Get Mystery Box with random crypto!

*विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता* सौजन्य : अॅग्र | कृषिक अँप Krushik app

*विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता*

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 13-Jan-22

पुणे : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी किमान तापमान तापमानात घट झाली आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. १२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ६.८ सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. १३) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असून, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.१ (११.४), नगर - (१४), धुळे २३.५ (६.८), जळगाव २५ (१२.२), कोल्हापूर २८ (१२.८), महाबळेश्‍वर २०.९(९.६), मालेगाव - (१२.२), नाशिक २६.३ (१०.३), निफाड २५.५ (८.९), सांगली २९.२ (१२.१), सातारा २८.२ (१२), सोलापूर ३१.२ (१६), सांताक्रूझ २७.३ (१४.४), अलिबाग २८ (-), डहाणू २४.१ (१४.१), रत्नागिरी २६.६ (१५.५), औरंगाबाद २५.५ (११.६), नांदेड २७ (१७.६), उस्मानाबाद - (१४), परभणी २५.२ (१६.४), अकोला २३.९ (१६.६), अमरावती २४ (१३.१), बुलडाणा २२ (१०), ब्रह्मपुरी २२.४ (१६.३), चंद्रपूर २३.६ (१७.२), गडचिरोली २२ (१५.६), गोंदिया २०.५ (१४), नागपूर २२.५ (१५.६), वर्धा २४ (१५.४), वाशीम २५ (१४), यवतमाळ २४.५ (१६)
१० अंश किंवा त्यापेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे : धुळे ६.८, निफाड - ८.९, महाबळेश्‍वर - ९.६, बुलडाणा १०
विदर्भात अवकाळी सुरूच : विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच असून, बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गडचिरोलीतील भाम्रागड येथे ६० मिलिमीटर, अहेरी ४०, एटापल्ली, मूलचेरा ३०, गडचिरोली, धानोरा प्रत्येकी २०, नागपूरमधील पारशिवणी, नागपूर, रामटेक प्रत्येकी ३०, कामठी, हिंगणा प्रत्येकी २० आणि गोंदिया येथे ३० मिलिमीटर पावासाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
*महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true