Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 23

2021-12-13 09:54:16
436 views06:54
ओपन / कमेंट
2021-12-13 09:54:07 *"प्रिव्हेंटिव्ह(एल)"*_____
पिकांची रोगप्रतिकारकक्षमता वाढवून उत्पादनात वाढ.. आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह (एल)*
*करपा,आकसा,व्हायरस,लाल्या,भुरी, डावणी,पिवळेपणा* पासून पिके वाचवा.
*(सर्व पिकांसाठी)*

9075099544
9145499544
437 views06:54
ओपन / कमेंट
2021-12-10 07:57:02 *पीएम किसान योजना : e-KYC पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही 10 वा हप्ता*

सौजन्य : सकाळ
दिनांक : 10-Dec-21

पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तुम्हीही याची आतुरतेनं वाट पाहत असाल, तर लगेच e-KYC पूर्ण करा. कारण, सरकारनं या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
सरकारनं PM KISAN योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी e-KYC आधार अनिवार्य केलंय. पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसेच, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीनंही हे साध्य करू शकता.
- यासाठी तुम्ही प्रथम pmkisan.gov.in पोर्टलवर जा.
- उजव्या बाजूला तुम्हाला टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
735 views04:57
ओपन / कमेंट
2021-12-08 07:34:56 घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 08-Dec-21

मुंबई, दि. 7 : राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात 20 नोव्हेंबर 2020 पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच 50 हजार 112 भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.
महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाला. यात 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात 7 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या 9 लाख 88 हजार 691 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून 7 लाख 43 हजार 326 घरे पूर्ण झाली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 1071 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर 4 हजार 684 घरे पूर्ण झाली आहेत.
राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत 4 लाख 19 हजार 833 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक 7 डिसेंबर 2021 पर्यंत 2 लाख 95 हजार 941 घरे पुर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 1 हजार 902 घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
281 views04:34
ओपन / कमेंट
2021-12-08 06:46:12
21 views03:46
ओपन / कमेंट
2021-12-07 15:17:44 आजचा कृषी सल्ला
आंबा
आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी बागेतील गवत काढून बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण बाष्पीभवनामुळे लवकर कमी होऊन झाडांना ताण बसण्यास मदत होईल.
मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे बागेमध्ये मोहोर प्रक्रियेसाठी मुळांना बसणारा ताण हा निघून गेल्याने पावसाची उघडीप मिळाल्यानंतर सपाट भागावर असणार्‍या आंबा बागेमध्ये शक्य असल्यास नांगरणी करावी. तसेच झाडांच्या बुंध्याजवळील व विस्ताराखालील माती १० ते १२ सें.मी. खोल उकरून मोकळी करावी. जेणेकरून पाण्याचा अंश लवकर कमी होऊन आंब्याच्या झाडांना पुन्हा ताण बसण्यास मदत होईल.
केळी
घडाची योग्य वाढ व पक्वता होण्याकरिता शेवटची फणी उमलल्यानंतर त्वरित केळफूल कापून बागेबाहेर नष्ट करावे. घडावर अतिरिक्त फण्या ठेवू नयेत. अपूर्ण व अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. तसेच केळफूल कापणीनंतर घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम व युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. यामुळे घडांचे वजन वाढते व घड लवकर काढणीस येतात. फळांच्या योग्य वाढीसाठी केळफूल कापणी, फण्यांची विरळणी आणि रसायनांची फवारणी झाल्यानंतर घड ७५ x १०० सें.मी. आकारमानाच्या २-६ टक्के सच्छिद्र पॉलिप्रॉपीलीन (१०० गेज) पिशव्यांनी झाकावा. यामुळे घडाचे थंड हवा, धूळ, पाणी, दव, फुलकिडी यांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर घडाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होऊन घड लवकर पक्व होतो.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
213 views12:17
ओपन / कमेंट
2021-12-07 07:55:34 पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पुढील आठवड्यात बँक खात्यात

सौजन्य : पुढारी
दिनांक : 07-Dec-21

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सोमवारी दिली. शेतकऱ्यांना दिला जात असलेला हा 10 वा हप्ता आहे. निधी वर्ग होण्यापूर्वी राज्य सरकारांना ट्रान्स्फर रिक्वेस्टवर सही करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वर्ग केले जातात. अनेक शेतकऱ्यांना नववा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना नववा आणि दहावा असे दोन्ही हप्ते दिले जातील. म्हणजे अशा शेतकऱ्यांना यावेळी चार हजार रुपये मिळणार आहेत.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानूसार दोन हजारांचा हफ्ता जमा करण्यात येतो. शेतकरी म्हणून नोंदणी असलेले ११.३७ कोटी नागरिक केंद्राच्या या योजनेचे लाभार्थी आहेत.
हे पैसे अडचणीच्या काळात वापरता येत असल्याने, शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा यानिमित्ताने केंद्राकडून केला जातो.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
301 views04:55
ओपन / कमेंट
2021-12-06 08:46:16 रात्रीचा गारवा वाढण्याची शक्यता ;तापमानात घट ; आठवडाभर कोरडे हवामान

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 06-Dec-21

पुणे : अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असल्याने कोकणासह राज्यात आता सर्वत्र कोरडे हवामान होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता आहे.
सध्या किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान सध्या सरासरीच्या तुलनेत घटलेले असले तरी ते दोन दिवसांत पूर्ववत होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे आल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागांत या स्थितीमुळे जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे तेथील रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील ढगाळ वातावरणही एक-दोन दिवसांत दूर होऊन सर्वत्र आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे. कोरडय़ा हवामानामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भात दिवसाचे कमाल तापमान सरासरीजवळ आले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ते अद्यापही सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे या भागात दिवसा हवेत किंचित गारवा आहे.
थंडीची चाहूल?
राज्यात सर्वत्र रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली रात्रीची थंडी जाणवत नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत ते सरासरीजवळ किंवा त्याखाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीचा गारवा वाढणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
250 views05:46
ओपन / कमेंट
2021-12-04 15:31:14 आजचा पशु सल्ला
पशु संवर्धन :-
थंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यांतून पाणी येणे, भूक कमी होणे, थरथर कापणे इ. लक्षणे दिसतात. संध्याकाळ होताच जनावरांना गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यामध्येही थंड वारे लागणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांना गोठ्यातच कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. जास्त थंडी असल्यास, गोठ्यामध्येच शेकोटी पेटवून गोठा उबदार करावा, मात्र धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी. योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा, तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. वासरांची विशेष काळजी घ्यावी, गोठयामध्ये स्वच्छता करावी. जंतुनाशकाने गोठयाची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. जनावरांचे वेळेवर जंत निर्मूलन करावे. त्यांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पाणी जास्त थंड असल्यासही गाई-म्हशी पाणी कमी पितात, पोटातील आम्लता (ॲसिडीटी) वाढते. त्यामुळे उत्पादन व शरीर स्वास्थ्य इत्यादीवर विपरीत परिणाम होतो. शक्य झाल्यास गाई-म्हशींना कोमट पाणी पिण्यास द्यावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
403 views12:31
ओपन / कमेंट
2021-12-04 10:25:28 https://krushikapp.blogspot.com/2021/12/blog-post_40.html
381 views07:25
ओपन / कमेंट