Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-06-03 14:20:59 *खरीप पिकांचे नियोजन फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी*
https://www.facebook.com/Krushikapp/videos/391765756300110/
440 views11:20
ओपन / कमेंट
2022-06-03 07:50:11 कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 03-Jun-22
पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. यातच विदर्भात उन्हाची ताप वाढत आहे. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उष्णतेची लाट आली अनुभवायला मिळाली. चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० पार पोचले आहे. तर पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मध्य महाराष्ट्रात तापमान ३७ अंशांच्या खाली आहे.
बुधवारी (ता. १) दुपारनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील अकोले येथे ५० मिलिमीटर, श्रीरामपूर येथे २० मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातील लातूरच्या उदगीर, औसा, परभणीतील धालेगाव, बीड मधील आंबेजोगाई येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आग्नेय उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. बंगालपासून आंध्रप्रदेश पर्यं��� हवेचा कमी दाहाचा पट्टा तयार झाला आहे. तर अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६, नगर ३५.१, धुळे ४०.५, जळगाव ४१.२, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर २४.६, नाशिक ३६.२, निफाड ३६.८, सांगली ३५.८, सातारा ३३.८, सोलापूर ३७.२, सांताक्रूझ ३४.०, डहाणू ३४.२, रत्नागिरी ३३.२, औरंगाबाद ३९.०, परभणी ४०.७, नांदेड ४०.८, अकोला ४३.७, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४४.८, गोंदिया ४४.८, नागपूर ४३.८, वर्धा ४४.०
मॉन्सून आगमनासाठी वाट पहावी लागणार : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुजरातच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल काहीशी थबकण्याची चिन्हे असून, महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी वाट पहावी लागणार आहे. मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडूतील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असून, ईशान्य भारतातील मणिपूर, नागालॅण्ड, मिझोराम राज्यात मॉन्सून दाखल झाला असून, बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने प्रगती केली असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
482 views04:50
ओपन / कमेंट
2022-06-02 14:52:34 आजचा कृषी सल्ला
सोयाबीन
सुधारित जाती
जात पिकाचा कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं./हे.)
केडीएस-७५३ ९५-१०० २५-३०
केडीएस-७२६ १००-१०५ २३-२५
केडीएस-३४४ १०५-११० २५-३०
डीएस-२२८ ९५-१०० २३-२५
केएस-१०३ ९५-१०० २५-३०
एएमएस-१००१ ९७ २२-२५
एएमएस-१००-३९ ९०-९५ २५-३०
एमएसीएस-११८८ १००-१०५ २५-३०
एमएसीएस-१२८१ ९५-१०० २५-३०
एमएसीएस-१५२० १००-१०५ २५-३०
एमएयूएस-७१ ९३-१०० २८-३०
एमएयूएस-८१ ९३-९७ २५-३०
एमएयूएस-१५८ ९३-९८ २६-३१
एमएयूएस-१६२ १००-१०३. २८-३०
एमएयूएस-६१२ ९३-९८ ३०-३५
जेएस-३३५ ९५-९८ २५-२८
जेएस-९३-०५ ९०-९५ २०-२५
जेएस-९५-६० ८२-८८ १८-२०
जेएस-९७-५२ ९८-१०२ २५-३०
जेएस २०-३४ ८६-८८ २०-२२
जेएस २०-२९ ९३-९६ २५-३०
जेएस २०-६९ ९३-९५ २५-३०
जेएस २०-११६. ९७-१०१ २५-३०
कापूस
वाणाची निवड
कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.
सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे.
आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे.
रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/ प्रतिकारक्षम वाण असावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणार्‍या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.
बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल.
वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकर्‍यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
225 views11:52
ओपन / कमेंट
2022-06-02 13:23:05 https://krushikapp.blogspot.com/2022/06/blog-post_1.html
225 views10:23
ओपन / कमेंट
2022-06-02 07:38:15 डॉ. रामचंद्र साबळे यांच्याकडून पावसाचा अंदाज जाहीर; जून महिन्यात खंडाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 02-Jun-22
पुणे : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साउथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी जाहीर बुधवारी (ता. १) केला. यंदा राज्यात सरासरीच्या १०१ टक्के पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रासाठी २०२२ वर्षासाठी जून ते सप्टेंबर मॉन्सून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. या वर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून महिन्यात येथे खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. तर कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड हवामानात राहतील.
यंदा पूर्व विदर्भ विभागात सर्वाधिक १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये शिंदेवाही (चंद्रपूर) येथे सरासरीच्या ११९१ मिलिमीटरपैकी १२२७ मिलिमीटर म्हणजेच १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य विदर्भ विभागात १०१ टक्के अंदाज व्यक्त केला असून, यवतमाळ केंद्राच्या परिसरात सरासरीच्या ८८२ मिलिमीटरपैकी ९०० मिलिमीटर म्हणजेच १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येईल. पश्‍चिम विदर्भ विभागात १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अकोला केंद्राचा समावेश येतो. पश्‍चिम, मध्य महाराष्ट्रात १००.३ टक्के पावसाची शक्यता असून, यामध्ये कोल्हापूर, कराड, पाडेगाव, सोलापूर, राहुरी, पुणे केंद्रांचा समावेश होतो. पाडेगाव, कोल्हापूर, कराड, राहुरी -सोनई, पुणे केंद्राच्या परिसरात शंभर टक्के पाऊस पडेल. तर सोलापूर केंद्राच्या परिसरात सर्वाधिक पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात, कोकण व मराठवाडा विभागातही १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात निफाड, धुळे, जळगाव, कोकण विभागात दापोली, मराठवाडा विभागांत परभणी केंद्राचा समावेश होतो.
राज्यातील केंद्रनिहाय जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पावसाचा अंदाज, टक्केवारीमध्ये :
विभाग --- सरासरी पाऊस, मिमी ------पावसाचा अंदाज -- सरासरीची टक्केवारी (± ५ %)
अकोला -- ६८३ --- ६८३ -- १००
नागपूर -- ९५८ --- ९५८ --- १००
यवतमाळ -- ८८२ --- ९०० -- १०२
शिंदेवाही (चंद्रपूर) -- ११९१ --- १२२७ ---१०३
परभणी, जालना --- ८१५ -- ८१५ --- १००
दापोली --- ३३३९ -- ३३३९ -- १००
निफाड --- ४३२ -- ४२३ --- १००
धुळे --- ४८१ --- ४९१ --- १०२
जळगाव -- ६४० -- ६४० --- १००
कोल्हापूर, शिरोळ --- ७०६ -- ७०६ -- १००
कराड, कृष्णा --- ६५० -- ६५० --१००
पाडेगाव, लाटे -- ३६० -- ३५० -- १००
सोलापूर --- ५४३ -- ५५४ -- १०२
राहुरी, सोनई --- ४०६ --- ४०६ -- १००
पुणे --- ५६६ --- ५६६ -- १००
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये सर्वच विभागांत शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, यवतमाळ, शिंदेवाही, धुळे, सोलापूर परिसरात सर्वाधिक पाऊस पडेल. खरिपात शेतकऱ्यांनी ६५ मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. याशिवाय धूळवाफ पेरणी करू नये. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व संस्थापक सदस्य, कृषी हवामान फोरम साऊथ आशिया
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
316 views04:38
ओपन / कमेंट
2022-06-01 15:19:03 आजचा कृषी सल्ला
आंबा
फळे काढल्यानंतर झाडाच्या आतल्या व बाहेरच्या बाजूच्या मेलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाच्या मधल्या मुख्य फांदीची छाटणी करावी. जर मधल्या मुख्य फांदीची छाटणी यापूर्वीच केली असेल तर अशा ठिकाणची पाहणी करून पुन्हा जर फांद्या वाढल्या असतील तर त्यांची छाटणी आवश्यक आहे. जेणेकरून झाडांमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. ज्या फांद्यांवर फळे धरली होती, अशा फांद्या सुमारे ३० ते ४५ सें.मी. अंतरापर्यंत पाठीमागे कापाव्यात. जर झाडावरती फांद्या घन झाल्या असतील तर अशा फांद्यांची विरळणी करावी.
संत्रा-मोसंबी-लिंबू
पीक संरक्षण
रोग व्यवस्थापन
झाडावरील फांद्या कापणीनंतर, कात्रीला सोडियम हायपोक्लोराइट १-२ टक्के द्रावणामध्ये बुडवून निर्जंतुकीकरण करावे.
झाडाच्या बुंध्यावर दोन फूट उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट ब्रशच्या साह्याने लावावी.
झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास, तो तीक्ष्ण चाकूने खरवडून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २०० ग्रॅम किंवा फोसेटील ए.एल. २०० ग्रॅम प्रति २५० मि.लि. पाण्यात मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट डिंक्या झालेल्या ठिकाणी लावावी.
फायटोफ्थोराग्रस्त झाडावर मेटॅलॅक्झिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील ए.एल. २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून फवारणी करावी. फवारणी करताना संपूर्ण झाड ओले होईल, असे पाहावे. उर्वरित द्रावणाची झाडाभोवती आळवणी करावी.
कीड व्यवस्थापन
खोडकिडा/ ईंडरबेला/ साल खाणारी अळी- अळीने पाडलेल्या छिद्रातील साल काढावी. इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे.
पिठ्या ढेकुण- झाडाभोवतीची जमीन चाळणी करून मोकळी करावी. झाडाच्या खोडाला प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून त्यावर ग्रीस लावावे. पिठ्या ढेकुण वाहून नेण्याचे काम मुंग्या करतात, त्यामुळे मुंग्यांची वारुळे बागेमध्ये असल्यास नष्ट करावीत. त्यासाठी क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी हे द्रावण मुंग्यांच्या वारुळातून टाकावे. झाडावर व झाडाच्या बुंध्यावर क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
367 views12:19
ओपन / कमेंट
2022-06-01 08:14:01 मॉन्सूनचा यंदा १०३ टक्के पाऊस; हवामान विभागाचा सुधारित अंदाज जाहीर

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 01-Jun-22
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) (आयएमडी) मंगळवारी (ता. ३१) जाहीर केला. या अंदाजात चार टक्क्यांची कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
‘स्टॅटेस्टिकल फोरकास्टिंग सिस्टिम आणि मल्टी मॉडेल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम या मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३६ टक्के), तर दुष्काळाची शक्यता ५ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे वितरण चांगले राहण्याची शक्यता आहे. यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशाची पूर्व-मध्य, पूर्व, ईशान्य, दक्षिण द्वीपकल्पाच्या नैॡत्य भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज :
विभाग---अंदाज
वायव्य भारत---९२ ते १०८ टक्के
मध्य भारत---१०६ टक्के
दक्षिण भारत---१०६ टक्के
ईशान्य भारत---९६ ते १०६ टक्के
एल निनो स्थिती सर्वसामान्य : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या मध्यम ला निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जून महिन्यात पाऊस सरासरी ग���ठणार : यंदाच्या जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य, मध्य भारतासह, दक्षिण भारताच्या उत्तर भाग, पूर्व भारतातील राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो.
महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत : मध्य भारतात १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडणार आहे. संपूर्ण मॉन्सून हंगामाचा विचार करता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यातही राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
378 views05:14
ओपन / कमेंट
2022-05-31 15:50:34

160 views12:50
ओपन / कमेंट
2022-05-31 13:52:03 *गुणवत्तापूर्ण खरीप कांदा उत्पादन फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हा*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=539553277777049&id=1832292603705174
198 views10:52
ओपन / कमेंट
2022-05-31 07:20:05
276 views04:20
ओपन / कमेंट