Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 19

2022-01-14 15:43:15 *आजचा कृषी सल्ला*
*आले*
द्विहंगामी पीक (खोडवा) उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून द्विहंगामी पीक (खोडवा) घेता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. या पिकास कंद सुकू नयेत, म्हणून पाणी देणे गरजे असते. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये देत असलेल्या पाण्याच्या ५० टक्के पाणी या काळात देणे जरुरीचे असते. सावलीसाठी सेंद्रिय पदार्थ जसे की उसाचे पाचट, आल्याचा पाला यांचे आच्छादन केल्यास ते फायदेशीर ठरते. कलिंगड, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड केल्यास, त्यांचे वेल गादी वाफ्यावर वाढवावेत. त्यामुळे आल्यास या वेलींच्या पानाचे आच्छादन होते आणि कंद गाभाळण्याचे प्रमाण कमी राहते. तसेच जमिनीलगतच्या कंदांना इजा होत नाही. साधारणतः अकराव्या महिन्यानंतर आले पिकाच्या कंदास नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होते, तोपर्यंत या वेलवर्गीय पिकांची काढणी करावी. खोडवा ठेवल्यानंतर एकदा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी करावी. जेणेकरून कंदकुजीचा प्रादुर्भाव होणार नाही. नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होताच, सेंद्रिय खते वापरून हलकी भरणी करून घ्यावी.
*हळद*
कंदांची विभागणी
जेठे गड्डे - मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. सदरचे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.
सोरा गड्डा - लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्याविरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.
बगल गड्डे - जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, त्यास अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.
हळकुंडे - बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात करतात.
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
165 views12:43
ओपन / कमेंट
2022-01-14 15:17:47

173 views12:17
ओपन / कमेंट
2022-01-14 14:08:17 ICL च्या फवारणीच्या व विद्राव्य अत्याधुनिक खतांद्वारे डाळिंब अंबिया बहार खत व्यवस्थापन.
फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा
https://www.facebook.com/Krushikapp/videos/955079678462657/
209 views11:08
ओपन / कमेंट
2022-01-14 08:47:27 राज्यात आणखी दोन दिवस हुडहुडीचे ; विदर्भात दोन दिवस पावसाळी स्थितीचा हवामान विभागाचा अंदाज

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 14-Jan-22

पुणे : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, पुढील दोन दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याने या काळात थंडीचा कडाका कायम राहील. त्यानंतर मात्र किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर तेथे हवामान कोरडे होईल. गुजरात, मध्य प्रदेशात थंड दिवसांची स्थिती असल्याने प्रामुख्याने मुंबईसह कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट होऊन थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात किमान तापमान सरासरीखाली येऊन थंडी अवतरली.
दोन दिवसांनंतर उत्तरेकडील थंडीची लाट ओसरणार आहे. त्याचप्रमाणे पश्चिमी चक्रवात निर्माण होणार आहे. या घडामोडीत राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. सध्या कर्नाटक ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे या पट्टय़ात काही भागात पाऊस होतो आहे. त्याचा परिणाम विदर्भावरही होत असून, या भागात पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवाभान..
सध्या उत्तरेकडील राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत थंडीची लाट आली आहे. गुजरात, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड राजस्थान आदी राज्यांमध्ये थंड दिवसांचे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही घट कायम आहे. सध्या मुंबईसह कोकणात सर्वत्र आणि मध्य महाराष्ट्रात ��हुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली आहे. त्यामुळे या भागात थंडी कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण असल्याने किमान तापमान सरासरीजवळ आहे.
दिवसाच्या तापमानात मोठी घट
राज्यात काही भागांत दिवसा अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वारे येत आहेत. या दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मोठी घट दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, कोल्हापूरमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ७ अंशांनी घटले आहे. कोकण विभागात मुंबई परिसर आणि रत्नागिरीत कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी कमी आहे. मराठवाडा, विदर्भातही ते सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी कमी आहे. गुरुवारी महाबळेश्वरमध्ये दिवसाचे तापमान सर्वात कमी १९ अंश सेल्सिअस होते. राज्यात बहुतांश भागात कमाल तापमान २५ अंशांच्या खाली आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
13 views05:47
ओपन / कमेंट
2022-01-13 10:13:50 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_12.html
227 views07:13
ओपन / कमेंट
2022-01-13 07:19:59 *विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता*

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 13-Jan-22

पुणे : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी किमान तापमान तापमानात घट झाली आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ६.८ सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. १३) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असून, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.१ (११.४), नगर - (१४), धुळे २३.५ (६.८), जळगाव २५ (१२.२), कोल्हापूर २८ (१२.८), महाबळेश्‍वर २०.९(९.६), मालेगाव - (१२.२), नाशिक २६.३ (१०.३), निफाड २५.५ (८.९), सांगली २९.२ (१२.१), सातारा २८.२ (१२), सोलापूर ३१.२ (१६), सांताक्रूझ २७.३ (१४.४), अलिबाग २८ (-), डहाणू २४.१ (१४.१), रत्नागिरी २६.६ (१५.५), औरंगाबाद २५.५ (११.६), नांदेड २७ (१७.६), उस्मानाबाद - (१४), परभणी २५.२ (१६.४), अकोला २३.९ (१६.६), अमरावती २४ (१३.१), बुलडाणा २२ (१०), ब्रह्मपुरी २२.४ (१६.३), चंद्रपूर २३.६ (१७.२), गडचिरोली २२ (१५.६), गोंदिया २०.५ (१४), नागपूर २२.५ (१५.६), वर्धा २४ (१५.४), वाशीम २५ (१४), यवतमाळ २४.५ (१६)
१० अंश किंवा त्यापेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे : धुळे ६.८, निफाड - ८.९, महाबळेश्‍वर - ९.६, बुलडाणा १०
विदर्भात अवकाळी सुरूच : विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच असून, बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गडचिरोलीतील भाम्रागड येथे ६० मिलिमीटर, अहेरी ४०, एटापल्ली, मूलचेरा ३०, गडचिरोली, धानोरा प्रत्येकी २०, नागपूरमधील पारशिवणी, नागपूर, रामटेक प्रत्येकी ३०, कामठी, हिंगणा प्रत्येकी २० आणि गोंदिया येथे ३० मिलिमीटर पावासाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
293 views04:19
ओपन / कमेंट
2022-01-12 14:31:11

93 views11:31
ओपन / कमेंट
2022-01-12 12:58:10 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_67.html
146 views09:58
ओपन / कमेंट
2022-01-12 12:49:33 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_7.html
153 views09:49
ओपन / कमेंट
2022-01-12 12:05:09 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_32.html
174 views09:05
ओपन / कमेंट