Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 24

2021-12-03 07:45:12 ‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजावणी

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 03-Dec-21

मुंबई, दि. २ : ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी आज वितरीत करण्यात आला असून ही विशेष योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या ‘विशेष योजने’बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. ही विशेष योजना महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन-घन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील मागास तालुक्यातील नागरिकांना रोजगार निर्मितीच्या समान संधी उपलब्ध होणार असून या भागांच्या विकासाला गती मिळणार आहे.
‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ मागास तालुक्यातील महिला बचतगट आणि अनुसूचित जाती जमातीचे सक्षमीकरण करण्याकरिता प्रत्येक मागास तालुक्यात ‘रोजगार निर्मिती’वर अधिक भर देण्यासाठी ‘विशेष योजना’ तयार करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यासाठी ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना’ अंतर्गत ‘विशेष योजना’ तयार करुन त्या राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना अंतर्गत’ विशेष योजने करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग प्रामुख्याने महिला बचतगट व अनुसूचित जाती-जमातीचे सक्षमीकरण करण्याकरिता करण्यात येणार आहे.
जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत ‘विशेष योजना’ प्रामुख्याने महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. या ‘विशेष योजने’साठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ७५:२५ तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी समूहासाठी ९०:१० याप्रमाणे अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार आहे. विशेष योजनेचे प्रस्ताव तयार करताना ‘शाश्वत विकास ध्येया’ अंतर्गत असलेली विशेषतः गरिबी निर्मूलन, उपासमारीचे समूळ उच्चाटन यांसारखी ध्येय साध्य करण्यात येणार आहेत.
‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
579 views04:45
ओपन / कमेंट
2021-12-02 15:28:54 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
पुनर्लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात, त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
कोबी वर्गीय पिके
जस्त कमतरतेसाठी लागवडीच्या वेळी एकरी ८ किलो झिंक सल्फेट; तर लोह कमतरतेसाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट शेणखताबरोबर किंवा निंबोळी पेंडीसोबत द्यावे.
फवारणीद्वारे द्यावयाची अन्नद्रव्ये देताना, चिलेटेड जस्त किंवा चिलेटेड लोह १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून लागवडीनंतर ३० दिवसानंतर आठ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
165 views12:28
ओपन / कमेंट
2021-12-02 08:26:57 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 02-Dec-21

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची शक्यता असून, आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहणार असून, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून गुजरातच्या कच्छपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी, राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असून, सकाळपासूनच ढगाळ हवामान झाले आहे. अनेक भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून, अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता.
दरम्यान, राज्यात गारठा वाढला असतानाच ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कोकण वगळता अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांपेक्षा कमी झाले आहे. तर किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. १) गोंदिया येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय : बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय ��हे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे येताना तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ३) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधार : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी (ता.१) सकाळपासूनच कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरींची संततधार सुरू आहे. तर मराठवाड्यातही ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
152 views05:26
ओपन / कमेंट
2021-12-01 15:38:26 आजचा कृषी सल्ला
कांदा-लसूण
कांदा बीजोत्पादनाचे व्यवस्थापन
पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
नत्र खताचा पहिला हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
नत्र खताचा दुसरा हप्ता १२ किलो प्रति एकर या प्रमाणात लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
पीक संरक्षण
ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण होईल.
पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
वरील फवारणीनंतर सुद्धा पानांवरील रोग आणि फुलकिडे यांचे नियंत्रण झाले नाही, तर हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. अधिक कार्बोसल्फान १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
वेल वर्गीय पिके
मावा, तुडतुडे, फुलकिडे (थ्रीप्स) व पांढरी माशी या रसशोषक किडी पानातील रस शोषून घेतात. तसेच त्यांच्यामुळे विविध विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
271 views12:38
ओपन / कमेंट
2021-12-01 07:59:55 15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येणार

सौजन्य : सकाळ
दिनांक : 01-Dec-21

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जर शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील, तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात येणार आहेत. त्यामुळे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्यातील 2,000 ट्रान्सफर होतील.
मगील वर्षी 25 डिसेंबरला केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित केले होते. आतापर्यंत, सरकारने देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.
'या' शेतकऱ्यांना ४ हजार रुपये मिळणार : ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. मात्र, ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल, ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.
कसं चेक करणार? : तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा
1. सर्वप्रथम तुम���हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. शेतकरी कॉर्नर यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
240 views04:59
ओपन / कमेंट
2021-11-30 15:26:59 आजचा फळ पीक सल्ला ( केळी, आंबा)
केळी
कमी तापमानामुळे केळी पिकावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करावयाच्या उपाययोजना
केळीची लागवड १.५x१.५ किंवा १.७५x१.७५ मीटर या शिफारशीत अंतरावर करावी. जास्त अंतरावर लागवड करणे टाळावे.
थंड वातावरणात केळी लागवड करणे टाळावे. लागवड शक्यतो ऑक्टोबरमध्येच पूर्ण करावी.
लागवडीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने सुरु, नेपिअर, शेवरी इत्यादी वारा प्रतिरोधक वनस्पतींची दोन-तीन ओळींत दाट लागवड करावी. यामुळे बागेतील झाडांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण होते.
रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात. हिवाळ्यात केळी पिकास पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
शक्य असल्यास बागेस रात्री किंवा पहाटेच्या वेळी ठिबक संचाने पाणी द्यावे.
जमिनीची जलधारणक्षमता वाढण्याकरिता पिकास शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. तसेच सेंद्रिय आच्छादन करावे. यामुळे ओलावा आणि जमिनीचे तापमान योग्य राखले जाते.
झाडाची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली रोगविरहित पाने कापू नयेत. पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. रोगग्रस्त पाने फक्त कापावीत.
वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिझाड ०.५-१ किलो निंबोळी खत मातीत मिसळून द्यावे. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. निंबोळी ढेपेमुळे मुळ्यांना इजा करणाऱ्या सुत्रकृमींपासूनही पिकाचे संरक्षण होते.
बागेमध्ये उसाचे पाचट, केळीची रोगविरहीत वाळलेली पाने, सोयाबीन भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा किंवा चंदेरी रंगाच्या पॉलिप्रॉपिलीनचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. तसेच जिवाणूंच्या संख्या वाढण्यास मदत होते.
तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास, पहाटेच्या वेळी बागेच्या चोहोबाजूंनी ओला काडीकचरा व गवत जाळून धूर करावा.
आंबा
पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास आणि फवारणी घेणे आवश्यक असल्यास पावसाची उघडीप पाहून तसेच फवारणी द्रावणात स्टीकर मिसळून फवारणी करावी.
आंब्याचा मोहोर रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी अॅझॉक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून पालवी तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या झाडावर फवारणी करावी.
पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कोवळ्या पालवीचे किडीच्या प्रादुर्भावाकरिता निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनाझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मोहोर फुटलेल्या बागेमध्ये तुडतुडे, मिजमाशी इत्यादी किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने मोहोर फुलण्यापूर्वी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ ईसी) ०.३ मि.लि. किंवा ब्युप्रोफेझीन (२५ एससी) २ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(*मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी १०-१२) वगळून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
226 views12:26
ओपन / कमेंट
2021-11-30 14:05:48 लिंबूवर्गीय पिकातील आंबे बहार व्यवस्थापन
फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=635967860915417&id=1832292603705174
228 views11:05
ओपन / कमेंट
2021-11-29 14:53:24 आजचा कृषी सल्ला
आले
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरीया इत्यादी देऊ नये. जर युरिया सारखी खते दिली तर पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे गड्ड्यांची वाढ लांबणीवर पडते. ज्या ठिकाणी पालाश या अन्नद्रव्याची कमतरता असेल, त्या ठिकाणी एकरी ३५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे गड्ड्यांचे वजन वाढून त्यांना चकाकी येते.
हळद
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरीया इत्यादी देऊ नये. जर युरिया सारखी खते दिली तर पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते. ज्या ठिकाणी पालाश या अन्नद्रव्याची कमतरता असेल, त्या ठिकाणी एकरी ५० किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
229 views11:53
ओपन / कमेंट
2021-11-29 14:24:56 https://krushikapp.blogspot.com/2021/11/blog-post_33.html
221 views11:24
ओपन / कमेंट
2021-11-29 14:24:27 https://krushikapp.blogspot.com/2021/11/blog-post_29.html
219 views11:24
ओपन / कमेंट