Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-05-19 15:38:45 आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमूग काढणीमध्ये दोन महत्वाची कामे असतात; भुईमुगाचे झाड उपटणे आणि उपटलेल्या वेलीच्या शेंगा तोडणे. भुईमूग काढणी करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा किंवा वाफसा स्थिती असल्यास वेली शेंगासह उपटून काढणी करता येते. मात्र, जमीन कडक झाली असल्यास बैलचलित किंवा ट्रॅक्‍टरचलित अवजारांचा वापर करता येतो. त्यामध्ये पास किंवा भुईमूग काढणी यंत्र उपलब्ध आहेत. शेंगा तोडण्यासाठी विविध वाणाप्रमाणे, ठिकठिकाणी विविध प्रकार अवलंबविले जातात. उपट्या वाणांमध्ये उपटलेले वेल हिरवे असतानाच शेंगा हाताने तोडून किंवा पासेवर वेल आपटून वेलीपासून वेगळ्या केल्या जातात. शेंगा वेगळ्या करण्यासाठी स्ट्रिपर्स उपलब्ध आहेत. ते मजुरांकरवी किंवा यंत्राद्वारे चालतात. पसरणाऱ्या वाणांमध्ये काढणी केलेले वेल वाळवून त्यापासून काठीने ठोकून शेंगा वेगळ्या केल्या जातात. उफणणी यंत्राने शेंगा वेगळ्या केल्या जातात.
भुईमूग काढणी करतेवेळी शेंगामध्ये ४० ते ५० टक्के ओलावा असतो. काढणी केलेल्या शेंगा वाळवून त्यातील ओलावा १० टक्क्यांपर्यंत कमी करावा. यामुळे शेंगा साठवणुकीमध्ये सुरक्षित राहतात. उन्हात शेंगा वाळविणे ही चांगली व सोपी पद्धत आहे. शेंगामध्ये बुरशी वाढू नये, म्हणून शेंगा लवकर वाळवाव्यात. मात्र उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा बियाण्यासाठी घेतल्या असतील, तर त्या उन्हात वाळवू नयेत. अन्यथा बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
सुर्यफुल
सूर्यफूल बियांत साधारणतः ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण असते. तेलामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘ई’ असते. तेलामध्ये ६८ टक्‍के लिनोलिक आम्ल, तर २० ते ४० टक्के ओलिक आम्ल असते. तेल काढण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी बियांमधील फोलपट काढून टाकणारे यंत्र म्हैसूरच्या अन्न तंत्रविज्ञान संस्थेने तयार केले आहे.
उप उत्पादन म्हणून मिळणाऱ्या सूर्यफूल पेंडीचा उपयोग मानवी खाद्य मिश्रणासाठी करता येतो. तसेच पेंडीचे पीठ तयार करता येऊ शकते. पेंडीमध्ये ४० टक्के प्रथिने आहारदृष्ट्या इतर प्रथिनांच्या तोडीची आहेत. सूर्यफूल पेंडीत कोणतेही अपायकारक घटक नाहीत. म्हणून याचा वापर मुख्यत्वे गाय, शेळी, मेंढी इत्यादी रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करतात.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
187 views12:38
ओपन / कमेंट
2022-05-19 13:42:29 *“आले/ हळद खत व्यवस्थापन ” फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=379404710898186&id=1832292603705174
202 views10:42
ओपन / कमेंट
2022-05-19 07:32:14 मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटसमूह व्यापला

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 19-May-22
पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा वेळेआधी दाखल झाला आहे. सोमवारी (ता. १६) अंदमानात आगमन झालेल्या मॉन्सूनची पुढील वाटचाल वेगाने सुरू आहे. वाऱ्यांनी बुधवारी (ता. १८) संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे.
नैॡत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे वाढलेले प्रवाह, ढगांचे आच्छादन आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवारी (ता. १६) अंदमान, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या बहुतांशी भाग, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सूनने पुढे चाल केली आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. तर २६ मेपर्यंत संपूर्ण अंदमान बेटसमुह व्यापतो. यंदा मात्र मॉन्सून सोमवारी (ता. १६) अंदमानात दाखल झाला असून, १८ मे रोजी संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला आहे.
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील प्रवासही वेगाने होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह, दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. यातच मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाच्या चटक्याने लाहीलाही होत असताना मॉन्सूनच्या आगमनाची सर्वांनाच ओढ लागली आहे. यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील प्रवासही वेगाने होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसांत मॉन्सून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह, दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. यातच मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाच्या चटक्याने लाहीलाही होत असताना मॉन्सूनच्या आगमनाची सर्वांनाच ओढ लागली आहे. यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
302 views04:32
ओपन / कमेंट
2022-05-17 15:47:00 आजचा कृषी सल्ला
सुरु ऊस
हुमणी
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. मुळे खाल्लेली दिसून येतात. ऊस उपटला असता पिवळसर पांढऱ्या रंगाच्या अळ्या दिसून येतात.
नियंत्रण
शेतात रॉकेलमिश्रीत पाण्याच्या टाक्या ठेऊन त्यावर बल्ब लावल्यास, भुंगेरे त्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडून त्यांचे नियंत्रण होईल.
लागवड करताना प्रति एकरी मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना ८ किलो शेणखतातून किंवा शेणकाला करुन लागवडीच्या वेळी सरीमधून दिल्यास, हुमणीवर बुरशी वाढून प्रादुर्भाव कमी होतो.
निंबोळी पेंडीचा चुरा ८ क्विंटल प्रति एकरी जमिनीत मिसळावा.
कीडनाशकांचा वापर
- हुमणीग्रस्त क्षेत्रात प्रति एकरी फिप्रोनिल (०.३ जीआर) ८ किलो सरीमध्ये शेणखतामधून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे किंवा
- इमिडाक्लोप्रिड (४०%) + फिप्रोनिल (४०% डब्ल्यूजी) हे संयुक्त कीडनाशक एकरी १६० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून नोझल काढलेल्या पंपाने ओळीत आळवणी करावी किंवा
- क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ४०० मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (२०० एस.एल.) १२५ मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी उसाच्या बेण्याजवळ नाळे मारून आळवणी करावी. लगेच हलके पाणी द्यावे.
- शेताजवळील कडुनिंब, बोर आणि बाभळीच्या झाडावरील भुंगेरे नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस ४ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भात
सुधारित जाती
या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत. पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असल्यामुळे कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होते. त्यामुळे पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन, ते कमी कालावधीत निसवतात. यामुळे भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) अधिक मिळते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी
हळवा गट - फुले राधा
निमगरवा सुवासिक गट - इंद्रायणी, फुले समृध्दी, भोगावती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
हळवा गट - कर्जत १८४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी २४, कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी ५
निमगरवा गट – कर्जत ५, कर्जत ६, बी.ए.आर.सी.के.के.व्ही. १३, पालघर १
गरवा गट - रत्नागिरी २, रत्नागिरी ३, कर्जत २, कर्जत ८
संकरित गट – सह्याद्री १, सह्याद्री २, सह्याद्री ३, सह्याद्री ४, सह्याद्री ५
खार जमिनीसाठी - पनवेल १, पनवेल २, पनवेल ३
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
हळवा गट - साकोली ६, सिंदेवाही १
निमगरवा गट- साकोली ७, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही गणेश
गरवा गट - सिंदेवाही ४, सिंदेवाही ५, पीकेव्ही मकरंद
डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
प्रभावती, पराग, अंबिका, तेरणा
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
412 views12:47
ओपन / कमेंट
2022-05-17 14:10:15 *विद्राव्य खत व्यवस्थापन*
मार्गदर्शक -
श्री.संजय नैथाणी,
प्रमुख कृषी शास्त्रज्ञ,
*इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) फेसबूक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=523194262852354&id=1832292603705174
376 views11:10
ओपन / कमेंट
2022-05-17 08:54:53
415 views05:54
ओपन / कमेंट
2022-05-17 08:54:48 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र,बारामती, कृषिक ऍप व इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL) यांच्या संयुक्त विद्यमाने
“विद्राव्य खत व्यवस्थापन” फेसबुक लाइव्ह Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
*मार्गदर्शक* -
श्री.संजय बिरादार,
वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ,
इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड (ICL)*
*तारीख* - १७/०५/२०२२
*वार*- मंगळवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
*नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक*
https://forms.gle/VzWzAJuqEPcK2Pez8
*विनित*
*कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती*
ICL Fertilizers India
413 views05:54
ओपन / कमेंट
2022-05-17 07:36:17 मॉन्सून अंदमानात दाखल; पाच दिवस आधीच अंदमान, निकोबार बेटांवर हजेरी

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 17-May-22
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) सोमवारी (ता. १६) अंदमानात आगमन झाले आहे. आणखी दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण अंदमान बेट समूह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान, निकोबार बेटांवर पाच दिवस आधीच दाखल झालेला मॉन्सून २७ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैॡत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे वाढलेले प्रवाह, ढगांचे आच्छादन आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १६) अंदमान, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या बहुतांशी भाग, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सूनने व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण अंदमान बेटसमुह व्यापून बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मे पर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा १५ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र मॉन्सून सोमवारी (ता. १६) अंदमानात दाखल झाला आहे.
मॉन्सूनचे केरळमधील आगमन २७ मे पर्यंत होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला होता. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
401 views04:36
ओपन / कमेंट
2022-05-16 15:59:54 आजचा कृषी सल्ला
*हळद*
लागवड पद्धती
सरी-वरंबा पद्धत: सरी-वरंबा पद्धतीने लागवडीसाठी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार सहा ते सात सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५ ते ६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना ३० सें.मी. अंतरावर कंदांची लागवड करावी. कंदावर ३ ते ४ इंच माती येईल अशा पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८-२९,००० कंद लागतात.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत: ही पद्धत यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीद्वारे विद्राव्य खतेही देता येतात, उत्पादनात वाढ मिळते. या पद्धतीत ४ ते ५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंथरून घ्यावी. लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत, म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लावले जातात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
*आले*
लागवड पद्धती
सपाट वाफे पद्धत: पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत माती आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
सरी-वरंबा पद्धत: मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत: काळी जमीन, त���ेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने १५-२० टक्के अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादीवाफ्याची लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावायच्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५०-६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवून, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि कंदांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आले लावावे आणि लगेच पाणी द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
198 views12:59
ओपन / कमेंट
2022-05-16 10:01:18
602 views07:01
ओपन / कमेंट