Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 18

2022-01-20 15:52:00 आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
अंबिया बहार सिंचन व्यवस्थापन अंबिया बहारासाठी ताणावर असलेल्या बागेमध्ये वखरणी करून घ्यावी. सिंचनासाठीचे आळे मोडलेले असल्यास दुरुस्ती करून ओलीत करावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे ७ ते ३०, ४४ ते ७२ व ८२ ते १०२ लिटर पाणी प्रति दिवस जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे. ठिबक सिंचन नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने ८-१० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. शेतातील गवत, तणस, कुटार असल्यास आळ्यामध्ये ५ ते १० सें. मी. थर देऊन आच्छादन करावे.
आंबा
आंब्यास मोहोर येऊन फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती आकाराची असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या (१३-०-४५) तीनवेळा फवारण्या कराव्यात. यामुळे फळगळ कमी होते, फळांचे वजन व आकार वाढून फळांची प्रत वाढते. तसेच साखर आम्लता प्रमाण सुयोग्य होऊन फळाला बाहेरून व आतील गराला आर्कषक केशरी रंग येतो. फळाचा टिकाऊपणा वाढून साक्याचे प्रमाण कमी होते
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
315 views12:52
ओपन / कमेंट
2022-01-20 09:19:50 https://krushikapp.blogspot.com/2022/01/blog-post_19.html
344 views06:19
ओपन / कमेंट
2022-01-19 15:47:44

189 views12:47
ओपन / कमेंट
2022-01-19 13:49:21 *रब्बी (उन्हाळी ) कांदा खत व्यवस्थापन”*
*फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/516247282981807/
238 views10:49
ओपन / कमेंट
2022-01-19 07:06:47
322 views04:06
ओपन / कमेंट
2022-01-19 07:06:39 सस्नेह नमस्कार,
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती, कृषिक अॅप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*“रब्बी (उन्हाळी ) कांदा खत व्यवस्थापन” परिसंवाद*
फेसबुक लाइव्ह Facebook Live च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
https://www.facebook.com/officialiclfertilizersindia
मार्गदर्शक :
श्री. संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
तारीख - १९/०१/२०२२
वार- बुधवार
वेळ - दुपारी ४ ते ५

*नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक*
https://forms.gle/VzWzAJuqEPcK2Pez8

विनित,
कृषिक अॅप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
ICL Fertilizers India
#krushikapp_Facebook_Live
#krushikapp
315 views04:06
ओपन / कमेंट
2022-01-18 08:03:37 शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 18-Jan-22

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्रात सध्या रब्बी ऊन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत. ऊस, फळबागा, भाजीपाला गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढत आहे. त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केले आहे. तसेच याबाबत कृषी विभागानेही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे खत पुरवठादारांनी त्यांच्याकडील जुना खत साठा त्याच दराने विक्री करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, याबाबत कृषीमंत्री श्री. भुसे यांनी नुकतीच केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मंडाविया यांना पत्र लिहून खत विक्री दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती.
राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर, खत कंपनीचे नाव खालीलप्रमाणे (कंसात नमूद दर दि. १३ जानेवारी,२०२२ रोजीचे)
१०:२६:२६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४० (१६४०). वाढ: १७० रुपये
१०:२६:२६ – चंबल फर्टीलाईझर्स लि.-१४६५ (१५००), वाढ: ३५ रुपये
१२:३२:१६- स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज -१४४० (१६४०) वाढ: १५० रुपये
१६:२०:०:१३ – कोरोमंडळ इंट. लि.
१०७५ (१२५०) वाढ: १७५ रुपये
अमोनियम सल्फेट: गुजरात स्टेट फर्टी. कंपनी- ८७५ (१०००) वाढ: १२५
१५:१५:१५:०९ – कोरोमंडळ इंट. लि.
११८० (१३७५ ) वाढ:१९५.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
241 views05:03
ओपन / कमेंट
2022-01-17 15:05:31 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन ते तीनवेळा जनावरांना पाणी पाजतात. त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही. तसेच अनेकवेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते. यावर उपाय म्हणजे जनावराला तहान लागेल तेव्हा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे मुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पहावयास मिळतो. ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही, ते पशुपालक बादलीला फ्लोट वॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल.
शेळी पालन :-
हिवाळ्यात लहान करडांच्या मरतुकीचे प्रमाण सर्वात जास्त असते. आपण त्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून हिवाळ्यात करडांचा निवारा उबदार असावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वछ आणि अमोनियामुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसदाह निर्माण करून खोकला, श्‍वसनसंस्थेचे विकार व यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होऊ शकतो. करडांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २-३ दिवसांनी बदलावा. थंडी जास्त असेल त्यावेळी छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. यामुळे करडांचे सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही, याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करंडापासून २० इंचांपेक्षा अधिक उंचीवर छताला टांगावा. विजेच्या दिव्याला संरक्षक पिंजरा असावा. करडांना हिवाळ्यात स्वछ आणि कोमट पाणी पिण्यासाठी द्यावे. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (४०-४५ अंश सेल्सिअस तापमान) ४-५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या कपड्यात किंवा गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे आणि जमल्यास कोमट दूध पाजावे. नवजात करडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चिक पाजावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २-३ टक्के कमी करता येते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
347 views12:05
ओपन / कमेंट
2022-01-17 07:27:28 खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 17-Jan-22

मुंबई, दिनांक १६ : रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहिले आहे.
मंत्री श्री. भुसे आपल्या पत्रात म्हणतात, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिक प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.
याप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री श्री. भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
खत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रति ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे : (कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी, २०२२ रोजीचे)
१०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.
१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये.
१६:२०:०:१३ – १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये
अमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५ रुपये
१५:१५:१५:०९ – ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ: १९५ रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
406 views04:27
ओपन / कमेंट
2022-01-15 07:47:30 पीएम किसान योजनेविषयी महत्वाची अपडेट, 'या' नियमात केला बदल

सौजन्य : पुढारी
दिनांक : 15-Jan-22

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा (PM KISAN) २ हजार रुपयांचा दहावा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०,९०० कोटी कोटी रुपये वर्ग करण्यात आले. आता मोदी सरकारने पीएम किसान योजनेत एक बदल केला आहे.
आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेटस स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसोन पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही. आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेटस पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेटस जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.
मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी ‘पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाईटवर करता येते.
PM Kisan या योजनेअंतर्गत जारी केलेली एकूण रक्कम सुमारे १.८ लाख कोटींवर पोहोचली आहे. PM-KISAN योजनेची घोषणा फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी होता.
पीएम किसान पोर्टलवर तुमचे स्टेटस कसे पहाल…
- pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा
- उजव्या बाजूला तुम्हाला Farmers Corner दिसेल
- Farmers Corner वर क्लिक करा
- आता पर्यायातून, Beneficiary Status वर क्लिक करा
- तुमचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते तपशील द्यावा लागेल
- तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे नाव यादीत असल्यास ते तुम्हाला सापडेल
PM KISAN वर तुमचे नाव मोबाईल ॲपद्वारे कसे तपासाल… : मोबाइल अॅपद्वारे तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तपशील पाहता येईल.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true
401 views04:47
ओपन / कमेंट