Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 28

2021-11-10 11:42:40 https://krushikapp.blogspot.com/2021/11/blog-post_13.html
230 views08:42
ओपन / कमेंट
2021-11-10 08:23:14 राज्यात गारठा वाढला; निफाड येथे पारा १२.५ अंशांवर

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 10-Nov-21

पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. ९) निफाड येथे राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी ��ावल्याने राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र पावसाने उघडीप देताच राज्यात थंडी परतली असून, गारठ्यात वाढ झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या खाली घसरले आहे. पहाटेच्या वेळी धुके पडण्यासही सुरुवात झाली आहे,. निफाड पाठोपाठ पुणे येथे १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.
मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.५ (१२.७), नगर ३१.४ (१४.७), जळगाव ३२ (१३), कोल्हापूर ३०.७ (१८.५), महाबळेश्‍वर २५ (१४.१), मालेगाव ३१.४ (१८.६), नाशिक २८.९ (१३.४), निफाड २९.४ (१२.५), सांगली ३२.२ (१७), सातारा ३०.५ (१८.१), सोलापूर ३३.३ (१५.०), सांताक्रूझ ३५.३ (२०.२), डहाणू ३४.६ (२१), रत्नागिरी ३४.२ (२१.२), औरंगाबाद ३०.२ (१३.६), नांदेड ३२.८ (१५.९), उस्मानाबाद - (१६), परभणी ३०.२ (१४.८), अकोला ३२.४ (१५.८), अमरावती ३१.६ (१५.३), ब्रह्मपुरी ३३.५ (१६.२), बुलडाणा ३०.२ (१५.६), चंद्रपूर ३१.८ (१६.४), गडचिरोली ३१.४ (१५.४), गोंदिया ३१ (१३), नागपूर ३१.५ (१४.४), वर्धा ३१ (१४.९), वाशीम ३२ (१४), यवतमाळ ३०.५ (१४.५)
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र : दरम्यान, अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पूर्व किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. गुरुवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत आहेत. पूर्वमध्य अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्र किनाऱ्यापासून दूर सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
286 views05:23
ओपन / कमेंट
2021-11-09 15:55:31 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
टोमॅटोमधील लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट), पानांवरील ठिपके (सेप्टोरिया लीफ स्पॉट) या रोगांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तर उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट), फळसड (बक आय रॉट) रोगाच्या नियंत्रणासाठी, वरील बुरशीनाशकांच्या व्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. झाडे योग्य प्रकारे बांधावीत. पाने आणि फळे मातीच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाचे अवशेष, रोगग्रस्त फळे गोळा करून जाळून टाकावीत.
वेल वर्गीय पिके
जमिनीचा मगदूर व वातावरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण आदी बाबींचा विचार करून पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर ठरवावे. जमीन हलकी असल्यास ३ ते ४ दिवस, मध्यम जमिनीत ५ ते ६, तर भारी जमिनीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. शक्यतो ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिंबक सिंचन पद्धतीमुळे सर्व वेलींना समान पाणी मिळते, तणांचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर लागवड शक्य होते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
352 views12:55
ओपन / कमेंट
2021-11-07 08:16:46 कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 07-Nov-21

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाले असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे ३० मिलिमीटर, आजरा २०, त्र्यंबकेश्वर १० मिलिमीटर तर कोकणातील हर्णे येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ५) गडचिरोली येथे नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूज येथे उच्चांकी कमाल ३७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.
◆शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.४ (२०.८), जळगाव ३२.८(१७.२), कोल्हापूर ३२.० (२३.०), महाबळेश्वर २४.४(१७.३), मालेगाव ३१.४ (१९.०), नाशिक ३१.१ (२०.४), सांगली ३३.२(२४.३), सातारा ३१.६(२१.०), सोलापूर ३३.२ (१९.४), सांताक्रूझ ३७.०(२५.४), अलिबाग ३३.७ (-), डहाणू ३५.१ (२५.४), रत्नागिरी ३५.४ (२४.६), औरंगाबाद ३१.६ (१९.८), नांदेड ३२.२ (२०.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३६.६ (१९.४), अमरावती ३२.२ (१७.१), ब्रह्मपुरी ३४.३ (१८.६), बुलडाणा ३१.० (१७.६), चंद्रपूर ३२.२ (१९.४), गडचिरोली -(१६.६), गोंदिया ३१.२ (१६.८), नागपूर ३१.७ (१७.७), वर्धा -(१८.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३१.० (१९.०)
◆वीजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी
◆कमी दाब क्षेत्र झाले ठळक : पूर्वमध्य अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. उत्तरेकडे सरकत असलेली हे ठळक कमी दाब क्षेत्र आज (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे व भारताच्या किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
345 views05:16
ओपन / कमेंट
2021-11-02 15:19:52 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
शेतकऱ्यांना बीजोत्पादन घ्यायचे असल्यास किंवा यावर्षीच्या सोयाबीनचा वापर पुढील वर्षी बियाणे म्हणून करायचा असल्यास, सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता बीज प्रयोगशाळेत किंवा घरच्या घरी तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास सोयाबीन बियाणे वाळवून, त्याला कार्बोक्सीन (३७.५%) + थायरम (३७.५% डीएस) ३ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे संयुक्त बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. नवीन पोत्यात हवेशीर संरक्षित कोठारात साठवावे. बुरशीनाशक लावलेल्या बियाण्याची धान्य म्हणून विक्री करू नये. साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. ज्यामुळे बियाण्याला ओल लागणार नाही, बियाणे खराब होणार नाही. बियाण्याची साठवणूक करताना, जास्तीत जास्त ५ पोत्याची थप्पी मारावी. त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील, अशारितीने ठेवावे. अन्यथा गोदामाच्या आत गरम जागा (हॉट स्पॉट) तयार होईल, ज्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती खूप लवकर कमी होते. बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा, मात्र त्यासाठी कूलरचा वापर करू नये. अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल, ज्यामुळे बियाणे खराब होऊ शकते. आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.
तूर
पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर फुलकळी लागताना, फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे किंवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे. पिकास फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट किंवा डी.ए.पी. २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
221 views12:19
ओपन / कमेंट
2021-11-02 10:05:22 दिवाळीनंतर अतिवृष्टीचे मिळणार बाराशे कोटी!

सौजन्य : सकाळ
दिनांक : 02-Nov-21

सोलापूर : जुलै ते सप्टेंबर या काळातील अतिवृष्टीमुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमधील 56 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने त्यांच्यासाठी दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. परंतु, आतापर्यंत तीन टप्प्यात तीन हजार 999 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आता दिवाळीनंतर 25 वाढीव मदतीचे बाराशे कोटी रुपये वितरीत केले जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली.
राज्यातील सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, पालघर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, नगर यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. जवळपास 54 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे अहवाल राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे राज्य सरकारने सुरवातीला भरपाईतील 75 टक्‍के रक्‍कम वितरीत केली आहे. उर्वरित 25 टक्‍के रक्‍कम पुढील महिन्यात वितरीत केली जाणार आहे. दरम्यान, महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तीन हजार 200 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्याचा कृती आराखडा तयार केला असून पुढील काही दिवसांत त्यादृष्टीने काम सुरू होईल, असेही विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
तीन टप्प्यांत मदत : राज्यातील अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली शेती पिके पाण्यात वाहून गेली. अनेकांची जनावरे वाहून गेली, घरांची पडझड झाली. त्यांच्यासाठी राज्य सरकारने जवळपास दहा हजार कोटींची मदत जाहीर केली होती. परंतु, जुलै महिन्यात दिलेले 365 कोटी, त्यानंतर दोन हजार 860 कोटी आणि आता 774 कोटींची मदत दिली आहे. राज्याच्या तिजोरीत जसा पैसा जमा होईल, तशी मदत शेतकऱ्यांना करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. उर्वरित मदत पुढील टप्प्यात मिळणार असून ज्यांना मदत मिळाली नाही, त्यांचाही त्यात समावेश असणार आहे.
जुलैनंतर अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारच्या माध्यमातून भरपाई वितरीत करण्यात आली आहे. काही दिवसांत 25 टक्‍के वाढीव रक्‍कमदेखील दिली जाणार आहे. - संजध धारुरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
316 views07:05
ओपन / कमेंट
2021-11-01 08:17:56 कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 01-Nov-21

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने सध्या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. रात्री वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे अधिकच थंडी जाणवू लागली आहे. पावसाला पोषक हवामान होताच किमान तापमानात थोडीशी वाढ झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १५ अंशांच्या वर गेला आहे. रविवारी (ता. ३१) जळगाव येथे नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका कायम असून, ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे.
रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३ (१६), नगर ३२.४ (-), जळगाव ३२ (१२.८), कोल्हापूर ३२.३ (२२.७), महाबळेश्‍वर २७.२ (१५.७), मालेगाव ३३ (१८), नाशिक ३०.३ (१४.२), सांगली ३४.२ (२१.८), सातारा ३१.१ (१९.७), सोलापूर ३४.२ (१९.३), सांताक्रूझ ३५.३ (२४), डहाणू ३३.८ (२२.२), रत्नागिरी ३६ (२३.९), औरंगाबाद ३०.८ (१५.२), नांदेड ३२.४ (१८.१), परभणी ३१ (१६.८), अकोला ३२.० (१६.०), अमरावती ३२ (१५.२), ब्रह्मपुरी ३३.४ (१५.३), बुलडाणा २९ (-), चंद्रपूर ३१.४ (२०), गडचिरोली ३२.४ (१८.८), गोंदिया ३०.८ (१५.८), नागपूर ३२ (१४.७), वर्धा ३१.६ (१५.६), यवतमाळ ३१.५ (१४.५)
विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर, सांगली, सातारा
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
295 views05:17
ओपन / कमेंट
2021-10-30 15:42:04 आजचा कृषी सल्ला
कापूस
पोटॅशिअम हे अन्नद्रव्य कापसाची परिपक्वता होत असताना फार महत्वाचे आहे. त्यामुळे या शेवटच्या अवस्थेत कापसाचे बोंड पूर्ण परिपक्व झाल्यावर बोंड पूर्णपणे उमलण्यासाठी व कापसाची प्रत चांगली राखण्यासाठी पिकावर पोटॅशिअम नायट्रेट (१३-००-४५) ०.५ ते १ टक्के (५ ते १० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी
भात
पीक निसवल्यानंतर साधारणतः २५ ते ३० दिवसांनी लोंबीत दाणे पक्व झाल्यावर भाताची कापणी करावी. वक्तशीरपणे कापणी केल्याने भात भरडताना कणीचे प्रमाण कमीत कमी राहते. कापणी करण्याच्या आधी ७ ते १० दिवस भात पीक असलेल्या खाचरातून सर्व पाणी काढून टाकावे. यामुळे पीक लवकर पक्व होते. लोंब्यांतील धाय/ दाणे रंग बदलू लागतात. पक्व झाल्यावर त्यांचा टणकपणा लोंब्यांना स्पर्श करताच जाणवतो. लोब्यांचा रंग पिवळट होऊन त्यातील दाणे हे पक्व होणे गरजेचे आहे. संपूर्ण भात खाचरातील असे भात पीक पक्व झाल्यावर ते कापणीयोग्य झाले असे समजावे. प्रचलित पद्धतीमध्ये भाताची कापणी त्यामधील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे १६ ते १८ टक्के असताना करतात. भात जास्त वाळविल्यामुळे कापणीच्या वेळी दाणे गळून पडतात, त्यामुळे होणारे नुकसान हे ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असते. तांदळात तुकड्यांचे प्रमाणही वाढते. अशा तांदळाला पॉलिशसुद्धा चांगल्या प्रकारे करता येत नाही, त्यामुळे दाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण २० ते २१ टक्के इतके असताना कापणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
466 views12:42
ओपन / कमेंट
2021-10-30 08:18:31 https://krushikapp.blogspot.com/2021/10/blog-post_30.html
424 views05:18
ओपन / कमेंट
2021-10-29 13:49:10 कोबी वर्गीय पिके
कीड नियंत्रण
चौकोनी ठिपक्‍याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) - कोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते. अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात.
एकात्मिक व्यवस्थापन
लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर दोन ओळी मोहरी पेरावी.
शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण लावावे.
एकरी पाच कामगंध सापळे (झायलो ल्यूर) लावावेत.
मोहरीवर अळ्या दिसू लागताच, क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
मुख्य पिकावर दोन अळ्या प्रति रोप दिसू लागताच, पहिली फवारणी बॅसेलिस थुरींजिऐंसीस जीवाणूवर आधारित कीटकनाशकाची (बी.टी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी करावी.
ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री मित्रकीटक एकरी ४० हजार या प्रमाणात सोडावेत.
दुसरी फवारणी, निंबोळी अर्क ४ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
तिसरी फवारणी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून करावी.
आवश्यकतेनुसार चौथी फवारणी, क्‍लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
485 views10:49
ओपन / कमेंट