Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला टोमॅटो लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात, त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडणार नाही, याची काळजी घ्यावी.
कांदा-लसूण
दोन पाखी साठवणगृह
या साठवणगृहाची रचना पूर्व-पश्चिम करावी. साठवणगृहाची लांबी ३०-५० फूट असावी.
साठवणगृह दोन पाखी असावे. एका पाखीची रुंदी ४ फूट तर साठवणगृहाची रुंदी १२ फूट असावी. दोन पाख्यांच्यामध्ये वावरण्यासाठी ४ फूट मोकळी जागा ठेवावी. जमिनीपासून तळाची उंची २ फूट ठेवावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवाव्यात. दोन पट्ट्यांमध्ये लहान कांदे पडणार नाहीत इतकी १-१.५ इंच मोकळी जागा ठेवावी.
साठवणगृहाचे छप्पर ॲसबेसटॉसचे असावे. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या ३ फूट पुढे आलेले असावेत. छताचा कोन २२ अंश इतका असावा.
साठवणगृहाची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून ८ फूट तर बाजूची उंची ६ फूट असावी. कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कप्प्याला झडपा असाव्यात.
पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर किमान दोन फूटाची मोकळी जागा ठेवावी.
साठवणगृहाच्या मागील बाजूवरील त्रिकोणी भागातून व दरवाजामधून पाऊस आत जावू नये, यासाठी पत्र्याचा भाग पुढील बाजूने वाढवावा किंवा त्याजागी हिरव्या शेडनेटची जाळी बसवावी.
तपशील दोन पाखी साठवणगृह
साठवणक्षमता (टन) २५ ५०
चाळ उभारणीची दिशा पूर्व-पश्चिम पूर्व-पश्चिम
लांबीxरुंदीxबाजूची उंचीxमधील उंची (फूट) ४०x१२x६x१० ८०x१२x६x१०
मधील मोकळ्या जागेची रुंदी (फूट) ४ ४
तळाची जमिनीपासूनची उंची (फूट) २ २
साठवणक्षमता (घनमीटर) ४२ ८४
चाळीचे अपेक्षित आयुष्य २० २०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en