Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 17

2022-02-02 07:49:50 शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 02-Feb-22

मुंबई, दि. 1 : शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा असे नियोजन करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
चालू रब्बी हंगाम येत्या खरीप हंगाम 2022 मध्ये खतांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक डी.एम. झेंडे, कृषी सहसचिव गणेश पाटील, मापदा चे अध्यक्ष विनोद तराळ, सचिव बिपिन कासलीवाल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत खतांचे उत्पादन वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. एमएआयडीसीला 30 टक्के प्रमाणे खते उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करण्यात यावेत, असेही श्री.भुसे यांनी सांगितले. कंपन्यांनी कुठल्याही खताचा साठा न करता वेळेवर खताचा पुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे, येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध करून द्यावी. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरतील त्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.भुसे यांनी सांगितले.
यावेळी खरिप हंगामात खतांची उपलब्धता, सद्य:स्थिती व संभाव्य अडचणी, खरीप हंगाम सुरुवातीचा शिल्लक साठा, वर्षनिहाय खत शिल्लक साठा, रब्बी हंगाम 2021-22 खत पुरवठा नियोजन, खरीप 2022 चे नियोजन, कंपन्यांकडून महिनानिहाय करण्यात येणारे नियोजन, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडील मिश्रखत कारखान्याकडे मिश्रखत उत्पन्नाकरिता प्राप्त मागणी, कें��्रीय खत विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान वितरण प्रणालीबाबतचा प्रस्ताव, सध्याच्या डीबीटी पद्धतीतील अडचणी याबाबत आढावा घेण्यात आला.
आजच आपली “कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
खरीप हंगामातील खतांची उपलब्धतेची स्थिती व संभाव्य अडचणी यावेळी नमूद करण्यात आल्या. खत मंत्रालयाचा सन २०२१-२२ चे खताच्या अनुदानासाठी तरतूद रु. ७९,५३० कोटी होती. ती १,५५,००० कोटी पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खतांवरची अनुदान मागणी प्रचंड वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम देण्याची DCT योजना सुरू होणार आहे. सध्याचे खत अनुदानाचे धोरण मार्च २०२२ अखेर सुरु आहे. त्यानंतरचे धोरण निश्चित नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅशच्या व फोस्फोरीक असिडच्या सतत बदलल्या आणि वाढत्या किंमतीमुळे खत कंपन्यांना पोटॅश मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे येत्या खरीप हंगामात MOP १०:२६:२६, १२:३२:१६ यासारख्या खतांच्या उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात डिएपीच्या सतत बदलत्या आणि वाढत्या किमतीमुळे खत कंपन्यांना डिएपी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्यामुळे येत्या खरीप हंगामात डिएपीच्या उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ शकतात. संयुक्त खतांची किंमत सर्वसाधारणपणे रु. २००० प्रति बॅग पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. आयातीत युरिया पुरवठ्यामध्ये मर्यादा येण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांकडे खरीप २०२२ करिता निविष्ठा खरेदीसाठी फक्त हरभरा, मका, ऊस याच पिकांपासून मिळणारे चलन रहाणार आहे. डिएपीला पर्याय म्हणून एसएसपी, PROM (Phosphate Rich Organic Manure) यांच्या उत्पादनाला आणि वापराला चालना द्यावी लागेल. पोटॅशला पर्याय म्हणून पिडीएम (Potash Derived from Molasses) वितरणासाठी खत कंपन्यांना उदयुक्त करावे लागेल. पाण्यात विरघळणा-या खतांची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. सिटी कंपोस्टची उपलब्धता वाढविण्यासाठी नगरविकास विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. संतुलित खत वापरासाठी खरीप पूर्व हंगामात शेतक-यांचे प्रबोधन करण्यासाठी निती ठरविणे आवश्यक आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
462 views04:49
ओपन / कमेंट
2022-02-01 15:13:18 आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
रोपवाटिका व्यवस्थापन रोपवाटिकेमध्ये खुंटावर केलेल्या बडिंगचे निरीक्षण करावे. खुंटावरील बडिंग जमलेले नसल्यास पुन्हा बडिंग करावे. ज्या खुंटावरील बडिंग फुटले आहे, त्यावर इथिऑन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
आंबा
फळगळ कमी करण्यासाठी नॅप्थील अॅसेटीक अॅसिड २० पीपीएम (२ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) या संजीवकाची पहिली फवारणी फळे वाटाण्याच्या आकाराची असताना, तर दुसरी फवारणी फळे गोटी आकाराची असताना करावी. हे वाढ नियंत्रक प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळवून नंतर पाण्यात मिसळावे.
तापमानात वाढ संभवत असल्याने, फळे वाटाणा ते सुपारी आकाराच्या अवस्थेत असलेल्या आंबा बागेमध्ये फळगळ होण्याची शक्यता आहे. ही फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा ते सुपारीच्या आकाराची होईपर्यंत द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
242 views12:13
ओपन / कमेंट
2022-01-31 13:04:30 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_30.html
224 views10:04
ओपन / कमेंट
2022-01-31 08:01:37 उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 31-Jan-22

पुणे : उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत असल्याने राज्यात थंडीची लाट आहे. निफाड, धुळे, जळगावसह परभणीतही पारा ५ अंशांच्या आसपास आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खालीच आहे. आज (ता. ३१) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी (ता. ३०) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४.५ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात ४.८ अंश, जळगाव येथे दहा वर्षांतील निचांकी ५ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर, गोंदिया येथेही किमान तापमान ८ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्याने थंडीची तीव्र लाट आली आहे. नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये थंडीची लाट आली आहे.
रविवारी (ता.३०) पंजाबमधील येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी २.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य आणि वायव्य भारतात किमान तापमानाचा ३ तारखेपर्यंत वाढ होण्याची, तसेच त्यानंतर पन्हा पारा घसरण्याची शक्यता आहे. तसेच बुधवारपासून (ता. २) ४० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, गुरुवारपासून (ता.३) वायव्य आणि उत्तर भारतात विजांसह पाऊस गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेल��� कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९१ (८.९), धुळे २७.० (४.८), जळगाव - (५.०), कोल्हापूर २९.५ (१५.३), महाबळेश्वर २४.७ (१३.७), मालेगाव - (८.६), नाशिक २८.६ (८.४), निफाड २७.० (४.५), सांगली ३१.२ (१४.९), सातारा २९.९(१३.४), सोलापूर ३१.४ (११.०), सांताक्रूझ ३२.६(१६.४), डहाणू २७.६ (१४.५), रत्नागिरी ३३.६ (१८.०), औरंगाबाद २८.३ (९.२), नांदेड २९.८ (९.६), उस्मानाबाद - (१४.०), परभणी २७.९ (१०.५), अकोला २९.१ (१०.१), अमरावती २७.८ (८.८), बुलडाणा २८.० (१०.५), ब्रह्मपुरी २८.० (९.४), चंद्रपूर २६.६ (१०.२), गडचिरोली २६.६(९.०), गोंदिया २५.० (७.८), नागपूर २७.० (७.९), वर्धा २७.८(९.४), यवतमाळ २५.५ (१०.५)
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक
मराठवाडा : औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड
“कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०२२” साठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
313 views05:01
ओपन / कमेंट
2022-01-29 07:37:49 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी ६०० कोटी – कृषिमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 29-Jan-22

मुंबई, दि. २८ : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२१-२२ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिश्श्याचा रु.४२० कोटी व राज्य हिश्श्याचा रु.१८० कोटी असा एकूण ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. हा निधी पोकरा ( हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्प ) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा, असे निर्देशही मंत्री श्री. भुसे यांनी दिले आहेत.
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४ हजार २१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५ हजार १४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये एकूण रु.७३०.५३ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे. प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.६०० कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
426 views04:37
ओपन / कमेंट
2022-01-28 15:59:00 आजचा कृषी सल्ला
आले
द्विहंगामी पीक (खोडवा) उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून द्विहंगामी पीक (खोडवा) घेता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. या पिकास कंद सुकू नयेत, म्हणून पाणी देणे गरजे असते. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये देत असलेल्या पाण्याच्या ५० टक्के पाणी या काळात देणे जरुरीचे असते. सावलीसाठी सेंद्रिय पदार्थ जसे की उसाचे पाचट, आल्याचा पाला यांचे आच्छादन केल्यास ते फायदेशीर ठरते. कलिंगड, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड केल्यास, त्यांचे वेल गादी वाफ्यावर वाढवावेत. त्यामुळे आल्यास या वेलींच्या पानाचे आच्छादन होते आणि कंद गाभाळण्याचे प्रमाण कमी राहते. तसेच जमिनीलगतच्या कंदांना इजा होत नाही. साधारणतः अकराव्या महिन्यानंतर आले पिकाच्या कंदास नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होते, तोपर्यंत या वेलवर्गीय पिकांची काढणी करावी. खोडवा ठेवल्यानंतर एकदा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी करावी. जेणेकरून कंदकुजीचा प्रादुर्भाव होणार नाही. नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होताच, सेंद्रिय खते वापरून हलकी भरणी करून घ्यावी.
हळद
हळद कायलीत शिजविणे या पद्धतीने हळद शिजविताना साधारणपणे २०० ते १००० किलो क्षमतेच्या लोखंडी १६ गेज पत्र्यापासून बनविलेल्या कायलीमध्ये हळद शिजवली जाते. अशा पद्धतीच्या कायलीचा तळाचा व्यास ४ ते ५ फूट असतो. उंची २.५ ते ३ फूट असते. वरचा भाग तळाकडील भागापेक्षा अर्धा फुटाने रूंद असतो, त्यामुळे हळद बाहेर काढणे सोपे जाते. या पद्धतीमध्ये हळद शिजविताना कायलीमध्ये हळद भरल्यानंतर वरती २.५ ते ३ इंच पाणी राहील इतकीच हळद भरावी. त्यानंतर त्याच्यावर हळदीचा पाला, जास्तीत जास्त गोणपाट वापरून पाण्याची वाफ आत कोंडली जाईल, याची दक्षता घ्यावी. मात्र चिखलमातीने वरून लिंपणे या प्रकाराचा अवलंब करू नये. साधारणपणे अडीच ते तीन तासांमध्ये हळद शिजली जाते. हळद शिजल्यानंतर विशिष्ट वास आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. शिजलेली हळद अंगठा आणि तर्जनीमध्ये धरून दाबल्यास चिरडली जाते. शिजलेली हळद पाहण्याच्या दुसर्‍या पद्धतीमध्ये काडीपेटीमधील काडी हळकुंडामध्ये घुसवल्यास काडी सहज आरपार जाते. या पद्धतीमध्ये असणार्‍या त्रुटी म्हणजे शिजविलेली हळद कायलीमधून बाहेर काढताना हळकुंडे फुटली जातात. आतील हळद बाहेर काढण्यासाठी किमान अर्धे पाणी बाहेर सोडावे लागते. कायलीच्या तळाशी बसलेला मातीचा थर संपूर्ण पाणी बाहेर काढल्याशिवाय काढता येत नाही, त्यामुळे श्रम वाढतात. काही प्रमाणात हळकुंडांचे नुकसान होते. त्यामुळे मालाची प्रतही खराब होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
218 views12:59
ओपन / कमेंट
2022-01-28 14:24:41 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_21.html
227 views11:24
ओपन / कमेंट
2022-01-28 08:02:53 उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 28-Jan-22

पुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट कायम आहे. तापमानाचा पारा आणखी घसरल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश किंवा त्यापेक्षाही खाली आले आहे. आज (ता. २८) विदर्भात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या किमान तापमानात सातत्याने घसरण असून, कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारीही (ता. २७) राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये थंडीची लाटही कायम होती. धुळे कृषी महाविद्यालयात पारा २.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०१८ रोजी तेथे सर्वांत कमी २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये थंडीची तीव्र लाट कायम असून, गुरुवारी (ता. २७) राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २८) मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २६.५ (९.८), नगर - (९), धुळे २४.५ (२.८), जळगाव २६.४ (८.५), कोल्हापूर २७.९ (१६.३), महाबळेश्‍वर २३ (१०.४), मालेगाव - (८.८), नाशिक २४.४ (१०.४), निफाड २३.१ (४.६), सांगली ३० (१५.३), सातारा २८.२(१४.७), सोलापूर ३०.२ (१४.०), सांताक्रूझ ३०.१(१७.२), अलिबाग - (१६.६), डहाणू २५.७ (१४.५), रत्नागिरी २८.९ (१७.९), औरंगाबाद २६.३ (८.८), नांदेड २७.२ (११.८), उस्मानाबाद - (११.४), परभणी २५.६ (१०), अकोला २६.३ (९.३), अमरावती २४.२ (१०), बुलडाणा २३.८ (८.८), ब्रह्मपुरी २५ (९.८), चंद्रपूर - (११.४), गडचिरोली २५ (११), गोंदिया २३.८ (८.८), नागपूर २४.७ (८.३), वर्धा २५.८ (९.४), यवतमाळ २९.५ (१०)
थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : विदर्भ : अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
१० अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे : धुळे २.८, निफाड ४.६, नागपूर ८.३, जळगाव ८.५, मालेगाव ८.८, औरंगाबाद ८.८, बुलडाणा ८.८, गोंदिया ८.८, नगर ९, अकोला ९.३, वर्धा ९.४, पुणे ९.८, ब्रह्मपुरी ९.८
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
326 views05:02
ओपन / कमेंट
2022-01-27 07:49:12 महाराष्ट्र आणखी गारठणार! २४ तासांत 'या' भागात थंडीची लाट

सौजन्य : सकाळ
दिनांक : 27-Jan-22

मुंबई : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात थंडीची लाट -
गेल्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा आणि नागपुरातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आलं होतं. पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी असेल.
पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात गारठा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत अनेक भागांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इथं थंडीची लाट होती. या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये देखील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पुढील २४ तासांत कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस जाणार आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
444 views04:49
ओपन / कमेंट
2022-01-21 08:11:51 *पुन्हा पावसाचा इशारा*

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 21-Jan-22

पुणे : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पुणे, नाशिकसह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी २२ जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २३ जानेवारीलाही कोकणात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या एकाप���ठोपाठ एक पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. सध्या उत्तरेकडील राज्यात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातही रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात २२ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील संपूर्ण भाग आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवाभान…
२३ जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत विदर्भात गडचिरोली, गोंदियातही हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे.
कारण काय?
राजस्थानमध्ये आता चक्रीय चक्रवात निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, २२ आणि २३ जानेवारीला हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
172 views05:11
ओपन / कमेंट