Get Mystery Box with random crypto!

राज्यात पावसासाठी पोषक हवामान सौजन्य : अॅग्रोवन दिनांक : 1 | कृषिक अँप Krushik app

राज्यात पावसासाठी पोषक हवामान

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 15-Nov-21

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने ढग जमा होत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. रविवारी (ता. १४) सकाळी निफाड येथे नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १७ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (२०.२), जळगाव ३२.७ (१७.३), कोल्हापूर ३०.९ (२३.३), महाबळेश्‍वर २५.७ (१८), मालेगाव २८.४ (१७.६), नाशिक ३०.१ (१७.६), निफाड ३०.१ (१६.२), सांगली ३१.६ (२३.५), सातारा २९.८ (२३), सोलापूर ३१.८ (२१.६), सांताक्रूझ ३५.५ (२४.४), डहाणू ३०.९ (२२.५), रत्नागिरी ३४.५ (२४.३), औरंगाबाद ३०.३ (१९.१), नांदेड २९ (२२.२), उस्मानाबाद ३०.१ (-), परभणी ३१.१ (२३.३), अकोला ३४.१ (२३), अमरावती ३१.८ (१९.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२२.१), बुलडाणा ३०.४ (२०.४), चंद्रपूर ३०.६ (२४.६), गडचिरोली २९.२ (२३.४), गोंदिया २९.२ (२०.५), नागपूर ३२ (२१.४), वर्धा ३१.२ (२१.४), वाशीम ३२.५ (२०), यवतमाळ ३०.५ (२१.४)
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राचे संकेत : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार होण्याची मालिका सुरू आहे. बंगालच्या उपसागातील प्रणालीबरोबरच अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता.१७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, मध्य अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. सोमवारपर्यंत (ता. १५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) हे कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true