Get Mystery Box with random crypto!

कृषिक अँप Krushik app

टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
टेलीग्राम चैनल का लोगो krushikappkvk — कृषिक अँप Krushik app
चैनल का पता: @krushikappkvk
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.05K
चैनल से विवरण

Krushik app

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-08-18 07:57:10 ‘केंद्रा’ची पीककर्ज व्याज सवलत योजना पुन्हा लागू

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 18-Aug-22
पुणे : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर मागे घेतला आहे. आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्क्यांपर्यंत व्याज सवलत देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
व्याज सवलत योजना बंद करण्यात येत असल्याचे केंद्राने काही महिन्यांपूर्वी घोषित केले होते. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के दरात तीन लाखांपर्यंतचे कर्ज देता येणार नाही, असे देशातील जिल्हा बॅंकांच्या लक्षात आले होते. याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ही बाब माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर श्री. पवार यांनी पाठपुरावा सुरू केला. तसेच बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना प्रत्यक्ष भेटून या समस्येबाबत निवेदन दिले. दुसऱ्या बाजूने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वस्तुस्थितीची माहिती करून देण्यात आली. त्यामुळे केंद्राने व्याज सवलत योजना चालू ठेवण्यास मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१७) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित व्याज सवलत योजनेस मान्यता दिली गेली. २०२२ ते २५ या कालावधीसाठी अल्पमुदत शेतीकर्ज पुरवठ्यासाठी ३४,८५६ कोटी रुपयांची व्याज सवलत मिळणार आहे. मात्र ही सवलत दोन ऐवजी आता केवळ दीड टक्के मिळेल. बॅंकांची कोंडी करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे. अर्थात, या निर्णयामुळे बॅंका आता एकदम आर्थिक संकटात सापडणार नसून अर्धा टक्का तरतूद स्वखर्चातून करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून अल्पमुदत पीककर्जाचा पुरवठा थेट शेतकऱ्यांना केला जात नाही. त्याऐवजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत गावपातळीवर कर्जवाटप होते. त्यासाठी जिल्हा बॅंका चार टक्के व्याजाने सोसायट्यांना कर्ज देतात. हेच कर्ज सोसायट्यांकडून सहा टक्के व्याजाने शेतकऱ्यांना दिले जाते. तीन लाखांपर्यंतचे कर्जवेळेत फेडल्यास तीन टक्के व्याज सवलत केंद्राकडून, तर तीन टक्के व्याज सवलत राज्याकडून सध्या मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने पीककर्ज मिळते.
बॅंकांच्या म्हणण्यानुसार, केंद्राने व्याज सवलत योजना रद्द केल्यामुळे बॅंकांचा निधी उभारणी खर्च वाढला असता. आता तो भरमसाट न वाढता किरकोळ स्वरूपाचा होईल. या निर्णयाचा लाभ सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील बँका, लहान पतपुरवठादार बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि संगणकीकृत प्राथमिक कृषी पतपुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
केंद्राच्या योजनेची अशी आहेत वैशिष्ट्ये...
- तीन लाखांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज वेळेत फेडल्यास दीड टक्का व्याज सवलत
- व्याज सवलत योजनेचे (आयएसएस) नाव आता सुधारित व्याज सवलत योजना (एमआयएसएस) असेल.
- ही कर्ज योजना पशुसंवर्धन, डेअरी, मत्स व कुक्कुट उद्योगातील शेतकऱ्यांना मिळेल.
- व्याजाचा दर सात टक्के असेल. मात्र त्यात तीन टक्के तत्काळ परतफेड सवलत (पीआरआय) असेल. म्हणजेच वेळेत कर्ज फेडल्यास फक्त चार टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल.
(टीप : योजनेतील सविस्तर वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सोसायट्या/बॅंकांशी संपर्क साधावा.)
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
566 views04:57
ओपन / कमेंट
2022-08-17 07:56:57 *नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार- मुख्यमंत्री*

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 17-Aug-22
मुंबई, दि. 16 : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांन�� एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सहकारमंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टरऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट इतकी सवलत कायम, लघु दाब जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर जून 2021 पासून नव्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या भागामधील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या असल्याने त्या त्या भागातील पंचनामे पूर्णत्वाकडे आहेत. याबाबत तातडीने मदत करण्यात येईल. ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल. जनतेच्या हितासाठी हे सरकार असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून पुनर्विलोकन ते करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले.
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
577 views04:56
ओपन / कमेंट
2022-06-23 08:19:48

112 views05:19
ओपन / कमेंट
2022-06-23 07:09:34 कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

सौजन्य : महासंवाद
दिनांक : 23-Jun-22
मुंबई, दि. 22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येईल.
2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल.
मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
159 views04:09
ओपन / कमेंट
2022-06-22 15:22:22 आजचा कृषी सल्ला
कांदा
खरीप कांद्याकरिता जमिनीची निवड
कांद्याची मुळे २५ सें.मी. खोलीपर्यंत वाढतात. मुळांभोवती योग्य प्रमाणात ओलावा आणि हवा असेल तर मुळांची वाढ चांगली होते. कांदा पिकाला उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमीन लागते. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते. भारी जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही. अशा जमिनीत खरीप कांद्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. चोपण, क्षारयुक्त जमिनीत कांदा चांगला पोसत नाही.
टोमॅटो
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.
सेंद्रिय खते - प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड
रासायनिक खते - मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
याशिवाय प्रति एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट, २ किलो बोरॅक्‍स आणि १० किलो मॅग्नेशियम सल्फेट ही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावीत.
जैविक खते – प्रति एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व २ किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
156 views12:22
ओपन / कमेंट
2022-06-22 14:02:51 ऊस पिकातील खत व्यवस्थापन फेसबुक लाइव्ह मध्ये सहभागी व्हा
https://www.facebook.com/Krushikapp/videos/566203021747598/
174 views11:02
ओपन / कमेंट
2022-06-22 09:14:28
247 views06:14
ओपन / कमेंट
2022-06-22 09:14:02 *टोमॅटो*
*करपा, आकसा, व्हायरस, पिवळेपणा* नियंत्रणासाठी....
आजच वापरा *प्रिव्हेंटिव्ह* *(एल)* आयुर्वेदिक स्प्रे पावडर.

*फायदे -*
पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवा.
अधिक फुटी, फुले व फळ धारणा.
फल - फळ गळ नियंत्रण.

*(सर्व पिकांसाठी उपयुक्त)*
+91 9075099544
+91 9145499544

https://wa.me/919075099544 (What's app)
https://wa.me/919145499544 (What's app)
243 views06:14
ओपन / कमेंट
2022-06-20 15:23:37 आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
दुभत्या जातिवंत गाई, म्हशींची नवीन पिढी आपल्या गोठ्यावरच तयार करावी. कालवडीचे वजन जितक्या लवकर २४० ते २५० किलो होईल, तितक्या लवकर आपण ती माजावर आल्यावर कृत्रिम रेतन करू शकतो. त्यासाठी गाय विल्यानंतर वासराला लगेच चीक पाजावा. वजनाच्या १० टक्के दूध दररोज दोन वेळेस विभागून द्यावे. त्यामुळे वासराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. युरियायुक्त पशुखाद्य किंवा चारा वासरांना वयाच्या सहा महिन्यांपर्यंत देऊ नये. तोपर्यंत त्यांना काल्फ स्टार्टर पशुखाद्य देता येईल. कालवडीचे वजन लवकर वाढावे यासाठी दररोज पशुखाद्य, हिरवा व कोरडा चारा, खनिजांचे योग्य प्रमाणात द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
44 views12:23
ओपन / कमेंट
2022-06-20 08:18:11 ‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ मोहीम; कृषी संचालक विकास पाटील यांची माहिती

सौजन्य : पुढारी
दिनांक : 20-Jun-22
पुणे : ‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ अशी मोहीम खरीप हंगामात राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी दिली. सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येणार आहे. याद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, पोषण मूल्य, दुष्काळात तग धरणारी पिके या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे. काळाच्या ओघात पिकांची उत्पादकता कमी आल्याने व इतर गळीत धान्य, नगदी पिकांवर भर दिल्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.
या पिकांचे महत्त्व लक्षात घेता त्यांना चालना देण्याच्या सूचना सर्व जिल्हा कृषी अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या भागातील वाढीस अनुकूल असलेल्या पौष्टिक तृणधान्यांचे पीक निवडून त्यांचे मिनी किट स्वरूपात वाटपाबाबत सलग, आंतरपीक, मिश्रपीक, बांधावर पेरणी पध्दतीने त्यांची लागवड करण्यास उद्युक्त करण्यात यावे. ज्यात कोरडवाहू भागात बाजरी व ज्वारी, पश्चिम घाट प्रदेशात नाचणी, वरई व राळा आदींचा समावेश आहे.
शेतकर्‍यांना बियाण्यांचे मिनी किट मोफत : प्रत्येक शेतकर्‍याला बियाण्यांचे पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाचे मिनी किट तयार करून मोफत देण्यात यावे. यासाठी बियाण्यांची उपलब्धता महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून घेण्यात यावी. त्यांच्याकडून बियाणे उपलब्ध न झाल्यास शेतकरी उत्पादक कंपन्या व स्थानिकरीत्या बियाणे उपलब्ध करून त्यांना मिनी किट देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत वाटप केलेल्या मिनी किटची लागवड शेतकरी करतील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en
189 views05:18
ओपन / कमेंट