Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला संत्रा-मोसंबी-लिंबू अंबिया बहार सिंचन व्यवस् | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
अंबिया बहार सिंचन व्यवस्थापन अंबिया बहारासाठी ताणावर असलेल्या बागेमध्ये वखरणी करून घ्यावी. सिंचनासाठीचे आळे मोडलेले असल्यास दुरुस्ती करून ओलीत करावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे ७ ते ३०, ४४ ते ७२ व ८२ ते १०२ लिटर पाणी प्रति दिवस जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे. ठिबक सिंचन नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने ८-१० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. शेतातील गवत, तणस, कुटार असल्यास आळ्यामध्ये ५ ते १० सें. मी. थर देऊन आच्छादन करावे.
आंबा
आंब्यास मोहोर येऊन फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती आकाराची असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या (१३-०-४५) तीनवेळा फवारण्या कराव्यात. यामुळे फळगळ कमी होते, फळांचे वजन व आकार वाढून फळांची प्रत वाढते. तसेच साखर आम्लता प्रमाण सुयोग्य होऊन फळाला बाहेरून व आतील गराला आर्कषक केशरी रंग येतो. फळाचा टिकाऊपणा वाढून साक्याचे प्रमाण कमी होते
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true