Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला सुरु ऊस हुमणी या किडीच्या प्रादुर्भावामुळे प | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
सुरु ऊस
हुमणी
या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. मुळे खाल्लेली दिसून येतात. ऊस उपटला असता पिवळसर पांढऱ्या रंगाच्या अळ्या दिसून येतात.
नियंत्रण
शेतात रॉकेलमिश्रीत पाण्याच्या टाक्या ठेऊन त्यावर बल्ब लावल्यास, भुंगेरे त्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडून त्यांचे नियंत्रण होईल.
लागवड करताना प्रति एकरी मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना ८ किलो शेणखतातून किंवा शेणकाला करुन लागवडीच्या वेळी सरीमधून दिल्यास, हुमणीवर बुरशी वाढून प्रादुर्भाव कमी होतो.
निंबोळी पेंडीचा चुरा ८ क्विंटल प्रति एकरी जमिनीत मिसळावा.
कीडनाशकांचा वापर
- हुमणीग्रस्त क्षेत्रात प्रति एकरी फिप्रोनिल (०.३ जीआर) ८ किलो सरीमध्ये शेणखतामधून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे किंवा
- इमिडाक्लोप्रिड (४०%) + फिप्रोनिल (४०% डब्ल्यूजी) हे संयुक्त कीडनाशक एकरी १६० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून नोझल काढलेल्या पंपाने ओळीत आळवणी करावी किंवा
- क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ४०० मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (२०० एस.एल.) १२५ मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी उसाच्या बेण्याजवळ नाळे मारून आळवणी करावी. लगेच हलके पाणी द्यावे.
- शेताजवळील कडुनिंब, बोर आणि बाभळीच्या झाडावरील भुंगेरे नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस ४ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भात
सुधारित जाती
या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत. पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असल्यामुळे कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होते. त्यामुळे पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते. चुडांना प्रमाणात फुटवे येऊन, ते कमी कालावधीत निसवतात. यामुळे भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) अधिक मिळते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी
हळवा गट - फुले राधा
निमगरवा सुवासिक गट - इंद्रायणी, फुले समृध्दी, भोगावती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
हळवा गट - कर्जत १८४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी २४, कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी ५
निमगरवा गट – कर्जत ५, कर्जत ६, बी.ए.आर.सी.के.के.व्ही. १३, पालघर १
गरवा गट - रत्नागिरी २, रत्नागिरी ३, कर्जत २, कर्जत ८
संकरित गट – सह्याद्री १, सह्याद्री २, सह्याद्री ३, सह्याद्री ४, सह्याद्री ५
खार जमिनीसाठी - पनवेल १, पनवेल २, पनवेल ३
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
हळवा गट - साकोली ६, सिंदेवाही १
निमगरवा गट- साकोली ७, पीकेव्ही खमंग, पीकेव्ही गणेश
गरवा गट - सिंदेवाही ४, सिंदेवाही ५, पीकेव्ही मकरंद
डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
प्रभावती, पराग, अंबिका, तेरणा
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en