Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 21

2021-12-28 13:44:48 *फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=632182718205583&id=1832292603705174
337 views10:44
ओपन / कमेंट
2021-12-28 06:40:47
407 views03:40
ओपन / कमेंट
2021-12-28 06:40:47 सस्नेह नमस्कार,

अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित

*“ खोडवा ऊस व्यवस्थापन” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*

https://www.facebook.com/krushikapp

मार्गदर्शक- श्री. संतोष करंजे
विषय विशेषज्ञ (कृषिविद्या),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - २८/१२/२०२१
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५

विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
410 views03:40
ओपन / कमेंट
2021-12-27 08:53:55 राज्यावर पुन्हा पावसाचे सावट

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 27-Dec-21

पुणे : कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यावर २८ डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातही अनेक ठिकाणी या काळात पाऊस होणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश भागात पाऊस झाला. दुसऱ्या आठवडय़ापासून कोरडे हवामान निर्माण झाले. त्यानंतर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने काही प्रमाणात थंडी अवतरली. विदर्भात दोन ते तीन दिवस थंडीची लाट होती. मात्र उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ झाली.
सध्या उत्तर भारतामध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. या भागात कमी दाबाचा एक पट्टा तयार होणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण-पश्चिम राजस्थान ते थेट विदर्भापर्यंत कमी दाबाचा एक पट्टा तयार होतो आहे. हा पट्टा पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश ओलांडून येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून या सर्व भागांसह महाराष्ट्रातही २८ आणि २९ डिसेंबरला काही भागांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतही २७ डिसेंबरनंतर दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ात काही भागांत २८ डिसेंबर, तर विदर्भात काही भागांत २८ आणि २९ डिसेंबरला गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे रात्री हलका गारवा जाणवतो आहे. पावसाळी स्थितीत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गारपीट, पाऊस कुठे?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ आणि २९ डिसेंबरला नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ात परभणी, बीड, हिंगोली. नांदेड, लातूर जिल्ह्यांत तुरळक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये २९, ३० डिसेंबरला पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत २८ डिसेंबरला हलक्या पावसाची शक्यता आहे.
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
290 views05:53
ओपन / कमेंट
2021-12-24 08:45:46 पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार

सौजन्य : लोकमत
दिनांक : 24-Dec-21

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या 10व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी 2021 योजनेचा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा मेसेजही लाभार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करतील. या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील, अशीही माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. शेतकरी pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सामील होऊ शकतात.
दरम्यान, पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11.17 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
आतापर्यंत शेतकऱ्यांना 9 हफ्ते : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 9 हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.
योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेक : पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
331 views05:45
ओपन / कमेंट
2021-12-23 15:41:58 आजचा कृषी सल्ला
आले
आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी सात महिन्यांपर्यंत ०-०-५० हे विद्राव्य खत ठिबकमधून सुरू ठेवावे. आल्याचे कोवळे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे दिसत असल्यास, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य तयार झाल्यामुळे ती हिरवी पडून त्यांची वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या गड्ड्याच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या गड्ड्यांवर माती टाकून ते झाकून घ्यावेत.
हळद
वाढीच्या दुसऱ्या अवस्थेनंतर म्हणजेच लागवडीपासून पाच ते साडे पाच महिन्यांनंतर हळदीची उंची वाढत नाही. या टप्प्यात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. साडेपाच फुटांपेक्षा हळदीची उंची अधिक असल्यास क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड सारख्या वाढ नियंत्रकाचा वापर तज्ञांच्या सल्ल्याने करावा. त्यामुळे हळद काडावरती जाण्याचा धोका टळतो. वाढीची तिसरी अवस्था पाच ते सात महिने या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये ०-०-५० या विद्राव्य खताचा वापर करावा.
ओली हळकुंडे सूर्यप्रकाशात उघडी दिसत असल्यास हळकुंडे हिरवी पडून वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या हळकुंडाच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते, पर्यायाने उतारा कमी मिळतो. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या हळकुंडावर माती टाकावी.
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
400 views12:41
ओपन / कमेंट
2021-12-21 08:35:30 यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, महिला शेतकरी अत्यंत कल्पक आहेत. त्या खूप कष्टातून पुढे आल्या आहेत. शेतीमध्ये ७०-८० टक्के महिला काम करतात परंतू त्यांच्या नावावर प्रत्यक्षात २० टक्क्यांच्या आसपास शेती आहे. हे चित्र बदलले पाहिजे.
या कार्यशाळेत दूरदृष्यप्रणालीद्वारे कृषी सचिव एकनाथ डवले, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) प्रकल्प संचालक इंद्रा मालो, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भुवनेश्वर येथील आयसीएआर-इन्स्टिट्यूट वूमन इन ॲग्रीकल्चरच्या प्रकल्प संचालक डॉ. चैत्राली म्हात्रे, बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे आदी सहभागी झाले.
इंद्रा मालो, राहिबाई पोपेरे, डॉ. चैत्राली म्हात्रे, राजश्री जोशी, सुनंदा सालोटकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यभरातील महिला शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करुन शेतीसंबंधी अनुभव सांगितले तसेच महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
306 views05:35
ओपन / कमेंट
2021-12-21 08:35:30 महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील : कृषिमंत्री दादाजी भुसे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 21-Dec-21

पुणे दि. २० : राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
राज्य शासनाच्या वतीने २०२२ हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून त्याअंतर्गत धोरणनिश्चितीसाठी राज्यस्तरीय महिला शेतकऱ्यांचे चर्चासत्र कृषी आयुक्तालयातील पद्मश्री सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी कृषी आयुक्त धीरज कुमार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, ‘बायफ’च्या प्रकल्प संचालक राजश्री जोशी, कृषिरत्न महिला शेतकरी सुनंदा सालोटकर आदी उपस्थित होते.
श्री.भुसे म्हणाले, शेतीतील कल्पक तसेच नवीन प्रयोगांची माहिती महिला शेतकऱ्यांना व्हावी यासाठी ‘आत्मा’मार्फत शेतपाहणी, कृषी सहलींसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली जाईल. जेणेकरुन त्यातून महिलांना नवीन प्रयोगांसाठी प्रोत्साहन मिळू शकेल. महिला शेतकरी, शेतमजुरांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये ३० टक्के प्रमाण राखीव असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगामध्येही महिलांसाठी ३० टक्के राखीव प्रमाण ठेवण्यात येईल.
महिला शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषीमाल, प्रक्रिया केलेले पदार्थ आदी ग्राहकांना प्राधान्याने मिळावेत यासाठी महिलांच्या स्टॉलला अग्रक्रमाचे ठिकाण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. महिलांकडून निर्मित पदार्थ, कृषीमालाला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु. जिथे जिथे शासकीय जागा असेल तेथे शेतमाल विक्रीसाठी शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट यांना प्राधान्य दिले जाईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
महिलांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ वर महिलांचे नाव असणे गरजेचे असून महिलांचे नाव लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने ७/१२ वर महिलांचे नाव लावण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. शेती व्यवसायाशी निगडीत क्षेत्रात महिलांना संधी देण्याची शासनाची भूमीका आहे. शेतकरी आणि शेतमजूर महिलांचा सन्मान तसेच त्यांचा शेतीतील सहभाग वाढविण्यासाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरेल असेही श्री. भुसे म्हणाले.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत बोलताना ते म्हणाले, पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी राज्य शासनाने ८० ते ८५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेला अधिक गती देण्यासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन, ग्रेडींग, पॅकेजींग तसेच निर्यातीसाठीची प्रक्रिया, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची व्यवस्था याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात ३५० अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून त्यानंतर ते संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करतील.
शेतीच्या सुधारणेसाठी बाजारव्यवस्था निर्माण करणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडित राज्य शासन, केंद्र शासनाच्या पोकरा, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आदी सर्व योजना एकाच छत��खाली आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी कृषी विभागाची एक स्वतंत्र शाखा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याअंतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण कमीत कमी खर्चात होईल याकडे लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
►२ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन सर्व ते प्रयत्न करत असून शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून एकूण २ हजार ३१४ कोटी रुपये विम्याचा हप्ता म्हणून कंपन्यांना दिले होते. त्या बदल्यात आतापर्यंत राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे, अशी माहितीही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.
315 views05:35
ओपन / कमेंट
2021-12-18 13:44:24 *क्षारपड जमीन सुधारणा*
*फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/775766700484526/?app=fbl
117 views10:44
ओपन / कमेंट
2021-12-17 15:46:36 आजचा कृषी सल्ला
गहू
कीड नियंत्रण
खोडमाशी
उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर, तसेच फुटवे मर दिसून येते. पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मि.मी. लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.
नियंत्रण
पोंगेमर किंवा फुटवे मर १० टक्के दिसून आल्यास, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.
मावा
पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट होतात. मधाप्रमाणे चिकट द्रव विष्ठेवाटे पांनांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते, त्यावर काळी बुरशी वाढुन पानाची प्रकाश संश्‍लेषण क्रिया बंद होते, परिणामी रोपे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.
नियंत्रण
शेतामध्ये पिवळ्या चिकट कार्डचा वापर एकरी १० ते १२ या प्रमाणात (सर्वेक्षण व नियंत्रणासाठी) करावा. जैविक उपायांमध्ये लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे. जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमिथोक्‍झाम ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
*हरभरा*
*घाटे अळी*
ही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभऱ्याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफुल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत, जमिनीची खोल नांगरट करावी. एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
338 views12:46
ओपन / कमेंट