Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-06-07 14:46:05 आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
नवीन बागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा, मोसंबी बाग लागवडीच्या जमिनीची खोली कमीत कमी एक मीटर असावी. मात्र एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये संत्रा, मोसंबी लागवड केल्यास योग्यप्रकारे खते व मशागतीचा अवलंब करावा लागतो. निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी, ८.३ पेक्षा कमी सामू असणारी, १२ टक्क्यांपेक्षा कमी मुक्त चुनखडीचे प्रमाण असणारी आणि स्थिर पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक असलेल्या जमिनीची निवड करावी.
मे महिन्यात खोदून ठेवलेले खड्डे भरून घ्यावेत. खड्डे भरतांना त्यांत दोन भाग पृष्ठभागावरील गाळाची माती, एक भाग वाळू आणि एक भाग कुजलेले शेणखत अधिक १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ किलो निंबोळी पेंड व १०० ग्रॅम क्लोरपायरिफॉस भुकटी एकत्र मिसळून खड्डे भरावे.
*आंबा*
कोय कलम
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी व सोपी पद्धत वापरून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे करता येतात. या पद्धतीत सुमारे ७०-८०% यश मिळते. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५-२० दिवसांचे, पाने व देठाचा रंग तांबडा असलेले रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. रोपाचा खालचा ७-९ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे ४-६ सें.मी. लांबीचा उभा काप घ्यावा. तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि फुगीर डोळ्याची , १०-१५ सें.मी लांबीची काडी घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालून ४-६ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घेऊन आकार द्यावा. ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. जाड काडीसाठी एक बाजू रोपाच्या सालीस जुळवून घ्यावी. कलमाचा जोड २ सें.मी. रुंद व २० सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. बांधलेली कलमे १४ x २० सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड २-५ सें.मी. मातीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे, मात्र पाणी कलमांच्या जोडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या फुटीवरील पाने गर्द हिरवी झाल्यावर कलमे हळूहळू मोकळ्या जागी उघड्यावर आणावीत. कलमाच्या जोमदार वाढीसाठी आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या ५०% गोमुत्राची फवारणी (२० मि.लि.) व ५०% गोमुत्राची (१०० मि.लि.) प्रति पिशवीत भिजवण महिन्यातून एकदा अशी तीन महिने करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
368 views11:46
ओपन / कमेंट
2022-06-07 07:30:15 ‘पूर्वमोसमी’ला पोषक हवामान

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 07-Jun-22
पुणे : उष्ण लाटेने (Heat Wave) विदर्भ होरपळत असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, अकोला, अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, उकाडा चांगलाच वाढत आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशापासून बांगलादेशापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आज (ता. ७) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, धुळे ४१.०, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर ३०.२, नाशिक ३६.८, निफाड ३७.२, सांगली ३५.९, सातारा ३८.१, सोलापूर ४१.८, सांताक्रूझ ३४.१, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४१.२, परभणी ४३.३, नांदेड ४१.०, अकोला ४४.८, अमरावती ४४.२, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४६.२, चंद्रपूर ३५.४, गोंदिया ४६.२, नागपूर ४५.२, वर्धा ४५.०
कोकणातील मॉन्सून आगमनाचा मुहूर्त टळणार : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमनही लांबले आहे. साधारणतः ७ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळणार आहे. यातच संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर या भागातही मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
वादळी पावसाचा इशारा :
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
79 views04:30
ओपन / कमेंट
2022-06-06 15:48:57
280 views12:48
ओपन / कमेंट
2022-06-06 15:48:19 सस्नेह नमस्कार,
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र,बारामती
कृषिक अॅप, यांच्या तर्फे आयोजित
“ सोयाबीन लागवड तंत्रज्ञान” * या विषयावर परिसंवाद "फेसबुक लाइव Facebook Live* च्या माध्यमातून
*लाईव्ह ऑन*
https://www.facebook.com/krushikapp
मार्गदर्शक- श्री. महेश जाधव
फार्म मॅनेजर
(अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट
ट्रस्ट, बारामती)
*तारीख* - ०८/०६/२०२२
*वार*- बुधवार
*वेळ* - दुपारी ४ ते ५
विनित,
कृषिक ऍप, कृषी विज्ञान केंद्र, बारामती
सदरची लिंक सर्व शेतकरी,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पोहचवावी ही विनंती
280 views12:48
ओपन / कमेंट
2022-06-06 15:35:23 *आजचा कृषी सल्ला*
*पशु संवर्धन :-*
पैदाशीसाठी वळूची निवड
सर्वोत्तम वळू तयार करणे हे अवघड, खर्चिक व खूप वेळ लागणारे काम आहे. त्यामुळे हा उपक्रम शासकीय, निमशासकीय संस्था व खासगी कंपन्या करू शकतात. परंतु त्यांच्याकडे असलेल्या कोणत्या वळूची निवड आपण करायची?, हे पशुपालकांनी गोपैदासीच्या धोरणानुसार ठरवावे.
आपल्या गोठ्यावरील आहे त्याच गाई पुढील पिढी तयार करण्यासाठी वापराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गाईला कोणता वळू वापरून कृत्रिम रेतन करायचे हे आपण ठरवले पाहिजे.
वळूची निवड करताना गाय ज्या जातीची आहे, त्याच जातीच्या वळूची निवड करावी. वळूच्या दुग्धोत्पादन क्षमतेबद्दलचे पैदास गुणांकन हे गाईपेक्षा अधिक आहे हे निश्चित करावे.
वळूतील दुग्धोत्पादन वाढवणारे जे गुण आहेत ते पुढील पिढीत पाठवण्याचे प्रमाण किती आहे? याचा अभ्यास झालेला असला पाहिजे, यासाठी जनुकीय चाचणी केलेला किंवा सिद्ध वळूचा वापर करावा.
वळू वापरताना वळूमातेचे, त्याच्यापासून जन्मलेल्या कालवडीचे दूध उत्पादन, शारीरिक ठेवण, कासेची ठेवण, कासदाहाचे प्रमाण इत्यादी बाबींची माहिती करून घ्यावी. सर्वोत्तम वळू आपल्या गोठ्यावर वापरावा.
वळू निवडताना फक्त दूध उत्पादनच बघू नये, त्याचे इतर आनुवंशिक गुणसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
योग्य वळूची निवड केल्यास गाईमधील नको असलेले गुणधर्म कमी होऊन चांगले गुण कालवडीमध्ये आपोआप येतील. फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी आवश्यक कालवडी गोठ्यात जन्माला येतील.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
257 views12:35
ओपन / कमेंट
2022-06-06 10:16:24
293 views07:16
ओपन / कमेंट
2022-06-06 10:16:23 *"प्रिव्हेंटिव्ह(एल)"*_
पिकांची रोगप्रतिकारकक्षमता वाढवून उत्पादनात वाढ.. आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह (एल)*
*करपा,आकसा,व्हायरस,लाल्या,भुरी, डावणी,पिवळेपणा* पासून पिके वाचवा.
*(सर्व पिकांसाठी)*

9075099544
9145499544
*व्हॉटसअप करा*
https://wa.me/919075099544
https://wa.me/919145499544
283 views07:16
ओपन / कमेंट
2022-06-06 08:38:36 मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 06-Jun-22
पुणे : उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. ६) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४५.��� अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, अकोला येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आज (ता. ६) राज्यात उन्हाचा चटका राहणार असून, विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.७, धुळे ४०.०, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३३.९, महाबळेश्वर २९.०, नाशिक ३६.१, निफाड ३७.४, सांगली ३५.५, सातारा ३७.६, सोलापूर ३९.६, सांताक्रूझ ३४.०, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३४.५, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.७, नांदेड ४०.८, अकोला ४४.२, अमरावती ४३.८, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४४.५, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ४५.६, नागपूर ४५.३, वाशीम ४१.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४२.५
मॉन्सून आगमन लांबले : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्याने कोकणात मॉन्सून लवकर दाखल होण्याची स्थिती होती. मात्र मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रावरून प्रगती थांबल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबले आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाला.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.
वादळी पावसाचा इशारा :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
303 views05:38
ओपन / कमेंट
2022-06-04 15:07:11 *आजचा कृषी सल्ला*
*कापूस*
लागवडीची वेळ
पाऊस व हवामानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये लागवडीच्या वेळेत काहीसा बादल केला जातो. विभागनिहाय लागवडीची वेळ खालीलप्रमाणे
मराठवाडा
बागायती (पूर्वहंगामी) – १ ते ७ जून (तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यावर)
कोरडवाहू – मॉन्सूनचा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावर (१५ जुलैपर्यंत)
विदर्भ
बागायती (पूर्वहंगामी) – २० ते ३० मे (तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यावर)
कोरडवाहू – १५ ते ३० जून
खानदेश व पश्चिम महाराष्ट्र
बागायती – २० मे ते ७ जून
*गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी बागायती (पूर्वहंगामी) लागवड १ जूननंतरच करावी.
*सोयाबीन*
पेरणीची वेळ
पावसाला सुरूवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत आणि ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची व उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
440 views12:07
ओपन / कमेंट
2022-06-04 07:53:44 *उष्ण लाटेने विदर्भ होरपळला*

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 04-Jun-22
पुणे : मॉन्सूनचे) आगमन काही दिवसांवर आले असतानाच, राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः होरपळून निघाला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही उष्ण लाट होती. आज (ता. ४) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर सरकला होता. विदर्भात कमाल तापमान ३९ ते ४७ अंश, मराठवाड्यात ४० ते ४२ अंश, मध्य महाराष्ट्रात २८ ते ३९ अंश, तर कोकणात ३२ ते ३४ अंशांच्या आसपास होते. आज (ता. ४) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्डपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्‍चिम सक्रिय आहे. पश्‍चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर ओडिशा किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या शिवाय अंदमान समुद्र आणि श्रीलंकेजवळ देखील चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.
शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.७, नगर ४०.२, धुळे ४१, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३५.३, महाबळेश्‍वर २८.७, नाशिक ३६.२, निफाड ३६.६, सांगली ३७.३, सातारा ३६.७, सोलापूर ३९.४, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.७, नांदेड ४०.८, अकोला ४३.३, अमरावती ४४.०, बुलडाणा ३९.४, ब्रह्मपुरी ४५.३, चंद्रपूर ४६.८, गोंदिया ४४.८, नागपूर ४५, वाशीम ४१.५, वर्धा ४५.४, यवतमाळ ४३.७
राज्यात शुक्रवारी सकाळी आठपर्यंत पाऊस मिलिमीटरमध्ये ः सिंधुदुर्ग ः रामेश्‍वर ९०, वैभववाडी ५०, कोल्हापूर ः शिरोळ ५०, कोल्हापूर ४०, गगनबावडा व पन्हाळा प्रत्येकी ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सांगलीच्या कसबे डिग्रजला ३० मिलिमीटर पाऊस पडला.
मॉन्सूनने ईशान्य भारत व्यापला : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान नसल्याने अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी वाट पाहावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरावरून मात्र मॉन्सूनची आगेकूच सुरू असून, संपूर्ण ईशान्य भारत व्यापून, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
432 views04:53
ओपन / कमेंट