Get Mystery Box with random crypto!

शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज सौजन्य : अॅग्रोवन | कृषिक अँप Krushik app

शेतीमाल तारण योजनेतून १२.६२ कोटींचे कर्ज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 12-Nov-21

पुणे : शेतीमालाचे पडणारे दर रोखण्यासाठी तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळु लागला आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत १ हजार २६३ शेतकऱ्यांनी सुमारे १२.६२ कोटींचे तारण कर्ज घेतले आहे. महामंडळाच्या वतीने नुकत्याचे घेतलेल्या वखार आपल्या दारी अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याची अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.
श्री. तावरे म्हणाले, ‘‘सुगी हंगामाच्या सुरुवातीलाचा बाजारपेठेतील अन्नधान्याची आवक सुरू होण्याअगोदरच राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे ‘वखार आपल्या दारी’ अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये राबविण्यात आले होते.
शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला, तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून देण्यात आली. यामध्ये महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांचा समावेश होता.
शेतकऱ्यांना घरबसल्या तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी देखील राज्य सहकारी बॅंकेच्या सहकार्याने ब्लॉकचेन (आॅनलाइन कर्ज योजना) यंत्रणादेखील राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये कर्ज मंजुरी आणि पैसे खात्यावर जमा केले जात आहे. याचा फायदादेखील शेतकऱ्यांनी होत असल्य��चे तावरे यांनी सांगितले.
हळदीला सर्वाधिक पसंती : तारण योजनेमध्ये हळदीला सर्वाधिक पसंती शेतकऱ्यांनी दिली असून. लातूर विभागात मध्ये २११ शेतकऱ्यांनी ४ कोटी ९९ लाख १८ हजार ७३७ रुपये, तर १०३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ६२ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे.
‘‘दिवाळीमध्ये सोयाबीन काढणीनंतर दर कमी झाले होते. पैशांची पण गरज होती. यामुळे ‘ॲग्रोवन’मधील वखार महामंडळाच्या शेतीमाल तारण कर्ज योजनेची माहिती वाचून वखार महामंडळात सोयाबीन ठेवले. आमच्या सोयाबीनची किंमत ५ लाख ६७ हजार होती. त्यावर तारण कर्ज ३ लाख ९६ हजार एवढे मिळाले. आता आम्ही सहा महिन्यांत सोयाबीनचे दर वाढल्यावर कधीही विक्री करू शकतो. सोने तारण कर्जापेक्षा जास्त लवकर कर्ज आम्हाला या योजनेत मिळाले.’’ - उदय संपतराव देवकाते, निरा वागज, ता. बारामती, जि. पुणे
८ नोव्हेंबर अखेरची स्थिती
पहिल्या तीन शेतीमालासाठी घेतलेले सर्वाधिक कर्ज
शेतमाल शेतकरी संख्या कर्ज रुपये (कोटीत)
हळद २१८ ५ कोटी १४ लाख
हरभरा १३३ २ कोटी ९० लाख
सोयाबीन १६९ २ कोटी ४९ लाख
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true