 *प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर*
अशी घ्या पिकांची काळजी.....!
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*90750 99544*
https://api.whatsapp.com/send?phone=919075099544
*करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा* या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा
*फायदे :-*
नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
हमखास व खात्रीशीर फायदा.
सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.
*ऑफर्स*
२०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ३५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ४५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ३५० मध्ये २०० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर - मूळ किंमत रु. ६७० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. ७७०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. ६७० मध्ये ४४० ग्रॅम प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
१ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर- मूळ किंमत रु. १६५० + पोस्टल चार्चेस रु.१००
एकूण किंमत - रु. १७५०
*कृषिक अॅपद्वारे ऑर्डर करून मिळावा रु.१०० ची भरघोस सवलत......*
म्हणजेच केवळ रु. १६५० मध्ये १ किलो प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर घरपोच मिळणार...
442 views07:24
ओपन / कमेंट
2022-04-18 07:46:09 राज्यात तीन दिवस पुन्हा लाहीलाही ; विदर्भ, मराठवाडय़ासह सर्वत्र तापमानात आणखी वाढ

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 18-Apr-22
पुणे : उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या चटक्यांनी राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कहर केला असतानाच राज्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडील राज्यांतील तापमानात वाढ होणार असल्याने विदर्भात सोमवारपासून (१८ एप्रिल) तीन दिवस उष्णतेची लाट येणार असून, मराठवाडय़ाचा पाराही वाढणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात काही प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज आहे. २१ एप्रिलनंतर मात्र तापमानात काही प्रमाणात घट होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. एकापाठोपाठ एक उष्णतेच्या लाटा येत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडय़ात त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात काही भागात तापमानाचा पारा चढाच आहे. गेल्या तीन दिवसांत तापमानात किंचित घट दिसून येत होती. मात्र, पारा पुन्हा वाढू लागला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भागासह मध्य भारतात कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, झारखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी भागांत २० एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहणार आहेत.
उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातही १८ ते २० एप्रिल या कालावधीत काही भागात उष्णतेची लाट असणार आहे. मराठवाडय़ातही उन्हाचा पारा चांगलाच वाढणार आहे. कोरडय़ा हवामानाची स्थिती आणि उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्यातील बहुतांश भागात पुढील तीन दिवसांत कमाल तापमान ४० अंशांपुढे राहण्याची शक्यता आहे. २१ एप्रिलनंतर मात्र राज्यात तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. या काळात तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर, ब्रह्मपुरी देशात सर्वात उष्ण : विदर्भात सध्या उन्हाचा चटका सर्वाधिक असून, सर्वत्र तापमान ४२ ते ४४ अंशांदरम्यान आहे. रविवारी चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे प्रत्येकी ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शनिवारी चंद्रपूर येथील तापमान देशातील उच्चांकी तापमान ठरले, तर सर्वात उष्ण जागतिक शहरांच्या यादीतही चंद्रपूर पोहोचले. अकोल्याचे ४३ अंशांपुढे तापमान आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होऊ शकते. मराठवाडय़ात तापमानाचा पारा सध्या ४० ते ४१ अंश असून, तो ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे आदी भागांत ४० अंशांच्या आसपास तापमान आहे. या विभागात इतर भागातही तापमान वाढणार आहे. मुंबईसह कोकण विभागात सध्या कमाल तापमान सरासरीच्या आसपास नोंदविले जात आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
468 views04:46
ओपन / कमेंट