Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 29

2021-10-29 08:03:00 शेतकऱ्यांच्या हितासाठी या कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी आता शिवसैनिक म्हणून मीच हिसका दाखविणार आहे,’’ अशी रोखठोक भूमिका कृषिमंत्र्यांनी घेतली आहे.
147 views05:03
ओपन / कमेंट
2021-10-29 08:02:59 विमा कंपन्यांच्या विरोधात मोठ्या कारवाईचे संकेत

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 29-Oct-21

पुणे : राज्यातील खासगी पीकविमा कंपन्यांच्या विरोधात कृषी विभागाने कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई द्या, अन्यथा कडक कारवाईला तयार राहा, असा इशारा देणाऱ्या नोटिसा कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी कंपन्यांना बजावल्या आहेत. यामुळे भेदरलेल्या कंपन्यांनी भरपाईचे वाटप सुरू केले आहे.
राज्याच्या कृषी खात्याने पाच ऑक्टोबरला एक महत्त्वाची बैठक घेतली. त्यात विमा कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाईच्या रकमा जमा करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक विकास पाटील व मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडून सातत्याने याचा पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. मात्र काही कंपन्या अजिबात दाद देत नसल्याने आता मोठ्या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कंपन्यांनी विमा योजनेच्या हेतूचाच पराभव केला : आयुक्तांनी या कारवाईचा पहिला टप्पा म्हणून भारतीय कृषी विमा कंपनी, रिलायन्स, आयसीआयआय लोम्बार्ड, इफ्को टोकियो, एचडीएफसी इरगो आणि बजाज अलियांझ अशा सहा कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘‘तुम्हाला सतत सांगूनही शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ होते आहे. तुमचे वागणे आमच्यासाठी अतिशय वेदनादायक आणि पश्‍चातापजनक आहे. तुमची कामाची पद्धत पंतप्रधान पीकविमा योजनेच्या हेतूचा पराभव करणारी आहे. इतकेच नव्हे तर यातून कंपन्यांची नफेखोरीची आणि पैसा बनविण्याची वृत्ती दिसते आहे,’’ अशा कठोर शब्दांत आयुक्तांनी या नोटिशीत टीका केली आहे. विमा योजनेच्या खरीप २०२१ हंगामामध्ये ८४.०४ लाख शेतकरी सहभागी आहेत. त्यांच्या विमाहप्त्यापोटी कंपन्यांना ४५१२ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४४०.५१ कोटी शेतकऱ्यांनी हप्ता जमादेखील केलेला आहे. याशिवाय हप्त्यापोटी राज्याने ९७३.१६ कोटी आणि केंद्राने ८९८.५५ कोटी रुपये कंपन्यांना दिलेले आहेत.
तुमच्या नफ्यासाठी योजना चालत नाही : नियमाप्रमाणे विमा कंपन्यांनी मध्य हंगामपूर्व आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या रकमा एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना द्यायच्या होत्या. आयुक्तांनी या कंपन्यांना बजावले आहे, ‘‘मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे, की पंतप्रधान पीकविमा योजना ही विमा कंपन्यांना नफा होण्यासाठी चालविली जात नसून, शेतकऱ्यांवर आपत्ती कोसळताच त्यांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी आहे.’’
विमा कंपन्यांनी चालू मध्य हंगामपूर्व आपत्तीमधील चार लाख ९७ हजार ८३४ पात्र शेतकऱ्यांसाठी २७ ऑक्टोबरअखेर २२५.१४ कोटींची भरपाई देण्याबाबत गणना केलेली आहे. गणनेचे हे काम सतत चालू आहे. याशिवाय स्थानिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत ३८ लाख २२ हजार ९६९ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या आहेत. कंपन्यांनी त्यातील पावणेपाच लाख सूचनांचे पंचनामेदेखील केलेले नाहीत. तसेच यातील पात्र १४ लाख ६ हजार शेतकऱ्यांना ७८० कोटी ६६ लाख रुपयांची भरपाईदेखील दिलेली नाही.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
सरकारी निधीचा हा गैरवापर : या प्रकारामुळे कृषी आयुक्त कमालीचे संतप्त झालेले आहेत. ‘‘काही कंपन्या खरीप २०२० मधील भरपाईबाबत केंद्रासोबत असलेल्या मुद्द्यांचे कारण देत खरीप २०२१ मधील भरपाई देत नसल्याचे दिसून येत आहे. हा सरकारी निधीचा गैरवापर असून, विमा योजनेच्या नियमावलीचा भंग आहे. त्यामुळे तुम्ही आता राज्य शासनाच्या कडक कारवाईला पात्र आहात.’’ असा गर्भित इशारा आयुक्तांनी या कंपन्यांना दिलेला आहे.
आयुक्तांच्या या नोटिशीनंतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडालेली आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने ११ कोटी रुपये तत्काळ शेतकऱ्यांच���या बॅंक खात्यात टाकले असून, अजून २१.५५ कोटी देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. इफ्को टोकियो कंपनीने कृषी आयुक्तालयाला पत्र देत नांदेड जिल्ह्यातील ७.२२ लाख शेतकऱ्यांसाठी ४५८.८९ कोटींच्या नुकसानभरपाईचे दावे विचारार्थ घेतले आहेत, असे कळविले आहे.
मुजोर विमा कंपन्यांना हिसका दाखविणार - कृषिमंत्री : दरम्यान, ‘अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड’ वितरण सोहळ्यात कृषिमंत्री भुसे यांनी विमा कंपन्यांना निर्वाणीचा दिलेला इशारा कृषी खात्यात चर्चेचा विषय बनला आहे. ‘‘शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई तत्काळ मिळावी, अशी सरकारची धडपड आहे. मात्र मुजोर विमा कंपन्या शेतकरीविरोधी कामे करीत आहेत.
161 views05:02
ओपन / कमेंट
2021-10-28 15:46:36 आजचा पशु सल्ला
पशु संवर्धन

गाई-म्हशींचा शेवटच्या तीन महिन्यांचा गाभणकाळ हा तसा दूध उत्पादकांकडून दुर्लक्षिला जातो, कारण त्यावेळी दूध मिळत नाही. जनावरांना सुरवातीच्या सहा महिन्यांच्या गाभणकाळात नेहमीचे खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो. परंतु शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे तिला पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते, तसेच खाद्य दोनऐवजी चारवेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते. शेवटच्या तीन आठवड्यात पचण्यास सोपा जास्त पाचकतत्त्वे असलेला आहार सुमारे ४ ते ५ किलो प्रति दिन विभागून खाऊ घालावा. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा. शेवटच्या गाभणकाळात व विल्यानंतर सुरवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार दिल्यास पचनासाठी लागणाऱ्या उर्जेत बचत होते.
शेळी पालन
पैदाशीसाठी नराची निवड
किफायतशीर शेळी व्यवसायाच्या यशाचा पाया म्हणजे त्यांची पैदास; आणि पैदाशीमध्ये कळपातील पैदाशीच्या नराचा मोलाचा वाटा असतो. म्हणूनच ५० माद्यांच्या निवडीपेक्षा एका पैदाशीच्या नराची निवड अत्यंत महत्त्वाची असते.
नर हा कळपातील सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
पैदाशीचा नर चपळ असावा.
पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा.
पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.
पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
325 views12:46
ओपन / कमेंट
2021-10-28 08:09:14 परस्थितीमुळे बाधित १४ जिल्ह्यांसाठी २८६० कोटीच्या मदतीनंतर ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 27-Oct-21

मुंबई, दि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच 14 बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे.
कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी सांगितले आहे.
पूरस्थितीमुळे बाधित व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण रु 774,15.43 लाख (अक्षरी रुपये सातशे चौऱ्‍याहत्तर कोटी पंधरा लाख त्रेचाळीस हजार फक्त) इतका निधी सोलापूर, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक आणि जळगाव या नऊ जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त यांचेमार्फत हा निधी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
दिनांक 21.10.2021 च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तातंरित करण्याबाबत द���्षता घ्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
351 views05:09
ओपन / कमेंट
2021-10-27 10:07:50 https://krushikapp.blogspot.com/2021/10/blog-post_26.html
415 views07:07
ओपन / कमेंट
2021-10-27 08:21:14 क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शारदा कार्बन प्लस’

सौजन्य : सकाळ
दिनांक : 27-Oct-21

पुणे : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’ हे विद्राव्य स्वरूपातील जिवाणू खत विकसित केले आहे. हे क्षारपड जमीन सुधारणा तसेच जमीन सुपीकता, पीक उत्पादन वाढीसाठी फायदेशीर दिसून आले आहे.
याबाबत कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे म्हणाले, की यामध्ये उपयुक्त जिवाणू आणि बुरशी आहेत. विशेषतः लॅक्टोबॅसिलस आणि सल्फर, पोटॅश, फॉस्फरस विरघळविणारे जिवाणूंचा समावेश आहे. कार्बन प्लसच्या वापरामुळे क्षारपड जमिनीची सुधारणा होते. मातीचे कण वेगवेगळे होतात. जमीन मऊ होते. वर्षातून दोन वेळा याचा वापर केल्याने जमिनीच्या वरच्या आणि खालच्या थरातील पाण्याचा निचरा सुधारतो.
जमिनीत मिसळल्यानंतर यातील जिवाणूंची संख्या वाढायला सुरुवात होते. जमिनीतील भौतिक आणि जैविक संरचना सुधारल्यामुळे पिकाला अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढू लागते. सेंद्रिय आम्ल जमिनीत तयार होते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. विविध हंगामी पिके तसेच फळबाग, भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी कार्बन प्लस उपयुक्त आहे.
"आम्ही नीरा, भीमा नदी क्षेत्र तसेच बारामती, इंदापूर तालुक्यातील क्षारपड जमीन तसेच सुपीकता कमी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये कार्बन प्लस वापराबाबत प्रात्यक्षिके घेतली. त्यामध्ये असे दिसून आले, की जमिनीची जैविक आणि भौतिक सुधारणा झाली. उसाची उगवण क्षमता सुधारली, फुटवे वाढले, कांडी वाढली, मुळ्यांची संख्या वाढली. पाणी निचरा चांगला झाला. सेंद्रिय कर्ब वाढला. पानांची हिरवटपणा वाढला. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही शारदा ऑरगॅनिक कार्बन प्��स हे ५,२०,३५ लिटरमध्ये उपलब्ध केले आहे. या संशोधनामध्ये श्री लोटस सोल्यूशनचे डॉ. अशोक कडलग, सचिन काळभोर आणि संतोष लाटणेकर यांचा समावेश आहे."
‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’चे फायदे
 शिफारशीत रासायनिक खतांचा वापर १५ ते २० टक्यांनी कमी होतो. जमीन भुसभुशीत होते. सेंद्रिय कर्ब वाढतो. क्षारपड जमिनीत सुधारणा होते. जमिनीत हवा खेळती राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
 जमीन तयार करताना एकरी १० टन शेणखत वापरले असेल किंवा पाचट कुजवून वापरले असेल तर एकरी २० लिटर कार्बन प्लस वापरावे अशी शिफारस आहे किंवा ५० टक्के शेणखत आणि ५० टक्के कार्बन प्लस वापरावे किंवा ५० टक्के मळी आणि ५० टक्के कार्बन प्लसचा वापर करावा.
 कार्बन प्लस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून वापरता येते. यामुळे ठिबक सिंचन यंत्रणेची स्वच्छतादेखील होते. जमिनीचे नुकसान होत नाही.
 क्षारयुक्त जमिनीत वर्षातून दोन वेळा वापरावे. पावसाळ्याच्या अगोदर एकदा वापरल्याने जमिनीचा निचरा सुधारत जातो. जमीन चांगली असेल तरी देखील याचा वापर फायदेशीर ठरतो. फळबाग, भाजीपाला पिकांना वर्षातून चारवेळा वापरल्याने जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब सुधारतो. पिकांना सर्व प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. फळे, भाजीपाल्याचा दर्जा वाढतो.
 शेणखत, गांडूळ खत तसेच प्रेसमडची गुणवत्ता वाढविण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. एक टन शेणखत, गांडूळ खत किंवा प्रेसमडच्या ढिगावर ५ लिटर कार्बन प्लसची फवारणी करून ढीग योग्य पद्धतीने मिसळावा.आठ दिवस हे मिश्रण चांगले मुरवावे. यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.
 जिवामृत, बायोगॅस स्लरीची गुणवत्ता वाढविण्यासाठी याचा वापर करावा. एकरी १००० लिटर जिवामृत किंवा बायोगॅस स्लरी वापरताना त्यामध्ये १ लिटर शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस मिसळावे.
 फळबागांसाठी उपयुक्त
 पीक अवस्थेनुसार वर्षातून चार वेळा एकरी ५ लिटर असे एकूण वर्षभरात २० लिटर वापरावे.
 जमिनीत ओलावा असताना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून २०० लिटर टाकीतून ५ लिटर कार्बन प्लस मिसळून पिकाला सोडावे.
 पाट पाण्यामधून देखील वापरता येते. ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात कार्बन प्लस मिसळून पाट पाण्याबरोबरीने सोडावे.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
434 views05:21
ओपन / कमेंट
2021-10-26 15:45:27 आजचा कृषी सल्ला
गहू
सुधारित वाण
फुले समाधान: बागायती वेळेवर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, तांबेरा रोगप्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता वेळेवर पेरणी ४५-५०, उशिरा पेरणी ४२-४५ क्विं/हे.
तपोवन: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम परंतु ओंब्यांची संख्या जास्त, प्रथिने १२.५%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
त्र्यंबक: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४०-४५ क्विं/हे.
गोदावरी: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
निफाड-३४: बागायती उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम आणि आकर्षक, प्रथिने १३%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, १०५-११० दिवसात कापणीस तयार, उत्पादनक्षमता ३५-४० क्विं/हे.
नेत्रावती: जिरायती आणि मर्यादित सिंचनाखाली पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम व आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता जिरायती १८-२०, मर्यादित सिंचनाखाली २७-३० क्विं/हे.
पंचवटी: जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२%, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, १०५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता १२-१५ क्विं/हे
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
528 views12:45
ओपन / कमेंट
2021-10-25 14:39:57 आजचा कृषी सल्ला
हरभरा
सुधारीत वाण
वाण : कालावधी (दिवस) : उत्पादन (क्विं/हे) : वैशिष्टये
विजय : जिरायत ८५-९०, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम
विशाल : १००-११५ : जिरायत १३, बागायत २० : आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
दिग्विजय : जिरायत ९०-९५, बागायत १०५-११० : जिरायत १४, बागायत २३ : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
विराट : ११०-११५ : जिरायत ११, बागायत १९ : काबुली वाण, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
कृपा : १०५-११० : बागायत १८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव
फुले विक्रांत : १०५-११० : बागायत २२ : मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य
फुले विक्रम : जिरायत ९५-१००, बागायत १०५-११० : जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी १६ : यांत्रिक काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य
पीकेव्हीके-२ : ११०-११५ : बागायत १६-१८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
पीकेव्हीके-४ : १०५-११० : बागायत १२-१५ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
बीडीएनजी-७९७ : १०५-११० : जिरायत १४-१५, बागायत ३०-३२ : मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित
पीकेव्हीके कांचन : १०५-११० : बागायत १८-२० : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
164 views11:39
ओपन / कमेंट
2021-10-22 08:52:49 https://krushikapp.blogspot.com/2021/10/blog-post_81.html
259 views05:52
ओपन / कमेंट
2021-10-21 15:52:34 आजचा कृषी सल्ला
आले
शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर आल्याला फुले येण्यास सुरवात होते. त्यास ‘हुरडे बांड’ असे म्हणतात. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून गड्ड्यांची वाढ होण्यास सुरवात होते. आल्याची फुले तशीच झाडावर ठेवल्यास कोणताही तोटा होत नाही. परंतु, फुले कापून काढल्यास त्यांच्या देठाच्या कापलेल्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. परिणामी कंदकूज रोग लागण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून आले पिकामध्ये फुले काढण्याचे टाळावे.
हळद
दुपारच्या वेळी साधारणतः तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यानंतर हळदीची पाने गोलाकार झालेली दिसतात. हा कोणताही रोग नसून, जास्त उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिकाची नैसर्गिक क्रिया आहे. अशी पाने तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा सरळ होतात. शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. तसेच फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी नव्याने येतच राहतात. परिणामी फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक ठरते. त्याचप्रमाणे फुले काढतेवेळी खोडाला इजा झाल्यास त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. कंदकूज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
386 views12:52
ओपन / कमेंट