Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला कांदा खरीप कांद्याकरिता जमिनीची निवड कांद्य | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
कांदा
खरीप कांद्याकरिता जमिनीची निवड
कांद्याची मुळे २५ सें.मी. खोलीपर्यंत वाढतात. मुळांभोवती योग्य प्रमाणात ओलावा आणि हवा असेल तर मुळांची वाढ चांगली होते. कांदा पिकाला उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमीन लागते. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते. भारी जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही. अशा जमिनीत खरीप कांद्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. चोपण, क्षारयुक्त जमिनीत कांदा चांगला पोसत नाही.
टोमॅटो
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.
सेंद्रिय खते - प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड
रासायनिक खते - मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
याशिवाय प्रति एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट, २ किलो बोरॅक्‍स आणि १० किलो मॅग्नेशियम सल्फेट ही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावीत.
जैविक खते – प्रति एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व २ किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en