Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 20

2022-01-12 07:58:21 वनामती आणि रामेती संस्थांमधून यापुढे शेतकरी, शेतमजुरांनाही प्रशिक्षण

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 12-Jan-22

मुंबई, दि. 11 – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देतानाच वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) आणि प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी (रामेती) यापुढे महिला, शेतकरी, शेतमजूर यांनाही कृषिविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, हे घटकही कृषि विस्ताराचे काम करीत असल्याने त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करा, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या. प्रामुख्याने या संस्था कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
वनामती आमि रामेती यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, वनामतीचे संचालक उदय पाटील, संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, वनामतीचे अधिकारी, विविध रामेतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, कृषि अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण ही संस्था घेते ही चांगली बाब आहे. मात्र, सध्या अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. कृषि विकासासाठी पूरक घटकांना प्रशिक्षण दिले तर कृषि विषयक योजनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सन 2022 हे वर्ष आपण कृषि क्षेत्रासाठी महिला वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि योजनांचा महिलांना अधिकाधिक लाभ देऊन त्यांना प्रगतीच्या दिशेने आपण नेऊ शकू. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
सध्या राज्य शासनाचा भर हा शेतकऱ्यांना आर्थिक बळकट बनविणे हा आहे. त्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने महिला, शेतकरी, शेतमजूर, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्रशिक्षण दिले तर खऱ्या अर्थाने कृषि विस्ताराची संकल्पना आपण पुढे घेऊन जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.
आजच आपली “कृषी तंत्रज्ञान सप्ताह” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
यावेळी वनामती आणि रामेतीच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. याठिकाणी प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक आहे. यशदाच्या धर्तीवर याठिकाणी काम होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नियोजन तयार करणे अपेक्षित आहे. कृषि क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे. या बदलाची नोंद प्रशिक्षण कार्यक्रम आखताना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाचे धोरण या संस्थांच्या माध्यमातून पुढे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषि सचिव श्री. डवले यांनी, प्रशिक्षण संस्थेने बदलत्या काळाची गरज ओळखून यापुढे कार्यरत राहावे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करुन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य निर्मिती व्हावी असे सांगितले. आयुक्त धीरजकुमार यांनी, याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्यांनी दिलेल्या प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यांची नोंद घेतली जावी, असे सुचविले.
242 views04:58
ओपन / कमेंट
2022-01-11 14:08:18 उसाला तुरा येणे समस्या व ऊपाययोजना
फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3154425938174237&id=1832292603705174
226 views11:08
ओपन / कमेंट
2022-01-11 08:01:53 सस्नेह नमस्कार,
अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
*“उसाला तुरा येणे समस्या व ऊपाययोजना ” या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक- श्री. महेश जाधव
फार्म मॅनेजर, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
*तारीख* - ११/०१/२०२२
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
319 views05:01
ओपन / कमेंट
2022-01-11 08:01:50
296 views05:01
ओपन / कमेंट
2022-01-10 08:38:01 *मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता - IMD*

सौजन्य : सकाळ
दिनांक : 10-Jan-22

मुंबई - उत्तरेकडील पश्‍चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे, यांच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. दरम्यान, सोमवारी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तरेकडील पश्चिम चक्रावात आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यासह पुढील ४,५ दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यामुळे पावसाची शक्यता आहे. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत मध्य पूर्वेकडील राज्यांसह व मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही १० आणि ११ तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारताला थंडीचा आणि पावसाचा दणका : देशातील अनेक भागात सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचं दिसून येत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असून मध्य आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे आर के जेनामनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, उत्तरेकडील पश्चिम चक्रावाताच्या वाढत्या प्रभावामुळे मध्य भारत आणि पूर्वेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. यामध्ये ओडिशा, झारखंड, बंगाल आणि बिहारचा समावेश आहे. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावातामुळे ११ जानेवारीपासून पूर्वेकडील भागात प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.
चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता : जेनामनी यांनी सांगितले की, ओडिशात ११ ते १२ जानेवारी या कालावधीत यलो अलर्ट आहे तर ११ जानेवारीला छत्तीसगढ, झारखंड, ओडिशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेलंगना आणि आंध्रप्रदेशातसुद्धा वीजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. याशिवाय उत्तर भारतात थंडीची लाट पसरेल असा इशारा दिला आहे. तर राजस्थान, हरय���णात दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे.
देशाच्या उत्तर भागातील पावसाबाबत हवामान विभागाने म्हटलं की, पश्चिम हिमालयाच्या भागासह आजुबाजुच्या प्रदेशात, राजस्थान, हरयाणा आणि पंबाजमध्ये १० तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. शनिवारी पावसापासुन थोडा दिलासा मिळाला होता. मात्र पंजाबमध्ये पाऊस सुरुच होता.
*आजच आपली “कृषिक महोत्सव २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
216 views05:38
ओपन / कमेंट
2022-01-04 14:13:52 *“उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्र”*

*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*

https://www.facebook.com/Krushikapp/videos/466626375053645/
192 views11:13
ओपन / कमेंट
2021-12-31 08:57:16 *कृषिक प्रदर्शन २०२२ नोंदणी*
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित “कृषिक प्रदर्शन” २०२२ दि. २० ते २३ जानेवारी २०२२
ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५
नाव नोंदणी करणे आवश्यक
प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी नोंदणी करावी.
मोठ्या गटांच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: ९०११०७६७०९/ ८३८००९३४०८
प्रती व्यक्ती प्रवेश शुल्क रु. ५० (कृषिक अॅपद्वारे २०% सवलतीत रु. ४०)
प्रदर्शन स्थळी SMS दाखवून सवलतीचा लाभ घ्यावा.
* २०, २१, २२ जानेवारी प्रवेश सशुल्क व २३ जानेवारी प्रवेश विनामुल्य आहे, परंतु नोंदणी करणे आवश्यक आहे.*
*त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी.*
play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US
261 views05:57
ओपन / कमेंट
2021-12-31 08:57:12
255 views05:57
ओपन / कमेंट
2021-12-30 13:34:19 *“हरभरा पिकातील किड व रोग व्यवस्थापन”*

*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=652638752593475&id=1832292603705174
126 views10:34
ओपन / कमेंट
2021-12-30 07:58:04 पीक विम्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना कशी द्याल?

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 30-Dec-21

२७ आणि २८ डिसेंबरला राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि अवेळी पाऊस झाला. त्याने प्रभावित झालेल्या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिथे पिकांचे नुकसान झाले, अशा अधिसूचित महसूल मंडळांमधील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असते. याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी पुढील पर्यायांचा वापर करता येईल -
१. क्रॉप इन्शुरन्स ॲप
२. विमा कंपनी टोल फ्री क्रमांक
३. विमा कंपनीचा ई-मेल
४. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय
५. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय
६. ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा
२७ व २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात काही ठिकाणी गारपीट, अवेळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तूर आणि कापूस पिकांचे नुकसान झाले. तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचेही नुकसान झाले. त्याचबरोबर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांच्या नुकसानीच्या बातम्या समोर येत आहेत. - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
आजच आपली “कृषिक प्रदर्शन २०२२” साठी नाव नोंदणी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
242 views04:58
ओपन / कमेंट