Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 27

2021-11-16 13:46:38 *रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती*
*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/961418454447479/
381 views10:46
ओपन / कमेंट
2021-11-16 09:18:33 *"प्रिव्हेंटिव्ह(एल)"*_____
पिकांची रोगप्रतिकारकक्षमता वाढवून उत्पादनात वाढ.. आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह (एल)*
*करपा,आकसा,व्हायरस,लाल्या,भुरी, डावणी,पिवळेपणा* पासून पिके वाचवा.
*(सर्व पिकांसाठी)*

9075099544
9145499544
414 views06:18
ओपन / कमेंट
2021-11-16 09:18:30
409 views06:18
ओपन / कमेंट
2021-11-15 15:48:47 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
किरळ लागणे
जनावरांनी ज्वारीची कोवळी धाटे खाल्ल्यास होणाऱ्या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असे म्हणतात. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते. जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले, तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होते. श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात. श्वसनाला त्रास होतो, जनावरे थरथर कापते. बेशुद्ध पडते.
प्रतिबंधात्मक उपाय
जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांना खाण्यास द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात, त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
उपचार
जनावराचे पोट फुगलेले दिसते. पशुवैद्यकाच्या सल्याने तातडीने उपचार करावेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
480 views12:48
ओपन / कमेंट
2021-11-15 08:44:47 राज्यात पावसासाठी पोषक हवामान

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 15-Nov-21

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने ढग जमा होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. रविवारी (ता. १४) सकाळी निफाड येथे नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १७ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (२०.२), जळगाव ३२.७ (१७.३), कोल्हापूर ३०.९ (२३.३), महाबळेश्‍वर २५.७ (१८), मालेगाव २८.४ (१७.६), नाशिक ३०.१ (१७.६), निफाड ३०.१ (१६.२), सांगली ३१.६ (२३.५), सातारा २९.८ (२३), सोलापूर ३१.८ (२१.६), सांताक्रूझ ३५.५ (२४.४), डहाणू ३०.९ (२२.५), रत्नागिरी ३४.५ (२४.३), औरंगाबाद ३०.३ (१९.१), नांदेड २९ (२२.२), उस्मानाबाद ३०.१ (-), परभणी ३१.१ (२३.३), अकोला ३४.१ (२३), अमरावती ३१.८ (१९.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२२.१), बुलडाणा ३०.४ (२०.४), चंद्रपूर ३०.६ (२४.६), गडचिरोली २९.२ (२३.४), गोंदिया २९.२ (२०.५), नागपूर ३२ (२१.४), वर्धा ३१.२ (२१.४), वाशीम ३२.५ (२०), यवतमाळ ३०.५ (२१.४)
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राचे संकेत : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याची मालिका सुरू आहे. बंगालच्या उपसागातील प्रणालीबरोबरच अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता.१७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, मध्य अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
497 views05:44
ओपन / कमेंट
2021-11-12 15:57:31 आजचा कृषी सल्ला
भात
भात पूर्णपणे वाळल्यावर म्हणजेच दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १४ ते १६ टक्के खाली आल्यावर मळणी करावी. मळणी नेहमीच्या अगर बैलांच्या सहाय्याने अगर मळणी यंत्राने करावी. भात मळणी यंत्राला एक गोल ड्रम आडव्या आसावर बसविलेला असतो. ड्रमवर पट्ट्या बसविलेल्या असून, त्यावर तारांचे लुप्स विशिष्ट कोनात बसविलेले असतात. या ड्रमची लांबी साधारणपणे ६० सें.मी. ते १ मीटरपर्यंत असते. कमी लांबीचे भात झोडणी यंत्र पायडल मारून किंवा इलेक्‍ट्रिक मोटारीवर चाल���िता येते. जास्त लांबीचे यंत्र इलेक्‍ट्रिक मोटार किंवा पॉवर टिलरद्वारे चालविता येते. यावर साधारणतः २ ते ४ मजूर एकाच वेळी काम करू शकतात. एका तासामध्ये साधारणपणे १३५ ते १५० किलो भाताची झोडणी करता येते.
तूर
कीड नियंत्रण
शेंगा पोखरणारी अळी - सुरवातीच्या काळात अळ्या कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे खातात.
पानाफुलांची जाळी करणारी अळी - फुलोऱ्यापासून किडीचा प्रादुर्भाव दिसतो. कमी कालावधीत येणाऱ्या जाती व जास्त आर्द्रता असलेल्या भागात किडींचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ करून लपून बसतात. त्यामुळे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटून खोडाची व शेंगांची वाढ खुंटते.
पिसारी पतंग - कळी, फुलोरा अवस्थेपासून ते काढणीपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या कळी, फुले व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या शेंगा किंवा शेंगांवरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.
उपाययोजना
पहिली फवारणी - पिकास फुलकळी येताना, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.७ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
377 views12:57
ओपन / कमेंट
2021-11-12 08:32:04 शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 12-Nov-21

पुणे : शेतीमालाचे पडणारे दर रोखण्यासाठी तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळु लागला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत १ हजार २६३ शेतकऱ्यांनी सुमारे १२.६२ कोटींचे तारण कर्ज घेतले आहे. महामंडळाच्या वतीने नुकत्याचे घेतलेल्या वखार आपल्या दारी अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याची अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.
श्री. तावरे म्हणाले, ‘‘सुगी हंगामाच्या सुरुवातीलाचा बाजारपेठेतील अन्नधान्याची आवक सुरू होण्याअगोदरच राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे ‘वखार आपल्या दारी’ अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये राबविण्यात आले होते.
शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला, तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून देण्यात आली. यामध्ये महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांचा समावेश होता.
शेतकऱ्यांना घरबसल्या तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी देखील राज्य सहकारी बॅंकेच्या सहकार्याने ब्लॉकचेन (आॅनलाइन कर्ज योजना) यंत्रणादेखील राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये कर्ज मंजुरी आणि पैसे खात्यावर जमा केले जात आहे. याचा फायदादेखील शेतकऱ्यांनी होत असल्य��चे तावरे यांनी सांगितले.
हळदीला सर्वाधिक पसंती : तारण योजनेमध्ये हळदीला सर्वाधिक पसंती शेतकऱ्यांनी दिली असून. लातूर विभागात मध्ये २११ शेतकऱ्यांनी ४ कोटी ९९ लाख १८ हजार ७३७ रुपये, तर १०३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ६२ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे.
‘‘दिवाळीमध्ये सोयाबीन काढणीनंतर दर कमी झाले होते. पैशांची पण गरज होती. यामुळे ‘ॲग्रोवन’मधील वखार महामंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती वाचून वखार महामंडळात सोयाबीन ठेवले. आमच्या सोयाबीनची किंमत ५ लाख ६७ हजार होती. त्यावर तारण कर्ज ३ लाख ९६ हजार एवढे मिळाले. आता आम्ही सहा महिन्यांत सोयाबीनचे दर वाढल्यावर कधीही विक्री करू शकतो. सोने तारण कर्जापेक्षा जास्त लवकर कर्ज आम्हाला या योजनेत मिळाले.’’ - उदय संपतराव देवकाते, निरा वागज, ता. बारामती, जि. पुणे
८ नोव्हेंबर अखेरची स्थिती
पहिल्या तीन शेतीमालासाठी घेतलेले सर्वाधिक कर्ज
शेतमाल शेतकरी संख्या कर्ज रुपये (कोटीत)
हळद २१८ ५ कोटी १४ लाख
हरभरा १३३ २ कोटी ९० लाख
सोयाबीन १६९ २ कोटी ४९ लाख
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
391 views05:32
ओपन / कमेंट
2021-11-11 16:12:25 आजचा कृषी सल्ला
वेल वर्गीय पिके
काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (७२ डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल (८० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकतेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी.
जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.
कांदा-लसूण
रांगड्या कांद्याचे उभे पीक
नत्राचा पहिला हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १४ किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणी करावी.
पीक संरक्षण
काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
बेनोमिल २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २ ग्रॅम
जांभळा व तपकिरी करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि.
फुलकीडे नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) –
कार्बोसल्फान २ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
422 views13:12
ओपन / कमेंट
2021-11-11 08:40:27 द्राक्ष पिकातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन
फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे
https://www.facebook.com/Krushikapp/videos/304047434899643/
172 views05:40
ओपन / कमेंट
2021-11-11 08:02:44 शेतकऱ्यांसाठी ३ लाखांपर्यंत कर्ज; 'या' सोप्या पध्दतीने करा अर्ज

सौजन्य : पुढारी
दिनांक : 11-Nov-21

किसान क्रेडिट कार्ड या योजनेतून शेकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळू शकते. ही योजना केंद्र सरकारने १९९८ मध्ये सुरु केली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. याचे व्याज २ टक्क्यांपासून ते ४ टक्क्यांपर्यंत आहे. या कार्डद्वारे शेतकरी ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. एसबीआयवरुन हे कर्ज घेण्यासाठी सोपी पध्दत आहे.
SBI किसान क्रेडिट कार्डसाठी, तुमचे खाते SBI मध्ये असले पाहिजे. तुम्ही बँकेच्या शाखेत KCC साठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनद्वारे YONO अॅप वापरून किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला फक्त YONO कृषी प्लॅटफॉर्मला भेट देऊन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे.
कर्ज घेण्यासाठी अशी करा प्रक्रिया
- प्रथम तुम्ही SBI YONO अॅप डाउनलोड करा
- sbiyono.sbi/index वेबसाइटवर लॉग इन करू शकता, तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय घेऊ शकता
- YONO Agriculture च्या पर्यायावर जा
- त्यानंतर ‘खाते’ हा पर्याय निवडा
- येथे KCC पुनरावलोकन विभागात जा
- अर्जावर क्लिक करा आणि समोर उघडणाऱ्या विंडोमध्ये विनंती केलेली माहिती भरा आणि सबमिट करा
अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल. यावर तुम्हाला कर्ज मंजूर होऊ शकते.
हे आहेत SBI किसान क्रेडिट कार्डचे फायदे
- KCC हे Revolving रोख क्रेडिट खात्यासारखे आहे
- ३ लाखांपर्यंत झटपट कर्जदारांसाठी 3% व्याज सवलत
- पिकाच्या कालावधीनुसार आणि पिकांच्या विपणन कालावधीनुसार परतफेड
- सर्व पात्र KCC धारकांना रुपे कार्डचे वाटप
- रुपे कार्डधारकांसाठी १ लाख रुपयांचा अपघात विमा. यासाठी ४५ दिवसांतून एकदा कार्ड सक्रिय करावे.
- कार्डवरुन तुम्हाला कमी वेळात कर्ज मिळू शकते
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
197 views05:02
ओपन / कमेंट