Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2022-04-30 14:52:11 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
टंचाई काळात पाणी उपलब्धता नसल्याने जनावरे ओढे, नाले, तलावातील साठलेले व खराब पाणी पितात. अनेकवेळा गढूळ अस्वच्छ पाण्याचा पुरवठा गोठ्यांना होत असतो. अस्वच्छ साठलेले पाणी असल्यास त्यातून जनावरांना विविध रोगाची लागण होऊ शकते. पाणी साठविण्याचे हौद अनेक दिवस स्वच्छ केले जात नाहीत. त्यात शेवाळ वाढून त्यातून विविध रोगजंतू पसरविले जाऊ शकतात.
स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही. तसेच पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचाही थोडा पुरवठा होईल. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवणे सारखा सोपा उपाय करू शकतो. बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेटही उपलब्ध आहेत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
238 views11:52
ओपन / कमेंट
2022-04-29 15:58:25 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) ७५ ग्रॅम अधिक मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सुर्यफुल
पक्ष्यांपासून संरक्षण
एकूण शिवाराच्या थोड्याशा भागात न घेता सलग मोठ्या पट्ट्यामध्ये लागवड करावी.
पीक पक्वतेच्या काळामध्ये सकाळ व संध्याकाळच्या वेळेस पिकांची राखण करावी. राखण करतेवळी फटाके फोडून आवाज काढल्यास फायदा होतो.
पिकाच्या अवतीभोवती चमकणाऱ्या अग्निरेखा पिळून बांधल्यास त्यातून निघणाऱ्या प्रकाश किरणांमुळे पक्षी पिकाजवळ येत नाहीत.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
224 viewsedited  12:58
ओपन / कमेंट
2022-04-29 07:49:31 अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान देणार

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 29-Apr-22
मुंबई, दि. 28 : गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी वाहतूक अनुदान व साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी दर 5 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.
तसेच ज्या सहकारी व खाजगी (शासन निर्णय 21 ऑक्टोबर 2011 ला एकवेळचा अपवाद म्हणून) साखर कारखान्यांच्या (इथेनॉलसाठी बी हेवी मोलॅसेस/ ऊसाचा रस वर्ग केलेला विचारात घेतल्यानंतर) प्रमाणित केलेल्या साखर उताऱ्यामध्ये 0.5 (अर्धा) टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घट आल्यास व अंतिम साखर उतारा 10 टक्के पेक्षा कमी आल्यास सरसकट सर्व कारखान्यांना प्रति टन 200 रुपये दराने 1 मे 2022 नंतर गाळप होणाऱ्या सर्व ऊसासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
160 views04:49
ओपन / कमेंट
2022-04-28 14:15:15 *ऊस पिकासाठी अॅक्टोसोल चा वापर व फायदे फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://fb.watch/cG9Ij-YP63/
180 views11:15
ओपन / कमेंट
2022-04-28 07:19:46 उद्यानपंडीत पुरस्‍कार – 25 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 25 हजार रुपये)
वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार – सर्वसाधारण गट – 57 पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट – 18 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 11 हजार रुपये)
राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात – 9 पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्‍कारार्थी – प्रत्‍येकी प्रथम क्रमांक – 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्‍न पुरस्‍कार – 7 पुरस्‍कारार्थी
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
269 views04:19
ओपन / कमेंट
2022-04-28 07:19:44 *कृषि पुरस्कारांनी १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान; २ मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा* – *कृषिमंत्��ी दादाजी भुसे*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 28-Apr-22

मुंबई, दि. 27 : राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वा. तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह, सन्‍मानपत्र देवून सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
पुरस्कारांच्या संख्येत सन 2020 पासून वाढ : सन 2020 पासून विविध कृषि पुरस्‍कार मार्गदर्शक सूचनांमध्‍ये बदल करण्‍यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या 10 वरुन 8 करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारांची संख्‍या 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्‍कार 9 वरुन 8 करण्‍यात आली आहे. सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्‍कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्‍पर्धा रब्‍बीच्या तालुका, जिल्‍हा ,विभाग व राज्‍य पातळ्यांवरील बक्षीसांच्‍या रक्‍कमेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
198 पुरस्कारार्थ्यांचा ‘या‘ पुरस्कारांनी होणार सन्मान
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार – 4 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 75 हजार रुपये)
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार -28 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)
जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार – 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – 23 पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार – 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 30 हजार रुपये)
245 views04:19
ओपन / कमेंट
2022-04-27 15:39:27 आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात, त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडणार नाही, याची काळजी घ्यावी.
कांदा-लसूण
दोन पाखी साठवणगृह
या साठवणगृहाची रचना पूर्व-पश्चिम करावी. साठवणगृहाची लांबी ३०-५० फूट असावी.
साठवणगृह दोन पाखी असावे. एका पाखीची रुंदी ४ फूट तर साठवणगृहाची रुंदी १२ फूट असावी. दोन पाख्यांच्यामध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा ठेवावी. जमिनीपासून तळाची उंची २ फूट ठेवावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवाव्यात. दोन पट्ट्यांमध्ये लहान कांदे पडणार नाहीत इतकी १-१.५ इंच मोकळी जागा ठेवावी.
साठवणगृहाचे छप्पर ॲसबेसटॉसचे असावे. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या ३ फूट पुढे आलेले असावेत. छताचा कोन २२ अंश इतका असावा.
साठवणगृहाची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट तर बाजूची उंची ६ फूट असावी. कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कप्प्याला झडपा असाव्यात.
पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर किमान दोन फूटाची मोकळी जागा ठेवावी.
साठवणगृहाच्या मागील बाजूवरील त्रिकोणी भागातून व दरवाजामधून पाऊस आत जावू नये, यासाठी पत्र्याचा भाग पुढील बाजूने वाढवावा किंवा त्याजागी हिरव्या शेडनेटची जाळी बसवावी.
तपशील दोन पाखी साठवणगृह
साठवणक्षमता (टन) २५ ५०
चाळ उभारणीची दिशा पूर्व-पश्चिम पूर्व-पश्चिम
लांबीxरुंदीxबाजूची उंचीxमधील उंची (फूट) ४०x१२x६x१० ८०x१२x६x१०
मधील मोकळ्या जागेची रुंदी (फूट) ४ ४
तळाची जमिनीपासूनची उंची (फूट) २ २
साठवणक्षमता (घनमीटर) ४२ ८४
चाळीचे अपेक्षित आयुष्य २० २०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
12 views12:39
ओपन / कमेंट
2022-04-27 09:18:36 राज्यात आज, उद्या पाऊस ; शुक्रवारपासून पुन्हा उष्णतेची लाट

सौजन्य : लोकसत्ता
दिनांक : 27-Apr-22
पुणे : राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस मात्र २९ एप्रिल ते २ मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रावात सक्रिय असल्याने राज्यातील काही भागांत दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागांत २७ आणि २८ एप्रिल रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार आहे.
आगामी पाच दिवसांत २९ एप्रिल ते २ मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या २४ तासांत कोकणात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना व गारांसह पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
ब्रह्मपुरीचा पारा ४४.७ अंशांवर : राज्यात मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४४.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेल़े सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आल़े
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
180 views06:18
ओपन / कमेंट
2022-04-26 15:38:41 आजचा कृषी सल्ला
आंबा
आंबा झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्‍यता असते. यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भाग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने अळीला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झालेल्या ठिकाणी त्वरित बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाहीत, याची नेहमी काळजी घ्यावी. नियमित बागेची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. त्यामुळे तेथून किडीचा संभाव्य प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
संत्रा-मोसंबी-लिंबू
आंबिया बहरातील फळगळीवर उपाययोजना
नियमित ठिबक सिंचन वेळापत्रकाप्रमाणे सध्या एप्रिल महिन्यात १०० ते १२० लिटर पाणी/ दिवस/ झाड पाणी द्यावे. पुढे मे महिन्यात १६० ते १८० लिटर पाणी/ दिवस/ झाड ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
आळे पद्धतीने पाणी देत असल्यास ३ ते ४ दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने मातीच्या मगदुराप्रमाणे पाणी (कमी प्रमाणात पण जास्तवेळा विभागून) द्यावे.
प्लॅस्‍टिक किंवा गवताने आळ्यामध्ये आच्छादन करावे.
फळगळीच्या नियंत्रणासाठी २,४-डी (१५ पीपीएम) १.५ ग्रॅम अधिक युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा पुढे १५ दिवसाच्या अंतराने जीए-३ (१५ पीपीएम) १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट २ किलो प्रति १२० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
187 views12:38
ओपन / कमेंट
2022-04-26 09:11:24 मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

सौजन्य : ॲग्रोवन
दिनांक : 26-Apr-22
पुणे : राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. आज (ता. २६) जळगाव येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील ढगाळ हवामान निवळू लागले आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी तापमान ४२ अंशांपेक्षा कमी झाले आहे. कोकणात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान, मध्य महाराष्ट्रात २५ ते ४४ अंश, मराठवाड्यात ३७ ते ४२ अंश आणि विदर्भात ३९ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे.
सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, धुळे ४२.८, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३३.५, महाबळेश्वर २५.८, नाशिक ३८.९, निफाड ३८.१, सांगली ३६.२, सातारा ३७.५, सोलापूर ४०.०, सांताक्रूझ ३५.५, डहाणू ३६.८, रत्नागिरी ३४.५, औरंगाबाद ३७.२, नांदेड ४१.६, परभणी ३८.२, अकोला ४२.०, अमरावती ४२.०, बुलडाणा ३९.३, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ४२.२, नागपूर ४२.२, वर्धा ४२.५, यवतमाळ ४१.०
मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (येलो अल���्ट) :
मध्य महाराष्ट्र : सांगली, सोलापूर
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
275 views06:11
ओपन / कमेंट