Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 25

2021-11-29 07:44:09 ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी; मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 26-Nov-21

मुंबई, दि. 26 : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे.
आजअखेर ई- पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली आहे, तर 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांची ई-पीक ॲपवरील नोंदणी पूर्ण झाली आहे.
आज अखेर औरंगाबाद विभागात 20 लाख 75 हजार 108 पैकी 17 लाख 27 हजार 916, आणि नाशिक विभागात 19 लाख 34 हजार 767 पैकी, 13 लाख 89 हजार 756 ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे. तर अमरावती विभागात 14 लाख 15 हजार 252 पैकी, 11 लाख 97 हजार 275 आणि पुणे विभागात 20 लाख 33 हजार 441 पैकी, 9 लाख 94 हजार 747 नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 11 लाख 50 हजार 203 पैकी, 9 लाख 93 हजार 709 आणि कोकण विभागात 3 लाख 31 हजार 077 पैकी, 1 लाख 44 हजार 965 शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केली आहे.
ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार आहे.
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
176 views04:44
ओपन / कमेंट
2021-11-26 13:57:10 *कांदा पिक व्यवस्थापन*
*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/612240866858954/
285 views10:57
ओपन / कमेंट
2021-11-26 09:49:48
366 views06:49
ओपन / कमेंट
2021-11-26 09:49:42 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या संयुक्त विद्यमाने
*“ कांदा पिक व्यवस्थापन ” * परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक: डॉ. विवेक भोईटे ( Vivek Bhoite )
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र),
कृषि विज्ञान केंद्र, बारामती
*तारीख* - २६/११/२०२१
*वार*- शुक्रवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्या पर्यंत पोहचवावी ही विनंती
365 views06:49
ओपन / कमेंट
2021-11-24 07:57:35 बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 24-Nov-21

मुंबई, दि. 23 : केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान अंतर्गत असणारी बियाणे व प्रक्रिया साठवण केंद्र उभारणी ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. राज्यात या प्रकल्पासाठी 50 प्रकल्प उभारणीचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. महत्त्वाच्या पिकांचे क्षेत्र लक्षात घेऊन लक्षांक निर्धारित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने एकूण 48 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 42 प्रस्ताव पात्र ठरले. उर्वरित पैकी चार रद्द तर दोन अपात्र ठरवण्यात आले. आजमितीस एकूण 16 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय, सन 2021-22 मध्ये एकूण 10 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. अधिकाधिक चांगल्या संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील, यासाठी जिल्हा स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश कृषीमंत्री श्री.भुसे त्यांनी दिले.
मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीस कृषि विभागाचे सहसचिव गणेश पाटील, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, उमेश चांदवडे उपस्थित होते.
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
147 views04:57
ओपन / कमेंट
2021-11-23 13:47:27 *सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान*
*फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=302543011727087&id=1832292603705174
317 views10:47
ओपन / कमेंट
2021-11-23 08:21:22 राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 23-Nov-21

पुणे : पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण ,गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसभरात राज्यात सोलापूर आणि अमरावती वगळता अन्य ठिकाणी पाऊस पडलेला नाही.
राज्यात पुढील चोवीस तासांत पावसाळी परिस्थती कायम राहणार आहे. अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही. आता पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात आणखी चार दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सोलापूरात २२ मिलिमीटर, तर अमरावतीमध्ये सात मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक तापमान ३४ अंश सेल्सिअस अकोल्यात, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले.कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राबरोबरच विदर्भ तसेच मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
100 views05:21
ओपन / कमेंट
2021-11-22 15:05:26 क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शारदा कार्बन प्लस’ ठरतेय फायदेशीर
डॉ. विवेक भोईटे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

*शारदा कार्बन प्लस*

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’ हे विद्राव्य स्वरूपातील जिवाणू खत विकसित केले आहे. हे क्षारपड जमीन सुधारणा तसेच जमीन सुपीकता, पीक उत्पादन वाढीसाठी फायदेशीर दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत नदी काठ तसेच कालव्याच्या परिसरातील जमिनी अति पाणी आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे खराब झाल्या आहेत. त्याचा पीक उत्पादन आणि सुपीकतेवर परिणाम झालेला दिसतो. या जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्याने भौतिक संरचना तयार होताना कणांची घनता जास्त असते. अति पाणी आणि अनियंत्रित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक होतात. जमिनीतून पाण्याचा निचरा कमी झाल्याने सोडीयम, मॅग्नेशिअम, कार्बेनेट, बाय कार्बोनेट क्षारांचा संचय वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवर क्षारांचा पांढरा थर दिसतो. या जमिनीत ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त प्रमाणात क्षारता पाहायला मिळते. जमिनीची सामू आठच्या वर गेला आहे. अशा जमिनीत उसाची मुळे वाढत नाहीत, फूट कमी मिळते. कांडी वाढत नाही. पानाचे शेंडे करपलेले दिसतात. काही जमिनीत एकरी १० ते २० टनांपर्यंत ऊस उत्पादन खाली आहे. शेतकरी जमीन आहे म्हणून नांगरट करून पीक लागवड करतात, परंतु उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या हे परवडत नाही. तसेच जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुधारणेकडे दुर्लक्ष झालेले दिसते.
*अधिक माहितीसाठी संपर्क:-* *८४८५०५४५२७*
संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा..
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
235 views12:05
ओपन / कमेंट
2021-11-20 08:27:58 अखेर माघार!

सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 20-Nov-21

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने शेतकरी संघटनांच्या आंदोलनापुढे नमते घेत वादग्रस्त तीन कृषी कायदे शुक्रवारी (ता.१९) अखेर रद्द केले. देवदिवाळी, गुरू नानक जयंतीच्या पर्वाचे निमित्त साधून पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदे औपचारिकरीत्या मागे घेतले जाणार असल्याचे सांगताना मोदींनी शेतकरी संघटनांना आंदोलन मागे घेण्याचेही आवाहन केले आहे.
कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घेतले जाणार नसल्याचे केंद्र सरकारतर्फे सातत्याने सांगितले जात होते. मात्र सरकारला ही माघार घ्यावी लागली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशाला उद्देशून भाषण करताना वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याची कबुली दिली. मात्र शेतकऱ्यांना समजावण्यात आपली तपश्‍चर्या कमी पडल्याचीही पुष्टीही मोदींनी जोडली.
आमच्या तपश्‍चर्येतमध्ये त्रुटी
‘‘आज देशातल्या जनतेची क्षमा मागताना मनापासून आणि पवित्र अंतःकरणाने सांगू इच्छितो, की कदाचित आमच्या तपश्‍चर्येतमध्ये काही तरी त्रुटी राहिली असावी, ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखे सत्य शेतकरी बांधवांना आम्ही समजावू शकलो नाही. आज गुरू नानक देवजी यांचे पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कोणाला दोष देण्याची नाही. आज संपूर्ण देशाला ह�� सांगण्यासाठी आलो आहे, की आम्ही तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण केली जाईल,’’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केली.या वेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुपर्वाच्या निमित्ताने आंदोलन संपविण्याची आणि आपापल्या घरी परत जाण्याची, तसेच नवी सुरुवात करण्याची भावनिक सादही पंतप्रधानांनी घातली. तत्पूर्वी, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा एक समूह विरोध करत होता, तरीही आमच्यासाठी ते महत्त्वाचे होते. कृषितज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व समाजवण्याचे प्रयत्न केले. आम्ही नम्रतेने आणि खुलेपणाने त्यांना समाजावत राहिलो. अनेक माध्यमांद्वारे व्यक्तिगत तसेच सामूहिक बातचित झाली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. कायद्यांतील ज्या तरतुदींवर आक्षेप होता, सरकार ते बदलण्यासही तयार झाले. दोन वर्षांपर्यंत कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव झाला हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढेही गेला. या सर्व गोष्टी देशासमोर असल्याचे मोदींनी सांगितले.
या सोबतच, आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या अडचणी अनुभवल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांची आर्थिक तसेच सामाजिक स्थिती सुधारण्याच्या महाअभियानामध्ये तीन कृषी कायदे आणल्याची सारवासारवही केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘लहान शेतकऱ्यांना उत्पादनाची योग्य किंमत आणि मालविक्रीसाठी अधिक पर्याय मिळावेत, हा त्या मागचा उद्देश होता. हीच मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी, कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटना करत होती. यावर संसदेत चर्चा होऊन कायदे आणले. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनांनी याचे स्वागत केले.’’ पंतप्रधान मोदी म्हणाले...
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना समजावण्यात आपली तपश्‍चर्या कमी पडली. कृषितज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी महत्त्व समाजवण्याचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांचा एक समूह विरोध करत होता, तरीही आमच्यासाठी ते महत्त्वाचे होते
समिती स्थापन करणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, पीक पद्धतीत बदल, शेतीमालाचे किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) निश्‍चितीची प्रक्रिया पारदर्शक बनविणे या सारख्या मुद्द्यांवर केंद्र, राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा तसेच शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी या वेळी जाहीर केले.
प्रतिक्रिया
कृषी हितासाठी, गरिबांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेतून चांगल्या मनाने हे कायदे आणले होते. परंतु शेतकऱ्यांच्या हिताची ही गोष्ट प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हंगाम निहाय कृषी सल्ला तसेच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषिक अॅप अपडेट/डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
296 views05:27
ओपन / कमेंट
2021-11-19 13:51:06 *कोरडवाहू फळपिक लागवड तंत्रज्ञान*
*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/958470788383261/
186 views10:51
ओपन / कमेंट