Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 15

2022-04-16 14:23:09 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
सूक्ष्म अन्नद्रव्ये
भुईमूग पिकामध्ये प्रामुख्याने लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते.
लोह - ज्या जमिनीत लोह कमी आहे, अशा जमिनीत पेरणीवेळी ८ किलो प्रति एकरी फेरस सल्फेट द्यावे. उभ्या पिकामध्ये लोहाची कमतरता दिसून आल्यास, १ किलो प्रति एकर प्रमाणे फेरस सल्फेटची फवारणी करावी.
जस्त - जस्त कमी असलेल्या जमिनीत ८ किलो प्रति एकरी झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे. उभ्या पिकामध्ये जस्ताची कमतरता आढळल्यास, १ किलो प्रति एकर प्रमाणे झिंक सल्फेट फवारणीद्वारे द्यावे.
बोरॉन – २ किलो बोरॉन प्रति एकरी पेरणीवेळी द्यावे किंवा उभ्या पिकामध्ये ०.१ टक्का द्रावणाची (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
सुर्यफुल
पाणी व्यवस्थापन
सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पिक असून ३० ते ३५ सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. सूर्यफूल पिकाला कळी धरणे (३० ते ४० दिवस), फुल उमलणे (५५ ते ६५ दिवस) आणि दाणे भरणे (६५ ते ७५ दिवस) या पीक वाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार काळ्या व भारी जमिनीमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतराने, तर मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जर पाणी उपलब्ध नसेल व केवळ एका पाळीकरीता पाणी उपलब्ध असेल, तर पीक फुलोरा या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, फुलकळीची अवस्था व पीक फुलोरा या संवेदनशील अवस्थेमध्ये असताना पाणी द्यावे. चार पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, रोपावस्था, फुलकळी अवस्था, पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
523 views11:23
ओपन / कमेंट
2022-04-16 08:31:04 मान्सूनमध्ये सरासरी पावसात घट होणार म्हणजे नेमकं काय?

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 16-Apr-22
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्ट (LRF) मध्ये या वर्षी देशात सामान्य मान्सून असणार आहे. सलग चौथ्या वर्षी भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभाग एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांत दीर्घ पल्ल्याचा अंदाज जाहीर करते. भारतीय हवामान विभागाने मोसमी पावसाचा दीर्घकालीन सरासरी अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार आहे.
भारतात एका वर्षात सरासरी किती पाऊस पडतो?
१९६१ ते २०१० च्या आकडेवारीनुसार, भारतात एका वर्षात सुमारे ११७६.९ मिमी पावसाची नोंद होते. यापैकी, सुमारे ७४.८ टक्के, किंवा ८८०.६ मिमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सूनमध्ये होतो. उर्वरित पावसाचे वितरण हिवाळ्यात (जानेवारी-फेब्रुवारी) ३.४ टक्के, ११.२ टक्के पूर्व-मान्सून हंगामात (मार्च-मे), आणि १०.५ टक्के मान्सून नंतरच्या हंगामात (ऑक्टोबर-डिसेंबर) असे होते.
मान्सूनमधील दीर्घ कालावधीन सरासरी कधी सुधारीत केली जाते?
दशकातून एकदा वार्षिक आणि मोसमी पावसाचे प्रमाण पडताळून पाहण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परंपरा आहे. मान्सून हंगामातील एलपीए पर्जन्यमान हे ५० वर्षांच्या कालावधीत केलेल्या गणनेचे बेसलाइन डेटा म्हणून काम करते. आवश्यक असल्यास, पर्जन्यमापकांच्या नेटवर्कमधून प्राप्त झालेल्या पर्जन्यमानाच्या माहितीमधून आढळलेल्या कोणत्याही बदलांच्या आधारे एलपीए सुधारित केले जाते.
२००२ मध्ये, भारतीय हवामान विभागने ५२३ जिल्ह्यांमध्ये १,९६३ पर्जन्यमापक बसवले होते. २०२० पर्यंत, ७०३ जिल्ह्यांमध्ये बसवलेल्या ४,१३२ पर्जन्यमापकांवरून पावसाची आकडेवारी गोळा केली जात होती. २००५ आणि २०१० दरम्यान भारताची पावसाची दीर्घकालीन सरासरी ८९.०४ सेमी नोंदवण्यात आली. २०११ ते २०१५ दरम्यान, हवामान विभागाने ती ८८.७५ सेमी पर्यंत सुधारित केली. त्यानंतर २०१८ ते २०२१ दरम्यान ती ८८.०६ सेमी करण्यात आली आणि येत्या मान्सूनपासून पावसाची सुधारित दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी असेल.
पावसाच्या सरासरीत घट का केली गेली?
“वरील कपात अखिल भारतीय पर्जन्यमानाच्या कोरड्या आणि ओल्या कालावधीच्या नैसर्गिक बहु-दशकीय परिवर्तनशीलतेचा भाग आहे. सध्या नैऋत्य मान्सून कोरड्या कालावधीतून जात आहे, जो १९७१ ते ८० च्या दशकापासून सुरू झाला होता. २०११ ते २०२० या दशकातील अखिल भारतीय नैऋत्य मोसमी पावसाची दशकीय सरासरी दीर्घकालीन सरासरीपेक्षा ३.८३ टक्के कमी आहे. पुढील दशक म्हणजे २०२१ ते २०३० तटस्थपणे जाण्याची अपेक्षा आहे आणि नैऋत्य मान्सून २०३१ ते २०४० च्या दशकापासून ओल्या युगात प्रवेश करेल,” असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक, मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
511 views05:31
ओपन / कमेंट
2022-04-15 08:02:31 मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 15-Apr-22
पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने ढग जमा होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे असल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. चंद्रपूर येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात ढगांची दाटी झाली आहे. केरळ, कर्नाटक किनारपट्टी, लक्षद्वीप बेटांसह परिसरावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.९, नगर ४२.६, धुळे ४२.०, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३१.७, नाशिक ३९.२, निफाड ३९.४, सांगली ३८.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.०, सांताक्रूझ ३५.६, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३३.१, औरंगाबाद ४०.२, परभणी ४०.५, अकोला ४२.३, अमरावती ४२.८, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४१.६, वर्धा ४२.८, वाशीम ४१.०, यवतमाळ ४१.५
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
536 views05:02
ओपन / कमेंट
2022-04-14 15:28:27 आजचा कृषी सल्ला
आले
जमिनीची निवड
आले हे कंदवर्गीय पीक असल्याने जमीन भुसभुसीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम प्रतीची, कसदार जमीन निवडावी. नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढीच्या दृष्टीने योग्य असते. कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीतही आल्याचे चांगले उत्पादन मिळते. या पिकाचे कंद जमिनीमध्ये एक फूट खोलीपर्यंत वाढतात, त्यामुळे कमीत कमी एक फूट खोली असलेली जमीन निवडावी. हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीचा सामू ६.५ ते ७ या दरम्यान असावा. लागवडीसाठी आम्लधर्मी, क्षारयुक्त, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात. चुनखडीयुक्त जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते. आल्याच्या लागवडीसाठी जमीन निवडत असताना कंदवर्गीय पिके घेतलेली जमीन (उदा. हळद, बटाटा, रताळे इ.) निवडू नये, त्यामुळे कंदकूजचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. शक्यतो द्विदलवर्गीय पिकांचा बेवड या पिकासाठी उत्तम समजला जातो.
हळद
जमिनीची निवड
हळद पिकाची यशस्विता प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून असते. हे पीक कोकणामध्ये अगदी जांभ्या जमिनीमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीमध्ये घेतले जाते. जमीन ही उत्तम निचरा असणारी निवडावी. कारण हे पीक जमिनीमध्ये आठ ते नऊ महिने राहते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंदकूज होण्याचा धोका वाढतो. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके (ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात. अगदी माळरानाच्या जमिनीत सुद्धा या पिकाची लागवड करता येते; परंतु या जमिनीमध्ये सरासरी उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने सुपीकता वाढवावी, सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर करावा. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लागवड केल्यास पिकावर कायम पिळसर छटा राहते, कारण अन्नद्रव्यांचे ग्रहण या जमिनींमध्ये योग्यप्रकारे होत नाही. हळदीच्या पिकासाठी बेवड म्हणून कंदवर्गीय पिके जसे आले, बटाटा किंवा हळदीवर हळद घेणे शक्यतो टाळावे. हळदीसाठी द्विदल पिके जशी घेवडा, भुईमूग, हरभरा यांसारख्या पिकांचा बेवड चांगला असतो.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
526 views12:28
ओपन / कमेंट
2022-04-14 12:34:44 देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; मॉन्सून कालावधीत ९९ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 14-Apr-22
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरूवारी (ता. १४) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती कायम राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती सर्वसाधारण पातळीवर येण्याचे होण्याचे संकेत आहेत.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १९७१ ते २०२० कालावधीतील सुधारीत दीर्घकालीन सरासरी जाहीर केली आहे. त्यानुसार देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा ९९ टक्के (उणे १ टक्का) पाऊस पडला होता.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
491 views09:34
ओपन / कमेंट
2022-04-14 09:30:12
498 views06:30
ओपन / कमेंट
2022-04-14 09:30:02 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“कलिंगड-खरबुज पिकाचे पोषण प्रबंधन” फेसबुक लाइव्ह Facebook Live च्या माध्यमातून
लाईव्ह ऑन
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - १५/०४/२०२२
*वार*- शुक्रवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक
https://forms.gle/VzWzAJuqEPcK2Pez8
*विनित**
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
ICL Fertilizers India
495 views06:30
ओपन / कमेंट
2022-04-13 15:20:37 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
पिनवर्म (टुटा अबसोलुटा)
डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होतो. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे ४०-१०० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकाच्या पाने, फळे आणि खोडावर आढळून येतो. किडीची अळी प्रथम पानांच्या दोन्ही पापुद्रांमधील हरितद्रव्य खाते. पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरट पापुद्रे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात व गळून पडतात. नंतर अळी कोवळे शेंडे, खोड व फळे पोखरून खायला सुरवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या फळांच्या सालीमध्ये अळी छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होते.
एकात्मिक व्यवस्थापन
पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रिड ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवावीत.
पानांवर किडीचा प्रादुर्भाव दिसताच, ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थांसह गोळा करून नष्ट करावीत.
शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
शेतात परोपजीवी मित्रकिटकांचे (ट्रायकोग्रामा अॅची, नेसिडोकोरस, नेबीस, मॅक्रोलोफस, नेक्रीमस) संवर्धन करावे.
बॅसिलस/मेटारायझीअम/बिव्हेरिया या जैविक कीडनाशकांची २ ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
किडीची कोषावस्था जमिनीवर आणि मल्चिंग पेपरवर आढळून येते. यासाठी जमिनीवर, मल्चिंग पेपरवर मेटारायझीअमची फवारणी करावी.
कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्यांचे प्रमाण जास्त आढळल्यास, झाडाच्या बुंध्याजवळ रिंग/स्पॉट पद्धतीने फिप्रोनिल १ मि.लि./ क्‍लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे आळवणी करावी.
आवश्यकतेनुसार, रासायनिक कीटकनाशक क्‍लोरअँट्रॅनिलीप्रोल ०.३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब ०.७५ मि.लि. किंवा स्पिनोसॅड ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
537 views12:20
ओपन / कमेंट
2022-04-12 15:57:36 आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
*खत व्यवस्थापन*
एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटसोबत २५ ग्रॅम झिंक सल्फेट, २५ ग्रॅम फेरस सल्फेट आणि २५ ग्रॅम मॅंगेनिज सल्फेट द्यावे. दोन वर्षांच्या झाडास दुप्पट, तीन वर्षांच्या झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडासाठी चौपट खत मात्रा द्यावी. प्रत्येक झाडाला वरील रासायनिक खते २० ते २५ किलो शेणखतात मिसळून द्यावीत. बांगडी पद्धतीने खते द्यावीत. ती देताना माती ओलसर असावी.
*डाळिंब*
आंबिया बहर (जानेवारी-फेब्रुवारी बहर नियमन)
(बागेची अवस्था : फळधारणा आणि फळाची वाढ)
बागेची मशागत
कोवळी फूट अधिक असेल तर कोवळे शेंडे खुडावे.
फळधारक फांद्यांना आणि झाडांना बांधून आधार द्यावा.
फळ लिंबू आकाराचे किंवा १०० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यावर डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी फळे संरक्षक पिशवीने किंवा पूर्ण ओळ क्रॉप कव्हरने झाकावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
549 views12:57
ओपन / कमेंट
2022-04-12 08:22:53 दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 12-Apr-22
पुणे : कमाल तापमानाचा पारा ४१ अंशांपार गेल्याने अंगाची लाही लाही होत असतानाच, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाने दणका दिला आहे. आज (ता. १२) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा कायम आहे. अकोला येथे सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, ब्रह्मपुरी वर्धा, वाशीम येथेही तापमान ४२ अंशांवर होतो. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३२ ते ४१ अंशांच्या आसपास होते. उष्णतेची लाट ओसरली असून, उन्हाची ताप कायम राहणार आहे.उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुरळक गारपीट (Hail) झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ येथे २० मिलिमीटर, हातकणंगले येथे १० मिलिमीटर, सांगलीतील पलूस येथे २० तर कसबे डिग्रज येथे १० मिलिमीटर आणि सोलापूरातील मोहोळ येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, धुळे ४१.०, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर ३१.०, मालेगाव ४२.८, नाशिक ३७.१, निफाड ३६.१, सांगली ३६.१, सातारा ३७.९, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३५.१, रत्नागिरी ३२.७, औरंगाबाद ४१.०, नांदेड ४०.६, परभणी ४०.५, अकोला ४३.९, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४२.१, गोंदिया ४१.२, नागपूर ४१.२, वर्धा ४२.२, वाशीम ४२.५
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
519 views05:22
ओपन / कमेंट